Halloween Costume ideas 2015
Latest Post


इतिहास-संशोधक सरफराज अहमद यांचं ‘अमीर खुसरो-दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा’ हे अकरा इतिहास-संशोधनपर लेखांचं लवकरच हरिती प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला कथा-कादंबरीकार आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

समी मूळचा मराठवाड्याचा व माझे वडील हैदराबादला वाढलेले. त्यामुळे दखनी भाषा, दखनी संस्कृती व उर्दू भाषा-साहित्य हा माझ्या आस्थेचा विषय. त्यामुळे समान आवडीमुळे सरफराज अहमद हे माझे केव्हा व कसे घनिष्ट मित्र बनले हे समजलेच नाही.

सरफराज अहमद हे हाडाचे इतिहास संशोधक आहेत. आणि मराठी जगताला ते दखनी इतिहासाचे अज्ञात पैलू उलगडून दाखवत आहेत. आणि त्याद्वारे मुस्लिम इतिहास म्हणजेच मुस्लिम राज्यकर्त्याच्या इतिहासाचे वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यात संशोधकीय शिस्त पाळत उपलब्ध, फारसी, उर्दू व इंग्रजी दस्तावेजाच्या आधारे पुर्नलेखन करत आहेत आणि मुस्लिमांचे भारत वर्षाला दिलेले योगदान व त्यातल्या अभिमान बाळगाव्या, अशा सकारात्मक बाबी तटस्थ, प्रामाणिकपणे पुराव्यासह आणि तर्कशुद्ध प्रतिपादनाद्वारे करत आहेत, हे लक्षात येत होतं.

आणि आता त्यांचे ‘अमीर खुसरो-दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा’ हे अकरा इतिहास-संशोधनपर लेखांचे पुस्तक मराठी रसिकांपुढे येत आहे, ही समाधानाची बाब आहे, मी सदर पुस्तकाचे मन:पूर्वक स्वागत करतो.

आज देशात इतिहासाचे भारतीय दृष्टीकोनातून पुनर्लेखनाच्या नावाखाली भारतातला जवळपास हजार वर्षांचा मुस्लिम इतिहास हा केवळ अन्याय व अत्याचाराचाच आहे, अशी भूमिका घेतली जात आहे. आणि त्याद्वारे मुस्लिमांचे ऐतिहासिक योगदान नाकारण्याचा अश्लाध्य प्रयत्न होत आहे. सर्वच मुस्लिम राज्यकर्ते हे सद्गुणांचे पुतळे होते, असा कोणी दावा करणार नाही, पण अकबर, शेरशहा सुरी, रजिया सुलतान, दक्षिणेतली चांदबीबी यांच्या राजवटी, तसेच मुस्लिमांचे स्थापत्यकलेमधले भरीव योगदान (उदा. - ताजमहल, कुतूबमिनार, लाल किल्ला, गोलघुमट), कला-संस्कृतीमध्ये टाकलेली भर (अमीर खुसरो ते मिर्झा गालिब) आणि मध्ययुगीन भक्ती सांप्रदायाचा समकक्ष आध्यात्मिक समता व बंधुतेचा आणि प्रेम - शांती - मानवधर्माचा पुरस्कार करणारा सूफी संतांचा संप्रदाय व त्यांचं काव्य, यांस आपण नाकारू शकत नाही.

ब्रिटिशांनी तसेच डाव्या विचारवंतांनी भारताच्या लिहिलेला इतिहासावर पूर्वीही प्रश्न उपस्थित केले जात होते व आजही केले जातात. त्यात काही गैर नाही. त्यामुळे नव्याने इतिहासाचे पुनर्लेखन करण्याची आवश्यकता असतेच. पण ते करताना आधी भूमिका ठरवून, विशिष्ट नजर वा विचारसरणी घेऊन आणि त्याला अनुकूल तेवढेच पुरावे व संदर्भ उदधृत करून इतिहासलेखन करणारे इतिहासकार एकांगी चित्र वाचकांपुढे उभे करतात. हे अर्थातच योग्य नाही. पण त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरी बाजू दाखवताना तशीच चूक करणारे इतिहासकार पण कमी नाहीत. त्यामुळे वैज्ञानिक वृत्तीने प्रश्न उपस्थित करत पुरावा तपासणे व त्यातून प्रसंगी परस्पर विरोधी बाजू एकाच राज्यकर्त्यांच्या येत असल्या तरी त्या तशा मांडणे व जिथे तर्कसंगती लागत नाही, तिथे वैज्ञानिकांप्रमाणे तसे नमूद करत त्याचा शोध पुढील काळावर सोपवून तसे प्रामाणिकपणे नोंदवणे, हे अस्सल इतिहास संशोधकाचे काम आहे.

असे इतिहासकार कमीच असतात. पण अशा दुर्मीळ इतिहास संशोधकात सरफराज अहमद येतात, असे माझे हे पुस्तक वाचताना मत झाले आहे. पण तरीही ज्यांच्यावर जमातवादी इतिहासलेखनाने अन्याय झाला आहे, त्यांच्या उजळ बाजूवर व उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकणे, ही भूमिका घेऊन हे लेखन झाल्यामुळे काही वेळा सरफराज अहमदच्या लेखनात खंडन-मंडणाचा अभिनिवेश डोकावतो, हे पण खरे आहे.

तरीही बऱ्याच अंशी सत्याचा वस्तुनिष्ठ शोध घेण्याचा खऱ्या इतिहास संशोधकाच्या भूमिकेशी ते ठाम राहिले आहेत, म्हणून या पुस्तकातून मुस्लिम राज्यकर्त्यांच्या इतिहासाची पुनर्व्याख्या करत जो इतिहास सरफराज अहमद यांनी कथन केला आहे, तो महत्त्वाचा आणि भारताच्या ‘गंगा-जमनी तहजीब’च्या संकल्पनेला सत्याचा आणि संशोधकीय आधार देणारा झाला आहे. आज अशा संशोधनाने विभिन्न संस्कृतीबाबत ‘मेल्टिंग पॉट’ झालेल्या भारताचा हा सर्वधर्मसमभाव आणि आदराचा इतिहास प्रभावीपणे सांगण्याची गरज होती, ती या पुस्तकानं बऱ्याच अंशी सफल झाली आहे.

पहिला लेख ‘अमीर खुसरो ते इब्राहिम आदिलशहा - गंगा-जमनी संस्कृतीचे दोन नायक’, ‘दारा शुकोहचा सुफी वारसा’ आणि टिपू सुलतान आणि बाबरच्या अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकणारे लेख मुस्लिम राज्यकर्त्याचे भारतीय इतिहास, संस्कृतीबाबतचे योगदान आणि त्यांनी आचरलेल्या शांततामय सहअस्तित्वावर प्रकाश टाकणारे आहेत.

अमीर खुसरोबाबत ते भारतीय संस्कृतीचे आत्मभान घेऊन सामान्य माणसांच्या बाजूने उभे राहणारे आणि समाजाला मूल्यविवेक शिकवणारे महाकवी आहेत, हे लेखकाचं प्रतिपादन पटणारं आहे. त्यांनी एच. एन. सोल्कनॉज या मध्ययुगीन इतिहासाच्या संशोधकाचं अमीर खुसरोबाबत नोंदवलेलं निरीक्षण महत्त्वाचं आहे- ‘‘मध्ययुगीन काळात भारतीय संस्कृतीची पालखी अमीर खुसरोंनी आपल्या खांद्यावर घेतली. समतेचे तत्त्व भारतीय समाजात रुजवण्यासाठी शब्दांचे माध्यम वापरले. इस्लामच्या उदारमतवादी परंपरेचे प्रतिनिधित्व करणारा खुसरो हा अद्वितीय कवी आहे.’’

या लेखात लेखकाने खुसरोची ‘धर्म जपत धर्मापलीकडे जाण्याची सद्भावना’ आणि ‘भारतप्रेम व राष्ट्रीयत्वाच्या कविता’  उदधृत करून ‘तो प्रेमाचा काफीर आहे व त्याला मुसलमानीची आवश्यकता नाही’, हे त्याचं बंडखोर व्यक्तिमत्त्व समर्पकपणे चितारलं आहे. त्याच्या एका कवितेच्या ‘किश्वरे हिंद बहिश्ते बर जमिन’ या ओळी दिल्या आहेत, ज्याचा अर्थ ‘भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे’, असा होतो. त्यातून तो या भूमीशी व इथल्या संस्कृतीशी किती एकरूप झाला होता, हे लेखकाने योग्य रीतीने दाखवून दिले आहे.

मोहमद कुली कुतुबशहा तर दख्खनी साहित्याचा महाकवी होता, हे लेखकाने सप्रमाण दाखवून त्याचा एक वेगळा पैलू कथन केला आहे. फारसीचा दुराग्रह न करता त्याने स्थानिक लोकभाषेत काव्यलेखन केलं. हे संदर्भ आणि हा सांस्कृतिक इतिहास आजच्या धार्मिक विद्वेषाच्या कालखंडात उच्चरवाने सांगणे आणि लोकांपर्यंत ही माहिती नेणे शांततामय सहअसित्वासाठी महत्त्वाचे आहे.

खरं तर प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक लेख मुस्लिम इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा आहे. सरफराज अहमद यांनी टिपू सुलतानाच्या पत्रव्यवहारातून आणि बाबरच्या आत्मचरित्र ‘बाबरनामा’ व अन्य कृतींमधून हे दोन राज्यकर्ते प्रचलित गैरसमजुतीच्या पलीकडे कसे प्रजाहितदक्ष व उदार सुलतान होते, हे संक्षेपाने पण प्रमाणानिशी दाखवून दिले आहे. खरे तर टिपू सुलतानाचं नायकत्व गिरीश कार्नाडांच्या ‘द ड्रिम्स ऑफ टिपू’ या नाटकाद्वारे भारतीयांपुढे आले होते, पण त्याच्या पत्रातून तो कसा इंग्रजांच्या वसाहतवादाला विरोध करणारा एतद्देशीय बादशहा होता, हे या लेखातून मला वाटते, मराठीत प्रथमच प्रभावीपणे आले आहे.

बाबराची आजची प्रतिमा ही बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादानं हिंदूंसाठी नकारात्मक झाली आहे, मात्र त्याची राजवट ही मंदिरं तोडण्याच्या एक-दोन घटना वगळता अत्यंत सहिष्णू होती, हा लेखकाने काढलेला निष्कर्ष पुरेशा पुराव्याविना पटणारा नाही. लेखकाने उरवाच्या डोंगरावरील मूर्त्या नग्न होत्या म्हणून तोडल्या, हा लेखकाने दिलेला संदर्भ माझ्या मते पुरेसा नाही. ‘‘बाबरच्या अधिकाऱ्यांनी बाबरला न कळवता स्वत:हून घेतलेल्या (म्हणजे मंदिर विध्वंसाच्या) निर्णयासाठी बाबराला जबाबदार धरता येणार नाही’’, हा लेखकाने काढलेला निष्कर्ष पुराव्याला धरून नाही, तर त्याचं मोठेपण वाचकांच्या मनावर ठसवण्यासाठी केलेलं विधान आहे, असं मला वाटतं.

इथं एक संशोधक इतिहासकाराच्या भूमिकेपासून सरफराज अहमद काही प्रमाणात ढळले गेले, असा निष्कर्ष एक वाचक म्हणून काढला तर चुकीचा ठरणार नाही. पण बाबराचं मोठेपण एका साम्राज्याचा निर्माता म्हणून निर्विवाद आहे. रयतेचं मन जिंकल्याखेरीज आणि स्थानिकाचा धर्म व संस्कृतीला आपलंसं केल्याखेरीज मोगल साम्राज्य एवढं प्रदीर्घ काळ टिकलं नसतं. त्यात अकबर, जहांगीर व शहाजहानचा - खास करून अकबराच्या उदार राज्यकारभाराचा वाटा मोठा आहे.

तसेच हैदराबादच्या शेवटचा निजाम मीर उस्मानअली खाँवर ‘शत्रूभावी समीक्षेच्या पलीकडचा’ नावाने जो लेख प्रस्तुत ग्रंथात आहे, तोही त्याला वाजवीपेक्षा अधिक उजळ करणारा व इतिहासाशी काहीसा विसंगत ठरणारा आहे. लेखकाने अनंत भालेराव या ‘मराठवाडा’ दैनिकाच्या संपादक व मराठवाड्याचं वैचारिक नेतृत्व करणाऱ्या सव्यसाची लेखकानं मीर उस्मान अलीला ‘शोषक बादशहा’ ठरवलं, ते या ग्रंथलेखकास व्यथित करणारं म्हणून अमान्य आहे.

मला स्वत:ला प्रस्तुत ग्रंथातील ‘मराठवाड्याच्या मध्ययुगीन इतिहासाचे पुनर्लेखन’ व ‘हैदराबादची साहित्य संस्कृती’ हे दोन लेख मूळचा मराठवाडी म्हणून विशेष महत्त्वाचे वाटतात. त्याद्वारा माझ्या उज्ज्वल मराठवाडी सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेची जाणीव, हे लेख वाचताना मला झाली. दख्खनी भाषेचा उदय आणि प्रगती, साहित्य निर्मिती तसेच उर्दू भाषेला निजामाने दरबारी भाषा केल्यामुळे त्या भाषेच्या विकासाला चालना मिळाली, याचे सम्यक ज्ञान या लेखांनी वाचकांना समाधानकारक रीतीने होते.

पण येथे लेखकाने कुतुबशाही-आदिलशाहीची स्थानिक मराठी, कानडी व तेलुगू भाषेला महत्त्व देण्याच्या उदार परंपरेला छेद देत निजामशाहीत उर्दू ही राज्यकारभाराची व शिक्षणाची भाषा करून ती स्थानिक लोकांवर का थोपवली गेली? त्यामागे निजामाच्या कोणत्या प्रेरणा होत्या? यावर भाष्य करणं आवश्यक होतं. निदान पुढील पुस्तकात तरी करावं व तटस्थपणे त्याचं ऐतिहासिक मूल्यमापन प्रस्तुत करावं असं मला जरूर सुचवावंसं वाटतं. सरफराज अहमद हे संशोधकीय शिस्तीनं इतिहासाकडे तटस्थपणे पाहणारे अभ्यासक आहेत, ज्याची प्रस्तुतचा ग्रंथ साक्ष आहे, म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं अवाजवी होणार नाही.

या पुस्तकातील इतर लेख म्हणजे ‘मुघलांचे जनानखाने’, ‘अलबरुनी’ आणि ‘फखरे मुदब्बीर’ हे लेख मुस्लिम जीवन व मुस्लिम विचारवंतांचे वैचारिक योगदान कथन करणारे आहे. मलिक अंबर याच्यावर स्वतंत्र लेख खरे तर त्याचे दखनी राजवटीच्या संदर्भातले योगदान पाहता आणि औरंगाबाद शहराचा निर्माता म्हणून त्याचं महत्त्व लेखकानं स्वतंत्रपणे लिहिणं आवश्यक होतं. इतर लेखात त्याच्या कर्तृत्वावर संक्षिप्तपणे प्रकाशझोत टाकला गेला आहे, पण तो दखनी संस्कृतीचा एक नायक होता, त्याच्यावर वेगळा लेख हवा होता, असं राहून राहून वाटतं. असो. मागेपुढे ते नक्कीच मलिक अंबर लेख लिहितील, अशी अपेक्षा आहे.

एकूणच प्रस्तुत पुस्तक नावाप्रमाणे दखनी संस्कृतीचं ऐतिहासिक महत्त्व व त्याला लाभलेली दखनी राष्ट्रीयत्वाची किनार आणि इब्राहिम आदिलशहा व मलिक अंबर या दोन मराठी राष्ट्रीयत्वाची उभारणी करणाऱ्या नायकांचं योगदान समर्थपणे दाखवून देणारा झाला आहे. भारतातील गंगा-जमनी संस्कृतीचं साधार व सम्यक दर्शन आजच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या काळात सप्रमाण व पुराव्यानिशी घडवल्याबद्दल या लेखकाचं मी अभिनंदन करतो. आणि हे पुस्तक प्रत्येक मराठी माणसानं उघड्या मनानं वाचावं, म्हणजे हा पुरोगामी महाराष्ट्र अधिक उदार, सहिष्णू व सेक्युलर होऊ शकेल!


‘अमीर खुसरो-दारा शुकोह :

प्रवास एका इतिहासाचा’

लेखक : सरफराज अहमद

हरिती प्रकाशन, पुणे

पाने – २४०, मूल्य – ३०० रुपये.

सदर पुस्तक प्रकाशनपूर्व पन्नास टक्के सवलतीत मिळवण्यासाठी  संपर्क :

राहूल लोंढे – 7385521336



राहुल गांधी यांच्या "भारत जोडो" पदयात्रेला सर्वसामान्य जनतेने अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे, या पदयात्रेचे पडसाद देशपातळीवर उमटले आहेत.  राहूल गांधींची भारत जोडो पदयात्रा लोकांना आपली वाटते यातच या पदयात्रेचे  यश आहे. प्रसार माध्यमांनी व वाहिन्यांनी या पदयात्रेला म्हणावी तेवढी प्रसिद्धी दिली नाहीतरी ती पदयात्रा व या पदयात्रेचा मेसेज लोकांपर्यंत पोहचला, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. मुद्रीत माध्यमांनी निम्म्या यात्रेपर्यंत बिलकुल  दखल घेतली नव्हती, पुढे जनतेचा प्रतिसाद पाहून त्या वृत्तपत्रांना नाईलाजाने का होईना थोडीफार दखल घ्यावी लागली. ही बाब ही ठळकपणे जनतेच्या समोर आली,

सध्या समाजजीवनामध्ये वृत्तपत्रांचे महत्त्व कमी कमी होत आहे,ही वास्तवता अधोरेखित करणारी ही गोष्ट आहे.कारण भारत जोडो पदयात्रा केवळ वृत्तपत्रांमुळे लोकांपर्यंत पोहोचेल, हा गैरसमज होता, हे आता सिद्ध झाले आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल किंवा त्यांनी काढलेल्या भारत जोडो पदयात्रेबद्दल किंवा त्यांनी घेतलेल्या उदात्त भूमिकेबद्दल, प्रसार माध्यमांनी तटस्थपणे प्रसिद्धी द्यायला हवी होती, मात्र तसे झाले नाही, ही नव्या बदलत्या वृत्तपत्रांच्या संपादक मालकांची लाचारी की अगतिकता ?असा प्रश्न ग्रामीण भागातील फार न शिकलेल्या माणसांनाही यानिमित्ताने पडला आहे, त्यामुळे सामान्य माणसांच्या मनातील वृत्तपत्रांविषयीचा आदरभाव व विश्वासार्हता कमी झाली आहे, हे ही वास्तव ठळकपणे नजरेत भरते आहे. दोन-पाच कोस चालत येवून खेडोपाड्यातील सर्व थरातील जनता राहुल गांधी यांना भेटून त्यांच्या सोबत चालत होती,  राहुल गांधीसुध्दा  आपुलकीने प्रत्येकाला जवळ घेत होते, त्या मध्ये कोणतीही कृत्रिमता दिसून येत नव्हती, जनतेशी समरस होऊन त्यांची दु:खे राहूल गांधी ऐकताना दिसत होते... 

भारत जोडो ही पदयात्रा राजकीय नाही. हे कॉंग्रेस पक्षाने वेळोवेळी जाहीर केले होते, जात-धर्म-भाषा यांच्या सीमा ओलांडून "नफरत तोडो भारत तोडो"  ही  भावना पुन्हा एकदा या पवित्र देशात निर्माण केली पाहिजे. हिच या पदयात्रेमागची भावना होती.जाती-धर्मांत भेदा-भेद करून, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वातावरण दुषीत करणाऱ्यांना या यात्रेने परस्पर उत्तर दिले आहे.

गेल्या ८ वर्षांत देशात जे सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वातावरण खराब केले गेले.... विरोधकांना शत्रू मानून त्यांना सीबीआय,ईडी सारख्या शासकीय यंत्रणा वापरून हैराण करण्यात आले .. होता होईल तेवढी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी व गळचेपी करण्यात आली... याबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनातील खदखद जाणवत होती. खरोखरच दोषींवर कारवाई ही झालीच पाहिजे मात्र केवळ विरोधासाठी विरोध करुन किंवा विरोधक संपवायचा म्हणून सत्तेवर आहे म्हणून आपल्या हातातील शासकीय यंत्रणेचा गैरवापर करणे, हे कधीही निषेधार्हच आहे, पण गेल्या काही वर्षांत ते केले गेले,ही वास्तवता कुणीही नाकारू शकत नाही.

आता या यात्रेमुळे धर्मवाद, जातियवाद पसरवून जनतेला भयभीत करून सोडणाऱ्या प्रवृत्तीं आपोआप नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत हे स्पष्टपणे दिसून आले. पप्पू म्हणून हिणवणाऱ्यांची समाजात नाचक्की झाली आहे, त्यामुळे राहूल गांधी यांना ट्रोल करणाऱ्यांवर बिळात जावून बसण्याची वेळ आली आहे.

बलाढ्य ब्रिटीश सत्तेला न घाबरता निधड्या छातीने स्वातंत्र्य मिळविलेला हा देश आहे. धगधगत्या स्वातंत्र्य चळवळीचा ज्वलंत इतिहास असणारा हा देश आहे,या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने लोकही आता धीट होत आहेत. कोणत्याही मुस्कटदाबीला भीक न घालणाऱ्या या जनतेने अनेकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. या यात्रेमुळे निर्माण झालेले स्वातंत्र्याचे वारे आता थांबणार नाही.  हे आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या पदयात्रेचे हसे करणाऱ्यांची तोंडं बघण्यासारखी झाली आहेत.

‌स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांनी  मुंबईतून दोन शब्दांचा नारा दिला होता तो म्हणजे... ‘चले जाव....’. आता तेच शब्द राजकीयदृष्ट्या पुन्हा एकदा जनतेची घोषणा होणार कि काय.. असे दिसू लागले आहे.

प्रचंड महागाई, नोटा बंदी, बेरोजगारी, जीएसटी , स्मार्ट सिटी या फसलेल्या योजनांमुळे हैराण करुन सोडलेल्या जनतेला देव-धर्माच्या विषयांत गुंतवून ठेवून दुसरीकडे राज्या राज्यात राजकीय तोडफोड करण्यात व्यस्त असलेल्या सरकारला सामान्य जनतेच्या हाल अपेष्टांविषयी देणेघेणे नाही हे स्पष्ट झाले आहे. इतके घाणेरडे राजकारण या देशात यापूर्वी कधीही झाले नव्हते. राहुल गांधी यांच्या ‘भारत-जोडो’ यात्रेने आज या प्रत्येक प्रश्नांवर सर्व सामान्य माणसाला विचार करणे भाग पाडले आहे.  सामान्य माणसाला गेल्या काही वर्षांतील हे घाणेरडे, मुल्यहीन राजकारण आता समजू लागले आहे. त्यामुळे  लोकांची उघडपणे शांततामय मार्गाने या सगळ्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरण्याची मानसिकता तयार झाली आहे.... .

'भारत जोडो' या पदयात्रेमुळे देशातील जनतेला लिलया  मिळत गेलेले हे सामर्थ्य आहे. हेच या पदयात्रेचे फलित म्हणावे लागेल.  त्यामुळेच ज्यांनी या यात्रेकडे दुर्लक्ष केले होते त्याच मंडळींना  आता दखल घेण्याखेरिज पर्याय राहिला नाही. ही पदयात्रा राजकीयही नाही.... पण, राजकारण नसतानाही त्यातील ‘मर्म’ लोकांना आपोआप कळत चाललेले आहे.  जनतेचा पाठिंबा कुठल्या मुद्द्यांवर कधी कुणाला मिळेल हे कुणालाच सांगता येत नाही ,याची दखल राजकारण्यांनी घ्यायला हवी.

भाजपाविरोधात लढायचे असेल तर सर्वच विरोधकांनी एकत्र पाहिजे, हा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड ही नेतेमंडळी या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती, याची गरज ओळखून सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे.

देशभरातील सर्वसामान्य जनतेच्या मनात विचार करायला लावणारी व सर्व थरातील जनतेचे लक्ष वेधून घेणारी ही भारत जोडो यात्रा प्रसिद्धी माध्यमांनी फारशी दखल घेतली नसली तरी यशस्वी होत आहे हे मात्र नक्की...!


- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)


"लोकशाही" हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून आला आहे ज्याचा अर्थ लोक (डेमो) आणि राज्य (क्रॅटो) असा होतो. एखाद्या देशातील नागरिकांनी आपल्या देशाच्या सरकारमध्ये सक्रिय भूमिका घेऊन त्याचे व्यवस्थापन प्रत्यक्ष किंवा निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत करावे, हा विचार म्हणजे लोकशाही होय. शिवाय हिंसक उठाव किंवा क्रांती करण्यापेक्षा शांततापूर्ण सत्तांतरांद्वारे जनता आपल्या सरकारची जागा घेऊ शकते, या कल्पनेचेही ते समर्थन करते. अशा प्रकारे, लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे लोकांचा आवाज आहे.

लोकशाही हा सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक भेदांचा विचार न करता, जगभरातील लोकांनी सामायिक केलेल्या समान मूल्यांवर आधारित एक सार्वत्रिक मान्यताप्राप्त आदर्श आहे. शासनाचा एक प्रकार म्हणून लोकशाही हा मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी सार्वत्रिक मापदंड आहे; हे मानवी हक्कांचे संरक्षण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी एक वातावरण प्रदान करते. लोकशाहीला सरकारचे सर्वोत्तम रूप म्हणून ओळखले जाते, कारण लोकशाहीत देशातील लोकच आपले सरकार निवडतात. त्यांना असे काही अधिकार मिळतात जे कोणत्याही माणसाला मुक्तपणे आणि आनंदाने जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. काळाच्या कसोटीवर लोकशाहीने मात केली आहे; इतर प्रकारचे सरकार अपयशी ठरले असले, तरी लोकशाही भक्कमपणे उभी राहिली आहे. तिने वेळोवेळी त्याचे महत्त्व सिद्ध केले आहे.

मुक्त समाजात वावरणाऱ्या लोकांना आपले स्वातंत्र्य गृहीत धरणे फार सोपे आहे, पण जेव्हा स्वातंत्र्याचा अभाव असतो, तेव्हा आयुष्य अकल्पनीय आव्हानांनी वेढले जाऊ शकते. मानवी हक्कांच्या सार्वत्रिक जाहीरनाम्यात अंतर्भूत केल्याप्रमाणे मानवी हक्कांचे संरक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकशाही नैसर्गिक वातावरण प्रदान करते. लोकशाही समाजाचा पाया म्हणजे तेथील लोकांची आपल्या राष्ट्राच्या निर्णयप्रक्रियेत भाग घेण्याची क्षमता होय. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा प्रत्येकाला वंश, लिंग किंवा इतर घटकांची पर्वा न करता मतदान करण्याची परवानगी दिली जाते, याचा अर्थ असा की लोकशाही समाजाच्या यशासाठी समावेश आणि समानता महत्त्वपूर्ण आहे.

आज लोकशाहीचे सर्वात सामान्य रूप म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही, जिथे लोक संसदीय किंवा अध्यक्षीय लोकशाहीसारख्या त्यांच्या वतीने शासन करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांची निवड करतात. लोकशाहीमध्ये असेंब्लीचे स्वातंत्र्य, संघटन, मालमत्तेचे हक्क, धर्म आणि भाषण स्वातंत्र्य, सर्वसमावेशकता आणि समानता, नागरिकत्व, शासनाची संमती, मतदानाचा हक्क, जीवन आणि स्वातंत्र्याच्या हक्कापासून अवांछित सरकारी वंचिततेपासून मुक्तता आणि अल्पसंख्याकांचे हक्क यांचा समावेश होतो. लोकशाहीमुळे शोषित गटांना बळ देणाऱ्या समानतेच्या संस्कृतीची सुरुवात होऊ शकते. अशा गटांना-खालच्या जाती व वर्ग, शेतकरी, वांशिक, वांशिक, वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याक यांना औपचारिक नागरिकत्वाचे अधिकार प्रदान करण्याच्या प्रक्रियेत लोकशाही एक राजकीय गतिशीलता वाढवू शकते, ज्यात हे गट आपले हितसंबंध हक्कांचा विषय म्हणून संकल्पित करतात आणि राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात त्या हक्कांचे समाधान करण्यासाठी त्याच प्रकारे आक्रमक दृष्टिकोन बाळगतात. एकदा सुरू झालेल्या या राजकीय गतिशीलतेचे सामाजिक मानवी विकासासाठी महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात, कारण त्यामुळे सरकारी सेवांचा विस्तार आणि सुधारणा आणि त्या सेवांचा वापर वाढतो. प्रभावी लोकशाही शासनपद्धतीमुळे स्त्री-पुरुषांचे जीवनमान सर्वत्र उंचावते आणि अशा वातावरणात मानवी विकास होण्याची शक्यता अधिक असते. लोकशाहीला पाठिंबा दिल्यामुळे केवळ मूलभूत हक्कांनाच चालना मिळत नाही, तर अधिक सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध जागतिक क्षेत्र निर्माण होण्यास मदत होते, ज्यात समाज आपले राष्ट्रीय हितसंबंध पुढे नेऊ शकतात. याव्यतिरिक्त, लोकशाही हे एक राष्ट्रीय हित आहे जे इतर सर्वांना सुरक्षित करण्यास मदत करते. लोकशाही पद्धतीने शासित राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणे, आक्रमकतेला आळा घालणे, खुल्या बाजारपेठांचा विस्तार करणे, आर्थिक विकासाला चालना देणे, नागरिकांचे संरक्षण करणे, गुन्हेगारीचा मुकाबला करणे, मानवी व कामगारांचे हक्क अबाधित राखणे, मानवतावादी संकटे व निर्वासितांचा ओघ टाळणे, जागतिक पर्यावरण सुधारणे आणि मानवी आरोग्याचे रक्षण करणे हे अधिक संभवते.

लोकशाहीचा संबंध उच्च मानवी भांडवलसंचय, कमी महागाई, कमी राजकीय अस्थिरता आणि उच्च आर्थिक स्वातंत्र्य यांच्याशी आहे. शैक्षणिक संस्था तसेच आरोग्य सेवेच्या सुधारणेद्वारे लोकशाही, जसे की शैक्षणिक स्तर आणि आयुर्मान यासारख्या विकासाच्या आर्थिक स्त्रोतांशी निगडित आहे. गेल्या पाऊणशे शतकात मोठ्या संख्येने राष्ट्रांनी लोकशाहीकडे यशस्वी संक्रमण केले आहे. आणखी बरेच जण संक्रमणाच्या विविध टप्प्यांवर आहेत. जेव्हा लोक मुक्तपणे जगण्यास मोकळे होतील, तेव्हा ते अधिक आनंदी होतील. लोकशाही लोकांना समान अधिकार देऊ देते आणि संपूर्ण देशात समानता कायम राहील याची खात्री देते. त्यानंतर, हे त्यांना अशी कर्तव्ये देखील देते जे त्यांना चांगले नागरिक बनवते आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील महत्वाचे आहे.

आदर्शपणे, लोकशाही वातावरणात, हुकूमशाही राज्याच्या तुलनेत आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या चांगल्या संधी आहेत. दीर्घकाळापर्यंत शाश्वत विकासासाठीही लोकशाही महत्त्वपूर्ण आहे. लोकशाहीचा अर्थ केवळ निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन वैयक्तिक निवडी व्यक्त करणे असा होत नाही. देशात सरकार निवडण्यासाठी केवळ मतदान करणे नव्हे; हे सर्व सरकारी विकास प्रयत्नांमध्ये सहभागी प्रक्रियेबद्दल आहे. हे सामाजिक आणि संस्थात्मक परिवर्तनाबद्दल आहे, वैयक्तिक वाढ आणि कल्याण हे अविभाज्य घटक मानतात. मूल्यवान आणि आदरयुक्त जीवनाची सुधारित गुणवत्ता असणे हा मूलभूत अधिकार असला पाहिजे.

लोकशाहीशिवाय विकास शक्य नाही. लोकशाही हा विकासाचा एक घटक आहे आणि मानवी कल्याणासाठी दोन्ही आवश्यक पूर्व-अटी आहेत. विकास आणि लोकशाही यांच्यातील दृढ सहसंबंधातून आर्थिक विकास हा लोकशाहीला पोषक आहे, हे वास्तव प्रतिबिंबित होते. संशोधनात असे दिसून आले आहे की, एखाद्या देशावर लोकशाही पद्धतीने जितके जास्त काळ राज्य केले जाते, तितके ते आर्थिक कामगिरीसह विविध प्रकारच्या प्रशासन आणि विकास निर्देशकांमध्ये अधिक चांगली कामगिरी करते.


- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.: ८९७६५३३४०४



छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी जे विचार व्यक्त केले आणि त्याआधीसुद्धा वेळोवेळी त्यांनी महाराष्ट्राचे इतर महापुरुषांविषयी आणि खुद्द महाराष्ट्राविषयी जे विचार जाहीरपणे शासकीय समारंभात व्यक्त केले त्याविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेने तीव्र प्रतिक्रिया देणे स्वाभाविक होते. तरीदेखील इथल्या जनतेने संयम सोडलेला नाही. इथले लोक सडकेवर उतरले नाहीत. जनतेच्या संयमाचे कौतुक करत असतानाच त्यांच्या भावनांची परीक्षा घेण्याचे धास कुणी करू नये.

राज्यपालांनी एकदा नाही अनेकदा महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी अनुचित उद् गार काढले आहेत. यामागे त्यांचे खरे उद्दिष्ट काय हे माहीत नाही. सत्तेच्या सर्वोच्च आणि अतिशय सन्मानजनक पदावर बसलेल्या व्यक्तीने जनतेचा, जनतेच्या भावनांचा, त्यांच्या महापुरुषांचा आदर करावा ही कुणाची अपेक्षा नाही तर हे अशा उच्चपदस्थ सत्ताधाऱ्यांवर बंधनकारक असते. ही साधी गोष्ट अशा व्यक्तींना कळायला हवी.

इतक्या घटना घडत असताना देखील भाजपने याविषयी आजपर्यंत काहीच केले नाही. यामुळे भाजपला नेमके काय हवंय हे त्यांनी बोलून दाखवावे. लोक हिंसेवर उतारु होत नाहीत, होऊ नयेत पण यामुळेच तर भाजपची कोंडी होत आहे काय? या सगळ्या घटनांमागे भाजपचे कोणते कुटिल राजकारण तर नाही ना. जनतेने हिंसक निदर्शने करावी, जेणेकरून राज्यात शांतता भंग व्हावी आणि याचा राजकीय फायदा भाजपला मिळावा अशी तर या पक्षाची खेली नसावी! कारण वारंवार अशा घटना घडत असताना महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांचा विचार भाजप करत असल्याचे दिसत नाही. उल च त्यांचे नेते काही वेळा असे काही वक्तव्य देऊन जातात ज्यामुळे अधिकच शंका वाटू लागते.

दुसरे असे की महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. भोतिक, आर्थिक क्षेत्रातच नाही साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्राची स्थिती इतर राज्यांपेक्षाच नव्हे तर भारतभरचा जरी विचार केला तरी फार प्रगत आणि विकसित आहे. महाराष्ट्राची ही ख्याती, हे नावलौकिक इतर राज्यांना काही प्रमाणात का असेना पसंत नाही. उघडपणे कोणतेही भूमिका ते घेत नसले तरी छुप्या कारवाया नेहमी चालूच असतात. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वच जाती-धर्माचे लोक शांततेने एकमेकाशी सुसंवादाने वागत असतात. ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. आणि नेमके हेच इतर राज्यांना, विशेषतः जिथे जिथे भाजपचे सरकार आहे त्यांच्यासाठी चिंताजनक आणि दुःखदायक बाब आहे, असे वाटते. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादाला एक इतिहास आहे. वारंबार त्याची पुनरावृत्ती होत असते. पण ज्या वेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छ. शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपले विचार मांजले त्याच वेळी पुन्हा सीमावाद चव्हाट्यावर येण्यामागचे संदर्भसुद्धा शोधावे लागतील.

राज्यपाल म्हणतात की ते छ. शिवाजी महाराजांवर टीका करण्याचा विचार स्वप्नातसुद्धा मनात आणू शकत नाही. त्यांचे हे वक्तव्य खरे आहे. कारण कोणताही माणूस स्वप्नात जे करू शकत नाही ते प्रत्यक्षात करत असतो. त्यांनी छत्रपतींबद्दल आपले विचार स्वप्नात मांडले असते तर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नव्हते, पण त्यांनी जाहीरपणे एका समाजासमोर आपले विचार मांडले आहेत, झोपेत नाही. इतकेच नाही तर महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीसुद्धा त्यांना पाहवत नाही. म. ज्योतिबा फुले यांच्याविषयी देखील त्यांनी आपले विचार मांडले होते. हे सगळे स्वप्नात नव्हते पण स्वप्नातलीच इच्छा-आकांक्षा प्रत्यक्षात आणण्यासाठीचा खटाटोप आहे.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहने काही अनिवार्य बाबी निश्चित केल्या आहेत त्या नष्ट करू नये आणि काही गोष्टी निषिद्ध केल्या आहेत त्या करू नयेत आणि सीमा निश्चित केल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका आणि काहींच्या बाबतीत त्याने न सांगता मौन बाळगले आहे तुम्ही त्यांच्या भानगडीत जाऊ नका.'' (हदीस : मिश्कात)

माननीय अबु हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''दुर्बल 'मोमिन' (ईमानधारक) च्या तुलनेत शक्तिशाली 'मोमिन' उत्तम आणि अल्लाह अधिक पसंत आहे आणि दोघांमध्ये चांगुलपणा व लाभ आहे आणि तू (परलोकात) लाभ देणाऱ्या वस्तूचा लोभी बन आणि आपल्या संकटांत अल्लाहपाशी मदत माग आणि धैर्य खचू देऊ नकोस आणि तुझ्यावर एखादे संकट कोसळल्यास मी असे केले तर असे होईल असा विचार न करता, अल्लाहने माझ्या नशिबी जे लिहिले, जे त्याने इच्छिले ते केले, असा विचार कर; कारण 'ओठ' (कदाचित) शैतानाच्या अनुसरणाचे द्वार उघडतात.'' (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण : या हदीसच्या पहिल्या भागाचा अर्थ आहे की एक तर तो मोमिन (ईमानधारक) आहे जो शारीरिक आणि काळजीवाहक क्षमता बाळगणारा असेल तर निश्चितच जेव्हा तो आपली सर्व क्षमता अल्लाहच्या मार्गात खर्च करील तर 'दीन'चे (जीवनधर्माचे) काम त्याच्या हातून अधिक होईल त्या व्यक्तीच्या तुलनेत जो दुर्बल आहे, ज्याची शारीरिक क्षमता चांगली नाही अथवा काळजीवाहक नाही, तेव्हा अल्लाहच्या मार्गात तोदेखील आपल्या क्षमतांचा वापर करील मात्र तितके काम तो करू शकणार नाही जितके पहिल्या मनुष्य करतो. यासाठी त्याला दुसऱ्याच्या तुलनेत बक्षीस अधिक मिळाले पाहिजे. दोघेही एकाच मार्गाचे म्हणजेच अल्लाहच्या मार्गाचे प्रवासी आहेत म्हणून या दुर्बल 'मोमिन'ला कमी काम केल्यामुळे बक्षीसापासून वंचित केले जाणार नाही. खरे तर शक्ती बाळगणाऱ्या 'मोमिन'ला हे सांगण्याचा उद्देश असा की आपल्या शक्तीचा आदर करा, तिच्याद्वारे जितके पुढे जाऊ शकता तितके जा, दुर्बलता आल्यानंतर मनुष्य काही करू इच्छित असेल तरीही करू शकत नाही. आणि हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मोमिन आपल्या प्रकृती, उपाय व क्षमतेला सहारा बनवत नाही तर त्याच्यावर जेव्हा संकट कोसळते तेव्हा त्याच्या मनात विचार येतो की हे संकट माझ्या पालनकर्त्याकडून आले आहे, हा माझ्या सुधाराच्या प्रशिक्षणाचा एक भाग आहे. अशाप्रकारे हे संकट त्याचे ईमानात (अल्लाहवरील श्रद्धेत) वाढ करण्याचे माध्यम बनते.

आलाम-ए-रोज़गार को आसाॅ बना दिया

जो ग़म हुआ, उसे ग़म-ए-जानाॅ बना दिया

अर्थात : सांसारिक संकटांना सोपं बनविलं, जे दु:ख झालं, त्यास ईश्वराचं दु:ख बनविलं.

माननीय अबु सईद खुदरी यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''मी ऐशोआराम आणि निष्काळजीपणाचे जीवन कसे व्यतीत करू शकतो, जेव्हा इसराफील (अ.) (अंतिम निवाड्याच्या (कयामतच्या) दिवशी जो मृतात्म्यांना जागे करण्यासाठी सूर नावाची तुतारी फुंकणार आहे तो देवदूत.) सूर (तुतारी) हातात घेऊन, कान लावून, मान झुकवून वाट पाहात आहेत की केव्हा आदेश येतो सूर फुंकण्याचा? (अंतिम निवाड्याच्या दिवसाच्या तुतारीची हकीकत कोणाला कशी कळणार?)'' लोकांनी विचारले, ''हे अल्लाहचे पैगंबर (स.)! मग आमच्यासाठी तुमचा काय आदेश आहे?'' पैगंबर म्हणाले, ''याचे पठण करीत राहा- 'हसबुनल्लाहु व निअमल-वकील.' (अल्लाह आमच्यासाठी पुरेसा आहे आणि तो योग्य कार्य घडविणारा आणि देखरेख करणारा आहे.)'' (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण : लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांची अस्वस्थता आणि काळजी पाहून आणि अधिकच उद्विग्न झाले आणि विचारले, ''जर आपली ही स्थिती आहे तर आमची काय स्थिती होईल? सांगा, आम्ही काय करावे जेणेकरून त्या दिवशी सफल होऊ.'' पैगंबरांनी त्यांना सांगितले, ''अल्लाहवर विश्वास ठेवा, त्याच्या देखरेखीत जीवन व्यतीत करा, त्याच्या दासत्वात जीवन व्यतीत करणारे सफल होतील.''

माननीय इब्ने उमर यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''जर एखादा मनुष्य अंतिम निवाड्याच्या दिवशी आपल्या डोळयांनी पाहू इच्छित असेल तर त्याने या तीन सूरहचे पठण करावे- 'इज़श्शमसू कुव्विरत', 'व इज़स्समाउन फ़तरत' आणि 'इज़स्समाउन शक़्कत.' (या तीन्ही सूरहमध्ये अतिशय परिणामकारक पद्धतीने अंतिम निवाड्याच्या दिवसाचा आराखडा करण्यात आहे.) (हदीस : तिर्मिजी)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या आयतीचे पठण केले 'यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा' (त्या दिवशी जमीन आपल्या सर्व स्थितींचे विवरण करील) आणि सहाबा (रजि.) (पैगंबरांचे सहकारी) यांना विचारले, ''स्थितीचे विवरण करण्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय?'' लोकांनी म्हटले, ''अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांनाच त्याचे ज्ञान आहे.'' पैगंबर म्हणाले, ''जमीन अंतिम निवाड्याच्या दिवशी साक्ष देईल की अमुक पुरुष अथवा अमुक स्त्रीने माझ्या पाठीवर अमुक दिवशी आणि अमुक समयी सत्कर्म अथवा दुष्कर्म केले.'' हाच अर्थ आहे या आयतीचा. लोकांच्या या कर्मांना वरील आयतीत 'अख़्बार' म्हटले गेले आहे. (हदीस : तिर्मिजी)

संकलन 

सय्यद इफ्तिखार अहमद


 


(२) ...आणि त्याने सूर्य व चंद्राला एका कायद्याच्या आधीन केले. या साऱ्या व्यवस्थेतील प्रत्येक वस्तू एका ठरलेल्या वेळेसाठी चाललेली आहे आणि अल्लाहच या सर्व कार्याची तजवीज करीत आहे. तो निशाण्या उघड करून देतो कदाचित तुम्ही आपल्या पालनकत्र्याच्या भेटीचा विश्वास बाळगाल. 



४) येथे संबोधन त्या समाजाशी आहे जे अल्लाहच्या अस्तित्वाला नाकारत नव्हते. तोच निर्माणकर्ता आहे आणि सृष्टीव्यवस्था त्याच्याच हातात आहे, हे सर्व त्यांना मान्य होते. म्हणून वरील सत्यासाठी येथे प्रमाण देण्याची किंवा त्या लोकांपुढे ते प्रमाण ठेवण्याची आवश्यकता भासली नाही. आकाशांना कायम करणारा, सूर्य चंद्राला नियमबद्ध करून ठेवणारा एकमेव अल्लाह आहे, हे त्यांना मान्य होते. त्यांना एका दुसऱ्या गोष्टीचे प्रमाण येथे दाखविले गेले की अल्लाहशिवाय दुसरा कोणी सृष्टीव्यवस्थेत सत्ताधारी नाही आणि अल्लाहच एकमेव उपास्य आहे. जो मनुष्य अल्लाह निर्माणकर्ता आणि पालनकर्ता आहे, हे मान्यच करत नाही त्याच्यासाठी हे प्रमाण कसे लाभप्रद ठरेल? याचे उत्तर म्हणजे अल्लाह अनेकेश्वरवादींसमोर एकेश्वरत्वाला सिद्ध करण्यासाठी जे तर्क ठेवतो तेच तर्क नास्तिकांसमोर अल्लाहचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पर्याप्त् आहेत. एकमेव एकच एक ईश्वर असण्याचे पूर्ण तर्क या आधारावर आहे की सृष्टीव्यवस्था ही एक जबरदस्त नियमबद्ध व्यवस्था आहे. या सृष्टीत चहुकडे एक सर्वव्यापी सत्ता, एक दोषरहित तत्त्वदर्शिता आणि एका अचूक ज्ञानाच्या निशाण्या दिसतात. या निशाण्या ज्याप्रमाणे पुष्टी करतात की या सृष्टीव्यवस्थेचे अनेक शासक नाहीत की अनेक व्यवस्थापक नाहीत; त्याचप्रमाणे या गोष्टीचीही पुष्टी करतात की या व्यवस्थेचा एकच एक शासक (नियंता) आहे. व्यवस्थेची कल्पना एका व्यवस्थापकाविना, कायद्याची कल्पना एका शासकाविना तसेच तत्त्वदर्शितेची कल्पना एका तत्त्वदर्शीविना, ज्ञानाची कल्पना एका ज्ञानीविना आणि सर्वाहून महत्त्वाचे म्हणजे रचनेची कल्पना एका रचयित्याविना केवळ दुराग्रही मनुष्यच करु शकतो किंवा ज्याची बुद्धी भ्रष्ट झाली असेल तोच करू शकतो.

५) म्हणजे ही व्यवस्था एक सर्वव्यापी सत्तेचा एक शासक आहे याचीच साक्ष देत नाही आणि एक जबरदस्त तत्त्वदर्शिता त्यात कार्यरत आहे, तर याचे सर्व भाग आणि त्यात कार्यरत सर्व शक्ती याचीसुद्धा साक्ष देतात की या व्यवस्थेच्या सर्व वस्तू नश्वर आहेत. प्रत्येकासाठी एक समयसीमा निश्चित केली आहे ज्यांच्या अंतापर्यंत ती चालते, त्यानंतर ती नष्ट होते. हे सत्य सृष्टीव्यवस्थेच्या एक एक भागासाठी लागू आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण व्यवस्थेलासुद्धा लागू आहे. या प्रकृती जगताची संपूर्ण रचना हे सिद्ध करीत आहे की सृष्टीव्यवस्थासुद्धा शाश्वत नाही, हिच्यासाठीसुद्धा समयसीमा निश्चित केली गेली आहे. हे जग नष्ट होईल आणि त्या जागी दुसरे जग अस्तित्वात येईल, म्हणून कयामत (पुनरुत्थान) होण्याची खबर दिली गेली आहे. म्हणून प्रलय (कयामत) ज्याच्या येण्याची सूचना दिली आहे त्याचे येणे असंभव नाही तर न येणेच असंभव आहे.

६) म्हणजे त्या निशाण्या ज्यांच्या वास्तवतेची सूचना पैगंबर मुहम्मद (स.) देत आहेत ते सत्यावर आधारित आहेत. सृष्टीत चहुकडे त्यांच्याविषयी साक्ष देणाऱ्या निशाण्या उपलब्ध आहेत. लोकांनी डोळे उघडून पाहिले तर त्यांना दिसेल की कुरआनमध्ये ज्या गोष्टींवर ईमान धारण करण्यास सांगितले गेले आहे, त्याविषयीची पुष्टी धरती व आकाशातील अगणित निशाण्या देत आहेत.

७) वर सृष्टीच्या निशाण्या साक्षीसाठी समोर ठेवल्या आहेत. त्यांची साक्ष अगदी स्पष्ट आहे की या जगाचा निर्माणकर्ता आणि शासनकर्ता एकच आहे. परंतु मृत्यूनंतर दुसरे जीवन आणि अल्लाहच्या न्यायालयात माणसांची हजेरी लावणे तसेच मोबदला आणि शिक्षेविषयी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या सूचना या सर्वांचे सत्याधिष्ठित असण्याची साक्षसुद्धा त्याच निशाण्या देत आहेत. त्या अप्रत्यक्ष जरी असल्या तरी थोडा विचार केल्यास समजून येतात. म्हणून पहिल्या वास्तविकतेवर सचेत करण्याची आवश्यकता भासली नाही. कारण ऐकणारा केवळ प्रमाणांना एकूनच समजून घेतो की त्यापासून काय सिद्ध होते. म्हणून दुसऱ्या वास्तविकतेवर मुख्य रुपाने सचेत करण्यात आले आहे की आपल्या निर्माणकर्त्यांच्या भेटीचा विश्वास तुम्हाला याच निशाण्यांवर विचार करून होऊ शकतो. वरील निशाण्यामुळे परलोकाचे प्रमाण दोन प्रकारे मिळते. 

एक म्हणजे जेव्हा आम्ही आकाशांची रचना आणि सूर्य व चंद्राच्या नियमबद्धतेवर विचार करतो तेव्हा आपले मन ग्वाही देते की ज्या अल्लाहने हे विशाल नभोमंळल बनविले आहे आणि ज्याच्या  

सामर्थ्याने मोठमोठे ग्रह नभोमंळलात भ्रमण करीत आहेत, त्याच्यासाठी मनुष्याला मृत्यूनंतर दुसऱ्यांदा जन्माला घालणे काहीच कठीण काम नाही. दुसरे म्हणजे याच नभोमंळलातील व्यवस्थेत आम्हाला साक्ष मिळते की याचा निर्माणकर्ता उत्तम तत्त्वदर्शी आहे. त्याच्या तत्त्वदर्शीपणाविरुद्ध आहे की त्याने मनुष्याला बुद्धी, चेतना आणि असा सजीव अधिकारी बनवून, मनुष्याला आपल्या धरतीवरील अगणित वस्तूंचा उपभोग घेण्याची शक्ती देऊन आणि निर्माणकर्ता प्रभु-स्वामीने मनुष्याच्या जीवनव्यवहाराचा हिशेब घेऊ नये आणि अत्याचारींना शिक्षा व सदाचारींना मोबदला देऊ नये? तो तर जरूर मनुष्याला विचारेल की ज्या मूल्यवान वस्तू त्याने मनुष्याच्या स्वाधीन केल्या, त्यांच्याशी त्याने कसा व्यवहार केला? एक आंधळा राजा आपल्या राज्याच्या मामल्यास आपल्या सहकाऱ्यांच्या हवाली करून निश्चिंत होऊ शकतो परंतु एक सर्वज्ञानी आणि तत्त्वदर्शीपासून अशा निष्काळजीपणाची आशा केली जाऊ शकत नाही. अशाप्रकारे आकाशांचे निरीक्षण आम्हाला केवळ परलोकवर विश्वास ठेवायास भाग पाडत नाही तर परलोक असण्यावर विश्वास दृढ करण्यास भाग पाडते.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget