Halloween Costume ideas 2015
Latest Post


कोणत्याही राष्ट्राच्या नागरिकांची परीक्षा त्यांच्यावर आपत्ती कोसळल्यास घेतली जाते. कोरोनाच्या जीवघेण्या संकटाने भारतीय समाजाची परीक्षा घेतली, यात दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो. देशात नव्याने अस्तित्वात आलेल्या लॉबीजनी मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णांचा श्वास हिरावून घेत बाजारात विकला. रेमडेसीवीर इंजेक्शन मधील डॉक्टरांच्या लॉबीने अब्जावधी कमवल. या औषधाचा कोरोनात उपयोग नसताना 1000-1200 चे इंजेक्शन 50 हजारापर्यंत विकले. इबोलासाठी विकसित औषधाला काडीची किंमत नव्हती. ती कमाई कोरोना रूग्णाच्या खिशातून पैसे काढून जगभराच्या डॉक्टरांनी किती कमवले याचा अंदाज नाही. औषध कंपन्या पेक्षाही जास्तच.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री एका टीव्ही वाहिनीला मुलाखत देताना म्हणाल्या की, ते शासनाकडून एक पैसा सुद्धा पगाराचा घेत नाहीत. इकॉनॉमी क्लासमध्ये स्वतःच्या खर्चाने प्रवास करतात. शासनाची गाडी वापरत नाहीत ना बंगला. स्वतःच्या घरात राहतात. प्रश्न असा पडतो त्यांना हेच करायचे होते तर सत्ता कशाला हवी होती. मूर्ख माणसाचाही विश्वास बसणार नाही अशा गोष्टी त्या मुलाखतीत म्हणत होत्या ! गाडी, बंगला, गलेलठ्ठ पगार व अन्य कोट्यावधीच्या सुविधांसाठी तसेच मनसोक्त भ्रष्टमाया कमाविण्यासाठी तर लोक जिवाची बाजी लावून निवडणुका लढतात. घोडेबाजार करतात, स्वतला विकतात पण काहीही करून एकदा आमदार, खासदार होतात आणि आपल्या पुढच्या पाच-पन्नास पिंढ्यासाठी जमीन-जुमल्यासह इतर मालमत्ता कमावतात. जर का नशिबानं मंत्रीपद मिळाले तर मग काही विचारच करायचा नाही. किती पिढ्यांच्या थाटा-माटात जगण्याची सोय होते हे त्यांचे त्यांनाच माहीत. आपण एकदाचे सत्तेबाहेर पडलेच तर आपली मुलं आहेतच बापाचा वारसा सांभाळण्यासाठी. अर्थातच हा सगळा खटाटोप ही मंडळी देशसेवेसाठी करत असतात याची जाणीव आपल्याला असणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ ममता बॅनर्जी देशसेवा करत नाही असा तर होत नाही ना. त्यांना राज्याच्या तिजोरीतून काहीच घ्यायचे नव्हते तर त्या रिंगणात उतरल्याच कशाला. हे कोडं समजण्यासारखा नाही. असो ही विचारधारा ममता बॅनर्जींची असेल. ज्याचे त्याला विचारांचे स्वातंत्र्य असायलाच हवे. त्या सरकारच्या  तिजोरीतून घेत नाहीत म्हणून इतर मंत्र्यांनी राज्यात असो की केंद्राच्या त्यांनी ही विचारधारा का बरे अमलात आणावी. कुणी शासनाचा बंगला घेत नाही, कुणी स्वतःसाठी देशात लाखो लोक हवेसाठी तडफडत मरत असताना स्वतःसाठी कोट्यावधी रुपयांचा महाल बांधतात अर्थातच ही त्यांची स्वतःची म्हणा किंवा त्यांच्या पाठीशी असलेल्या संघाची मना. त्यांची विचारधारा लोक मरत असतील तर ते म्हणणारच कारण ते याच लायकीचे आहेत, असे त्या विचारधारेच्या एका व्यक्तीनं आधीच जाहीर केलेला आहे. म्हणजेच कुणी माणसांना जगण्यासाठी धडपड करतो तर कोणी माणसांचा जीव गेला तर त्यांच्यावर याचा काहीच परिणाम होत नाही. परिणामासाठी त्यांनी आपली विचारधारा का बदलावी. त्यांनाही त्यांच्या विचारधारेचे स्वतंत्र आहे की नाही. मग त्यांना वाईट म्हणण्यात किंवा ममता सारख्या अविश्वसनीय नेत्याची प्रशंसा करण्यात काय अर्थ. ममतादीदी इथेच थांबल्या नाहीत त्या पुढे म्हणाल्या की, ते स्वतःचा खर्च भागविण्यासाठी पुस्तकांच्या रॉयल्टी कामात आणतात त्याचबरोबर ते संगीतही देतात आणि लिहितात, पेंटिंग करतात अशा व्यक्तीने राजकारणात आणि सत्तेत यायचेच कशाला. त्या आल्या नसत्या तर आज भाजपाला पश्चिम बंगालचा मुलूख राज्य करायला मिळाला असता. त्यांचा हक्क का बरे दीदींनी गिळून टाकला. किती आटापिटा करून निवडणुका लागल्या होत्या. ऐन कोरोनाच्या काळात लोक मरत असताना देखील त्यांची पर्वा नाही केली. या निवडणुकांमुळे कोरोनाचा विस्फोट झाला. एका नेत्याच्या म्हणण्यानुसार दररोज दहा हजार लोक मृत्युमुखी पडतात ही गोष्ट नेत्यांना माहीत नसेल का जे काही होत आहे ते त्यांच्या विचारधारेप्रमाणे होत आहे. त्यांना हेच हवे असेल तर त्यांना दोष देण्यात काय उपयोग. सगळ्यांनी ममता सारखे होऊन सत्तेत उपाशी राहावं असं कधी होत असतंय का? अशा माणसात असून सुद्धा त्या साहित्य लिहितात, चित्र रंगवितात, संगीत देतात, गाणी लिहितात हे सगळं इतरांना कसे जमणार, त्यांना जे जमतं ते करत आहेत, लोक मरताहेत हे पुरेसे नाही काय?

विनोदाची बाजू सोडून आता इतर गोष्टी असे नाही की फक्त सत्ताधारी हे सगळ करतात, या देशाचे नोकरशहा की ज्यांच्यावर आजवरची देखभाल करण्याची जबाबदारी आहे ते लोक असो की वेगवेगळ्या खात्याचे शासकीय अधिकारी असोत ते सर्व दोषी नसतील पण त्यांच्यासोबत बरेच जण या कोरोना मृत्यूला जबाबदार आहेत. ते जे काही करत आहेत उदा विशिष्ट विचारधारेच्या सत्ताधाऱ्यांचा पायंडा पडत असतील, त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांना लोक हवेसाठी (ऑक्सिजन ) मरत असताना हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सिलेंडर आपल्या जीव सोडत असताना आजारींना न देता बाहेर काळ्याबाजारात सिलिंडर विकत आहेत. हॉस्पिटल मधल्या कुणा आजारीन जर पैसे दिले तर त्यांना सिलेंडर आणून देतात. असा जगाच्या कोणत्याही देशात, जनसमुहात, राष्ट्रात ऐकायला देखील मिळत नाही. देशाला स्वतंत्र देताना ब्रिटिशचे त्यावेळचे पंतप्रधान म्हणाले होते की, आपण स्वातंत्र्य तर देत आहोत पण या देशातला शासक भाजी भाकरी वर देखील टॅक्स आकारतील. त्यांना त्यावेळी कोरोना आणि ऑक्सिजनचा किती घनिष्ट संबंध आहे हे माहीत नव्हते. असते तर ते म्हणाले असते की श्वास घ्यायला हवा सुद्धा ते पैसे घेऊन देतील.

या देशाची जनता गरीबातली गरीब आहे. त्यांना त्यांचे अधिकार काय आहेत तेच माहीत नाही. तर ते मागणार काय आणि कुणाकडून, कोणी मागितलेच तर मग त्यांना जेलची कोठडीे आहेच. अशात गरज आहे या देशात एका सेवाभावी समुदायाने पुढे येण्याची. देशातल्या गरीब जनतेची सेवा करण्याची, त्यांना अन्न पाणी देण्याची, आजारी पडल्यास त्यांना औषध उपचार करण्याची, या व्यतिरिक्त आणखी दुसरे त्यांचे स्वप्नच नाहीत. नशिबाने शिक्षण मिळालेच तर ते लाखमोलाचे.

आमच्या मते या कार्यासाठी मुस्लिमांनी पुढे यावे. या बदल्यात त्यांना काही मागू नये. शासनातल्या नोकऱ्याचा विचार सोडून द्यावा. कोणत्या योजना, त्यांचे काय लाभ सगळं काही विसरून अहोरात्र या देशाच्या दीनदुबळ्यांची सेवा करावी. असे एक उदाहरण आपल्या महाराष्ट्रात मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅन्ड जस्टीसचे आहे. ते आपल्या साधनानुसार गेली 10-15 वर्षे काम करत आहेत. इतर संस्था ही असतील पण ही संस्था आमच्या परिचयाची. अशा संस्था देशभर उभाराव्या. यासाठी मुस्लिमांनी पुढे यावे. अल्लाहच्या कारणास्तव सेवा करावी. बाकी कशाचा विचार करू नये.

कोणत्याही राष्ट्राच्या नागरिकांची परीक्षा त्यांच्यावर आपत्ती कोसळल्यास घेतली जाते. कोरोनाच्या जीवघेण्या संकटाने भारतीय समाजाची परीक्षा घेतली, यात दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो. देशात नव्याने अस्तित्वात आलेल्या लॉबीजनी मृत्यूशी झुंज देत असलेल्या रुग्णांचा श्वास हिरावून घेत बाजारात विकला. रेमडेसीवीर इंजेक्शन मधील डॉक्टरांच्या लॉबीने अब्जावधी कमवल. या औषधाचा कोरोनात उपयोग नसताना 1000-1200 चे इंजेक्शन 50 हजारापर्यंत विकले. इबोलासाठी विकसित औषधाला काडीची किंमत नव्हती. ती कमाई कोरोना रूग्णाच्या खिशातून पैसे काढून जगभराच्या डॉक्टरांनी किती कमवले याचा अंदाज नाही. औषध कंपन्या पेक्षाही जास्तच.



2015 च्या एका अभ्यासानुसार संपूर्ण जगात जवळपास 180 कोटी इस्लामधर्मीय आहेत. म्हणजे विश्व लोकसंख्येच्या 24.1% इस्लामधर्मीय मुस्लिम लोक जगाच्या विविध देशामध्ये आपली आस्था टिकवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. विश्वातील बहुतांश देशात कमी-अधिक प्रमाणात मुस्लिमांचे अस्तित्व आहे. या साऱ्या मुस्लिमांमध्ये  समान असलेले धागे म्हणजे- त्यांची केवळ अल्लाहवर असणारी श्रद्धा, त्यांचा एक प्रेषित-मुहम्मद(स.अ.स.) , त्यांचा धर्म इस्लाम,त्यांचा एकच ग्रंथ कुरआन मजीद आणि त्यांच्यामध्ये समान असलेल्या काही सांस्कृतिक बाबी.  

        जगभरात मुस्लिम व्यक्ती कुठेही रहात असली तरी काही बाबींचा अवलंब आपल्या जीवनात नकळत करत असते. विश्वातील सारेच मुस्लिम ज्या समान बाबींनी जोडले गेले आहेत, आणि आपल्या दैनंदिन जीवनात इस्लाममुळे ते ज्या गोष्टी सहजपणे करत असतात त्या गोष्टी इतर धर्मीयांना माहीत नाहीत. मुस्लिमांच्या बाबतीतल्या अशा अनेक गोष्टींचा उहापोह या लेखाद्वारे करण्याचा मानस आहे.

कलमा

जगातील सारेच मुस्लिम एकमेकांशी एका विधानाने (लाईलाहा ईल्लल्लाह मुहम्मदुर्रसुल्लुल्लाह) जोडले गेले आहेत, यालाच कलमा असे म्हटले जाते. म्हणजे जगातील सर्व मुस्लिमांच्या या गोष्टीवर विश्वास असतो की अल्लाह शिवाय उपासने योग्य कोणीच नाही आणि मुहम्मद (स.अ.स) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. मुसलमान फक्त अल्लाहची उपासना करतात आणि प्रेषितांना अल्लाहचा संदेश मानवजातीला सांगणारे दूत मानतात.

कुरआन मजीद आणि रिहाल

साधारणपणे जगातल्या सर्व मुस्लिम घरात  कुरआन मजीदची अरबी भाषेतील प्रत असते. तर काही जणांच्या घरी या प्रतीशिवाय स्थानिक भाषेतील कुरआन मजीदच्या भाषांतराची प्रत असते. हा ग्रंथ घरातल्या उंच आणि सुरक्षित ठिकाणी लाकडाच्या किंवा पीव्हीसीच्या फोल्ड होऊ शकणाऱ्या बैठकीवर ठेवले जातो ज्याला रिहाल असे म्हणतात. लहान मुलांकडून किंवा इतर कोणाकडूनही  कुरआन मजीदची बेअदबी होणार नाही याची प्रत्येकाकडून खास काळजी घेतली जाते. प्रत्येक मुस्लिम घरात  कुरआन मजीदची  प्रत असली तरी आपल्या मुलीच्या लग्नानंतर सासरी जाताना तिला कुरआन मजीदची एक प्रत,रिहाल आणि मुसल्ला दिला जातो. कुरआन मजीदचे पठण झाल्यानंतर पठण करणारी व्यक्ती कुरआन मजीद बंद करून ठेवण्याआधी त्याचा अत्यंत आदराने मुका घेते, डोळ्यांना लावते, कधी-कधी आपल्या छातीशीही घट्ट धरते.

मुसल्ला

  प्रत्येक मुस्लिम घरात किमान  एक मुसल्ला किंवा ज्याला जानमाज म्हटले जाते ते असतेच. हा मुसल्ला फक्त नमाज  पढण्यासाठी असतो. मुसल्ला  कापडी, चटईचा अथवा गालिचाच्यारुपात  असतो. कुटुंब कितीही गरीब असले तरी त्या मुस्लिम घरात कुरआन मजीदची प्रत आणि मुस्सल्ला हमखास असतो. या लहान चटईवर,कापडावर किंवा छोटेखानी गालिचावर घरात नमाज पढली जाते. घरातील महिलाही या मुसल्ल्यावर नमाज पढतात,आणि पुरुषही सुन्नत किंवा नफील नमाज याच जानमाजवर  पढतात. अनेक घरात एकापेक्षा जास्त जानमाज आढळतात. अनेकदा नातेवाईक, आप्त, मित्रमंडळी जेव्हा हज यात्रेस जातात तेव्हा आपल्या जवळच्या लोकांसाठी भेट म्हणून जानमाज आणतात. मुसल्ला किंवा जानमाजचा वापर फक्त नमाज पढण्यासाठीच केला जातो, नमाज  व्यतिरिक्त आणखी कशासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. प्रत्येक मुलीच्या लग्नातही सासरी जाताना तिला माहेरकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये जानमाज दिला जातोच.

किबला

                 मक्का या सौदीअरबस्थित शहरास इस्लामधर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी मस्जिद अल-हरम म्हणजेच काबा ही वस्तू आहे. ही जगातील पहिली मस्जिद म्हणून ओळखली जाते. यालाच अल्लाहचे घर असेही संबोधले जाते. ही वास्तू चौकोनी असून अंदाज़े 42ु 36 फूट इतकी असून या वास्तुची उंची 43 फूट इतकी आहे. ही वास्तू काळ्या दगडांनी बांधलेली आहे. या वास्तूस एक दरवाजा असून ती आतून पूर्णपणे रिकामी आहे. ही मस्जिद असुन प्रेषित इब्राहिम (अ.स)यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. ही मस्जिद विश्वाच्या मधोमध आहे आणि विश्वातील सारे मुस्लिम या मस्जिदला आपला किबला मानतात. किबला म्हणजे ज्याकडे तोंड करून नमाज पढली जाते ती दिशा. जगातील सर्व मुसलमान म्नक्यातील काबा या किबला असलेल्या वास्तूकडे तोंड करून नमाज पढतात. आशियातील मुस्लिम पश्चिमेला तोंड करून तर पश्चिमेकडील राष्ट्रातील मुस्लिम पूर्वेकडे म्हणजे मक्का कडे तोंड करून नमाज पढतात.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील कोणताही मुस्लिम काबाकडे पाय करून कधीही झोपत नाही. त्याच प्रमाणे कोणत्याही मुस्लिम घराची रचना अशा प्रकारे केली जाते की ज्यामध्ये स्वच्छतागृह कधीही काबाकडे तोंड करून असत नाही. म्हणजेच मुस्लिम स्त्री-पुरूष शुचिर्भूत होतांना काबाकडे कधीही तोंड करत नाहीत. ते कधीच मल-मूत्र विर्सजन काबाकडे तोंड करून  करत नाहीत किंवा ते त्याकडे तोंड करून कधीही थुंकतही नाहीत.

दस्तरखान                   

 बहुतेक मुस्लिम कुटुंब शक्यतो सर्वजण  एकाचवेळी एकत्र बसून आपले भोजन करतात आणि शक्यतो जमिनीवर बसूनच आपले अन्नग्रहण करतात.  जेवताना ते शक्यतो एकमेकांसमोर बसतात, आणि त्याच्यामध्ये जे कापड अथंरले जाते त्यास दस्तरखान असे म्हणतात, हे दस्तरखान नेहमी स्वच्छ ठेवले जाते. बहुतेक वेळा हे कापड लाल रंगाचे असते. या कापडावरच जेवतांना ताटे ठेवली जातात. शक्यतो सारे कुटुंबिय स्त्री असो की पुरूष आणि मुलेही  एकत्रपणे जेवण करण्याचा  प्रयत्न करतात.  अनेकदा   एका ताटात बसून जेवले जाते. अशाने बरकत येते आणि आपसातील प्रेम वृध्दिगंत होते अशी मुस्लिमांची आस्था आहे.  मुस्लिम लोक एकत्र जेवताना एकमेकाचे उष्टे आहे असे काही मानत नाहीत. आणि ताटात उष्टे अन्नही सोडत नाहीत. अनेकदा दस्तरखानवर पडलेले अन्नही उचलून खाल्ले जाते. अनेकदा पेल्यात पिऊन राहीलेले पाणी दुसरी व्यक्ती त्यातच पाणी टाकून पिते ते पाणी उष्टे आहे असे समजले जात नाही.

सलाम

प्रत्येक मुस्लिम एकमेकांशी बोलण्याआधी अस्सलामु अलैकुम अर्थात तुमच्यावर (अल्लाहची) शांती असो असे अभिवादन करतात. प्रत्येकजण आधी अभिवादन करण्यात पुढाकार घेतो. मग समोरचा व्यक्ती वयाने,मानाने लहान असली तरी कमीपणा वाटून घेत नाही. ओळख असो वा नसो समोरील व्यक्ती मुस्लिम आहे असे वाटल्यास त्या व्यक्तीस तो सलाम करतोच. अशा प्रकारे ते शांतीचा संदेश पसरवत असतात. लहान-लहान मुलेही घरात प्रवेश करतांना सलाम करतात. खरेतर सलाम करणे ही प्रेषित मुहम्मद(स.अ.स) यांची प्रथा आहे. परंतु एखाद्याने सलाम केल्यास त्यास व अलैकुम सलाम अर्थात तुमच्यावरही (अल्लाहची) शांती असो असे प्रतिउत्तर देणे अनिवार्य असते. म्हणजेच दोन व्यक्ती जर एकमेकांशी अबोल्यामध्ये असतील आणि त्यातील एकाने सलाम केला तर दुसऱ्याला त्यास उत्तर देणे अनिवार्य ठरते. सलाममुळे अबोला, दुरावा कमी होण्यास मदतच मिळते.

  आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील कोणत्याही देशातील मुस्लिम एकमेकांना अस्सलाम अलैकुम असेच अभिवादन करतात. फारफार तर अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाही व बरकातुहू  अर्थात तुमच्या वर (अल्लाहची)  शांती असो,अल्लाहची दया आणि आशीर्वाद असो असे प्रति उत्तर देतात.

 इस्तिंजां

  इस्तिंजा  म्हणजे शुचिर्भूत होणे. अनेकदा आपण मुतारी मध्ये जातो तेव्हा सार्वजनिक मुतारीत काही वेळेला आपणास वीटकराचे  तुकडे आढळतात.  हे तुकडे कोण कशासाठी ठेवतो या प्रश्नाचे उत्तर असे आहे की- प्रत्येक मुस्लीम स्त्री-पुरुष जो पाच वेळा नमाज पडतो त्यास शुचिर्भूत राहणे आवश्यक असते.

     त्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुष खाली बसूनच मूत्र विसर्जन करतो. मुत्राचे थेंब आपल्या अंगावर, कपड्यांवर उडू देत नाही. कारण ज्या वस्त्रांवर मुत्राचे थेंब पडलेले आहेत त्या वस्त्रानिशी नमाज पढता येत नाही. त्यामुळे नमाज पढणारी प्रत्येक व्यक्ती मूत्रविसर्जना नंतर प्रत्येक वेळी आपली मूत्र विसर्जनाची जागा मूत्र विसर्जना नंतर पाण्याने धुवून स्वच्छ करते. त्यामुळे नमाजी मुस्लिम अशा ठिकाणीच मूत्रविसर्जन करण्याचा प्रयत्न करतात ज्या ठिकाणी पाण्याची सोय असते. परंतु जेव्हा केव्हा नमाजी पुरुषाला मूत्रविसर्जन करणे आवश्यक आहे असे वाटते तेव्हा सार्वजनिक ठिकाणी पाणी नसल्यास तो वीटकराच्या तुकड्यांचा  वापर करतो. मुत्राचा अखेरचा थेंब जो शिश्नाच्या टोकास असतो तो थेंब अंगावर, कपड्यावर पडू न देता वीटकराच्या तुकड्याने  टिपून घेतला जातो. मुस्लिम नमाजी स्त्री-पुरुष  वैयक्तिकरित्या किती स्वच्छ असतात हे यावरून लक्षात येते. ही बाब बहुतेक इतर धर्मीयांना माहिती नसते.

गुस्ल 

गुस्ल म्हणजे आंघोळ करणे. परंतु ही आंघोळ साध्या अंघोळी सारखी नसते. केवळ डोके आणि अंगा-खांद्यावर पाणी घेणे म्हणजे गुस्ल नव्हे. जेव्हा-केव्हा पुरुषाला वीर्यस्खलन होते,  एखाद्या स्त्रीस मासिक पाळी येते किंवा पती-पत्नीच्या समागमाने वीर्यस्खलन होते तेव्हा असे स्त्री-पुरुष धार्मिकदृष्ट्या अपवित्र किंवा अशुद्ध होतात. अशा स्थितीत गुस्ल केल्याशिवाय नमाज पढता येत नाही.  कुरआन मजीदचे पठण करता येत नाही. त्यामुळे अशा अशुद्ध किंवा अपवित्र  स्त्री-पुरुषांना गुस्ल  करणे अनिवार्य असते. गुस्ल  करण्याआधी मनात अशी नियत करणेही आवश्यक असते की - हे अल्लाह मी अपवित्र किंवा अशुद्ध आहे मला या गुस्लने शुद्ध आणि पवित्र कर. गुस्ल  करताना सर्व शरीर पाण्याने ओले व्हायला हवे. सर्व अंग पाण्याने भिजायला हवे. अंगावरचा एकही केस सुका राहता कामा नये.  नापाक अपवित्र किंवा अशुद्ध असलेली व्यक्ती गुस्ल  केल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकत नाही. अनेकदा मुस्लिम मंडळी जुमा के जुमा अंघोळ करतात असे म्हणून त्यांना हिणवले, चिडवले जाते. परंतु एक बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सर्व जगाच्या पाठीवर मुस्लिमांचे वास्तव्य आहे. वेगवेगळ्या प्रदेशांची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळी असते . कुठे कुठे प्रचंड उकडा आणि कडक ऊन्ह  असते  तर काही प्रदेशात गोठवणारी थंडी असते. कडाक्याच्या थंडीत राहणारे लोक रोज आंघोळ करतीलच असे नाही. परंतु  प्रेषितांच्या आदेशानुसार कितीही थंडी असली तरीही नापाक अशुद्ध /अपवित्र झाल्यास गुस्ल अत्यावश्यक असते. त्याच प्रमाणे दर शुक्रवार या दिवशी गुस्ल करणे अनिवार्य असते. तसेच ईदच्या दिवशी ही गुस्ल करणे आवश्यक असते.

वुजू 

      कोणत्याही मशिदीत प्रवेश केल्यास त्या ठिकाणी चार कक्ष हमखास असतात. यामध्ये तहारतखाना (स्वच्छतागृह), गुस्लखाना( स्नान कक्ष), वुजूखाना आणि नमाज पढण्याचा कक्ष असतो. नमाज पढण्याआधी काही अटींचे पालन करावे लागते त्या म्हणजे - ती व्यक्ती पाक असावी, नापाक नसावी. वीर्यस्खलनाने, समागमाने, मासिकपाळीने अशुद्ध अपवित्र नसावी. त्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत त्यावर मल-मूत्राचे, वीर्याचे किंवा रक्ताचे डाग नसावेत. त्याचबरोबर नमाज पढण्याआधी त्या व्यक्तीने वुजू केलेले असावे. म्हणजे नमाज पढण्या आधी किंवा कुरआन पठण करण्याआधी पाक साफ असणे अनिवार्य असते.

         वुजू करताना आधी दोन्ही हात मनगटापर्यंत धुतले जातात, तीन वेळा चूळ भरून तोंड स्वच्छ केले जाते. त्यानंतर तीन वेळा नाक आतून स्वच्छ केले जाते. मग तीन वेळा संपूर्ण चेहरा धुतला जातो. मग कोपरापर्यंत दोन्ही हात तीन वेळा धुतले जातात. हे केल्यानंतर दोन्ही हातात पाणी घेऊन ओले हात डोक्यावरून मानेपर्यंत फिरवले जातात व दोन्ही कानांची छिद्रे आणि कानामागील जागा हाताने स्वच्छ केली जाते. सर्वात शेवटी आधी उजवा पाय आणि मग डावा पाय घोट्यापर्यंत स्वच्छ धुतला जातो. नमाज पूर्वी स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेस वुजू असे म्हणतात. म्हणून प्रत्येक मशिदीत नमाज पढणाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची आणि वुजू करण्याची व्यवस्था असतेच असते. 

एकच नमाज पद्धत

इस्लाम धर्मियांमध्ये वेगवेगळे पंथ असले तरी हे सर्व लोक फक्त अल्लाहलाच  पूजनीय मानतात. प्रेषित मुहम्मद( स. अ. स.) यांना अखेरचे प्रेषित मानतात. इस्लामधर्मीय उपासक अल्लाह शिवाय इतर कोणाचीही उपासना करत नाहीत.  कोणाच्या पायावर आपला माथा टेकत नाहीत. या साऱ्यांचा कयामत (महाप्रलय) वर ठाम विश्वास असतो आणि या कयामतच्या दिवशी सर्व मानवांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब  होईल यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. कयामत नंतरचे मरणोपरांत जीवन हे कधीही न संपणारे असून आपल्या ईहलोकातील जीवनात आपण केलेल्या पाप-पुण्यानुसार जन्नत (स्वर्ग) किंवा  जहन्नम (नरक) मध्ये आपण पाठवले जाणार आहोत यावर त्यांची दृढ श्रद्धा आणि विश्वास असतो. इस्लामधर्मीय सर्व पंथाचे लोक नमाज, रोजा, जकात आणि हजयात्रा याद्वारे अल्लाहची उपासना करतात. 

        कोणताही मुस्लिम मग तो कोणत्याही देशात असो किंवा कोणत्याही भाषेचा असो तो नमाज पढताना संपूर्ण नमाज अरबी भाषेतूनच पढतो. त्यासाठी त्याला कुरआन मजीदमधील छोटे छोटे का  असेना किमान दहा सूरह (प्रकरण) तरी मुखोद्गत असायला लागतात. नमाज नंतर मागितली जाणारी दुआ मात्र तो आपल्या भाषेत मागू शकतो. परंतु नमाज मात्र जगात सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने अरबीत पढली जाते. नमाज पढताना हात छातीवर बांधायचे  की पोटावर यात मतभेद असू शकतात. 

     पण मुस्लिमांच्या अशाप्रकारच्या अनेक बाबी  इतर धर्मियांना माहिती नसतात. अशा अनभिज्ञ असणाऱ्या एकमेकांच्या अनेक गोष्टी माहीत करून घेतल्यास आपले सहजीवन सोपे, सहज आणि सुखकर होईल यात शंका नाही. 

- डॉ. इ्नबाल मिन्ने

7040791137



महाराष्ट्रातून कोरोना पुरता गेलेला नाही. उलट कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात थयथयाट करीत आहे. महाराष्ट्र तर याबाबतीत आघाडीवरच आहे. अर्थात कोरोना गेल्यानंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सावरण्याचे, अडकून पडलेले अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचे, बेरोजगारी घटविण्याचे, शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्याचे, अशी अनेक भीमकाय आव्हाने आ वासून पुढे उभी राहणार आहेत. कोरोना काळातही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. असे सारे असताना आमचे राजकारणी विवेकाला सोडचिठ्ठी देऊन, कोत्या राजकारणाच्या चिखलात मनमुराद लोळत आहेत. याला कोणीही अपवाद नाही. सगळे एकाच माळेचे मणी आहेत.

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे महाविकास आघाडी सरकार यांचे संबंध एक दिवस तरी सौहार्दाचे होते का, हे शोधावेच लागेल. मध्यंतरी राज्य सरकारचे विमान राज्यपालांनी आपल्या प्रवासासाठी मागणे आणि सरकारने ते कोतेपणाने नाकारणे, यात अनपेक्षित असे काही घडलेले नाही. महाराष्ट्राचे ‘हसे’ तेवढे झाले. घटनात्मक संरचनेला आजचे राजकीय नेते मनोमन किती किंमत देतात, हे यातून दिसते. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. विधिमंडळात मंजूर होणाऱ्या विधेयकांवर त्यांची संमती स्वाक्षरी असते. याशिवाय, ते कुलपती या नात्याने राज्यातील साऱ्या शिक्षण व्यवस्था आणि यंत्रणेचे अध्वर्यू आहेत. कोणत्याही निमित्ताने होणारा त्यांचा पाणउतारा हा काही कोश्यारी या व्यक्तीचा अवमान नसतो, ते त्या पदाचे अवमूल्यन असते. आपल्या वागण्यातून असे होऊ नये, इतकी तरी समज मुख्यमंत्री कार्यालयाने दाखवायला हरकत नव्हती. अर्थात, यातून राज्यपालांच्या पूर्वीच्या अनेक वर्तनांचे दाखले देऊन उणी-दुणी काढण्यात आली. हे राज्याच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही. हे राज्यपाल म्हणजे काही डॉ. पी. सी. अलेक्झांडर किंवा एअर चीफ मार्शल आय. एच. लतीफ या राज्यपालांची परंपरा राखणारे नव्हेत. त्यांचा एक पाय आणि मन भाजप प्रणीत पक्षीय राजकारणात अडकलेले आहेच. हे न लपून राहिलेले गुपीत आहे. तसे नसते, तर त्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाहीर टीकाटिपणी केली नसती. दिल्लीतून येणारे दूरध्वनी झेलत पहाटे, आडवेळेला अंधाराचा फायदा घेवून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना औट घटकेची शपथ देणेही टाळले असते. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विवेकाला अशी अनेकदा सोडचिठ्ठी दिली आहे. आपण भाजपचे नेते आहोत, याचा निदान पदाच्या प्रतिष्ठेपुरता तरी विसर पडायला हवा, हे त्यांना जमत नाही. याचा अर्थ त्यांचा जाहीर अपमान केल्यानेच आपले राजकीय चातुर्य आणि धूर्तपण सिद्ध होते, असे ज्यांना वाटते, त्यांना या देशात होऊन गेलेल्या अनेक उदारमनस्क, मोठ्या मनाच्या नेत्यांचे चरित्रच समजलेले नाही. त्याची त्यांना आवश्यकताही वाटत नसावी.कोणत्याही खुलाशाची संधी नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागे लपून, आपले राजकीय हिशेब चुकते करण्याची रीत महाराष्ट्रात 1980 नंतर क्रमाक्रमाने वाढत गेलीच आहे.  सत्तेत  बसलेले केवळ काही काळासाठी नेमलेले विश्वस्त आहेत; मात्र विेशस्तांना मालकी हक्काचा भ्रम होण्याचे प्रमाणही अलीकडे वाढतच चालले आहे. या साऱ्याचा वाईट परिणाम असा होतो, की नेते व राज्यकर्ते अनुदारपणे वागतात, तेव्हा त्यांच्याकडे पाहून चालणारे दुय्यम नेते, तळागाळातील कार्यकर्ते किती तरी पटींनी अधिक अनुदार होतात; कारण ते आपल्या नेत्याच्या वागण्यातून काही ना काही संदेश टिपत असतात. तो प्रत्यक्षात आणत असतात. संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात ’वनिता देखोनि गोमटी; विवेकाची होय नत दृष्टी’ असे म्हटले आहे. राजभवनातील किंवा मंत्रालयातील सत्तासुंदरीच्या स्पर्शाने विवेकाची दृष्टी हरपणे, हे काही चांगले लक्षण नाही. पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभनिय नाही, तरीही महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील बेबनाव सतत टोकाची भूमिका घेवून महाराष्ट्राची इज्जत घालविणारे वर्तन संपूर्ण देशाला दाखवत आहेत. वास्तविक कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जनता हवालदील झालेली आहे. हा संसर्ग थोपवण्यासाठी खरंच सरकारची मानसिकता सकारात्मक आहे की नाही? असा संशय सर्व थरांतून व्यक्त होत आहे. अशावेळी  कोविड प्रतिबंधक लस मिळविण्याच्या बाबतीत सरकारने केलेली दिरंगाई व  बेशिस्तपणा महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीला गालबोट लावणारा आहे. आज या नैसर्गिक संकटाला थोपविण्यासाठी हातात हात घालून काम करणे गरजेचे असताना शासन आणि प्रशासन यांच्यातील बेबनाव महाराष्ट्राची मोठी हानी करणारा ठरणार आहे. तेव्हा कोरोना पूर्णपणे घालविण्यासाठी कटिबद्ध व्हावं अन्यथा महाराष्ट्राची जनता कदापीही माफ करणार नाही.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून कोल्हापूर येथील करवीर काशी चे संपादक आहेत.)


पवित्र कुरआनच्या आदेशानुसार, वारसाचे अधिकार केवळ पुरुषांनाच प्राप्त नाहीत तर यात स्त्रियांचेही अधिकार आहेत. वारसा कमी प्रमाणात असो की जास्त प्रमाणात, त्याची मयताच्या सर्व नातेवाईकामध्ये वाटणी करून द्यावी. शेतजमीन असो की घरदार, एवढेच नव्हे तर मयताने मागे सोडलेल्या उद्योगधंद्याचीही सर्व वारसदारांमध्ये वाटणी व्हावी.

अल्लाह आदेश देतो की पुरुषांसाठी दोन स्त्रियांइतका वाटा आहे. जर फक्त मुलीच वारसा असतील आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर त्यांच्यासाठी मयताने मागे सोडलेल्या वारसामध्ये २/३ वाटा मिळेल. पण जर एकच मुलगी असेल तर तिला निम्मा वाटा मिळेल, बाकीची मालमत्ता इतर नातलगांमध्ये वाटली जाईल.

महत्त्वाची गोष्ट अशी की वारसा हक्काची विभागणी मयताने करून ठेवलेल्या मृत्रुपत्राची पूर्तता करून आणि त्याने कोणते कर्ज मागे सोडलेले असेल तर त्या कर्जाची परतफेड करूनच केली जाऊ शकेल. मयताची संतती असेल तर त्याच्या मातापित्यांना देखील प्रत्येकास सहावा हिस्सा दिला जाईल. जर मयताची संतती नसेल आणि फक्त मातापिताच वारस असतील तर मातेला एकतृतियांश हिस्सा मिळेल आणि जर मयताचे भाऊ-बहिणी असतील तर मातेस सहावा हिस्सा मिळेल. (मयत) पत्नीला संतती नसेल तर तिने मागे सोडलेल्या संपत्तीत पतीचा अर्धा वाटा असेल, पण जर तिला संतती असेल तर पतीला तिच्या संपत्तीत एकचतुर्थांश वाटा आहे. (मयत) पतीला जर संतती नसेल तर त्याने मागे सोडलेल्या संपत्तीत पत्नीला एकचतुर्थांश वाटा मिळेल, पण जर पतीला संतती असेल तर पत्नीला १/८ वाटा मिळेल.

एखाद्या पुरुष अथवा स्त्रीला स्वतःची मुलंबाळं आणि वडीलही नाहीत पण भाऊबहीण असेल तर त्या दोघांना प्रत्येकास सहावा हिस्सा मिळेल. जर एकापेक्षा जास्त भाऊबहिणी असतील तर त्यांना संपत्तीचा एकतृतियांश वाटा मिळेल.

तुमचे वाडवडील अथवा तुमच्या मुलांपैकी कोणी तुम्हांस लाभदायी ठरतील हे तुम्हास माहीत नाही. अल्लाहने ठरवून दिलेल्या या मर्यादा आहेत. म्हणून त्यालाच सर्व बाबींची जाणीव आहे. (पवित्र कुरआन, अध्याय-४)

- सय्यद इफ्तिखार अहमद



विश्वात वेळ सर्वव्यापी आहे आणि आपण ज्या जिवंत वास्तविकतेचा सामना करतो त्या प्रत्येक प्रसंगी ती आपले जीवन ठरवते. या संहितांच्या अर्थपूर्ण पाठपुराव्याचे व्यावहारिक आणि सामाजिक अर्थ असल्याबद्दल आम्ही धार्मिक विधी (वेळ सापेक्ष) सूचीबद्ध आणि सानुकूलित  केले आहेत. ’सामूहिक आठवणीं’च्या सामाजिक-मानसिक आणि उत्क्रांतीचे दस्तऐवजीकरण केले जाते. घटनेच्या लौकिकतेसह समुदाय आणि कर्मकांड काहीसे बदलत जातात. पूर्वी अनेक गोष्टी गमावल्या गेल्या आहेत आणि त्या संग्रहालयांमध्ये पोहोचल्या आहेत, काहींना वेळ देता आला नाही आणि काही ’साम्राज्याच्या भग्नावशेषांमध्ये’ गाडले गेले. वेळ बदलतो आणि विधीही बदलले आहेत आणि ईद हा जगभरातील मुस्लिमांसाठी धार्मिक उत्सव आहे आणि ’बहुतेक’ प्रतीकात्मकतेच्या घटकांमध्ये कमी झाला आहे.

जसे मानव बहुतेक त्यांच्या संवादात्मक शिष्टाचारांद्वारे ओळखले जातात आणि निश्चित केले जातात तसेच समाजाचेही असते. सर्वसाधारणपणे उपखंडातील समाजांमध्ये आणि विशेषत: मुस्लिमांमध्ये धर्म आणि धर्माचा सराव या बाबतीत काही प्रमाणात द्विधा अवस्था आहे. ईदचा सणही त्याच नजरेत पडतो आणि लोक बहुतेक त्याच्या केवळ बाहेरून/बहिर्मुख हेतूवर लक्ष केंद्रित करतात आणि त्याग आणि एकजुटीची भावना प्रवचनातून संपू देतात. 

(रमजान ईदच्या या पूर्वसंध्येला जोडलेल्या आध्यात्मिक आणि मूलगामी ’प्रतीकां’पेक्षा ईदवरील सार्वजनिक चेतना जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात ग्राहकवादी दृष्टीकोनाभोवती फिरते. आपल्या सभोवतालच्या दैनंदिन घटनांशी झगडत असताना आम्ही नेहमीच प्रतिगामी कल्पनाशक्तीच्या प्रतिध्वनी कक्षांपुरते मर्यादित राहिलो आहोत. हे मोठ्या प्रमाणात सामाजिक मानसशास्त्राच्या (समुदायाच्या) कारणास्तव विभाजित उपदेश प्रकट करते जे एकात्मक सार आणि ’गंभीर महत्त्व’च्या काळात प्रतिबिंबित होते.

टोपोफिलियाक (आस्था, स्थान किंवा शारीरिक वातावरणाशी भावनिक संबंध) ’आठवणी’ आणि साथीच्या रोगाच्या काळात ही ईद आपल्यासमोर असलेल्या अस्तित्ववादी आणि सामाजिक समस्यांच्या गरजा आणि मागणीनुसार आपल्या जीवनपद्धतीची पुनर्कल्पना करण्याचा एक मार्ग बनली पाहिजे. आपल्या समजुतीच्या धार्मिक आणि एस्कॅटोलॉजिकल (मृत्यू, न्याय, आत्मा आणि मानवजातीचे अंतिम भाग्य यांच्याशी संबंधित असलेल्या ब्रह्मज्ञानाचा भाग) आधाराचे वारंवार शाब्दिक प्रतिपादन या विषयात शिरकाव करणारी माध्यमे पाहता काहीसे धुसर होते. ईदच्या आधी आणि दरम्यान आमच्या विचारांची बांधणी आणि नियोजन असे असते की आपण फक्त काय आहोत आणि कुठे आहोत त्याऐवजी कसे आणि का आहोत याची पुनरावृत्ती आढळते. जेव्हा समाज अन्याय आणि अतिरेकाचा सामना करण्याची हाक देतो तेव्हा लोकांना मदत करणार्‍यांच्या समतावादी गटाची (ओळख) परिभाषित करते. याचे प्रामाणिक मूल्यमापन तयार करण्यासाठी समुदायाच्या सामाजिक-धार्मिक आदर्शांचा त्वरित आणि वाजवी पुनर्दृष्टीमध्ये गंभीर आणि विसंवादी दृष्टिकोन आवश्यक आहे. साथीचा रोग संसर्गाचा वाढता कल दर्शवित असल्याने लोकांनी जागतिक आणि प्रादेशिक आरोग्य संस्थांनी तयार केलेल्या मानकांचे पालन करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. रमजान ईद बहुतेक मैत्रीपूर्ण आणि कौटुंबिक बंधांची देवाणघेवाण आणि सांगडीशी संबंधित असल्याने सामान्यत: सामुदायिक संपर्काची भीती असते, ती जास्तीत जास्त टाळली पाहिजे. जगभरातील अभूतपूर्व काळ पाहता लोकांना हानी किंवा आजारापासून वाचवणे ही उपासनेची कृती बनते. हा दिवस साजरा करताना आपण नम्र आणि वास्तववादी असणे आवश्यक आहे. या साथीच्या रोगामुळे अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांचे कामकाज रुळावरून घसरले आहे आणि सर्वांत जास्त फटका वाहतूक क्षेत्राला बसला आहे. त्यांना आणि इतर गरजू लोकांना मदत करण्यासाठी या रमजान ईदचा सार्वजनिक संदेश असला पाहिजे. या आत्म्याच्या उत्सवामुळे एखाद्या गरजवंताच्या चेहर्‍यावर हास्य उमटले पाहिजे. 

जेव्हा उत्सव साजरा करण्याची वेळ येते, तेव्हा ’काय साजरे करावे, कधी साजरे करावे आणि कसे साजरे करावे’ असे फेनोमेनोलॉजिकल (घटनात्कम) प्रश्‍न असतात. ‘सेलिब्रेशन’ म्हणजे एक ’क्षण’ आहे जो ’एखाद्या गोष्टीवरील यश, कर्तृत्व किंवा विजय’ मधून तार्किकदृष्ट्या त्याचा अर्थ प्राप्त करतो. स्वत:शी झालेल्या संभाषणांच्या रोजच्या आनंदात  ईदचा क्षण येऊ शकतो, जो केवळ एका वर्षातील दोन दिवसांपुरता मर्यादित नसतो. आपल्या ’जगण्याच्या’ पद्धतीचे आणि ’अस्तित्वा’च्या रूपरेषेचे उद्दिष्ट पात्र आणि गरजूंना भावनिक आणि आर्थिक मदत देणे आणि एकमेकांमध्ये आध्यात्मिक आणि भावनिक प्रेम पसरवणे हे आहे, जे ईदच्या सक्षम अर्थाचे प्रतिनिधित्व करते. जेव्हा सौंदर्य, योग्यता आणि समाधानाचे कौतुक करण्याची वेळ येते तेव्हा आपण अनेक सत्ये आणि वास्तविकता मिळवू शकतो.

उत्सव म्हणजे सामाजिक एकजूट आणि ’अतींद्रिय त्याग’ या उद्देशाच्या सर्वांगीण पोशाखात अवज्ञा, प्रतिकार आणि चिकाटीच्या बाह्या सतत परिधान करणे. सीरियापासून येमेनपर्यंतचे मुस्लिम जग मानवतावादी संकटांमध्ये वेढले गेले आहे जिथे बर्बरता हा एक आदर्श आहे आणि हिंसाचार ही एका दिवसाची सामान्य आवृत्ती आहे. मानवतेची खरी मूल्ये साध्य करण्यासाठी आणि दडपशाही व शोषणाच्या लाटेच्या विरोधात उठण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

ईद हा खोट्या ’आधुनिकता काल्पनिक’ धोक्यांच्या अनावश्यक क्षुल्लक दिखाऊपणाच्या कठोर आणि उथळ प्रदर्शनाखाली गमावलेल्या मूल्यांच्या मुक्तीचा, सुधारणेचा आणि पुनर्बांधणीचा क्षण बनला पाहिजे. आपण अशा काळात आहोत जेव्हा ईश्‍वराला आपण एकमेकांचे चेहरे पाहू नये असे वाटते; आमचे मास्क्स आमची द्वेषयुक्त आणि पूर्वग्रह सभ्यता परिभाषित करतात. आम्ही सार्वजनिक प्रार्थना करू शकत नाही, हज रद्द आहे; जर हे वास्तव आपल्याला जागे करू शकत नसेल तर आपण सर्व सांगाडे ’इतिहासाची पाने’ होण्याची वाट पाहत आहोत. काळ नेहमीच समाजाचे भवितव्य आणि वर्तन बदलतो.

जर ईद म्हणजे शेजारी आणि नातेवाईकांसोबत आनंदाचा क्षण असेल तर आम्हाला अशा अवस्थेत नेऊन सोडले जात आहे जिथे आपण आपल्या घरावर शेजार्‍याची नजर सहन करू शकत नाही आणि ’नातेवाईक’ हा शब्द ’नगण्य अनोळखी’मध्ये परिवर्तित झाला आहे. एकेकाळी लोक एकत्रित जमत असत आणि उघडपणे संभाषण करीत असत कारण तेव्हा सोशल डिस्टन्सिंग सारख्या ’भिंती’ची भावना नव्हती परंतु आता फक्त भिंती आहेत काळजी, एकत्रपणा आणि ’शेजारधर्मा’च्या भावनांच्या देवाणघेवाणीच्या. ते योग्य शब्दांत सांगण्यासाठी आमच्या संबंधांचे काँक्रिटीकरण केले ते. जर आपल्या शेजार्‍यांशी व नातेवाईकांशी प्रेमळ आणि व्यवहार्य संबंधांचे कोणतेही संकेत नसतील तर ईद साजरी करणे निरर्थक बनते, मग सामायिक करणे हे विधीचे ’निव्वळ कृत्य’ बनते आणि यापुढे काहीही नाही. अशा प्रकारे आपण आध्यात्मिक आणि धार्मिक जागृतीच्या अर्थाजवळ कुठेही पोहोचत नाही. हे ’प्रश्‍न’ आता आपल्या ’जाणिवेत’ खोलवर रुजले आहेत आणि त्यांनी सामाजिक-मानववंशशास्त्रीय शब्दसंग्रहातून निघणार्‍या सांस्कृतिक व्युत्पत्तीची भूमिका घेतली आहे.

तरुण आणि वृद्ध दोघेही खर्‍या अर्थाने ईदच्या भावनेचे महत्त्व विषद करत लोकांचे प्रबोधन करण्यात पुढाकार घेत आहेत हे पाहून आनंद होत आहे. एक दशकापूर्वी ईदमधील गोडवा आणि रोमांचित लक्षणीय फरक दिसत आहे आणि आता हे सर्व क्षणिक, क्षणभंगुर असल्याचे दिसून येते, ज्यास फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आणि सांस्कृतिक सिद्धान्तकार बाउड्रिलार्डने ’हायपर-रिअल वर्ल्ड’ म्हटले आहे.

ईद म्हणजे आनंद पण सध्या व्यवस्थेने स्वत:ला ‘हायड्रा-हेडेड मास्टर’मध्ये रूपांतरित केल्यामुळे उत्सवाच्या क्षणीही ती ’स्टेटिस्ट’ सूर आळवते. एखाद्या उत्सवाचा आनंद आपण किती साजरा करतो हा आता व्यवस्थेचा विषय बनला आहे. राजकीय शब्दकोशांना ’नियंत्रण आणि वर्चस्वाच्या पध्दती’खाली शस्त्रास्त्रे दिली जात असल्याने जगभरात हा आश्‍चर्याचा क्षणही दिसून येत नाही. वेळही ’स्टेटिस्ट’ बनवला जातो, कारण व्यवस्था आपल्याला कधी बाहेर पडायचे आणि कधी घरात राहायचे याची वेळ निश्‍चित करते. एक प्रकारे आपण ’सार्वभौम’च्या हॉब्सियन स्वरूपाशी (मूग गिळून) एकनिष्ठ बनलो आहोत.

गायत्री स्पिवाक या उपअल्टर विचारवंताने या युक्तीला ’धोरणात्मक अत्यावश्यकता’ असे म्हटले आहे, जेव्हा उपेक्षित प्रदेशाची चिन्हे आणि इतिहास अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारे पुसला जातो तेव्हा सामायिक राजकीय आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतिनिधित्व आणि व्यक्त केले जाते.  आपण ’गुडघ्यां’वरून मान खाली उतरणे आणि ’बोलणे आणि विचारणे’ सुरू करणे आवश्यक आहे की आपल्याला आनंद साजरा करावा लागेल की अन्यथा फक्त ’स्मारके’ हार मानण्याची वाट पाहत आहेत. ही ईद अशा वेळी येते जेव्हा आपल्याकडे एकतर ’क्षण’ अर्पण करण्याचा किंवा क्षणात ’आत्मशुद्धी’चा पर्याय उरतो. निवड ही तुमची एकमेव गोष्ट आहे जी स्टेटिस्ट नाही.

ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विकृतींच्या तुलनेत ईदच्या बदलत्या अर्थावर विचार करणे, हंगामी ’षडयंत्र’ आणि ‘बारमाही संकुचितता’ या अशांत पाण्याला नेण्यासाठी आपल्या जाणिवेच्या आणि समजुतीच्या दृष्टीने पुनरुज्जीवनवादाची खूप गरज आहे. तरीही आम्हाला आशा आहे की रमजाननंतरचा नवा ’चंद्र’ कोरोनाच्या अंधार्‍या काळाला मागे टाकेल जेणेकरून लोकांना ’उत्सव’रुपी ईद साजरी करण्याची संधी मिळेल. बहुतेकदा काळ लोकांचे प्रतिनिधित्व करतो आणि कधीकधी लोक काळाचे प्रतिनिधित्व करतात, आम्ही या महामारीतील ‘अस्थायी वास्तविकते’च्या कालखंडात आशावादी वळणाची वाट पाहात आहोत.


-शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.:८९७६५३३४०४


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget