Halloween Costume ideas 2015
Latest Post

मुंबई
पालघर प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात पालघरमधील घटनेसंदर्भात स्पष्टीकरण द्यावे, असे नोटिसीत म्हटलंय. लॉकडाऊनच्या परिस्थितीत पोलिसांच्या उपस्थितीत जमावानं एखाद्याला ठेचू मारावं हे भयानक कृत्य असल्याचे सांगत मानवअधिकार आयोगाने ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणातील संबंधितांवर काय कारवाई केली ? कुणाला काय दिलासा दिला ? याचा तपशील चार आठवड्यात सादर करण्याचे पोलीस महासंचालकांना निर्देश देण्यात आले आहेत.
चोर असल्याच्या अफवेतून प्रवास करणाऱ्या तिघांची जमावाने निर्घृण हत्या केली. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला होता. यात दोन साधूंसह एका चालकाचा समावेश होता. जामावाने तिघांवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला असून याप्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यात 16 एप्रिल रोजी दोन साधूंसह तिघांना जमावाने मारहाण केली होती. या प्रकरणात शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. पालघर प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी व्हावी, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. राज्य सरकारने या प्रकरणाचा अहवाल तयार करून सविस्तर माहिती द्यावी, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांप्रदायिक अफवा पसरवणाऱ्यावर सरकार नजर ठेवून आहे. या प्रकरणाचे राजकारण होता कामा नये. कोणीही समाजात तेढ निर्माण करमारी माहिती पसरवू नका, अशे गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करून म्हटले आहे.
पालघरमध्ये नमकं काय घटलं ?
डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर असल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना मागील आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी 110 जणांना अटक केली आहे. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाला. या हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (वय-30) चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय-70 रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (वय-30) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई
 संपूर्ण देश सध्या कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. दरम्यान, आपल्याकडे आता कोरोनाबाधितांचा आकडा जरी मोठ्या प्रमाणात वाढत असला तरीही आपल्या देशासाठी तसेच राज्यासाठी देखील एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या आज (२१ एप्रिल) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या १४ दिवसांमध्ये देशातील तब्बल २३ राज्यांतील ६१ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. यात महाराष्ट्रासाठी विशेष बाब अशी की, या एकूण ६१ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यांचा समावेश होतो.
राज्यातील लातूरसह उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या ४ जिल्ह्यांमध्ये तब्बल गेल्या १४ दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. निश्चितच देशासह राज्यासाठी ही एक सकारात्मक बाब आहे. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीच्या काळात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र, त्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक दक्ष झाल्यानंतर गेल्या १४ दिवसांत या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्यामुळे या जिल्ह्यांना निश्चितच फायदा झाला आहे.
देशात कोरोनाबाधितांचा आकडा आता १८ हजारांच्याही पुढे गेला आहे. तर आत्तापर्यंत ३२५२ कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाले आहेत. रोज रुग्णालयातून रुग्ण बरे होऊन घरी जाताना दिसत आहेतच. मात्र, सोमवारी (२० एप्रिल) एकूण ७०५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आत्तपर्यंत एकाच दिवशी इतके रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामूळे जरी कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी मोठ्या संख्येने लोक बरे होऊन आपल्या घरी जात असल्याचे मोठे समाधानही व्यक्त केले जात आहे.

मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता लॉक डाऊन करण्यात आलं आहे. परंतु २० तारखेपासून राज्यातील काही भागात सशर्त सूट देण्यात आली आहे. मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगरच्या काही भागात उद्योगांना सशर्त परवानगी देण्यात आली होती.
परंतु सरकारच्या सूचनांच योग्य पालन होत नाही त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर भागातील शिथिलता रद्द करून पुन्हा संपूर्ण लॉक डाऊन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाकडून देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी #लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द; लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे-प्रशासनाला निर्देश
२० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही व्यक्त केली होती नाराजी,निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द करण्याचा दिला होता इशारा
लॉकडाऊन संदर्भात शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली. १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर,पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.
ई-कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येणार. फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हे मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहणार
#lockdown  बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील तसेच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचे आहे
राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील, मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंधच राहणार

Social Media
मुंबई
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात २५१ गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या २५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र आहेत.
त्यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण २०, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली ११, नाशिक ग्रामीण १०, नाशिक शहर १०, जालना ९, सातारा ८, नांदेड ८, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ५, ठाणे ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, हिंगोली ३, रायगड २, वाशिम १, धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११२ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ८७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब ) गैरवापर केल्या प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ५० आरोपींना अटक केली आहे, तर यापैकी ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स टेक डाऊन करण्यात यश आले आहे.

धुळे शहर
काल धुळे शहरामध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, सदर गुन्ह्यातील आरोपीने सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन सदर विषाणूचा प्रसार एका धर्माचेच लोक करत आहेत या आशयाचा मजकूर असणाऱ्या पोस्ट्स फेसबुकवर टाकल्या. यामुळे परिसरातील शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता होती.

पुणे ग्रामीण
पुणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये काल एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे पुणे ग्रामीण जिल्ह्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या २० वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींनी व्हाट्सअप ग्रुपवरून व आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर कोरोनाबाधित व्यक्तींबद्दल चुकीची माहिती पाठवून अफवा पसरविली होती.

माहितीची सत्यता पडताळावी
कोरोना महामारीच्या संबंधित कोणत्याही माहितीची, सरकारी माहितीसोबत सत्यता पडताळून बघितल्याशिवाय कोणाला तोंडी किंवा लिखित स्वरूपात किंवा सोशल मीडियावर (फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअप इत्यादी) शेअर करू नये. अशा खोट्या व चुकीच्या पोस्ट्स, फॉरवर्ड मेसेजेस, फोटोज किंवा व्हिडिओ पाठविणाऱ्यांवर सरकारी आदेशांचे व नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. जर कोणी या कोरोना महामारीबाबत खोटी किंवा चुकीची माहिती, मेसेजेस, फोटोज, व्हिडिओ तुम्हाला पाठवत असतील तर त्याबाबत तुम्ही तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकता. तसेच या गुन्ह्याची माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website ) पण द्यावी.
महाराष्ट्र सायबर सर्व नागिरकांना आवाहन करते की कृपया कोणीही अफवा व खोट्या बातम्या समाज माध्यमांवर पसरवू नयेत, व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर मार्फत करण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात आज कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ५२१८ झाली आहे. १५० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७२२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४२४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात १९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २५१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १२, पुण्यातील ३, ठाणे मनपामधील २ तर सांगली येथील १ आणि पिंपरी चिंचवड येथील १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १० पुरुष तर ९ महिला आहेत. त्यात ६० वर्षे किंवा त्यावरील ९ रुग्ण आहेत तर ९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर १ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या १९ मृत्यूंपैकी १२ रुग्णांमध्ये ( ६३ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: ३४५१ (१५१)
ठाणे: २२ (२)
ठाणे मनपा: १५० (४)
नवी मुंबई मनपा: ९४ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: ९३ (२)
उल्हासनगर मनपा: १
भिवंडी निजामपूर मनपा: ६
मीरा भाईंदर मनपा: ८१ (२)
पालघर: १८ (१)
वसई विरार मनपा: १११ (३)
रायगड: १६
पनवेल मनपा: ३४ (१)
ठाणे मंडळ एकूण: ४०७७ (१६९)
नाशिक: ४
नाशिक मनपा: ६
मालेगाव मनपा: ८५ (८)
अहमदनगर: २१ (२)
अहमदनगर मनपा: ८
धुळे: २ (१)
धुळे मनपा: २
जळगाव: १
जळगाव मनपा: २ (१)
नंदूरबार: ४
नाशिक मंडळ एकूण: १३५ (१२)
पुणे: १९ (१)
पुणे मनपा: ६४६ (५२)
पिंपरी चिंचवड मनपा: ५१ (२)
सोलापूर: ०
सोलापूर मनपा: २५ (२)
सातारा: १३ (२)
पुणे मंडळ एकूण: ७५४ (५९)
कोल्हापूर: ६
कोल्हापूर मनपा: ३
सांगली: २६
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: १
रत्नागिरी: ८ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)
औरंगाबाद:१
औरंगाबाद मनपा: ३४ (३)
जालना: १
हिंगोली: १
परभणी: ०
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ३८ (३)
लातूर: ८
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ०
लातूर मंडळ एकूण: १२
अकोला: ७ (१)
अकोला मनपा: ९
अमरावती: ०
अमरावती मनपा: ६ (१)
यवतमाळ: १६
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: ६० (३)
नागपूर: ३
नागपूर मनपा: ७६ (१)
वर्धा: ०
भंडारा: ०
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ८२ (१)
इतर राज्ये: १५ (२)
एकूण: ५२१८ (२५१)

(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा / मनपांनी उपलब्ध करुन दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत. आज मुंबई मनपा क्षेत्रात प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या १७ एप्रिलपासूनच्या अहवालातील रुग्णांचा समावेश करण्यात आलेला आहे.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ४३२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ६६११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २६.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

रिजवानूर रहमान खान (अध्यक्ष जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र)


मुंबई, २० एप्रिल 
 महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तीन जणांच्या जमावबंदीमुळे निर्माण झालेला सांप्रदायिक तणाव हा निषेधार्ह व निंदनीय आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करणार्या सरकारच्या त्वरित कृतीचे आम्ही स्वागत करतो.  जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अध्यक्ष रिज़वान-उर-रहमान खान म्हणाले की, या प्रकरणातील १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या कृत्याबद्दल आम्ही त्यांचेही कौतुक करतो. ते म्हणाले की, ही एक दुर्दैवी घटना होती. माननीय खान म्हणाले की, “केंद्रात भाजपा नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मॉब लिंचिंगमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे आणि कमीतकमी या द्वेषपूर्ण मानसिकतेचा परिणाम झाला होता. "मी राज्यातील महा विकास आघाडी सरकारला विनंती करतो की, समाजात किंवा मीडियामध्ये असो की सोशल मीडियावर या हेट मॉन्गर्सचा शोध घ्यावा, त्यांना द्वेष आणि वैर भावना पसरविण्याची आणि कायदा हातात घेणयाची शिक्षा द्या."

Abdul Malbari
सूरत (गुजरात)
गुजरातमधील सुरतचे अब्दुल मलबरी सध्या अनेक कुटुंबांचा आधार बनले आहेत. कोणत्याही जाती-धर्माच्या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असेल तरी अब्दुल तिचे अंत्यसंस्कार करतात. त्यांनी हे काम स्वीकारलं आहे, कारण संसर्गाच्या भीतीनं कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या जवळ त्यांच्या घरचे जाऊ शकत नाहीत.
५१ वर्षीय अब्दुल मलबरी गेल्या ३० वर्षांपासून कोणीही ताब्यात न घेतलेल्या, बेवारस अशा व्यक्तींच्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करतात. रस्त्यावर राहाणारे भिकारी, आत्महत्या केलेले लोक, ज्यांना जवळचं कोणी नाही अशा लोकांना सन्मानाने या जगातून निरोप देण्याचं काम ते करतात. केदारनाथचा पूर, कच्छमधला भूकंप किंवा त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळेसही मृतदेहांचे अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांच्यासोबत आता ३५ कार्यकर्ते काम करतात.
सुरतमधल्या कोरोनाबाधितांच्या केसेस वाढल्यानंतर सुरत महानगरपालिकेने अब्दुल मलबारी आणि त्यांच्या स्वयंसेवकांना संपर्क केला. जगभरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूच्या आकड्याने त्यांना चिंतेत टाकलं होतं. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह त्यांच्या परिवाराच्या स्वाधीन करता येत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधित मृतदेहांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीत जाऊन करण्याची त्यांना विनंती केली आणि अब्दुल यांनी त्यास होकार दिला.
अब्दुल मलबारी यांना मनपा अधिकाNयांचा मदतीचा फोन येताच १५ ते २० मिनिटात ते हॉस्पिटलमध्ये पोहचतात. मृत व्यक्तीवर अग्नीसंस्कार झाल्यानंतर किंवा त्यांचा दफनविधी झाल्यानंतर अब्दुल यांची टीम ते स्मशान किंवा दफनभूमी पूर्णपणे डिसइन्फेक्ट करतात. अब्दुल यांनी आपली २० जणांची टीम तयार केली आहे. कोरोनाबाधित व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणती काळजी घेण्यात यावी, पीपीई किट कसं वापरावं यासाठी त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आलंय. त्यांनी आपले कॉन्टॅक्ट नंबर्स सगळ्या महत्त्वाच्या अधिकाNयांना आणि सरकारी दवाखान्यांना दिले. त्यांना कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची सूचना मिळाली की ते लगेच आपलं किट घेऊन कामाला लागतात. या सगळ्यात सरकार, पोलीस, फायर ब्रिगेड आणि सॅनिटाईजिंग टीमचंही सहकार्य त्यांना मिळतं.
हे सर्व करीत असताना आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वत: व आपल्या टीमची काळजी घेतात. त्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’च्या सगळ्या सूचनांचे पालन केले जाते. ते बॉडीसुट, मास्क आणि ग्लोव्हज घातल्याशिवाय बाहेर पडत नाही. मृतदेहावर रसायनं फवारली जातात आणि त्याला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलं जातं. अब्दुल यांच्याकडे ५ शववाहिका आहेत ज्यातल्या २ फक्त कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृत्यूनंतर वापरल्या जातात. त्या नियमितपणे सॅनिटाईज केल्या जातात. मृतदेहाला हॉस्पिटलमधून ताब्यात घेतल्यापासून ते त्याचा अंत्यविधी होईपर्यंत अब्दुल आणि त्यांचे सहकारी प्रोटेक्टिव्ह कीट वापरतात.
आयुष्यात वाईट अवस्थेतले कित्येक मृतदेह पाहिले. पण ही परिस्थिती त्याहूनही वाईट आहे. जवळचे नातेवाईक रडतात, आमच्या माणसाला शेवटचं पाहू द्या म्हणून विनंती करतात आणि कोणीच काही करू शकत नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना लांब ठेवणं गरजेचं असतं. अब्दुल मलबारी त्यांना आश्वासन देतात, की अंतिम संस्कार तुमच्या धर्माप्रमाणेच होतील, सगळे विधी पार पाडले जातील, कशातही कसूर राहणार नाही.
अब्दुल कोरोनाबाधित व्यक्तींचे अंत्यसंस्कार करतात हे कळाल्यानंतर अनेक जण त्यांच्याशी पूर्वीसारखे वागत नाही, पण त्याने आपल्याला काही फरक पडत नसल्याचं ते स्पष्ट करतात.
 
सौजन्य-
(बीबीसी न्यूज गुजराती)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget