Halloween Costume ideas 2015
Latest Post



दरवर्षी मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी किडनी डे साजरा केला जातो. हा एक असा वार्षिक कार्यक्रम आहे, जो जागतिक स्तरावर साजरा केला जातो. हे मानवी मूत्रपिंडांच्या आरोग्याला लक्ष्य करते. किडनीच्या आरोग्याचे महत्त्व, त्यासंबंधीचे आजार, ते टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि ज्यांना किडनीचे आजार आहेत, त्यांच्या उपचाराच्या उपाययोजना आणि कोणत्या लोकांना हे आजार होऊ शकतात याबाबत जनजागृती करणे. (जोखीम गटावर) जागरूकता हा त्याच्या उद्देशाचा भाग आहे.

त्यात सहभागी कसे व्हावे?

1- आरोग्य तपासणी

आपले आरोग्य राखण्यासाठी नेहमी किडनीजचे स्क्रीनिंग केले पाहिजे. लवकर निदान झाल्यास रोग लवकर बरा होऊ शकतो.

2. ज्ञान देणे आणि ते प्रकाशित करणे

किडनीबद्दल माहिती मिळवा आणि तुमच्या  संबंधित इतरांशी शेअर करा. ज्ञान ही प्रतिबंधाची पहिली पायरी आहे.

3. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा

व्यायाम, पाण्याचे योग्य सेवन, संतुलित आहार

4. सोशल मीडियाचा वापर. 

सोशल मीडियाचा या संबंधी प्रभावीपणे वापर करणे जसे की ते फेसबुक, इंस्ट्राग्राम, एक्स यावर स्टोरी, रिल्स आणि स्टेटस शेअर करणे, जेणेकरून लोक किडनीच्या आरोग्याला प्राधान्य देतील.

5- संशोधनास समर्थन द्या

किडनी रोग संशोधन संस्थेला आर्थिक सहाय्य प्रदान करणे.


जागतिक किडनी दिनाचा उगम

याची सुरुवात 2006 मध्ये ISN (इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी) आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने झाली. हा एक जागतिक जागरुकता दिवस आहे, ज्याचा उद्देश लोकांमध्ये किडनीच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवणे हा आहे. सुरुवातीला 60 देशात हा प्रकल्प राबविण्यात आला. सध्या एका अहवालानुसार, जगभरात 950 दशलक्ष लोक मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आहेत. दरवर्षी सरकार आणि स्वयंसेवी संस्था किडनी दिवसाचे आयोजन करतात. हे दरवर्षी एका थीमवर आयोजित केले जाते.


या वर्षाची थीम आहे:

सर्वांसाठी किडनी आरोग्य काळजी आणि इष्टतम औषध सरावासाठी समान प्रवेश. किडनीचे आजार आणि किडनीचा कर्करोग ग्रीन रिबनने दाखवला जातो. जे लोक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत किंवा डायलिसिस करत आहेत किंवा किडनी दाता आहेत किंवा ज्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे ते जनजागृतीसाठी हिरवी रिबन बांधतात.

सर्वप्रथम, स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या किडणीची तपासणी करू शकतो. अनेक ठिकाणी किडनीच्या आजारांची तपासणी मोफत किंवा अगदी वाजवी दरात केली जाते. 10 पैकी 1 किंवा सर्व लोकांपैकी 10 टक्के लोक किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत.

तीव्र मूत्रपिंडाचा आजार हे विशेषतः महिलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. किडनी संबंधी प्रश्नमंजुषा आयोजित केली जाऊ शकते. मूत्रपिंडाच्या आजारांवर व्याख्याने आणि सेमिनार आयोजित केले जाऊ शकतात. मानवी साखळी निर्माण होऊ शकते. खालील कार्यक्रम सार्वजनिक चौकांवर घेतले जाऊ शकतात. 


जागतिक किडनी दिन 2024

किडनी, आरोग्य. Protect Your Kidneys

किडनी जागरूकता, आरोग्यपूर्ण जीवनशैली.

नुकताच 14 मार्च रोजी जागतिक किडनी दिन साजरा केला गेला. माणसाला 2 किडनी असतात. एक उजवीकडे आणि दुसरी डावीकडे असते. प्रत्येक किडनी पोटाच्या मागच्या खालच्या भागात अकराव्या बरगडीच्या मध्यभागी असते. उजव्या बाजूला यकृत असल्यामुळे उजव्या किडनी डाव्या किडनीपेक्षा किंचित छोटी असते. तारुण्याच्या निरोगी अवस्थेत प्रत्येक किडनी चार इंच लांब, दोन इंच रुंद आणि वजन 150 ग्रॅम असते. महिलांच्या मूत्रपिंडाचे वजन 50 ग्रॅम पर्यंत कमी होऊ शकते. मूत्रपिंडाचा वरचा भाग जाड आणि गोलाकार असतो, त्यावर टोपीसारख्या अर्धवक्रग्रंथी असतात आणि त्यातून येणारे 20% रक्त मूत्रपिंडांना मिळते. दोन्ही किडनी एका मिनिटात 1.2 लिटर रक्त साफ करतात.

किडनी काय करू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? - किडनीद्वारे रक्तातील हानिकारक टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे शरीरातून बाहेर काढले जातात. ते शरीरातील पाण्यातील क्षार आणि आम्लांचे प्रमाण राखतात. त्यामुळे 

रक्तदाब नियंत्रित राहतो.

1. (फिल्टरेशन) फिल्टरिंग

2. -तीव्रता (Concentration)

3. - (SECRATION)) उत्सर्जन

ही तीन महत्त्वाची कार्ये किडनी करत असते.

मूत्र तयार करणे आणि रक्तातील युरिया, युरिक ऍसिड, प्रथिने, साखर आणि सर्व विषारी पदार्थ काढून टाकणे हे मूत्रपिंडाचे सर्वात महत्वाचे कार्य आहे.

किडनीचा आजार कोणाला होतो?

मूत्रपिंडाचा आजार सर्व वयोगटातील आणि वंशाच्या लोकांना होऊ शकतो. 60 ते 75 वर्षे वयोगटातील चारपैकी एक पुरुष आणि पाच पैकी एका महिलेला किडनीचा आजार आहे. 75 वर्षांवरील निम्म्या लोकांना किडनीचा आजार आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत किडनी रोग, मधुमेह आणि रक्तदाब.


मूत्रपिंडाचे मुख्य आजार कोणते आहेत?

1) पॉलीसिस्टिक किडनी रोग

हा आनुवंशिक आजार आहे. हे जनुकातील बदलामुळे होते. त्यामुळे मूत्रपिंडात पाण्याने भरलेल्या सिस्ट्स (लहान पिशव्या) तयार होतात, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते.

ते कसे टाळता येईल?

1. वजन कमी करून हे टाळता येईल.

जास्त वजनामुळे किडनी जास्त काम करते.

2-धूम्रपान सोडून

3- आहारात मीठाचे प्रमाण कमी करून 

4-नियमितपणे व्यायाम करून.

5- दारू पिणे बंद करून.

किडनीच्या आजाराची 30 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये ही लक्षणे असू शकतात. पाठदुखी, डोकेदुखी, लघवीतून रक्त येणे, उच्च रक्तदाब, वारंवार लघवीचे संक्रमण, किडनी स्टोन, किडनी निकामी होणे, किडनीचे जुने आजार.

हे सर्व सामान्य आजार आहेत, जे उच्च रक्तदाब किंवा उच्च मधुमेहामुळे होतात. यामुळे किडनीच्या कार्यामध्ये हळूहळू घट होते, जोपर्यंत रोगाचे शेवटी निदान होत नाही. तोपर्यंत काळजी घेतली गेली नाही तर किडनीची मोठी हानी होवू शकते. CKD (chronic kidney disease)  म्हणजे भूक न लागणे, मळमळ, उलट्या होणे, खाज सुटणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, पाणी टिकून राहणे, हृदयाच्या गतीवर होणारा परिणाम, CKD - तीव्र किडनी रोग - AKF  मूत्रपिंड निकामी होणे - AKD तीव्र मूत्रपिंड इजा म्हणतात. यामध्ये किडनी अचानक काम करणे बंद करते. त्याचे 3 टप्पे असतात, पण किडनी मूळ स्थितीत परत येऊ शकते.

3) ग्लोमेरुलोनेफ्रायटिस किडनी युनिट नेफ्रॉन युनिट हे फिल्टरिंग भाग आहे, त्यात इन्फेक्शन असेल तर त्याला ग्लोमेरुलोनेफ्रीबी म्हणतात.त्यामुळे पोटदुखी, ताप, श्वासोच्छवासाचा त्रास होतो. लघवीत रक्त येणे/लघवी न होणे, चेहरा, डोळे, घोटे, पाय, हात इत्यादींवर सूज येणे. त्याची मुख्य कारणे म्हणजे स्ट्रेप्टोकॉक्सीबॅक्टेरिया संसर्गामुळे पुरळ येणे, सांधेदुखी. या सर्वांची चाचणी घेतली जाते. अँटीन्यूक्लियर अँटीबॉडी

मूतखडे : कॅल्क्युलस हा सर्वात सामान्य रोग आहे. भारतात दरवर्षी 2 दशलक्ष (20 लाख) पेक्षा जास्त मुतखड्याच्या नवीन केसेस आढळतात. किडनी स्टोन लहान, मोठे आणि कठीण असू शकतात. ते नुकसान करत नाहीत आणि सहजपणे उपचार केले जाऊ शकतात.

किडनी स्टोनमुळे पाठ आणि पोटात तीव्र वेदना होतात. अतिथंडी वाजून ताप येतो, लघवीत रक्त येणे, मळमळ व उलट्या होणे. लघवीला दुर्गंधी येणे इ. याची लक्षणे आहेत.

होमियोपॅथी आणि युनानी औषधाने त्यावर चांगला उपचार केला जातो.

तुम्हाला किडनीच्या आजाराचा धोका आहे का? 

1- तुम्हाला मधुमेह आहे का?

2- तुमचे वजन जास्त आहे का?

3- तुम्हाला रक्तदाब आहे का?

4- तुम्ही वयोवृद्धे आहात का?

5- कुटुंबातील कोणाला किडनीचा आजार आहे का?. 6- तुम्ही दारू पिता का?

7- तुम्ही सिगारेट ओढता का?

8- तुम्ही पाणी कमी पितात का?

या प्रश्नांपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

किडनीच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी सुवर्ण नियम. किडनीचा आजार हा एक सायलेंट किलर आहे जो तुमच्या आयुष्यावर परिणाम करतो. काही प्रतिबंधात्मक उपाय करून हे टाळता येऊ शकते.

साखर नियंत्रणात ठेवा, बीपी नियंत्रणात ठेवा.

वजन नियंत्रणात ठेवा, दररोज व्यायाम आणि चालणे, ताजी फळे आणि भाज्या वापरा.

तूप, लोणी, चरबी ऐवजी ऑलिव्ह, सूर्यफूल तेल वापरा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक औषध घेऊ नका. भरपूर पाणी प्या, दिवसातून आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. 

लघवी संसर्ग जर तुम्हाला टाळायचे असेल तर तुम्ही जास्त वेळ विनाकारण लघवी करणे थांबवू नये आणि भरपूर पाणी प्यावे, लघवीला जळजळ, ताप, सर्दी अशी लक्षणे दिसतात.


किडनीच्या आजारात उपयुक्त फळे

स्ट्रॉबेरीमध्ये दोन प्रकारचे फिनॉल असतात.

(1) अँथ्रोसायनिन (2) एलाजिटानिन्स

जे किडनीची कार्ये प्रभावी बनवू शकतात. सफरचंद, अननस, लिंबूवर्गीय फळे, ब्लू बेरी, लिंबाचा रस, सरबत किंवा कोशिंबीर याने किडनी स्टोनपासून बचाव करता येतो. त्यात असलेले मोनो साइट्रेट्स किडनीमध्ये खडे बनू देत नाहीत. पोटॅशियम पपईमध्ये असते जे यूरिक ऍसिड जमा होऊ देत नाही. डाळिंबातही पोटॅशियम भरपूर असते पण सोडियम आणि फॉस्फरसचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते उपयुक्त आहे. किडनीच्या आरोग्यासाठीही नारळ पाणी उपयुक्त आहे. आठवड्यातून 2-3 वेळा नारळ पाणी पिणे मुतखड्यावर उपयुक्त आहे आणि त्यांचा आकार कमी करण्यास मदत करते, परंतु क्रिएटिनिनची पातळी जास्त असल्यास नारळाचे पाणी जास्त पिऊ नका. सीकेडी रुग्ण आणि डायलिसिसवर असलेल्यांसाठी टरबूज हे खूप चांगले फळ आहे. त्यात बीटा-कॅरोटीन 6 विटॅमीन सी आणि लाइकोपीन असते. पोटॅशियम, खनिजे आणि जीवनसत्त्वे भरपूर असलेले खरबूज किडनीच्या आजारांसाठी खूप चांगले आहे. हे बीपी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. कोरड्या फळांमध्ये बदाम हे मूत्रपिंडासाठी उपयुक्त आहे. यामध्ये फायबर्स, प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स असतात आणि मॅग्नेशियम देखील असते, जे किडनीसाठी खूप उपयुक्त आहे. भाज्यांबद्दल बोलायचे झाले तर फ्लॉवर, कोबी (पत्ता), कारले, गाजर, कांदा, काकडी उपयुक्त भूमिका बजावतात. किडनीच्या रूग्णाने मीठ जास्त असलेले पदार्थ घेऊ नयेत. कोल्ड ड्रिंक्स, फास्ट फूड, चॉकलेट, काजू, कॉफी, चहा, खारे अन्न, खूप गोड पदार्थ घेऊ नयेत. किडनीच्या आरोग्यामध्ये चांगली झोप देखील महत्त्वाची भूमिका बजावते. किडनीच्या आजारांमध्ये, त्वचेतील टाकाऊ पदार्थ आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी रुग्णाला दररोज 40 मिली गरम पाण्यात 40 मिनिटे ठेवले जाते, त्यामुळेही अधिक क्रिएटिनिन पातळी, मूत्र अल्ब्युमिन कमी होते, होमिओपॅथी, युनानी आणि आयुर्वेदिक उपचारांव्यतिरिक्त हे करणे चांगले आहे. अ‍ॅलोपॅथिक औषधे दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात घेतल्याने मूत्रपिंडाचे आजार होत असल्याने, शक्यतोवर अ‍ॅलोपॅथी औषधी तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय घेणे टाळावे. शेवटी, अल्लाहकडे प्रार्थना करते की या प्राणघातक मूत्रपिंडाच्या आजारांपासून आणि इतर सर्व रोगांपासून आपले रक्षण करावे. आमीन!


- डॉ. सिमीन शहापुरे



सरकारी सूचना, संदेश, आदेशांचे महत्त्व काय असते हे सांगण्याची गरज नाही. ते स्वीकारण्यास कुणी नकार दिला किंवा त्याचे पालन केले नाही तर काय होऊ शकते याची लगेच कल्पना येते. इतकेच नव्हे तर आदेश घेऊन येणाऱ्या व्यक्तीला योग्य आदर दाखवला गेला नाही तरीही काय कारवाई होऊ शकते हेही जाणवते. जगातल्या सामान्य राज्यकर्त्यांची आज्ञा पाळताना माणूस इतकी सावधगिरी बाळगतो मग सृष्टीचा खरा शासक असलेल्या ईश्वराची आज्ञापालन करण्यात किती काळजी घेण्याची गरज आहे याची जाणीव माणसांना व्हायला हवी. पवित्र कुरआन हा ग्रंथ विश्व निर्मात्याचा मानवजातीला दिलेला शेवटचा संदेश आहे. लोकांनी हा संदेश स्वीकारून, त्यावर विश्वास ठेवून, त्यानूसार आचरण केल्यास ते कल्याण आणि सुखसमृद्धीला पात्र ठरतील, अन्यथा त्यांना या सांसारिक जगातही शिक्षा भोगावी लागू शकते आणि मरणोत्तर जीवनातही ते नरकाचे इंधन बनू शकतात. निर्मात्या ईश्वराने मानवजातीचे जीवन आता या अंतिम संदेशाशी जोडले आहे आणि लोकांचे भवितव्य त्यावरच आधारित आहे. जो कुणी या मार्गदर्शनाचा स्वीकार करेल तो आपले जीवन घडवेल आणि जो यापासून दूर जाईल त्याचे भविष्य उद्ध्वस्त होईल. हे स्पष्टपणे सांगताना कुरआनमध्ये विश्व निर्मात्याने म्हटले आहे,

कुल् या’अय्युहन्नासु क-द जा-अकुमुल्-हक्कु मिर्-रब्बिकुम्, फमनिह्-तदा फइन्नमा यह्तदी लिनफ्सिही, वमन् जल्ला फइन्नमा यजिल्लु अलय्-हा, व मा अ-न अलय्-कुम् बि-वकीलिन.

अनुवाद :- हे मुहम्मद! (स.) सांगून टाका की, लोकहो! तुमच्यापाशी तुमच्या पालनकर्त्याकडून सत्य आलेले आहे, आता जो सरळ मार्ग अनुसरील त्याचे सद्वर्तन त्याच्यासाठीच हिताचे होय, आणि जो मार्गभ्रष्ट राहील त्याची मार्गभ्रष्टता त्याच्यासाठीच विनाशकारी आहे आणि मी तुमच्यावर काही हवालदार नाही. 

( 10 यूनुस : 108 )

या आयतीमध्येही संपूर्ण मानवजातीला संबोधित करण्यात आले आहे. आदरणीय पैगंबर (स) यांना लोकांसमोर हे जाहीर करण्याचा हुकुम देण्यात आला की तुमच्यापर्यंत अल्लाहचा अंतिम संदेश म्हणजे पवित्र कुरआन आलेला आहे. हाच खरा धर्म आहे. मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी कुरआन आणि अंतिम पैगंबर आदरणीय मुहम्मद (स) यांच्या जीवन चरित्रातून सन्मार्ग स्पष्ट झाला आहे. यावर विश्वास ठेवा आणि या मार्गदर्शनाचा स्वीकार करा. त्यातच तुमच्या सांसारिक आणि मरणोत्तर जीवनाचे यश दडलेले आहे. आता जो कुणी यातील मार्गदर्शनाचे, आदेशांचे, सुचनांचे पालन करेल तो स्वत:चेच भले करेल. जो त्यावर विश्वास ठेवणार नाही तो दिशाभूल होऊन चुकीच्या मार्गांवर भटकत राहील. ज्याचे दुष्परिणाम त्याला स्वतःलाच भोगावे लागतील. अल्लाहच्या पैगंबरांची जबाबदारी केवळ संदेश पोहोचवण्याची आहे. लोकांच्या मनात विश्वास बसवणे हे त्यांचे काम नाही आणि त्यांच्यावर तुमच्या कृत्यांची कोणतीही जबाबदारी नाही. तुमच्या आचरणाचे तुम्ही स्वत:च जबाबदार आहात. त्यांचे काम तुम्हाला सन्मार्ग दाखवणे आहे. ते स्वीकारण्यासाठी बळजबरी करणे किंवा त्या मार्गाचा अवलंब करायला भाग पाडणे ही त्यांची पद्धत नाही. मार्गदर्शन स्वीकारणाऱ्यांना स्वर्गाची सुवार्ता देणे आणि न स्वीकारण्याचे वाईट परिणाम व शिक्षेपासून लोकांना सावध करणे हेच त्यांचे कार्य आहे. त्यांनी जीवन प्रवासाचा सरळ मार्गही स्पष्ट केला आणि भटकंतीच्या मार्गांपासूनही सावध केले. आता जो कुणी ईशप्रसन्नता शोधू इच्छितो त्याने हे मार्गदर्शन स्वीकारावे आणि ज्या मनमौजीला या सांसारिक जीवनाबरोबर मरणोत्तर जीवनातही त्रास सहन करायची हौस आहे, ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो! या प्रार्थनेशिवाय अशा माणसांसाठी दुसरे काय म्हणता येईल?

......................... क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद

9730254636 - औरंगाबाद.



ह. अब्दुल्लाह इब्ने उमर म्हणतात की जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) प्रवासावर निघायचे तेव्हा ते आपल्या स्वारीवर स्वार होण्यापूर्वी तीन वेळा अल्लाहच्या महानतचे वर्णन करीत (अल्लाहु अकबर) आणि प्रार्थना करत की “तो किती महान आहे ज्याने ह्या स्वारीला आमच्या स्वाधीन केले, आम्ही त्याच्यावर काबू मिळवला नसता आणि निश्चितच आम्ही आपल्या विधात्याकडे वळणार आहोत. हे अल्लाह! या प्रवासात आम्ही तुझ्याशी नेकी आणि सदाचाराची विनंती करतो. हे अल्लाह, या प्रवासाला आमच्यासाठी सोपं कर आणि आमचा हा प्रवास सुखकर होवो. हे अल्लाह, तू या प्रवासादरम्यान माझा सहवासी आहे आणि माझ्या मागे माझ्या कुटुंबाचे देखरेख करणारा आहे. मी या प्रवासातील अडीअडचणींशी तुझी शरण मागतो आणि भयभीत करणाऱ्या घटना व दृश्यांशी. आणि आपल्या घरी परतताना वाईट अवस्थेत असण्याशी. आणि प्रेषित (स.) घरी परतत त्यावर ते म्हणत असत, “आम्ही वळणारे आहोत आपल्या विधात्याकडे आणि त्याचे गुणगान करणारे आहोत.” (मुस्लिम)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले की “जेव्हा तीन माणसे प्रवासाला निघाले असतील, त्यांनी आपल्यातून एकाला आपला नेता करावा.” (ह. अबू सईद खुदरी, अबू दाऊद)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी शत्रुराष्ट्राच्या प्रवासादरम्यान पवित्र कुरआन घेऊन जाण्यास मनाई केली आहे. (ह. अब्दुल्लाह बिन उमर, अबू दाऊद)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की “प्रवास प्रकोपाचाच एक भाग आहे जो तुम्हाला झोपू देत नाही की व्यवस्थित खाणे-पिणे देत नाही. प्रवासाचे उद्दिष्ट पूर्ण होताच तुम्ही आपल्या घरी मुलाबाळांकडे परतण्याची घाई करा.” (ह. अबू हुरैरा, बुखारी)

प्रेषित मुहम्मद (स.) एकदा मस्जिदमध्ये बसले असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आली तेव्हा प्रेषितांनी थोडे बाजुला सरकून त्याच्यासाठी जागा करून दिली. ती व्यक्ती म्हणाली, “जागा मुबलक आहे, बाजुला होण्याची गरज नाही.” त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, “एका मुस्लिमाचा हा अधिकार आहे की जेव्हा त्याचा बंधू त्याच्याकडे येत असेल तर त्याने त्याच्यासाठी जागा करून द्यावी. त्याला आपल्या जवळ बसवून घ्यावे.” (ह. वासिला बिन खत्ताब, बैहकी)

ह. मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की “तुम्ही जोवर श्रद्धा धारण करत नाही तोवर स्वर्गात जाणार नाही. आणि जोवर तुम्ही एकमेकावशी स्नेहाचा व्यवहार करत नाही तोवर तुम्ही श्रद्धावंत असू शकत नाही. मी तुम्हाला अशी गोष्ट सांगतो ज्यावर तुम्ही आचरण केलेत तर तुमच्यामध्ये स्नेह वाढेल आणि ती गोष्ट ही की तुम्ही आपसात एकमेकांना सलाम करत जा.” (ह. अबू हुरैरा, मुस्लिम)

- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(१२) पाहा, आम्ही रात्र आणि दिवस अशा दोन निशाण्या बनविल्या आहेत. रात्रीची निशाणी आम्ही प्रकाशहीन बनविली आणि दिवसाच्या निशाणीला प्रकाशमान केले जेणेकरून तुम्ही आपल्या पालनकर्त्याची कृपा शोधावी आणि महिना व वर्षाचा हिशेब माहीत करून घ्यावा. अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक गोष्टीचे स्पष्ट पृथ:करण केले आहे. 

(१३) प्रत्येक माणसाचा शकून आम्ही त्याच्या स्वत:च्या गळ्यात लटकविलेला आहे. आणि कयामतच्या दिवशी आम्ही एक लेख त्याच्यासाठी काढू जो त्याला उघड पुस्तकाप्रमाणे आढळेल. 

(१४) वाच,आपल्या कृत्यांची नोंद, आज स्वत:चा हिशेब करण्यासाठी तू स्वत:च पुरेसा आहेस. 

(१५) जो कोणी सरळमार्गाचा अवलंब करील त्याचे सरळमार्गावर चालणे त्याच्या स्वत:साठीच लाभदायक आहे. आणि जो पथभ्रष्ट होईल त्याच्या पथभ्रष्टतेचा दुष्परिणाम त्याच्यावरच होणार आहे. एखादा ओझे उचलणारा दुसर्‍याचे ओझे उचलणार नाही. आणि आम्ही शिक्षा देणार नाही जोपर्यंत की (लोकांना सत्य-असत्याचा फरक समजाविण्यासाठी) आम्ही एक पैगंबर पाठवीत नाही. 



७) म्हणजे प्रत्येक माणसाचे सुदैव अथवा दुदै&व आणि त्याच्या शेवटाचे भले अथवा वाईटाची कारणे व सबबी खुद्द त्याच्या अस्तित्वातच आहेत.

८) अर्थ असा की प्रत्येक मनुष्य स्वत:साठी कायमस्वरूपी एक नैतिक जबाबदारी बाळगतो. तो आपल्या वैयक्तिक स्वरूपात सर्वोच्च अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. सदरहू व्यक्तिगत जबाबदारीत इतर कोणीही व्यक्ती त्याची सहभागी नाही. 


उमेदीची फलश्रुती आणि कृतघ्नतेचे परिणाम


निसर्गातील देणग्यांमध्ये अन्न ही फार मोठी देणगी आहे. माणूस राब राब राबतो तो पोटाची खळगी भरण्यासाठी. यासाठीच माणूस शेती-बाडी करण्यात आणि त्यामध्ये वेगवेगळे संशोधन करण्यात पटाईत आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती हा प्रमुख व्यवसाय म्हणून ओळखला जातो. तरीही आपण पाहतो काही सधन शेतकरी सोडले तर बाकीच्या शेतकऱ्यांची अवस्था हवी तेवढी सक्षम दिसत नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात, त्यांमध्ये आपल्या निसर्गकर्त्याकडून योग्य उमेद न बाळगणे, ईशकृतघ्नता, अहंकार हीदेखील कारणे आहेत.

शेतीच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचे आणि अप्रत्यक्षपणे संपूर्ण देशाचे पोट अवलंबून असते. परंतु शेतकऱ्यांना या गोष्टीची खात्री देता येत नाही की शेतात पेरलेले बी उगवेल की नाही, उगवलेले पीक वाढेल की नाही, वाढलेले पीक बहरेल की नाही किंवा बहरलेले शेत कापणीपर्यंत टिकेल की नाही. शेतकरी फक्त एक उमेद राखू शकतो, पिकाला कापणीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्या निसर्गकर्त्याचीच आहे. बहरलेल्या पिकांचा अहंकार बाळगला आणि आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्नता दर्शविली तर त्याचे परिणाम आपण ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाच्या स्वरूपात पाहत असतो.

याबाबतीत एक सत्य प्रसंग कुरआनमध्ये अभ्यासायला मिळतो. अध्याय अल्-कहफ च्या आयत क्रमांक ३२ मध्ये आहे,

"हे‌ पैगंबर (स.), त्यांच्यासमोर एक उदाहरण प्रस्तुत करा. दोन व्यक्ती होत्या, त्यांच्यापैकी एकाला आम्ही द्राक्षाच्या दोन बागा दिल्या आणि त्यांच्याभोवती खजुरीच्या झाडांची कुंपणे लावली आणि त्यांच्या दरम्यान शेतजमीन ठेवली."

भाष्यकारांनी याचे वर्णन करताना सांगितले आहे की त्या व्यक्तीला ज्या द्राक्षाच्या बागा दिल्या होत्या त्या दोन्ही बागा दरवर्षी फळांनी भरभरून जायच्या आणि या दोन बागांच्या मध्ये एक कालवा होता जेणेकरून हवा तितका पाणीपुरवठा होत रहावा. या सर्व गोष्टींचा त्या बागायतदाराला घमंड होता. तो दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन आपल्या संपत्तीबद्दल बढाई मारू लागला. त्याला चिडवत तो म्हणाला, "माझी संपत्ती तुझ्यापेक्षा जास्त आहे आणि माझ्याकडे नोकर व प्राणीही भरपूर आहेत. मला वाटत नाही की ही बाग कधीही नष्ट होईल."

दुसरी व्यक्ती श्रद्धावंत होती, त्या घमंडी व्यक्तीचे हे बोलणे ऐकून ती त्याच्या कृतघ्नतेवर आक्षेप घेत निसर्गकर्त्याच्या शक्तीबद्दल आणि त्याच्यासोबत कृतघ्नतेच्या परिणामांबद्दल सतर्क करायची. पण ती व्यक्ती कृतघ्नतेच्या इतक्या खालच्या पातळीवर पोहचली होती की ती निसर्गकर्त्याच्या अस्तित्वाला विसरून गेली होती. शेवटी त्याचा परिणाम असा झाला की, तीची फळे आणि माल आपत्तीने नष्ट झाला.

या प्रसंगातून आपल्याला एवढा बोध तर नक्कीच व्हायला पाहिजे की आपल्या पोटाची जबाबदारी निसर्गकर्त्याची आहे. आपल्याला त्याच्याशी कृतज्ञ राहून प्रत्येक गोष्टीवर त्याचेच सामर्थ्य असल्याची श्रद्धा ठेवावी लागेल. मग ती गोष्ट शेती करणे असो वा दुसरी कोणतीही गोष्ट.

(क्रमशः)


- हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६


प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या एकूण जीवनप्रवासात “भूके को खाना खिलाव” हे ब्रीदवाक्य आजपर्यंत सर्वत्र पाळले जात आहे. त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे कोरोना महामारीतील लॉकडाऊन काळ! त्या जागतिक समस्येसमोर संपूर्ण जग एकवटले गेले. अन्न आणि औषधे हीच त्या काळातील आवश्यक बाब होती. सर्वधर्मसद्भाव ह्याचे सजीव उदाहरण म्हणजे कोविड काळ होय! सेहरी आणि इफ्तार या कालावधीत रोजा राखला जातो. म्हणजेच उपवास हा जगण्याचा एक सन्मार्ग होय.

रमजानचे एकूण २९ किंवा ३० रोजे पाळण्याचे कारण त्यामुळे रोजेदार आत्मविश्वास मिळवण्यासाठी म्हणून जे चिंतन करतो ज्यामुळे जीवन जगण्याचा मार्ग सुकर कसा असावा? त्यासाठी प्रयत्न करतो. जे-जे कुणी त्रस्त असतील, निर्धन असतील, शारीरिक व्याधीमुळे निराश असतील अशा दुःखी लोकांना जगण्याची एक उमेद देण्याची शक्ती ह्याच मुबारक महिन्यात मिळवली जाते. द्वेष नको, क्रोध नको, घृणा नको, अहंकार नको, स्वस्तुती तर नकोच नको... जी व्यक्ती स्त्री किंवा पुरुष अल्लाहसमोर नतमस्तक होते, तिला विधात्याने निर्माण केलेल्या ब्रह्मांडात असलेल्या सुखसोयी सहज प्राप्त होतात. जे प्राप्त झाले त्याचे मनस्वी आभार व्यक्त करणे आणि ज्याची अपेक्षा असेल त्यासाठी अल्लाहकडे दुआ मागणे, ही एक प्रकारची सहज शक्य होऊ शकेल अशी मागणी आहे. पूर्ण विश्वास त्यामुळे जगणे सहज शक्य होते.

ईमान हा मानवी जीवनातील संस्कारित भाव होय! जन्म झाला त्या पालकांच्या पंखा खाली जगण्याची उमेद मिळते. जन्म अमुकच एका धर्मात का झाला असावा? याला उत्तर काय असावे? मात्र संस्कारित जीवन जगण्यासाठी म्हणून जे धर्मपंडित, मौलवी, पाद्री व इतर धर्मगुरू अभ्यासक मार्गदर्शन करतात त्यात माणूस जगतो. जगात अनेक धर्म अवतरले. त्यासोबत धार्मिक पवित्र ग्रंथ सुद्धा आले. धर्मगुरूंनी ज्यांना जसजशी शिकवण दिली, तसतसा त्या व्यक्तीचा वैचारिक विकास शक्य होऊ लागला. व्यक्ती कितीही धार्मिक उपासक असो, त्याने इतर धर्मियांचा मान राखणे आवश्यक आहे. अशा कितीतरी हदीस किंवा हिकायती आहेत ज्यामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कदापि कुणालाही आग्रही केले नाही. प्रेषितांना माणूस प्रिय असे. जगण्याची त्यांची प्रथा किंवा पद्धत याचे त्यांच्या अनुयायी जाणकारांनी कायम नीट निरीक्षण केले. असेच का? त्याची माहिती घेतली. नबुवत म्हणजेच प्रेषित त्यांचीच अल्लाहने निवड का केली असावी? कारण माणूस म्हणून समाजात कसे जगावे ? ह्याचे पालन ते स्वतः जबाबदार म्हणून करत असत. वेळेवर नमाज अदा करणे, खोटे बोलू नये. त्रास होईल असे आचरणात येता कामा नये.

इस्लाम धर्म गोरगरीब लोकांच्या मदतीस कायम पुढे राहणारा असा धर्म होय. गरिबांसाठी अन्नदान करणे, कपडे परिधान करून त्यांनाही ईदच्या खुशीमध्ये सामावून घेणे. ही महत्त्वाची माहिती सर्वांना आहे. शरीर कितीही सशक्त असू दे, मनाचा सशक्तपणा हीच खरी दिव्य शक्ती होय. आत्मविश्वास मिळवण्यासाठी म्हणून माणूस श्रद्धेकडे वळतो. भरकटलेल्या विचारांना सन्मार्गावर आणायचे असेल तर माणसाने आध्यत्मिक शक्तीकडे वळणे आवश्यक आहे. अध्यात्म एक अस्त्र आहे स्वतःच्या गुणावगुणावर अंकुश ठेवण्यासाठी!

जगात अनेक धर्म आहेत. त्या सर्वांची शक्ती आहे ती अध्यात्म! प्रथम स्वतःशी बोला नंतर जगाचे ऐका. “ज्यांस स्वच्छता राखायची असेल त्याच्या मनी घाणीविषयी तिटकारा असता कामा नये,” असे गांधीजी म्हणायचे. अपराध, अश्लीलता, अहंकार, द्वेष असे अनेक मानवी वैचारिक विकार आहेत ज्यांवर एकमात्र उपाय म्हणजे अध्यात्म होय. धर्म ही एक संकल्पना आहे. शरीर धर्म, मानसिक धर्म, कुटुंब धर्म अशा या व्याख्या आहेत धर्माच्या. इस्लाम हा एक परिपूर्ण धर्म होय, ज्याची स्थापना साडेचौदाशे वर्षांपूर्वी आखाती वाळवंटात झाली. नबुवत मिळणे हा अल्लाहचा आदेश होय.

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जे अनुभवले त्यांत ईश्वरी संदेश होता तो म्हणजे सिजदा! एकेश्वराचा आग्रही संकेत! होय स्वतःविषयीचा फसवा अहंकार. या जगी कुणीही पूजक नाही. जो जन्मला त्यास कर्म हाच एक मार्ग होय. स्वपूजक स्वस्तुती हे मानसिक रोग आहेत त्यावर अंकुश मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती. त्याच भावनेतून रोजा ही एक उपासना ठरली. माहे रमजान हा उपवासाच्या माध्यमातून दिव्यतेकडे नेणारा पवित्र महिना होय. तकवा, नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामी आज्ञेतील रोजा यांस पर्याय नाही. सशक्त स्त्री-पुरुष आणि मुले या सर्वांनी माहे रमजानमध्ये रोजा पाळणे अत्यावश्यक आहे. अन्न तर नाहीच, पाण्याचा थेंबही न घेता पूर्णपणे उपाशी राहणे आवश्यक आहे. प्रेषितांनी ते प्रथम स्वतः केले व नंतर इतरांनी त्याचे अनुकरण केले. आजही ते सुरू आहे. 

इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्टच्या वतीने प्रकाशित मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी लिखित एका पुस्तकातील परिच्छेद येथे देऊ इच्छितो... “प्रेषित असे सांगताहेत, “मी एक मनुष्य आहे. तुमच्यासारखाच मनुष्य. माझ्याजवळ माझे स्वतःचे असे काहीच नाही. सर्व अल्लाहचे आहे व अल्लाहनेच दिले आहे. या वाणीसारखी दुसरी वाणी नाही. ही माझ्या बुद्धीची उपज सुद्धा नाही. या वाणीचा शब्दन् शब्द अल्लाहकडून माझ्याकडे आला आहे. जे अवतरित होते अल्लाहकडून, तेच मी तुम्हांस सांगतो. “

रोजा (उपवास) अल्लाहने सर्व मुस्लिमांसाठी अनिवार्य केला आहे. हा एक आदेश आहे. जेणेकरून सर्वांनी एकत्रितपणे रोजा करावा. स्वेछेनुसार त्यांत कदापि कसलाही बदल होऊ शकत नाही. ही आग्रही भूमिका एवढ्यासाठीच की प्रत्येक रोजेदाराचे ईमान म्हणजेच श्रद्धा एकाच ईश्वरी शक्तीवर असावे. त्यात मनसोक्त बदल होऊ नयेत, हीच खरी शिकवण आहे. 

संपूर्ण रमजान महिन्यांत घरचे तसेच सामाजिक वातावरण पवित्र असावे, भक्तिमय असावे तसेच एकाच वेळेस अल्लाहसमोर नतमस्तक व्हावे! मनाचे पावित्र्य जपणे तसेच प्रलोभनांपासून अलिप्त राहणे, मालमत्ता, दागदागिन्यांच्या अहंकारातून मुक्त होणे. असे अनेक आध्यत्मिक फायदे एका रोजामुळे होत आहेत. ईमान आणि त्याची जाणीव तसेच वैर आणि दोषमुक्त जगण्याची संधी माहे रमजान देऊ शकतो, अशा या पवित्र मासाचे आपण सर्वांनी स्वागत करू या.


इकबाल शर्फ मुकादम

(मो.नं.: 99206 94112)



१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले अझिमुल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. ज्या वेळी स्थानिक राज्यकर्ते, संस्थानांचे प्रमुख कोणत्याही कृती योजनेशिवाय ब्रिटीशांशी लढण्याची इच्छा व्यक्त करत होते, तेव्हा अझिमुल्ला यांचे असे मत होते की केवळ बळाचा आंधळा वापर करण्यापेक्षा नियोजित कृतीने अधिक परिणाम होतील.म्हणूनच त्यांनी ब्रिटिशांशी लढण्यासाठी रणनीती आखली.

ते इंग्रजी आणि फ्रेंच शिकले. कानपूर कॉलेजमध्ये शिकले आणि तिथेच ते अध्यापक झाले. कानपूरचे राज्यकर्ते नानासाहेब पेशवे यांना अझिमुल्ला यांच्या प्रतिभेची माहिती झाली आणि त्यांनी त्यांना आपले वकील होण्याची ऑफर दिली.

कानपूर संस्थानाच्या कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी नानासाहेबांच्या निमंत्रणावरून अझिमुल्ला इंग्लंडला गेले, तेथे त्यांनी काही वर्षे व्यतीत केली. इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी ब्रिटिशांचे राजकारण जवळून पाहिले. भारताच्या परतीच्या प्रवासात त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या.

जेव्हा ते माल्टाला पोहोचले तेव्हा त्यांना कळले की रशियन सैन्याने माल्टा येथे अँग्लो-फ्रेंच सैन्याचा पराभव केला आहे. म्हणून रशियाच्या लष्करी क्षमतेचे निरीक्षण करण्यासाठी ते कॉन्स्टँटिनोपलला गेले. नंतर त्यांनी फ्रान्स आणि क्रिमियाला भेट दिली आणि संबंधित देशांच्या राज्यकर्त्यांचे राजकारण आणि युद्धनीती पाहिली. त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी काम करण्यास प्रेरित केले.

जे देश ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात मदत करण्यास तयार होते त्यांच्याशी अझिमुल्ला यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. भारतात परतल्यानंतर त्यांनी नानासाहेबांसमोर आपले विचार व्यक्त केले आणि १८५७ च्या बंडाला पाठिंबा मिळवण्यासाठी स्थानिक राज्यकर्त्यांना पत्रे लिहिली. त्यांच्या पत्रांमध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.

इंग्रजांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये ‘पयाम-ए-आझादी’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी अवधच्या बेगम हजरत महल, मौलवी अहमदउल्ला शाह, झाशीच्या लक्ष्मीबाई, मोगल राजपुत्र फिरोज शाह आणि तात्या टोपे यांना नाना साहेबांसह इंग्रजांविरुद्ध रणनीती आखण्यात मदत केली.

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात जवळजवळ पराभवाची परिस्थिती निर्माण झाली असताना नानासाहेब, हजरत महल आदींसह ते नेपाळच्या जंगलात परतले. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आर्थिक आणि लष्करी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना ऑक्टोबर १८५९ मध्ये अझिमुल्ला खान यांचे निधन झाले.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget