Halloween Costume ideas 2015
Latest Post


माननीय अब्दुल्लाह बिन अमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चार गुणवैशिष्ट्ये ज्या मनुष्यात असतील तो पक्का धर्मद्रोही असेल आणि ज्या मनुष्यात त्यापैकी कोणतेही एक गुणवैशिष्ट्य असेल तर त्याच्यात शत्रुत्वाचे एक गुणवैशिष्ट्य असेल, तर ते त्याने सोडून द्यावे. ती चार गुणवैशिष्ट्ये अशी आहेत- जेव्हा त्याच्याकडे एखादी ठेव ठेवण्यात आली तर त्यात अफरातफर करणे, खोटे बोलणे, वचन दिले तर ते न पाळणे आणि जेव्हा त्याचे कुणाशी भांडण झाले तर शिवीगाळ करणे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सर्वांत मोठा खोटारडेपणा म्हणजे मनुष्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना ती गोष्ट दाखवावी जी त्या दोन्ही डोळ्यांनी पाहिली नसेल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : म्हणजे त्याने कसलेही स्वप्न पाहिले नाही परंतु जागा झाल्यानंतर अतिशय मजेदार व चांगल्या गोष्टी सांगतो, म्हणतो की हे मी स्वप्नात पाहिले आहे, असे करणे म्हणजे आपल्या डोळ्यांद्वारे खोटे बोलविणे होय.
माननीय असमा बिन्ते उमैस (रजि.) यांच्या कथनानुसार, आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या एका पत्नीला घेऊन त्यांच्या घरी गेलो. जेव्हा आम्ही पैगंबरांच्या घरी पोहोचलो तेव्हा पैगंबरांनी दुधाचा एक ग्लास काढून आणला, मग त्यांनी आपल्या इच्छेनुसार प्यायले आणि त्यानंतर आपल्या पत्नीला दिला. त्या म्हणाल्या, ‘‘मला इच्छा नाही.’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तुम्ही भूक व खोटारडेपणाला एकत्र करू नका.’’ पैगंबरांना जाणवले की आपल्या पत्नीला भूक लागलेली असूनदेखील त्या औपचारिकपणा दाखवित आहेत, म्हणून पैगंबरांनी खोट्या औपचारिकपणा दाखविण्यास मनाई केली आहे. (हदीस : मुअजम सगीर तिबरानी)
माननीय सुफियान बिन असीद ह़जरमी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आपल्या बंधुला एखादी गोष्ट सांगितली आणि त्याने तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, मात्र तुम्ही जी गोष्ट त्याला सांगितली ती खोटी होती, हा फार मोठा अप्रामाणिकपणा आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
माननीय अब्दुल्लाह बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) आमच्या घरी आले होते तेव्हा माझ्या आईने मला बोलविले, ‘‘इकडे ये! मी तुला एक वस्तू देईन.’’ तेव्हा पैगंबरांनी विचारले, ‘‘तुम्ही त्यांना काय देऊ इच्छिता?’’ आई म्हणाली, ‘‘त्याला खजूर देऊ इच्छिते.’’ पैगंबरांनी आईला म्हटले, ‘‘जर तुम्ही देण्यासाठी बोलविले आणि दिले नाही तर तुमच्या कर्मपत्रात हा खोटारडेपणा लिहिला जाईल.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : सर्वसामान्यपणे आई-वडील आपल्या मुलांशी असे वागतात की काही देण्याच्या बहाण्याने बोलवितात, मात्र देण्याची इच्छा नसते, तेव्हा हा अल्लाहपाशी खोटारडेपणा ठरेल. कर्मपत्रात हा खोटारडेपणाच्या यादीत लिहिला जाईल.
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) सांगतात, खोटे बोलणे कोणत्याही स्थितीत वैध नाही, न गंभीरपणे आणि न गंमत म्हणून. आणि हेदेखील वैध नाही की तुमच्यापैकी कोणी आपल्या मुलाला एखादी वस्तू देण्याचे वचन द्यावे आणि ते पूर्ण न करावे. (हदीस : अल अदबुल मु़फरद, पृष्ठ ५८)
माननीय बह़ज बिन हकीम (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दुर्दशा व दुर्दैव आहे त्या मनुष्याकरिता जो लोकांना हसविण्यासाठी खोटे बोलतो, दुर्दशा आहे त्याच्याकरिता, दुर्दशा आहे त्याच्याकरिता.’’ (हदीस: तिर्मिजी)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये त्या लोकांना सावध करण्यात आले आहे जे बोलताना काही खोट्या गोष्टींचा समावेश करून तीखट-मीठ लावून मजेदार बनवितात आणि त्यापासून आनंद घेतात.
माननीय अबू उमामा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘सत्यावर दृढ असणाNया मनुष्याने धर्माच्या बाबतीत वादविवाद न घातल्यास मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या कोपNयांत एका घराची जबाबदारी घेतो, आणि जो खोटे बोलणार नाही, मग ते हसण्याच्या स्वरूपात का असेना; मी त्याच्यासाठी स्वर्गाच्या मधोमध एका घराची जबाबदारी घेतो आणि जो आपल्या नीतीमत्तेत सुधारणा घडवील, मी त्याच्यासाठी स्वर्गातील सर्वांत वरच्या भागातील घराची जबाबदारी घेतो.’’ (हदीस : अबू दाऊद)


(२२४) अल्लाहच्या नावाचा उपयोग अशा शपथग्रहण करण्यासाठी उपयोग करू नका की त्यामुळे सदाचार, धर्मपरायणता आणि लोककल्याणाच्या कार्यापासून तुम्ही परावृत्त व्हाल.२४३ अल्लाह तुमच्या सर्व गोष्टी ऐकणारा आणि जाणणारा आहे. (२२५) अल्लाह तुम्हाला तुमच्या निरर्थक शपथांबद्दल पकडणार नाही२४४ परंतु ज्या शपथा तुम्ही प्रामाणिकपणे घेता त्याविषयी तुम्हाला अवश्य विचारले जाईल. अल्लाह अत्यंत क्षमावंत आणि सहनशील आहे.
(२२६) जे लोक आपल्या पत्नींशी संबंध न ठेवण्याची शपथ घेतात त्यांच्यासाठी चार महिन्यांचा अवधी आहे.२४५ जर त्यांनी पुन्हा संबंध प्रस्थापित केले तर अल्लाह क्षमावंत व कृपावंत आहे.२४६ (२२७) आणि जर त्यांनी तलाकचाच विचार केला असेल२४७ तर लक्षात ठेवा अल्लाह सर्व काही ऐकणारा व जाणणारा आहे.२४८ 
(२२८) ज्या ाqस्त्रयांना तलाक दिली गेली असेल त्यांनी तीन ऋतुस्रावांपर्यंतच्या काळापर्यंत प्रतिक्षा करावी. आणि त्यांच्यासाठी हे वैध नाही की अल्लाहने त्यांच्या गर्भाशयांत जे काही घडविले आहे ते त्यांनी लपवावे. त्यांनी मुळीच तसे करू नये, जर त्या अल्लाह आणि अंतिम दिनावर विश्वास ठेवीत असतील. त्यांचे पती त्यांच्याशी संबंध सुधारण्यास तयार असतील तर ते या इद्दतच्या काळात त्यांना आपल्या पत्नी म्हणून परत स्वीकार करण्याचे हक्कदार आहेत.२४९ 

243) हदीस कथनाने माहीत होते की ज्‌या व्‌यक्तीने एखादी शपथ खाल्ली आणि नंतर त्याला कळले की या शपथेला तोडणेच योग्य आहे तर त्याला शपथ तोडून दिली पाहिजे आणि प्रायश्चित (कफ्‌फारा) दिले पाहिजे. शपथ तोडण्यासाठी प्रायश्चित मूल्‌य दहा दीनदुबùयांना पोटभर जेवू घालणे किंवा त्यांना पोषाख देणे किंवा एक गुलाम स्वतंत्र करणे किंवा तीन दिवसाचे रोजे ठेवणे आहे. (पाहा कुरआन,  5:89) 
244) अर्थात ज्‌या शपथा विनाहेतू अनवधानाने मुखातून निघतात अशा शपथांवर कफ्‌फारा (प्रायश्चित) नाही की त्यांच्‌यावर पकडसुद्धा होणार नाही.
245) शरियतच्‌या परिभाषेत यास "ईला' म्हणतात. पती-पत्नीच्‌या दरम्यान संबंध नेहमीच चांगले राहु शकत नाहीत. गैरसमजुतीची कारणे तर निर्माण होतच असतात. परंतु अशा गैरसमजुतीला आणि बिघाडाला अल्लाहची शरियत पसंत करीत नाही की, दोन्ही एक दुसऱ्यासोबत कायद्याच्‌या दृïीने पती-पत्नी राहावेत, परंतु व्‌यवहारात एक दुसऱ्यापासून असे विलग व्‌हावे जणू पती-पत्नीच नाही. अशा बिघाडसाठी अल्लाहने चार महिन्याची समयसीमा निश्चित केली आहे. या काळात एकतर त्यांनी आपले संबंध सुरळीत करावे किंवा पती पत्नी संबंध तोडून टाकावेत जेणेकरून एक दुसऱ्यापासून स्वतंत्र होऊन ज्‌याच्‌याशी निभाव होईल त्याच्‌याशी निकाह करावा. आयतमध्ये ""शपथ घेण्याचे'' शब्‌द वापरले आहे. यासाठी हनफी आणि शाफई धर्मशास्त्रींनी या आयतचा हेतू असा समजला की ज्‌यावेळी पती-पत्नीने आपले संबंध तोडण्याची शपथ घेतली तेव्‌हाच आदेश लागू होतो. परंतु मालिकी विद्वानानुसारी अशी शपथ जरी घेतली गेली असेल किंवा नाही, दोन्ही स्थितीत संबंधविच्‌छेदसाठी समयसीमा चार महिन्याचीच आहे. इमाम अहमद यांचे कथन याच समर्थनात आले आहे. (बिदायतुल मुज्‌तहीद, भाग 2 पृष्ठ 88)
246) काही धर्मशास्त्रींनी याचा अर्थ असा घेतला आहे की त्यांनी या समय सीमेत आपली शपथ तोडून टाकली आणि पुन्हा पती-पत्नीचे संबंध स्थापित केले तर त्यांच्‌यावर शपथ तोडण्याचा कफ्‌फारा (प्रायश्चित) नाही. अल्लाह क्षमा करणारा आहे. परंतु अधिकांश फिकाह विद्वानांचे मत आहे की शपथ तोडण्याचा कफ्‌फारा द्यावाच लागेल. "क्षमावान आणि दयावान'चा अर्थ हा होत नाही की कफ्‌फारा तुम्हाला माफ करण्यात आला. याचा अर्थ असा आहे, की अल्लाह तुमचा कफ्‌फारा स्वीकार करील आणि संबंधविच्‌छेद प्रक्रियेत जो अतिरेक एकदुसऱ्याने केला त्यास अल्लाह माफ करील.
247) माननीय उस्मान, इब्‌ने मसऊद, जैद बिन साबित (रजि.) यांच्‌या मते समेटाची (रूजू) समय सीमा चार महिने आहे. ही मुदत संपून गेल्‌यावर हे स्पï होते की पतीने तलाक देण्याचा निश्चिय केलेला आहे. म्हणून मुदत संपल्‌यावर आपोआप तलाक होईल. आणि ही एक ""तलाक बाईन'' असेल म्हणजे इद्दतच्‌या काळात पती समेट घडवू शकत नाही. परंतु ते दोन्ही पती पत्नी इच्छित असतील तर पुन्हा निकाह करू शकतात. हनफी विद्वानांनी याच मताचा स्वीकार केला आहे. सईद बिन मुसय्यिब, मकहुल, जोहरी इ.च्‌या मते चार महिन्याची मुदत संपल्‌यावर आपोआप तलाक होईल. परंतु ही ""तलाक रजई'' असेल बाईन नसेल (म्हणजे इद्दतकाळात समेट घडू शकतो, पुन्हा निकाह करण्याची गरज नाही) या विपरीत माननीय आएशा (रजि.), अबू दरदा (रजि.) आणि मदीनातील अनेक धार्मिक विद्वान यांच्‌या मते चार महिन्याची मुद्दत संपल्‌यानंतर न्यायालयात दावा दाखल होईल. न्यायालय पतीला आदेश देईल की पत्नीशी समेट (रुजू) करावे अथवा तलाक द्यावा. इमाम मलिक व शाफईंनी याच मताचा स्वीकार केला आहे. 
248) म्हणजे जर तुम्ही पत्नीला अनुचित प्रकारे सोडून दिले तर तुम्ही अल्लाहविषयी निडर बनू नका. तो तुमच्‌या अतिरेकास जाणून आहे.
249) हा आदेश त्या स्थितीसाठी आहे ज्‌यात पतीने-पत्नीला एक किंवा दोन तलाक दिले असतील.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेत उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भाषणानंतर केलेल्या ट्विटला उत्तर कोरियाने प्रत्युत्तरात उत्तर कोरियाविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध पुकारल्याचे म्हटले आहे. चाडसह उत्तर कोरियाच्या नागरिकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत प्रवेश बंदीचा आदेश काढल्याने, उत्तर कोरियाचा संताप वाढला आहे. मात्र उत्तर कोरियाने युद्धाची घोषणेसंदर्भात केलेला दावा अमेरिकेने फेटाळला असला तरी युद्धाबाबतचा हा वाद-प्रतिवाद विकोपाला पोहोचला असून जणू आगामी काळातील तिसऱ्या महायुद्धाची ही ठिणगीच म्हणावी लागेल.
जगाच्या इतिहासात विसावे शतक अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरते. या शतकात जगाने दोन महायुद्धे बघितली व त्यात झालेला अमानुष मानवी संहारसुद्धा बघितला. पहिले महायुद्ध १९१८ साली संपले. तेव्हा जागतिक नेत्यांना वाटले की यापुढे असा मानवीसंहार होणार नाही यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली पाहिजे. याच हेतूने १० जानेवारी १९२० रोजी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष वुड्रू विल्सन यांच्या पुढाकाराने `लिग ऑफ नेशन्स’ ही संघटना स्थापन झाली. दुर्दैवाने या संघटनेत अमेरिकेसारखा बलाढ्य देश नव्हता. या व इतर अनेक कारणांनी `लिग ऑफ नेशन्स’ ही संघटना फारशी यशस्वी होऊ शकली नाही व १९३९ साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. दुसरे महायुद्ध १९४५ साली समाप्त झाले खरे, पण जाताजाता जगाला अणुशक्तीचे भयानक रूप दाखवून गेले. अमेरिकेने हिरोशीमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले. १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यानंतर पुन्हा एकदा भविष्यात अशी भयानक युद्धे होऊ नयेत म्हणून एखादी जागतिक संघटना असावी हा विचार बळावला. यातूनच २४ ऑक्टोबर १९४५ रोजी `संयुक्त राष्ट्रसंघ’ ही संस्था स्थापन करण्यात आली जी आजही कार्यरत आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघ निर्माण झाला म्हणजे जगातील युद्धे संपली असा नक्कीच नाही. आजही जगाच्या कोणत्या ना कोणत्या भागात युद्धे सुरूच आहेत. असे होण्याचे अतिशय महत्त्वाचे कारण म्हणजे जरी दुसरे महायुद्ध संपले तरी त्याबरोबरच शीतयुद्ध सुरू झाले. जगाच्या इतिहासात शीतयुद्ध हा वेगळा प्रकार होता. यात एका बाजूला अमेरिकाप्रणीत भांडवलशाही होती तर दुसरीकडे `सोव्हिएत युनियनप्रणित मार्क्सवाद’ होता. याचाच अर्थ असा की शीतयुद्ध हे प्रत्यक्षात तत्वज्ञानासाठीचे युद्ध होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या काळी अमेरिका व रशिया आपापली तत्वज्ञानं जगभर नेण्यासाठी साम, दाम, दंड व भेद वगैरे सर्व प्रकारची हत्यारे वापरत होती. शीतयुद्धाचा आविष्कार संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत होत असे. रशियाने जर अमेरिकेच्या मित्रराष्ट्राच्या विरोधात ठराव आणला तर अमेरिका `नकाराधिकार’ वापरून हा ठराव निकामी करत असे. तसेच रशियाही करत असे. यामुळे सुरक्षा परिषदेत काहीही अर्थपूर्ण कामच होत नसे. यात मोठया प्रमाणात १९९१ साली बदल झाला जेव्हा सोव्हिएत युनियन रसातळाला गेले. थोडक्यात, म्हणजे १९९५ ते १९९१ दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे शीतयुद्धाची रणभूमी झालेले होते. आज अमेरिका व इतर युरोपियन देश मानवी हक्क किंवा अण्वस्त्र प्रसाराच्या मुद्द्याला तितकेसे महत्त्व देत नसून त्यांच्या दृष्टीने आर्थिक हितसंबंध जास्त महत्त्वाचे असतात. सध्या जागतिक राजकारणात उत्तर कोरिया एक महासंकट बनले आहे. संयुक्त राष्ट्र संघासह जगातील जवळपास सर्व महाशक्ती देशांनी घातलेली बंदी आणि चेतावणीकडे दुर्लक्ष करून हुकुमशाह किम जोंग यांच्या नेतृत्वातील हा इवलासा देश जगासाठी मोठे डोकेदुखी बनली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या बंदीनंतरही घातक प्रक्षेपास्त्राच्या परीक्षणापासून ते अमेरिकेला उघड आव्हान देण्यापर्यंत उत्तर कोरियाची मजल गेली आहे. काही दिवसांपूर्वी जपानवरून क्षेपणास्त्रांचा मारा उ. कोरियाने केला होता. उ. कोरियाचे काय करायचे याचे उत्तर सध्या जगातील कोणत्याही महाशक्तीकडे नाही. जर लवकरात लवकर या घातक यक्षप्रश्नाचे उत्तर शोधण्यात आले नाही तर हे जगाला तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाईल, याची दाट शक्यता आहे. कारण गत दोन्ही महायुद्धांचा इतिहास आणि त्यांच्या पाश्र्वभूमीचे संक्षिप्त अवलोकन केल्यास आढळून येते की तत्कालीन परिस्थिती अगोदरपासून ज्वालामुखीसारखी निर्माण होऊ लागली होती. मग नंतर एका क्षुल्लक घटनेवरून दोन्ही जागतिक युद्धाच्या रूपात महाविस्फोट झाला. यूरोपीय देशांमध्ये आपसांतील मतभेद विकोपाला पोहोचले होते. ऑस्ट्रीयाच्या राजकुमारच्या हत्येच्या बहाण्याने पहिल्या महायुद्धाची सुरूवात झाली. १९१८ साली प्रथम जागतिक युद्धाच्यासमाप्तीनंतर राष्ट्रसंघाची स्थापना झाली आणि दुसरीकडे जर्मनीवर अनुचित प्रतिबंध लादण्यात आले. यातच दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली ती १९३९ साली जर्मनीने पोलंडवर केलेल्या आक्रमणाच्या स्वरूपात. हे विश्वयुद्ध अतिशय भयानक होते. या युद्धाचा अंत होता होता अमेरिकेने जपानवर अणूबॉम्ब टाकले. आजही जागतिक वातावरण तणावपूर्ण आहे. अशात उत्तर कोरियाची वर्तणूक पाहता त्याने किंवा त्याच्याविरूद्ध कोणत्याही देशाने केलेली कारवाई तिसऱ्या महायुद्धाचे कारण बनू शकते. उ. कोरियाने अगोदरच अमेरिकेला हायड्रोजन बॉम्बची भीती दाखविली आहे. यावर जागतिक महाशक्ती राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांनी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, अन्यथा जग बेचिराख झाल्याशिवाय राहणार नाही.

दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यांच्या सीमारेषा सतत वाढत राहिलेल्या आहेत तो चीन हा एकमेव देश आहे. चीनच्या शेजाराला पाकिस्तान व उत्तर कोरिया या देशांशी त्यांनी सीमावाद उकरून काढला नसून बाकीच्या बारा देशांशी भूमीवर सागरी क्षेत्रातील असलेल्या सीमांबाबत खुसपटे काढलेली आहेत. चीनच्या या धोरणाला ‘सलामी स्लाईसिंग’ म्हणून ओळखले जाते. १९४८ साली चीनमध्ये राज्यक्रांती झाली आणि चीनमधील घराणएशाही उद्ध्वस्त होऊन चीनी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आली. तेव्हापासून चीनचा आक्टोपस विळखा चालू झालेला आहे. १९४९ साली चीनने लष्करी बळावर तिबेट घशात घातले, त्यानंतर १९६२ मध्ये भारताचा अक्साई चीन आणि लडाखचा काही भाग भारतावर आक्रमण करून प्राप्त केला. अशा या चीनच्या धोरणानुसार चीनची ‘सलामी स्लाईसिंग’ सुरवात डोकलामच्या आक्रमणाने सुरू झालेली आहे. जुन्या वहिवाटी, जुने नकाशे, जुने करार ऐतिहासिक जुने दाखले भासवून नवनव्या कुरापती व कारणे काढून चीन शेजारी देशाशी नवनवे सीमावाद, सागरी क्षेत्रवाद उकरीत आहे. आपल्या आर्थिक ताकदीची व लष्करी बळाची घमेंड मारून आपली साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्याची धमकी देत आहे. अरुणाचल व लडाख हे तिबेटचे भाग असल्याचे सांगून चीनी राज्यकर्ते फार पूर्वीपासूनच त्यावर वाद घालीत आहेत, हे उगाच नाही!
- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.

अत्यंत निर्भीड आणि जातियवादविरोधी असलेल्या अत्यंत लढवय्या पत्रकार म्हणून ओळख असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमध्येहत्या करण्यात आली. कारण गौरी यांच्या लेखणीने सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी संघटनांवर व त्याच्या नेत्यांवर, त्यांच्या पक्षपाती धोरणांवर आणि कर्मठ व जातियवादी विचारांवर हल्लाबोल केला होता. जातियवाद्यांचा त्यामुळे थयथयाट होत होता आणि गौरी लंकेश त्यांचे शत्रू बनल्या होत्या. म्हणून अशाच जातियवाद्यांनी व हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा काटा काढला असावा अशी सध्या चर्चा चालू आहे. ज्या पद्धतीने नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम.एस. कलबुर्गी यांना मारण्यात आले अगदी तशीच पद्धत गौरी लंकेश यांची हत्या करण्यात अवलंबली आहे. म्हणून या हत्यासत्रामागे एक मजबूत साधनसंपत्ती असलेली व राजकीय वरदहस्त लाभलेली शक्ती असावी, असा संशय येऊ लागला आहे. या मागची विचारधारा, असले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, मुडदे पडत आहेत. ही फौज ट्विटरवर पण सक्रीय आहे. आणि गौरीच्या खुनाचे समर्थन करीत आहे. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा वाचाळ वाह्याताच्या ट्विटचा मागोवा घेत आहेत. जणू त्याला प्रोतास्हनच देत आहेत. गौरी लंकेशच्या हत्येबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या व हळहळणाऱ्यांची खिल्ली उडविणाऱ्यांपैकी काहींना आपले प्रधानसेवक ट्विटरवर फॉलो करतात, याचा अर्थ आपणच किती दुर्दैवी, नालायक आणि मूर्ख आहोत हेच स्पष्टहोत नाही काय?
- निसार मोमीन, पुणे.

ब्रह्मदेशातील (म्यानमार) बौद्धांनी व तेथील सरकारने स्थानिक रोहिंग्या मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचे नाकारले असून त्यांना देशाबाहेरकाढण्याचे सत्र अहोरात्र चालविले आहे. ज्यामुळे हजारो रोहिंग्या मुस्लिम बांग्लादेश, भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि शेजारच्या राष्ट्रांत पळ काढीत आहेत व त्याच्या होड्या समुद्रात मुलाबाळांसहित बुडत आहेत. आजमितीला म्यानमारमध्ये दहा लाख रोहिंग्या मुस्लिम असून ते सुन्नी इस्लामी पंथाचे आहेत. त्यांची म्यानमारच्या राइकन (अरकान) प्रांतात प्रामुख्याने वस्ती आहे. म्यानमार सरकार त्यांना नागरिकत्वाचा दर्जा देण्यास तयार नसल्याने त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत त्यामुळे ते देशविहीन बनले आहेत. याला दहशतवादी बौद्ध व म्यानमार सरकार जबाबदार आहेत. दहशतवादी बौद्ध भिक्षुक व बौद्ध समाजाने रोहिंग्या मुस्लिमांच्या कत्तली चालविल्या असून त्यांची घरेदारे जाळून टाकीत आहेत. त्यांच्या महिलांवर बलात्कार करीत आहेत. यामुळे या आशियाई भागात बौद्ध-मुस्लिम संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नमके याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारची वारी केली आहे. या प्रश्नावर मोदींनी कडक भूमिका घ्यायला हवी. कारण बौद्ध-मुस्लिम संघर्ष भारतातसुद्धा पेट घेऊ शकतो आणि दहशतवादाला बळ मिळू शकते. सध्या देशात पन्नास हजार रोहिंद्यांनी आश्रय घेतला आहे. म्यानमारच्या वांशिक हिंसाचारामुळे जानेवारी १४ ते मे २०१५ या महिन्यांत ९८ हजार रोहिंग्यांनी बंगालच्या उपसागरामधून पलायन केले आहे. बांग्लादेशात रोहिग्यांनी आश्रय घेतला असून परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.
- निसार मोमीन, पुणे.

-कलीम अजीम, अंबाजोगाई

पहलू खानच्या हल्लेखोरांना क्लीन चिट देऊन भाजपने पुन्हा एकदा चर्चा गायकेंद्री केली आहे. गेल्या काही आठवड्यापासून गाय अजेंड्यातून बाहेर गेली होती. जीडीपीचे घसरलेले आकडे, जुन्या नोटांचा घोळ, चलन फुगवटा, गौरी लंकेशची हत्या, फेक न्यूज, पेट्रोल दरवाढ असे ज्वलंत मुद्दे चर्चाविश्वात येताच भाजपने गाय गोठ्यातून बाहेर काढली आणि चर्चा बघताबघता राजकारण पुन्हा गायकेंद्री झालं.
पेट्रोल दरवाढीच्या भडक्याने भक्त संप्रदाय यंदा प्रथमच सरकारविरोधात गेल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे भक्तांना योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी गायीचं खेळणं बाहेर काढावं लागलं. नेहमीचं डऱ्यांव-डऱ्यांव ऐकून भक्त मंडळी आपल्या नित्यकामात व्यस्त झाली. दुसरीकडे संघ प्रमुखांनी हैदराबादला घटना बदलण्याचं भाषण दिलं. मग काय सुधारणावादी देखील विरोध कार्यक्रम आखण्यात व्यस्त झाले. परिणामी पहलू आणि पेट्रोल दरवाढीची चर्चा अचानक गायब झाली.
पहलू खान हत्या प्रकरणात क्ल गुरुवारी सहा हल्लेखोरांना क्लीन चिट देण्यात आली आहे. हत्येच्या वेळी हे आरोपी घटनास्थळी नव्हते असा युक्तिवाद राजस्थान पोलिसांनी केला आहे. घटना घडताना सर्व आरोपींचे मोबाईल लोकेशन इतरत्र होते, त्यामुळे त्यांनी पहलूची हत्या केली नाही असं पोलिसांनी अहवाल दिला आहे. या घटनेचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. काँग्रेसनं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. तसंच हा खटला राजस्थान बाहेर हलवावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. तर पहलू यांच्या कुटुंबीयांनी राजस्थान पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. सुरुवातीपासून राजस्थान सरकार व पोलिसांची भूमिका संशयास्पद होती, त्यामुळे पोलिसांनी दबावातून हा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा खटला हरयाणा किंवा दिल्ली कोर्टात चालवावा अशी विनंती पहलूचं कुटुंब करत आहे. इथंही न्याय मिळाला नाही तर सुप्रीम कोर्टात जाऊ असा पावित्रा खान कुटुंबीयांनी घेतला आहे.
गुरुवारी ही बातमी येताच 'सोशल मीडिया'तून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पहेलू खानला नेमकं कोण मारले अशी प्रश्न फेरी नेटीझन्स घेत होते. पहलू खानच्या हल्लेखोरांना क्लीन चिट देऊन पोलिसांनी पुन्हा पक्षपातीपणाचं उदारहण देऊ केलं आहे. इथंही सेम अखलाख पॅटर्न वापरण्यात आला आहे. पीडितांना आरोपी ठरवून पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. सरकारने आयोजित केलेल्या पशू मेळाव्यातून दुधासाठी खरेदी केलेल्या व्यापाऱ्याला सरकारनेच गो-तस्कर ठरवलं आहे. तर अखलाक प्रकरणात त्याच्या फ्रिजमधलं मांस हे गौमांस असल्याचा आरोप करण्यात आला होता, याप्रकरणी बिसाहडा गावाने महापंचायत बोलावून अखलाक कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला होता. आंखोदेखी साक्षीदार असताना आरोपींना क्लीन चिट देणे म्हणजे हे चक्क न्याय व्यवस्थेचच 'लिंचिग' आहे. पीडितांना आरोपी घोषित करणं हे जगात कुठेच होत नसेल, पण भाजपशासित राज्यकारभारात असे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. यावर संवेदनहीन सीव्हील सोसायटी गप्प आहे. हे संसदीय लोकशाहीचं वस्त्ररहरण आहे. पहलू खानला या हल्लेखोरांनी मारलं नाही तर 'ब्लू व्हेल' खेळताना तो मारला गेला का? असा प्रश्न सहज पडून जातो.
नुकतंच मॉब लिंचिग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कडक आदेश देऊ केले आहेत, मॉब लिंचिग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल अधिकारी नियुक्त करावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. आदेशाची अंमलबजावणी न करता उलट गो-पीडितांना आरोपी ठरवून मुख्य आरोपींची सुटका केली जात आहे. अखलाकच्या हल्लेखोराला शहीद म्हणून राष्ट्रध्वजाचा सन्मान देण्यात आला होता. गेल्या महिन्यात छत्तीसगढमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या गोशाळेत २०० गायींचा उपासमारीने मृत्यू झाला होता. गाईच्या नावानं माणसं मारणारे गोरक्षक यावर गप्प होते. यातल्या एका गाईला मुस्लिमांकडून थोडी तरी इजा झाली असती तर कथित गोरक्षकांनी देश पेटवला असता. नुसतं संशयावरुन २८ जणांची हत्या गोरक्षकांनी केल्याचा इतिहास ताजा आहे.
भाजप मतांच्या ध्रूवीकरणासाठी गायीचं उदात्तीकरण करत असल्यचं स्पष्ट आहे. भाजपने गोवा विधिमंडळात जनतेला ग्वाही दिली की, ‘खाण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत बीफ कमी पडू देणार नाही' हे कुठलं भाजप आहे. गोवा व छत्तीसगढची घटना ही जनतेच्या धार्मिक भावनांशी खेळ होता. भारतीय संस्कृतीने गाईला देवत्व प्रदान केलंय, पण भाजप सरकारने गाईला राजकीय खेळणं बनवलंय. येत्या काळात गायीवरुन हिंसक प्रवृत्तींचं समर्थन करताना छत्तीसगढची घटना तेवढी आठवावी.
पहलू खानच्या हल्लेखोरांना क्लीन चिट दिल्याने न्यायाची अपेक्षा फोल आहे. त्यामुळे खटला सेशन कोर्ट किंवा हायकोर्टातही सरकारी दबावाखाली चालेल. त्यामुळे हा खटला राजस्थानबाहेर चालवावा अशी मागणी पहलू खानच्या मुलाने केली आहे. मुलगा इरशाद घटनेचा प्रयक्षदर्शी आहे. मात्र मृताचा जबाब व प्रत्यक्षदर्शीची साक्ष सीबी-सीआयडीने निकालात काढत म्हटलंय की, ‘आरोपीचे मोबाईल घटनेवेळी इतर ठिकाणी होते. त्यामुळे त्यांना हल्लेखोर म्हणता येत नाही' नक्कीच हा युक्तिवाद हास्यास्पद व प्रथमदर्शनी विश्वास न ठेवण्यासारखा आहे. पीडित व प्रत्यक्षदर्शी सांगत असताना मोबाईल लोकेशनचा आधार घेतला गेला. याचा अर्थ स्पष्ट होतो की पोलिसांना आरोपींना अडकवायचं नाही, त्यामुळे नसते कारणं ते पुढे करत आहेत. उलट पशूखरेदीचे सरकारी कागदं अमान्य करत पहलू खानवर गो-तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यापूर्वी जुनैद हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यात आला आहे. अखलाकचे हल्लेखोर मोकाट आहेत. पहलूचे आरोपीही आता सुटणार आहेत. या क्लीन चिटविरोधात १५ सप्टेंबरला काही काही संघटनांनी पहलू खानच्या हत्येच्या ठिकाणी श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं. स्थानिक गुंडांनी ही श्रद्धाजंली सभा उधळून कार्यकत्र्यांना धमकावलं. वंदे मातरम्, भारत माता की जय म्हणत कार्यकत्र्यांवर चालून गेले. पोलिसांनीदेखील सभा घेण्यास मज्जाव केला. या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी डीएसपी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं होतं. अखलाकचं उदाहरण समोर आहे. पीडितांना आरोपी करण्याची पद्धत भारतात सुरु झाली आहे. गोमांस व गो-तस्करीच्या संशयावरुन मारले गेलेल्या प्रत्येकांना आरोपी बनवण्यात आलं आहे. मीडियाने पीडितांची बाजू घेण्याऐवजी हल्लेखोरांची बाजू लावून धरली. पीडितांना दोषी घोषित करणे ही न्यायव्यवस्थेची थट्टा आहे. या प्रकाराला काँग्रेस नेते शहजाद पुनावाला यांनी न्यायव्यवस्थेची लिंचिग म्हणत प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. अशा प्रकारावर 'मासुका' अंतर्गत करावाई व्हावी अशी मागणी ते करत आहेत.
पहलूची हत्या एप्रिलमध्ये झाली होती. या प्रकरणी ती तपास चार महिन्यानंतर जुलैमध्ये राजस्थान पोलिसांनी गुन्हे शाखा सीबी सीआयडीकडे सोपवला. गुन्हे शाखेनं दोन महिन्यात तपास पूर्ण करत १३ सप्टेंबरला अहवाल दिला. ऑगस्ट-सप्टेंबर महिने नोटबंदीचा घोळ, जीडीपी, चलन फुगवटा, गौरी लंकेश आणि इंधन दरवाढीवरुन सरकारवर टीकास्त्र उगारलं जात होतं. नोटबंदीचे आकडे व आरबीयच्या उत्पन्नात घट सरकारविरोधी होते.
जीडीपीवरुन हल्लाबोल सुरुच होता, अशात चर्चा वळती करण्यासाठी बाबा राम रहीम, रोहिंग्या शरणार्थी, बुलेट ट्रेन, दिल्लीत शाळकरी मुलाची हत्या बीग मीडिया इव्हेंट झाले. यात नोटबंदी, इंधन दरवाढ व गौरी लंकेश विषय बाजुला फेकले गेले. चर्चा पुन्हा जीडीपी न गौरी लंकेशवर येईल असे संकेत येताच राज्यघटना बदल व गोरक्षा मीडिया पॅनलला आणण्यात आली. सुधारणावादी व प्रतिगामींना कृती कार्यक्रम भेटला आहे. येत्या काळात पुन्हा यावर चर्चेच्या पेâऱ्या झडणार आहेत. अर्थातच गौकेंद्री राजकारणाचा खेळ पुन्हा सुरु झालाय.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget