Halloween Costume ideas 2015
Latest Post


प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विधान आहे की "अल्लाह लाजाळू आणि उदार मनाचा आहे. जेव्हा कुणी आपले दोन्ही हात त्याच्या समोर पसरवून त्याला काही मागतो तेव्हा त्यास रिकाम्या हातांनी परत पाठवताना त्याला लाज वाटते." (अबू दाऊद, तिर्मिजी, इब्ने माजा)

कअब बिन अजरा (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत गेलो तेव्हा मी पाहिले की प्रेषितांचा चेहरा पडलेला आहे. मी त्यांना म्हणालो की माझे माता-पिता तुमच्यावर कुरबान. आपणास बरे वाटत नाही का? त्यावर प्रेषितांनी उत्तर दिले, "तीन दिवस झाले अन्नाचा एक कण पोटात गेला नाही." कअब म्हणतात की मी तिथून निघून गेलो काही खाण्याची व्यवस्था करण्यासाठी. मी पाहिलं की एक ज्यू व्यक्ती आपल्या उंटाला पाणी पाजत होता. मी त्याला विहिरीतून पाणी काढून देण्याचा खजुरीवर सौदा केला. असे करून बरेच खजू जमा केले. ते घेऊन मी प्रेषितांकडे परतलो. त्यावर प्रेषितांनी विचारले, "हे तुम्हाला कुठून मिळाले?" कअब म्हणतात की मी त्यांना सर्व हकीगत सांगितली. प्रेषित (स.) यांनी मला विचारले, "हे कअब, तुम्ही माझ्यावर प्रेम करता?" मी म्हणालो की होय. माझे माता-पिता तुमच्यावर कुरबान. त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, "जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्याकडे उपासमार अशी चालून येते जसे डोंगरावरून पाणी खाली वाहते. हे कअब, तुम्हालादेखील या परीक्षेतून जावे लागेल आणि उपासमार तसेच आर्थिक संकटालाही तुम्हाला तोंड द्यावे लागेल." (तरगीब व तरहीब, तिबरानी)

उतबा बिन गजवान बसरा (इराक) चे राज्यपाल होते. त्यांनी आपल्या एका भाषणात इतर काही गोष्टींबरोबर हेदेखील सांगितले की मी आणि प्रेषित मुहम्मद (स.) अशा अपस्थेत होतो की (मी सातपैकी एक होतो, इतर सहा व्यक्ती होते) आर्थिक स्थिती इतकी हलाखीची होती की बाबळीच्या झाडाच्या पानाशिवाय आमच्याजवळ खायला काहीही नव्हते. पाने खाऊन खाऊन आमच्या तोंडात जखममा झाल्या होत्या. कपडे नव्हते. एकदा एक चादर मिळाली होती. तिचे दोन तुकडे करून एक तुकडा मी परिधान केला आणि दुसरा सअद बिन मालिक यांना दिला. आणि आजची स्थिती अशी आहे की आम्ही सातही जणांपैकी प्रत्येक जण कोणत्या न् कोणत्या राज्याचा राज्यपाल आहे. मला हा सन्मान लाभला यासाठी मी अल्लाहचा आभारी आहे. मी मोठेपण बाळगावे यापासून मी अल्लाहला शरण जातो. (तरगीब व तरहीब, मुस्लिम)

माननीय अदी यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``तुमच्यापैकी प्रत्येक मनुष्याशी अल्लाह स्वत: संभाषण करील (हिशोब घेईल) आणि तेथे त्याचा कोणीही शिफारस करणारा नसेल आणि त्याला लपविणारा पडदाही असणार नाही. तो मनुष्य आपल्या उजवीकडे पाहील (कोणी शिफारस करणारा आणि मदत करणारा आहे) तेव्हा त्याला आपल्या कर्मांव्यतिरिक्त दुसरे काहीही दिसणार नाही, मग डावीकडे पाहील तेव्हा तिकडेही आपल्या कर्मांव्यतिरिक्त त्याला काहीही दिसणार नाही, मग समोरच्या दिशेने पाहील तेव्हादेखील त्याला फक्त नरक (आपल्या अनेक भयानकतेसह) दृष्टीस पडेल. हे लोकहो! आगीपासून वाचण्याची काळजी घ्या, एका खजुरीचा अर्धा भाग देऊन का असेना.'' (हदीस : मुत्तफ़क़ अलैह)

स्पष्टीकरण : या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) `इनफ़ाक़' (अल्लाहचा `दीन'- जीवनधर्म आणि अल्लाहच्या निराधार दासांवर खर्च करणे) ची शिकवण देत होते, म्हणून फक्त याचाच उल्लेख केला. पैगंबर म्हणतात, ``जर कोणाकडे फक्त एकच खजूर आहे आणि तो तिचा अर्धा भाग देत असेल तर हेदेखील अल्लाहच्या दृष्टीने मौल्यवान आहे. तो संपत्तीचे अधिकउणे पाहात नसून खर्च करणाऱ्याची मनोवृत्ती पाहात असतो.''

संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद


 


(४१) हे लोक पाहात नाहीत की आम्ही या भूमीवर चालून येत आहोत आणि हिचे वेटोळे सर्व बाजूंनी आवळत येत आहोत?६० अल्लाह राज्य करीत आहे, कोणी त्याच्या निर्णयावर पुनर्दृष्टी करणारा नाही आणि त्याला हिशेब घेण्यास काही विलंब लागत नाही. 

(४२) यांच्यापूर्वी जे लोक होऊन गेले आहेत त्यांनीदेखील मोठमोठाले डावपेच लढविले होते,६१ परंतु खरी निर्णायक युक्ती तर पूर्णपणे अल्लाहच्याच हातात आहे. तो जाणतो की कोण काय कमवीत आहे, आणि लवकरच हे सत्याचा इन्कार करणारे पाहतील की कोणाचा शेवट चांगला होतो.

(४३) हे इन्कार करणारे म्हणतात की तुम्हाला अल्लाहकडून पाठविलेले नाही, सांगा, ‘‘माझ्या व तुमच्या दरम्यान अल्लाहची ग्वाही पुरेशी आहे तसेच त्या प्रत्येक व्यक्तीची साक्ष ज्याला ग्रंथाचे ज्ञान आहे.’’६२

१४. इब्राहीम

(मक्काकालीन, एकूण ५२ आयती)

अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.

(१) अलिफ, लाऽऽम, रा. हे मुहम्मद (स.)! हा एक ग्रंथ आहे जो आम्ही तुम्हावर अवतरित केला आहे, जेणेकरून तुम्ही लोकांना अंधाराच्या गर्तेतून काढून दिव्यप्रकाशाकडे आणावे, त्यांच्या पालनकत्र्याच्या इच्छेने जो जबरदस्त आणि स्वयंभू स्तुतीस पात्र आहे. 

(२) अल्लाह असमंतातील व पृथ्वीरील सर्व चराचरांचा स्वामी आहे. आणि अत्यंत कठोर विनाशकारी शिक्षा आहे सत्य स्वीकारण्यास नकार देणाऱ्याकरिता


६०) म्हणजे काय तुमच्या विरोधकांना दिसून येत नाही की इस्लामचा प्रभाव अरब भूभागाच्या कानाकोपऱ्यात फैलावत जात आहे. तसेच या लोकांसाठी चोहोबाजूने घेर कमी कमी होत आहे. ही त्यांच्यावर आलेल्या आपत्तीची निशाणी नाही तर काय आहे? अल्लाहचे सांगणे, `आम्ही या भूभागावर चालून येत आहोत.' ही एक अत्यंत सूक्ष्म वर्णनशैली आहे. सत्याचे आवाहन अल्लाहकडून होत आहे आणि अल्लाह त्यास प्रस्तुत करणाऱ्यांसोबत आहे. म्हणून एखाद्या भूभागात हा संदेश फैलावण्यास अल्लाह उपमा देतो की `आम्ही स्वत: त्या भूभागावर चालून येत आहोत.'

६१) म्हणजे आज ही काही नवीन गोष्ट नाही की सत्याच्या आवाजाला दाबण्यासाठी असत्य, धोका आणि अत्याचारांचे हत्यार वापरले जात आहेत. मानवी इतिहासात नेहमी अशाच युक्त्यांनी सत्य आवाहनाला पराजित करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

६२) म्हणजे ती प्रत्येक व्यक्ती जी वास्तविकपणे आस्मानी ग्रंथांचे ज्ञान ठेवते, तो याची साक्ष देईल की जे काही मी प्रस्तुत करीत आहे ती तीच शिकवण आहे ज्याला पूर्वीचे पैगंबर घेऊन आले होते.


१) म्हणजे अंधारातून काढून प्रकाशात आणण्याचा अर्थ शैतानी रस्त्यांपासून हटवून अल्लाहच्या मार्गावर आणणे आहे. दुसऱ्या शब्दांत प्रत्येक तो मनुष्य जो अल्लाहच्या मार्गावर नाही तो खरे तर अज्ञानतेच्या अंधारात भटकत आहे. मग तो स्वत:ला कितीही प्रकाशमान विचारांचा का समजेना आणि त्याच्या दाव्यामध्ये कितीही ज्ञानप्रकाश झगमग करीत असेल. याविरुद्ध ज्याने अल्लाहचा मार्ग अवलंबिला आहे तो ज्ञानप्रकाशात आला मग तो अशिक्षित खेडूत का असेना.

नंतर असे सांगितले गेले की तुम्ही यांना आपल्या पालनकर्त्याच्या आदेशाने किंवा त्याच्या कृपेने अल्लाहच्या मार्गावर आणा. यात या वास्तविकतेकडे संकेत आहे की एखादा प्रचारक मग तो पैगंबर का असेना, सरळमार्ग दाखविण्याशिवाय दुसरे आणखी काही करू शकत नाही. एखाद्याला या मार्गावर आणणे त्याच्या अधिकारातील गोष्ट नाही. हे सर्व अल्लाहची मेहरबानी आणि त्याच्या परवानगीवर अवलंबून आहे. अल्लाह एखाद्याला प्रेरणा देतो तेव्हा तो मार्गदर्शन प्राप्त् करू शकतो, अन्यथा प्रेषितासारखा पूर्ण प्रचारक आपले पूर्ण जोर लावूनसुद्धा त्याला सरळमार्गावर आणू शकत नाही. अल्लाहच्या प्रेरणेविषयी त्याचा कायदा अगदी वेगळा आहे ज्याला कुरआनमध्ये विभिन्न स्थानांवर स्पष्ट रुपाने सांगितले गेले आहे. याने स्पष्ट होते की अल्लाहकडून मार्गदर्शन त्यालाच मिळते जो स्वत: मार्गदर्शनाची इच्छा उरी बाळगतो. आग्रह, दुराग्रह आणि पूर्वग्रहदूषितपणा व पक्षपातापासून तो पवित्र असला पाहिजे. तो आपल्या मनाचा व इच्छांचा दास नसला पाहिजे. त्याने डोळे उघडे ठेवून पाहिले पाहिजे, उघड्या कानांनी ऐकले पाहिजे आणि निर्मळ मनाने विचार केला पाहिजे. असे करताना सत्य त्याने बेधडक मान्य केले पाहिजे.

२) अरबीत `हमीद' शब्द आला आहे. हमीद हा शब्द `महमूद'चाच समानार्थी शब्द आहे, तरी दोघांत सूक्ष्म फरक आहे. महमूद एखाद्याला तेव्हाच म्हटले जाते जेव्हा त्याची प्रशंसा केली जाते किंवा केली गेली असेल  परंतु `हमीद' स्वत: प्रशंसनीय आहे. मग त्याची कोणी प्रशंसा करो अथवा न करो. या शब्दाचा अर्थ गुणग्राहक, प्रशंसनीय अशा शब्दांनी व्यक्त होऊ शकत नाही. म्हणून आम्ही `हमीद' याचा अर्थ `आपल्या अस्तित्वात (स्वयंभू) प्रशंसनीय' (स्तुतीस पात्र)असा केला आहे.


बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ ला येवला येथे ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही’ ही घोषणा केली. त्यानंतर त्यांनी हिंदू सनातनी कर्मठ धर्ममार्तंडाच्या वागणुकीत काही बदल होतो का, म्हणून तब्बल २० वर्षेवाट पाहिली आणि १९५६ मध्ये त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला. लाखोंच्या संख्येने हिंदूंची संख्या कमी झाली ती मुसलमानांचा अन्याय, अत्याचारामुळे नव्हे तर हिंदुत्वाच्या जन्मजात वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनेने दलितांवर केलेल्या छळामुळे आणि खापर फोडतात मुस्लिमांमुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे म्हणून!

पाकिस्तान निर्मितीला जबाबदार खऱ्या अर्थाने सनातनी ‘हिंदुत्ववादी’च आहेत. जिना मूळचे हिंदू लोहाना समाजाचे. त्यांच्या वडिलांचा मासेमारीचा व्यवसाय. लोहाना समाजात मासेमारीचा व्यवसाय निषिद्ध. म्हणून कर्मठ सनातनी हिंदुत्वाद्यांनी त्यांचा छळ केला. याच छळापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी धर्मांतर केले. त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला. दुर्दैवाने खरा इतिहास लिहिल्या गेलाच नाही. काश्मिरी पंडितांवरील मुस्लिमांनी केलेल्या भीषण अन्याय-अत्याचाराचे अतिरंजित चित्रण ‘काश्मीर फाइल्स’ सिनेमात केले आहे. मुस्लीमद्वेषावर आधारित या सिनेमाचे ‘प्रमोशन’ खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी केले. या सिनेमाने करोडोचा धंदा केला व मुस्लीम द्वेषाचे भरघोस पीक या माध्यमातून घेतले गेले. जे भाजपाला भविष्यात ‘राजकीय’ फायदा करून देईल. पण या विषयाची एक दुसरीही बाजू आहे. हरिसिंग काश्मीरचे राजे होते तेव्हा मोठ्या संख्येनी हिंदू धर्मातून धर्मांतरित झालेल्या मुस्लिमांनी त्यांना हिंदू धर्मात परत घेण्याची विनंती केली. हरिसिंगांनी त्यांना सांगितले, ‘हा प्रश्न धर्मक्षेत्रातील असल्यामुळे यावर निर्णय काश्मीरी पंडित घेतील.’ निर्णयासाठी हा प्रश्न काश्मिरी पंडितांकडे सोपविण्यात आला. पण काश्मिरी पंडितांनी या प्रश्नापासून हात झटकत या प्रश्नावर केवळ काशीचे पंडितच निर्णय देऊ शकतात, असा निवाडा दिला. काशीच्या पंडितांनी त्या धर्मांतरित मुस्लिमांना हिंदू धर्मात घेण्यास नकार दिला. आता हिंदूंची लोकसंख्या कमी होण्याला जबाबदार कोण? हिंदू धर्माचे धर्ममार्तंड की मुस्लीम?

काँग्रेसच्या काळात शेषनसारखा खमक्या निवडणूक आयोगाचा अध्यक्ष होण्याची शक्यता होती. आता असा शेषन तयार होण्याआधीच कोणत्या का कारणाने होईना तुरुंगामध्ये जाईल आणि वर्ष दोन वर्षेत्याची जमानतही होणार नाही. विरोधकांच्या बाबतीत इतकं टोकाचं, सुडाचं राजकारण आधीच्या सत्तेने केलं नाही. सत्तेच्या माध्यमातून चालणारी न्यायदानाची प्रोसेस हीच आज पनिशमेंट म्हणून उघड्या नागड्या पद्धतीने काम करीत आहे. सत्ताधारी पक्ष आज एक प्रकारे वॉशिंग मशीनचं काम करीत आहे. त्यांच्यासोबत असाल तर स्वच्छ आणि विरोधात असाल तर गलिच्छ! त्याच्याबाजूनं असाल तर ‘देशभक्त’ आणि त्यांच्या विरोधात जालं तर ‘देशद्रोही’! भाजपा म्हणजे ‘हिंदुस्थान’ आणि विरोधक म्हणजे डायरेक्ट ‘पाकिस्तान’. अशाप्रकारे बटबटीत पद्धतीने देशांतर्गत विभाजन सुरू आहे. काळ तर कठीण आहेच. आणि म्हणूनच ‘विद्रोही’ संमेलनासोबत राहून विद्रोहाचीही गरज आहे.

२०१६ नंतर सरकारने ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’मार्फत देण्यात येणारी शेतकरी आत्महत्येची आकडेवारी देणं थांबविलं म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या, असंही होत नाही. फक्त त्या प्रश्नांची तीव्रता त्यामुळे जाणवत नाही एवढेच. मोदी सरकारने कोरोनाचा कहर सुरू असताना शेतकरी ‘कल्याणा’साठी तीन अध्यादेश घाईगर्दीने काढले. या अध्यादेशातील करार शेतीचे समर्थन करताना सरकार म्हणाले होते, ‘शेतकर्‍यांजवळ शेती आहे, पण भांडवल नाही आणि कंपन्यांकडे भांडवल आहे पण शेती नाही.’ या विधानानंतर परत प्रश्न पडतो; पण मुळात शेतकऱ्यांकडे भांडवलचं का नाही? परंतु हा प्रश्न आपल्याला पडतही नाही आणि पडूही दिल्या जात नाही.

दुधाचे भाव वाढले तर गरिबांच्या मुलांना घोटभर दूधही दुरापास्त. आणि मग यासाठी (भाव पाडण्यासाठी) सरकारचा हस्तक्षेप आनंदी आनंद. पण शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाचे भाव गडगडले तर सरकार हात झटकून मोकळे. हा शेतीच्या लुटीचा कावाच असतो ना! शेतीत येणारे उत्पादन, त्यासाठी होणारा खर्च व त्याला दिली जाणारी किंमत वा मिळणारी किंमत इथेच खरं तर पाणी मुरते. गेल्या कित्येक वर्षांची आकडेवारी पाहिली तर राज्यशासनाने शिफारस केलेल्या भावाच्या तुलनेत केंद्र सरकारने जाहीर केलेले अंतिम हमीभाव हे जास्तीत जास्त ७० टक्क्यांपर्यंतच होते. म्हणजे राज्य सरकारने काढलेला खर्च व दिल्या गेलेल्या किमती येथेच मुळात ‘गड्डा’ (तोटा) ३० टक्क्यांचा. शेतकरी ‘खड्ड्यात’ जाणार नाही तर दुसरं काय होणार?

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक शेतकरी ‘कल्याणा’चीच भाषा झाली. पण त्याचे कल्याण तर सोडाच, अकल्याणच जास्त झाले. स्वातंत्र्यानंतर गोरगरिबांच्या कल्याणासाठी एवढा खटाटोप केल्याचं सांगितलं जातं, पण त्यांचं भलं न होता त्यांचं वाईटच होतं. आणि भलं मात्र काही मूठभर लोकांचेच होते. त्यातही अदानी-अंबानीचेच कोट-कोट कल्याण होते. हा काय चमत्कार आहे. कोण्या शायरच्या या ओळी आहेत माहिती नाही. तो विचारतो,

‘देखकर फसल अंधेरो की

आप हैरत में क्यू हो

तुमने अपने खेतो में

उजाले बोये ही कहाँ थे?’

या विषमतावाद्यांचा कोणताही नेता त्यांच्या संघटनेशिवाय जनमाणसांमध्ये मोठा होऊ शकत नाही. स्वतःची जात व त्या जातीचे हितसंबंध, त्या जातीचे जन्मजात वर्णश्रेष्ठत्व यापलीकडे ज्यांची ‘करुणा’च पोहोचत नाही, ते काय खाक मोठे होणार? त्यांना असंघटनेच्या अंतर्गत कितीही प. पू. म्हटले तरीही. म्हणून मग ते आपल्याच लोकशाहीवादी, समतावादी नेत्यांचे अपहरण करतात. स्वामी विवेकानंदांचं असचं अपहरण केलं. त्यांनी भगवे कपडे परिधान केले असल्यामुळे त्यांनाही ते सोपं गेलं आणि आम्ही त्या अपहरणाला हातभार लावला. पण, आता दत्तप्रसाद दाभोळकरांनी खरा विवेकानंद समजावून सांगितला तेव्हा तो त्यांचा नाहीच हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. आज दत्तप्रसाद दाभोळकरांना त्यांनी विवेकानंदांच्या बाबतीत सत्यकथन केले म्हणून पोलिस संरक्षणात जगावं लागतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही याच मंडळींनी ‘गो ब्राह्मण प्रतिपालक’ म्हणून ‘हिंदुत्वाच्या’ तुरुंगात डांबून ठेवले होते. मुस्लिमांच्या विरोधात त्यांचा यथेच्छ वापर करून घेतला. त्यांची ‘हिंदुत्वा’च्या तुरुंगातून गोविंद पानसरेंनी सुटका केली. या पापाची शिक्षा म्हणून पानसरेंची हत्या झाली. आता राहता राहिले सावरकर. पण, त्यांनी सावरकरांच्या कितीही महिमा गायल्या तरीही त्यांच्याबाबत उपलब्ध असलेले पुरावे त्यांचा हा खोटा महिमा काळवंडून टाकणारच आहे. त्या भरोशावर त्यांची उतमाज सुरू आहे. सर्व स्वायत्त संस्था, प्रसारमाध्यमे त्यांनी वेठीस धरली आहेत. अशा वेळेसच खऱ्या अर्थाने ‘विद्रोहा’ची गरच असते.

सत्ताधार्‍यांच्या असत्य प्रस्थापित करण्याला ललकारण, आव्हान देणे, प्रश्न विचारण्याची आता खरी गरज आहे. ते प्रश्नांची ‘नाकेबंदी’ करतील. प्रश्नच निर्माण होऊ नये म्हणून प्रश्नांची ‘नसबंदी’ही करतील. या अन्यायाविरोधात यापुढे प्रखर असा लढा उभारावा लागेल. तोच खरा विद्रोह असेल आणि विद्रोही संमेलनाची फलश्रुतीही.

१९८० मध्ये मी व माझी बायको माया यवतमाळ जिल्ह्यातील मेटीखेडा या गावी रहायला गेलो. सोबत कोण्यातरी महापुरुषांच्या विचारांनी विणलेली खाट घेऊन गेलो आणि त्या खाटेवर त्या परिसरातील माणसांना बसविण्याचा प्रयत्न करू लागलो. पण माणूस त्यावर आडवा करून झोपवायचा प्रयत्न करायचो. तेव्हा तो माणूस पूर्णपणे त्यात मावायाचा नाही. कधी डोके तरी बाहेर यायचे. डोके आत घेतले तर पाय बाहेर यायचे. कड फेरला तर हात बाहेर यायचे. खाट तर महापुरुषांच्या विचारांनी विणलेली. माझ्या लेखी या खाटेमध्ये कोणतीही चूक असण्याची शक्यता नाही. त्यात अपुरेपणा तर असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण ती खाट विणलेलीच महापुरुषाने. तो कसा चूक असणार? चूक असलीच तर त्या माणसात असेल. त्या खाटेच्या बाहेर माणसाचे पाय येत असतील तर त्या माणसाच्या पायातच काही खोट असेल. डोके बाहेर येत असेल तर त्याच्या डोक्यातच काही फरक असेल आणि हात बाहेर येत असलीतल तर त्याच्या हाताचच काही मिस्टेक असेल. महापुरुष कसा चुकू शकतो? काही डिफेक्ट असेल तर तो त्या माणसात.

म्हणून मग मी त्या माणसाला त्या खाटेवर परफेक्टपणे बसविण्यासाठी त्या माणसाचे बाहेर येणार पाय कापू लागलो, हात कापू लागलो. आणि खाटेवर फीट बसविण्यासाठी त्याचे डोकेही कापू लागलो. महापुरुषाने ज्या काळात त्या विचाराची खाट विणली तो काळ. त्याच्या वेळेचा माणूस त्या खाटेवर बरोबर बसला असेल; पण आताच्या माणसाला ती अपुरी पडत असेल. म्हणून त्या खाटेचा ‘विस्तार’ करण्याची गरज आहे हेच मी विसरून गेलो की काय? हाही स्वतःशीच विचार करण्याची गरज आहे. या विचारांची खाट, त्या विचारांची खाट असे आम्ही ‘खाटमांडू’ तर झालेलो नाही ना? माणसापेक्षाही माझी ‘खाट’ आणि खाटमांडूंचे आपआपसात सदासर्वकाळ भांडू-भांडू असे काही तर होत नाही ना? या अंगानेही स्वतःला तपासावे लागेल. माणसांसाठी खाट असेल, खाटेसाठी माणूस असू शकत नाही. तव्दतच माणसांसाठी विचारधारा असेल, विचारधारेसाठी माणूस असणार नाही.एकेकाळी मुंबईत कामगार चळवळ प्रभावी होती व त्यावर कम्युनिस्ट विचारधारेचा मोठा प्रभाव होता. पण, म्हणून गणेशोत्सव मुंबईत थांबला होता, असे दिसत नाही व बंगालमध्ये अनेक दशके कम्युनिस्टांची सत्ता होती म्हणून तिथला दुर्गोत्सव थांबला तर नाहीच. उलट कमीसुद्धा झाला नाही. सर्वसामान्यांना देव लागत असावा. याची जाणीव संतांना सुद्धा असावी असे दिसते. म्हणूनच ‘विठ्ठल विठ्ठल’ करणारे तुकाराम महाराज म्हणतात,

‘देव आहे ऐसी वदवावी वाणी

देव नाही ऐसे जाणावे मनीफ

ज्ञानेश्वरांची एक ओवी अशाच आशयाची आहे. संत गाडगेबाबा पंढरपूरला जायचे; पण कधी मंदिरात गेले नाही. तुमच्या देवावर कुत्रं टांग करून मुतते असे जाहीरपणे ते म्हणायचे आणि लोकही ते ऐकून घ्यायचे. कारण गाडगेबाबांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ ही टॅग लाईन धरून ठेवली होती. समाजातून देव रिटायर्ड करायला निघालेल्या डॉ. श्रीराम लागूंना आपल्या घरातले देव रिटायर्ड करता आले नाहीत.

कोणत्याही देशात जा. देश प्रगत वा अप्रगत असू द्या. मागासलेला वा पुढारलेला असू द्या. साक्षर वा निरक्षर असू द्या. त्या देशातील राष्ट्रध्वजाबद्दल म्हणा, ‘या फडक्याने मी माझ्या घराची फरशी पुसतो.’ तुम्ही कोणत्याही देशात असा तुमचा मुडदा पडल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे शेंदूर फासलेल्या दगडाला दगड म्हणून चालत नाही.

आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या जाहीरातील वा कार्यक्रमात ‘आम्ही कोणत्याही देवा धर्माच्या विरोधात नाही’ या वाक्यानेच सुरुवात करावी लागते. यातील गमक ‘विद्रोही’ म्हणविणार्‍यांनी वेळीच ओळखलेले बरे, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. गाडगे महाराजांनी कठोरपणे देवावर टीका केली असेल. पंढरपुरात जाऊन ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी मंदिरातही गेले नसतील. पण, तेथे येणार्‍या वारकर्‍याला ‘कशाला येथे येतोस मरायला?’ असं कधी म्हणाले नाही. त्याची त्या गर्दीतील गैरसोय बघून, निवार्‍याला जागा नाही बघून त्यांनी त्यांच्यासाठी करुणेतून धर्मशाळा बांधली. विद्रोहातून, क्रांतीतून ‘करुणा’ वजा केली तर केवळ क्रौर्य शिल्लक राहतं याचही भान ‘विद्रोही’नी बाळगलं पाहिजे. द्वेषाच्या या वातावरणात परस्परांवर प्रेम करणं हासुद्धा विद्रोह ठरू शकतो, याची मला जाणीव आहे. माणसा-माणसांनी दंगलीत केलेल्या परस्परांच्या कत्तलीतून झालेल्या रक्तमांसाच्या चिखलातूनच कमळ चांगला फुलतो, याची कमळीवाल्यांना चांगलीच जाणीव आहे आणि द्वेषाच्या वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विषाणूचं पोषण होतं, याची कल्पना रेशीमबागेतील भागमभाग करणार्‍याला आहे. त्यामुळे त्या विषाणूंना पोषक ठरणार्‍या द्वेषाला दूर सारत प्रेमाचा अंगीकार करणे, हाच सध्याच्या काळातील ‘विद्रोह’ ठरणार आहे, याची मला खात्री आहे.                                                       

(उत्तरार्ध)



कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) नियंत्रित यंत्रे मानवी कामकाजाचा ताबा घेतात याबद्दलची उत्सुकता आणि भीती हा तंत्रज्ञान क्षेत्रात बराच काळ चर्चेचा विषय राहिला आहे. माणसांपेक्षा अधिक हुशार असलेल्या यंत्रांमुळे मानवतेला धोका निर्माण होतो, असा इशारा अनेकांनी दिला असला तरी काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शक्तीची सैद्धान्तिक चर्चा काही वर्षांपासून होत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून तंत्रज्ञान क्षेत्र सैद्धान्तिक क्षेत्रातून खऱ्या ग्राहक मॉडेलकडे वळल्याने आश्चर्य आणि चिंतेच्या स्थितीत आहे. Open AI च्या ChatGPT च्या आगमनामुळे, AI अनंत शक्यता म्हणण्याऐवजी प्रत्यक्ष वापराच्या पृष्ठभागावर स्थलांतरित झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा विकास अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सध्याचे तंत्रज्ञान मानवी बुद्धिमत्तेशी जुळवून घेऊ शकत नाही किंवा त्यावर मात करू शकत नाही हे खरे असले तरी त्यांच्या विकासावर मानवी संवादाचा मोठा प्रभाव आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संशोधन सुरू झाल्यापासून, संशोधक हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत की संगणक मानवाला ज्या प्रकारचा भाषिक प्रभाव देऊ शकतो, ज्यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) नावाची उपशाखा उदयास आली आहे.

ChatGPT हा OpenAI नावाच्या कंपनीने विकसित केलेला कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्रम आहे. २०१५ मध्ये एलन मस्क, सॅम ऑल्टमन, ग्रेग ब्रॉकमन, इल्या सुत्स्केव्हर आणि वोज्सीच झारेम्बा यांनी ओपनएआय या कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेची स्थापना केली. OpenAI चे इतर कार्यक्रम आहेत, परंतु ChatGPT २०१८ मध्ये सादर केले गेले.

ChatGPT ने नुकतेच बातम्यांच्या चक्रात धुमाकूळ घातला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स लँग्वेज प्रोसेसर नोव्हेंबर २०२२ मध्ये सार्वजनिक वापरासाठी लाँच करण्यात आला होता आणि इन्स्टाग्राम आणि टिकटॉकसारख्या कंपन्यांपेक्षा वेगाने लोकप्रियता मिळवली. लोकांसाठी सादर झाल्यापासून, ChatGPT १०० दशलक्ष सक्रिय मासिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहे - ही कामगिरी करण्यासाठी टिकटॉकला नऊ महिने आणि इन्स्टाग्रामला अडीच वर्षे लागली.

ChatGPT नैसर्गिक भाषा प्रक्रिया प्रकल्पाचे तिसरे मॉडेल GPT-3 वर आधारित आहे. हे तंत्रज्ञान एक पूर्व-प्रशिक्षित, मोठ्या प्रमाणात भाषा मॉडेल आहे जे GPT-3 आर्किटेक्चरचा वापर करून इंटरनेट डेटा आणि ज्ञानाचा आधार म्हणून संदर्भ देण्यासाठी स्त्रोतांच्या अफाट साठ्याचा शोध घेते. ही AI ज्ञानाची विहीर आहे, परंतु संवाद साधण्याची त्याची क्षमता च त्याला इतर तंत्रज्ञानापेक्षा वेगळे करते.

भाषेचे भाषांतर, संक्षिप्तीकरण, मजकूर पूर्ण करणे, प्रश्नांची उत्तरे देणे आणि अगदी मानवी उच्चार यासह भाषानिर्मितीच्या अनेक कामांसाठी हे सुरेख केले गेले आहे. ChatGPT एक ट्रान्सफॉर्मर-आधारित न्यूरल नेटवर्क आहे जे मानवी लेखन पॅटर्नसह उत्तरे आणि डेटा प्रदान करते. AI ला संदर्भ, प्रासंगिकता आणि प्रश्नांना मानवासारखे प्रतिसाद कसे तयार करावे हे समजून घेण्यासाठी अनंत प्रमाणात मजकूर डेटासह प्रोग्राम केले गेले आहे.

यामुळे संगणकाशी संवाद साधण्याच्या पद्धतीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुबईत  नुकत्याच पार पडलेल्या जागतिक परिषदेत ChatGPTच्या सरकारी क्षेत्रातील वापरावर सविस्तर चर्चा झाली. भारतासह बहुतेक सरकारांनी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ChatGPTच्या डेटाचा वापर करण्याचा एकत्रित प्रयत्न सुरू केला आहे. सरकारे त्याकडे वळल्याचे कारण हे आहे की ते एकाच वेळी बरीच संभाषणे हाताळू शकतात. व्यवसाय आणि प्रणाली ज्यांना उच्च पातळीवरील ग्राहकांच्या चौकशीला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. हा एक कार्यक्षम उपायही ठरेल.

ChatGPT हे विविध क्षेत्रांसाठी एक बहुआयामी साधन आहे कारण ते नैसर्गिक भाषण, औपचारिक लेखन आणि तांत्रिक भाषा यासारख्या विविध शैलींमध्ये प्रतिसाद प्रदान करते. उदाहरणार्थ, जर एखाद्यास कोडिंगची आवश्यकता असेल तर ती रिअल टाइममध्ये तयार केली जाऊ शकते. थोडक्यात, ChatGPT ही एक शक्तिशाली प्रणाली आहे जी आपल्या दैनंदिन जीवनातील बर्याच पैलूंसाठी उपयुक्त आहे.  GPT-4 च्या आगमनामुळे यंत्रांमध्ये  मानवी मेंदूइतकीच विचार करण्याची क्षमता असणे अपेक्षित आहे. मानवी मेंदूमध्ये सरासरी ८,६०० कोटी न्यूरॉन्स आहेत, तर GPT-4 मध्ये एक ट्रिलियनपेक्षा जास्त न्यूरल नेटवर्क उपलब्ध आहेत. यामुळे त्यांना सध्याच्या टायपिंग परिस्थितीऐवजी ऑडिओ आणि व्हिडिओ इनपुट मिळणे शक्य होईल.

इतर कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणे ChatGPT लाही मर्यादा आहेत. हे ChatBot कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालते. त्यात मानवी सामान्य ज्ञान आणि सामान्य ज्ञानाचा अभाव आहे. हे संदर्भ समजू शकत नाही किंवा अधिक अमूर्त उत्तर आवश्यक असलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे देऊ शकत नाही. ChatGPT डेटामधून उपलब्ध नमुन्यांवर आधारित मजकूर तयार करते.  जर आपल्याला उपलब्ध नसलेल्या डेटाच्या बाहेर एखादे कार्य करण्यास सांगितले गेले तर ते अवास्तव किंवा अयोग्य प्रतिसाद तयार करू शकते. पूर्वी उपलब्ध नमुन्यांच्या आधारेच प्रतिसाद तयार केले जाऊ शकतात. इतर कोणत्याही मशीन लर्निंग मॉडेलप्रमाणे ChatGPTच्या प्रशिक्षण डेटामध्ये पूर्वग्रह असू शकतात. हे पक्षपाती असू शकते, ज्यात लिंग पूर्वग्रह, वांशिक पूर्वग्रह आणि वयवाद यांचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा डेटा  २०२१ पर्यंत साठवला जातो.

संभाषणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यास सक्षम असलेल्या चॅटजीपीटी या अत्यंत विकसित भाषेच्या मॉडेलचे फायदे साध्य करायचे असतील तर त्याचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. त्याच्या मर्यादा समजून घेतल्या आणि जोखीम कमी केली तरच इतर तंत्रज्ञानाप्रमाणे तेही मानवी भल्यासाठी अनुकूल होऊ शकते. कोणत्याही तंत्रज्ञानासह, त्यासह गोपनीयतेची चिंता असू शकते. ChatGPT मोठ्या प्रमाणात डेटा इनपुटपासून तयार केले गेले होते, याचा अर्थ असा आहे की डेटा प्रशिक्षण प्रक्रियेत योगदान देणारा कोणीही संभाव्यत: असुरक्षित आहे, कारण तो डेटा आता कायमचा संग्रहित केला जातो आणि वापरला जाऊ शकतो.

AIमधील घडामोडींवर लक्ष ठेवणे आणि या तंत्रज्ञानाचे फायदे आणि जोखीम याबद्दल अचूक जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे. या मोहिमेचे पडसाद शिक्षण क्षेत्रात उमटत आहेत. प्राथमिक शाळेतील मुलांपासून ते महाविद्यालयीन पदवीधरांपर्यंत विद्यार्थी निबंध, असाइनमेंट लिहिण्यासाठी चॅटजीपीटीवर अधिकाधिक अवलंबून आहेत आणि ते सहजपणे तयार करण्यास आणि वापरण्यास सक्षम झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होईल.

ChatGPT अत्यंत बुद्धिमान आहे परंतु तरीही काही शब्द, वाक्ये आणि प्रश्न समजून घेण्यासाठी संघर्ष करू शकतो, ज्यामुळे विषयबाह्य प्रतिसाद मिळू शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही हुशार असली तरी कॉमन सेन्स आणि व्यक्तिमत्त्व हे मानवी गुण आहेत. आणि ChatGPT भावनांमध्ये प्रशिक्षित असताना, अद्याप काही मानवी अनुभव, ध्येय आणि समजांना मर्यादा आहेत. त्याच्या डेटाबेसमध्ये इंटरनेटचा समावेश आहे - आणि ऑनलाइन सर्व काही सत्य नाही. त्यामुळे चॅटजीपीटी वापरताना माहितीच्या अचूकतेची शाश्वती नसते.

ऑटोमेशन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे जगभरातील लाखो नोकऱ्या नष्ट होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्या तुलनेत ब्लू कॉलर नोकऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. लेखन-संपादनापासून  ते अकाऊंटिंग, अॅडव्होकेसी,  टीचिंग आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगपर्यंत अनेक नोकऱ्यांमध्ये याचे प्रतिबिंब कसे उमटेल, अशी भीती वाढत आहे.

भाषा, भाषांतर आणि मजकूर संकलनापासून ते संशोधन आणि ऑटोमेशनपर्यंत, ChatGPTचे अनेक उपयोग आहेत जे विविध उद्योगांमध्ये लागू केले जाऊ शकतात. हे लक्षात ठेवा की, कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणे, ChatGPTच्या मर्यादा आहेत, म्हणून त्याचे कार्य तपासणे आणि बॅकअप योजना ठेवणे नेहमीच चांगले.

बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेले बरेच AI प्रोग्राम आहेत जे ChatGPTसारख्याच प्रकारे कार्य करतात. काही सर्वात उल्लेखनीय गोष्टींमध्ये समाविष्ट आहे: चॅटसोनिक, चिंचिला, फूल, मेगाट्रॉन ट्यूरिंग एनएलजी, जैस्पर, डुप्लिकेट, फेसअॅप, एल्सा, सोक्रेटिक इ.

आण्विक संलयन आणि मानवी क्लोनिंग सारख्या तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या धोक्यापेक्षा एआयचा धोका मोठा आहे. आभासी जगात ChatGPT प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे पडसाद दररोज प्रत्यक्ष जगासमोर येत आहेत. काही महिन्यांतच जगाचा वेगळ्या पद्धतीने कायापालट होऊ शकतो, असे अनेकांना वाटते आणि झपाट्याने प्रगती करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनाच्या भवितव्याचा अंदाज बांधणे सोपे नाही. दररोज नवनवीन उपयोग शोधले जात असल्याने येणारा काळ रोमांचक असेल.

- शाहजहान मगदुम


(आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन विशेष - २१ फेब्रुवारी)


जगात "मातृभाषा" या शब्दाला आपण मातेचा दर्जा देऊन व्यक्त होण्याची शक्ती म्हणतो, एका विशिष्ट प्रदेशाचे जग या एका शब्दात वसलेले असते. यात संस्कृती, ज्ञान, ओळख, शिक्षण, परंपरा, चालीरीती, कारागिरी, पेहराव, सण, वर्तन, कार्यपद्धती, व्यवसाय, जीवनशैली, यांसारख्या जीवनाच्या विविध टप्प्यांचा समावेश होतो. जे पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत राहतात. उदाहरणार्थ, आदिवासी भाषा या प्रदेशातील वनस्पती, प्राणी आणि औषधी वनस्पतींबद्दल ज्ञानाचा खजिना आहे. तथापि, जेव्हा एखादी भाषा कमी होते तेव्हा ती ज्ञान प्रणाली पूर्णपणे नष्ट होऊन विविध टप्प्यांचे एक विशेष ज्ञानासारखे जग संपते. प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्या मातृभाषेचे ज्ञान ही अभिमानाची बाब असून मातृभाषेचे रक्षण व प्रसार करण्याचा सदैव प्रयत्न केला पाहिजे.

"मातृभाषा" म्हणजे मूल जन्मानंतर पहिल्यांदा ऐकते, शिकते ती भाषा. हे आपल्या भावना आणि विचारांना एक निश्चित आकार देण्यास मदत करते. इतर गंभीर विचार कौशल्ये, दुसरी भाषा शिकणे आणि साक्षरता कौशल्ये सुधारण्यासाठी मातृभाषेत शिकणे महत्त्वाचे आहे. सर्वसमावेशक विकासासाठी मातृभाषेत बोलणे-शिकणे खूप महत्वाचे आहे. हे आपलेपणाची भावना देऊन एखाद्याची मुळे किंवा त्याचा आधार समजून घेण्यास मदत करते. हे संस्कृतीशी जोडून वर्धित संज्ञानात्मक विकास सुनिश्चित करते आणि विविध भाषा शिकण्याच्या प्रक्रियेत मदत होते. भाषिक सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" पाळला जातो. या वर्षीची थीम "बहुभाषिक शिक्षण - शिक्षणात परिवर्तनाची गरज" आहे. युनेस्को मातृभाषा किंवा प्रथम भाषेवर आधारित बहुभाषिक शिक्षणास प्रोत्साहन आणि चालना देते. मातृभाषेद्वारे घर आणि शाळा यातील दुरावा कमी करून जेव्हा शाळेतील वातावरण त्यांना परिचित असलेल्या भाषेत तयार केले जाते तेव्हा विद्यार्थी चांगले शिकतात. सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षणासाठी मातृभाषेतील शिक्षण हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे संशोधन दाखवते, आणि हे शिकण्याचे परिणाम आणि शैक्षणिक कामगिरी देखील सुधारते. मातृभाषेवर आधारित बहुभाषिक शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना समाजात पूर्णपणे सहभागी होण्याचे सामर्थ्य देते. हे परस्पर समंजसपणा आणि एकमेकांबद्दल आदर वाढवते आणि सांस्कृतिक पारंपारिक वारसा संपत्ती जतन करण्यात मदत करते, जे जगभरातील प्रत्येक भाषेत आहे. बऱ्याच देशांमध्ये, मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषा शिकवून बहुतेक विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता धोक्यात येते. असा अंदाज आहे की जगातील ४०% लोकसंख्या ज्या भाषेत बोलतात किंवा समजतात अशा भाषेत त्यांना शिक्षण मिळत नाही. नामशेष झालेल्या किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर उभ्या असलेल्या अनेक भाषांचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत आवश्यक आहे. दर १५ दिवसांनी एक भाषा संपूर्ण सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा घेऊन नाहीशी होते. जगात बोलल्या जाणाऱ्या अंदाजे ७००० भाषांपैकी किमान ४३% भाषा धोक्यात आहेत. या शतकाच्या अखेरीस १५०० ज्ञात भाषा नामशेष होतील. आधुनिकता, वर्तमान उच्चशिक्षण आणि गतिशीलता काही लहान भाषांना दुर्लक्षित करून कमकुवत करते.

७००० जागतिक भाषांपैकी ९०% भाषा १ दशलक्षाहून कमी लोक वापरतात. १ दशलक्षाहून अधिक लोक १५०-२०० भाषा बोलतात. खरं तर, मातृभाषा (प्रथम भाषा) म्हणून जगातील सर्वात लोकप्रिय भाषा मंदारिन चीनी आहे, २०२२ मध्ये ९२९ दशलक्ष लोक ती बोलत होती. दुसऱ्या क्रमांकावर स्पॅनिश आणि तिसऱ्या क्रमांकावर इंग्रजी, त्यानंतर हिंदी आणि त्यानंतर बंगाली भाषा आहे. आशियामध्ये जगातील २२०० भाषा आहेत, तर युरोपमध्ये २६० आहेत. युनेस्कोने म्हटले आहे की २५०० भाषा नामशेष होण्याचा धोका आहे. भारतात १२१ भाषा आहेत ज्या १०,००० किंवा त्याहून अधिक लोक बोलतात. भारतात २२ अनुसूचित भाषा आहेत आणि देशातील ९६.७१ टक्के लोकसंख्येला यापैकी एक मातृभाषा आहे. संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये २२ भाषांचा समावेश करण्यात आलेल्या त्या भाषा आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी ह्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार, देशातील ५२८ दशलक्ष लोकांमध्ये हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी मातृभाषा आहे, जी लोकसंख्येच्या ४३.६ टक्के आहे. त्यानंतर, ९७ दशलक्ष लोक किंवा ८ टक्के लोकसंख्येद्वारे बंगाली भाषा बोलली जाते, ज्यामुळे ती देशातील दुसरी सर्वात लोकप्रिय मातृभाषा बनली आहे. १९६१ पासून भारताने २२० भाषा गमावल्या आहेत. पुढील ५० वर्षांत आणखी १५० भाषा नष्ट होऊ शकतात, उदाहरणार्थ, पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या संशोधनानुसार, "माझी" भाषा सिक्कीममध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या माझी भाषा बोलणारे फक्त चार लोक आहेत आणि ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत.

आजच्या आधुनिक काळात स्वतःच्या मातृभाषेत बोलायला लोकांना लाज वाटते आणि इतर भाषेत बोलायला अभिमान वाटतो. जर एखादी व्यक्ती आपल्या मातृभाषेत बोलत असेल तर त्याला खालच्या दर्जाचे मानले जाते. आमचा हा कोणता विकास आहे जो आम्हाला आमच्याच संस्कृतीपासून दूर नेत आहे. आपणच आपल्या मातृभाषेचे, ज्ञानसंस्कृतीचे विरोधक आहोत, जर आपण आपल्या बोलीभाषेला प्रोत्साहन देऊन प्रसार करत नसेल तर. आज आपल्या देशाची राष्ट्रीय भाषा "हिंदी" ही जागतिक स्तरावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक म्हणून वेगाने वाढत आहे. बंगाली, पंजाबी, उर्दू आणि तमिळ यांनाही अनेक देशांमध्ये अधिकृत भाषा म्हणून मान्यता आहे. मोठ्या संख्येने परदेशी लोक भारतीय भाषांचे ज्ञान आत्मसात करत आहेत. जागतिक स्तरावर विदेशी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, डिजिटल तंत्रज्ञान आणि ऑनलाइन व्यवहारात भारतीय भाषांचा समावेश केला जात आहे. सरकार आता प्रादेशिक भाषांमध्ये उच्च आणि व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या देशातील प्रादेशिक भाषेतील चित्रपट जगभर नवा इतिहास रचत आहेत. तुम्ही कितीही भाषा शिकलात तरी मातृभाषेतच बोला, वागा आणि ते जतन करून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आधुनिकतेच्या देखाव्यात पिढ्यानपिढ्या असलेली आपली भाषेची ओळख विसरू नका. मातृभाषेचा नेहमी अभिमान बाळगा, लाज नाही.

- डॉ. प्रितम भि. गेडाम

मोबाइल न. ८२३७४ १७०४१



एका निश्चित भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना त्या क्षेत्रात एका व्यवस्थेची गरज असते जेणेकरून एक समाज सामूहिक जीवन जगण्यासाठी व्यवस्थेने त्या समूहाच्या दैनंदिन गरजा, अडीअडचणी, त्यांचे राहणीमान, अनेक प्रकारच्या सोईसुविधा अशा क्षेत्रात पुरविल्या जाव्यात यासाठी जगात निरनिराळ्या राजकीय व्यवस्था अस्तित्वात आहेत. कुठे राजेशाही आहे, कुठे एकाधिकारशाही तर कुठे संमिश्र व्यवस्था आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर आधुनिक विचारांचा उदय झाला. यात लोकशाही राज्यपद्धतीला सर्व जगातल्या संस्कृती-सभ्यतांनी मानवी कल्याणासाठी सर्वोत्तम शासनपद्धती म्हणून मान्यता दिली. आज आपण पाहतो की जगभर या आधुनिक विचारधारेखाही लोकशाहीप्रणित राज्य आणि शासनव्यवस्था कार्यरत आहे. म्हणजे लोकसमूहांना त्यांच्या आवडीची राजकीय पद्धत म्हणजे लोकशाही असा समज. या व्यवस्थेद्वारे ज्यांनी सत्ता काबिज केली आणि ज्या लोकांनी त्यांना लोकशाहीतील महत्त्वाचे अंग म्हणजे निवडणुकीद्वारे त्यांना सत्ता दिली - दोघांना यात समाधान वाटले. कोणत्याच प्रकारची राजकीय सत्ता ज्या देशात असेल त्याच अनुषंगाने तिथल्या लोकांची म्हणजेच नागरिकांची विचारधारा असते. असे नाही की सर्व नागरिकांची विचारधारा एकच असते. काहींची विचारधारा दुसऱ्या प्रकारची असते. म्हणूनच निवडणुकांचे प्रयोजन करण्यात येते. बहुसंख्येने ज्या नागरिकांना जी विचारधारा मान्य असते त्यांच्या मर्जीचे सरकार निवडणुकीद्वारे सत्ता संपादन करते.

या सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांना काय हवे असते तर सर्व नागरिकांमध्ये संसाधनांची न्याय्य वाटणी आणि हे त्या व्यवस्थेअंतर्गत राजकीय आणि सामाजिक स्थिती कितपत समाधानी आहे हे ठरवते. याशिवाय त्यांच्या भौतिक गरजा म्हणजे अन्न, वस्तू आणि निवारा यापलीकडे रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या सोयी, आरोग्य व्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी समाधानीचे जीवन जगत असतानाच बेहतर भविष्यही हवे असते. नागरिकांच्या या समस्या बिनदिक्कत पूर्ण केल्या गेल्या तर नागरिकांमध्ये सत्तेविरुद्ध आक्रोश निर्माण होत नाही. कोणत्याही समाजाच्या रचनात्मक स्थितीचे हे निकष आहेत. जर उपरोल्लेखित गरजा पूर्ण होत राहिल्या तर समाजात तेढ निर्माण होत नाही. फॉल्ट लाइन्स निर्माण होत नाहीत. अशा प्रकारे लोकसमूह एका राजकीय आधुनिक संस्थेची निर्मिती करतात. आपसातील संमतीने अशा प्रकारे एक राजकीय समाजाचा आविष्कार होतो. सध्या जगभर बहुसंख्येने अशाच प्रकारचे लोकसमूह आहेत ज्यांनी आपसातील सल्लामसलतीने लोकशाही पद्धतीचे राज्य निर्माण केले आहे. डाव्या विचारसरणीचे जे राष्ट्र आहे ते सुद्धा स्वतःला लोकशाहीवादी म्हणवतात. खरे पाहता तिथे सरकारचेच उमेदवार ठरवायचे असतात आणि नागरिकांना त्यांनाच मते द्यावी लागतात. त्यांच्या मर्जीनुसार काही नसते. लोकसाहीत नागरिकांची मंजुरी नसणे म्हणजे त्यास लोकशाही म्हणता येईल काय? असो.

आज प्रश्न असा आहे की ज्या लोकशाहीचा जगभर इतका गाजावाजा आहे ती खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे काय? सध्या नवनवीन माहिती जगासमोर येत आहे. सर्वांत महत्त्वाची म्हणजे इस्रायलमध्ये ताल हन्नान नामक एक व्यक्ती आहे जो खोट्या माहिती पसरवून लोकशाही पद्धती असलेल्या देशांतर्गत होणाऱ्या निवडणुकांमध्ये ढवळाढवळ करतो आणि कोट्यवधी रुपये घेऊन सत्ताधाऱ्यांना त्यांचे सरकार निवडून येण्यासाठी मदत करतो. माहितीनुसार तीस राष्ट्रांमध्ये त्याने निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करून सरकार निवडून आणण्यात तेथील राजकारणीवर्गाची मदत केली आहे. याचा अर्थ असा की सबंध लोकशाही विचारधारेलाच त्याने हायजॅक करुन टाकले आहे. अशात ज्या नागरिकांनी आपल्या मर्जीतील सरकार निवडण्यासाठी मदते दिली होती त्यांना तेच सरकार मिळाले का असा प्रश्न उपस्थित होतो. खोट्या माहितीद्वारे जनतेची फसवणूक करण्याच्या या प्रकरणात हन्नान हा एकटा की इस्रायलचा त्याला पाठिंबा किंवा त्याचे साहाय्य लाभले का, हा एक प्रश्न. तसे असेल तर जगातल्या ३० देशांमध्ये इस्रायलधार्जिने सरकार असणार. आर्थिक क्षेत्रात हिंडेनबर्ग नावाची संस्था वाटेल त्या उद्योगपतीला लक्ष्य करून त्याची नासधूस करू शकते, जॉन सोरोस नावाची व्यक्ती इतर देशांच्या चलनाची किंमत ठरवू शकते, इतकी आर्थिक शक्ती या लोकांकडे कशी येते? याचा अर्थ एकच लोकशाहीचा सर्वच स्तरांवर नाश होत आहे. जगासमोर ह्या गंभीर समस्या आहेत. सध्या नागरिकांनी तर संमतीचे सरकार आपले हक्काधिकार या गोष्टी विसरून गेलेलेच बरे. हे जग कोणत्या वळणावर आलेले आहे?

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget