Halloween Costume ideas 2015
Latest Post

‘सामाजिक समतेचा प्रवाह’ या प्रा. बेन्नूर स्मृतीग्रंथाचे प्रकाशन : अरफा

 

मुंबई-
स्वत:च्या विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे. शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो. समाज सुसंस्कृत होतो म्हणून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेण्यासाठी मुस्लिम  समाजातील मुलांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे॰ गरिबी असली तरी शिक्षण अर्धवट सोडू नका, विज्ञानयुगामध्ये शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. समाजाच्या विकासासाठी शिक्षण  आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी मंत्री, राष्ट्रीय प्रवत्तेâ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलीक यांनी केले.
बीड मायनॉरिटी वेल्फेअर ट्रस्ट मुंबईच्या वतीने मदरसा अन्वरुल कुरआन, कुर्ला येथे २३ जानेवारी २०१९ रोजी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या कलाहुणांना चालना देण्यासाठी आणि  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्या प्रसंगी नवाब मलीक बोलत होते.
ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य के. ए. सय्यद सर यांच्या अथक परिश्रमाने कुर्ला जागृतीनगर परिसरातील गोरगरीब समाजाबरोबरच मुस्लिम समाजासाठी माता  सावित्री / फातिमा सार्वजनिक वाचनालयाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सय्यद सर म्हणाले, वाचनाने मस्तक सुधारते, ते  कोणापुढेही नतमस्तक होत नाही. वयाला हरवायचे असेल तर वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. वाचनामुळे जीवनात मौज आहे. नाही तर समस्या रोज आहेत. सय्यद सरांनी  विद्यार्थ्यांना वाचनाचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची गरज आहे. मुलींनीसुद्धा चांगल्या पद्धीतने शिक्षण घेऊन जुन्या चालीरिती दूर केल्या पाहिजेत. समाजाची शिक्षश्रणाची टक्केवारी वाढविली  पाहिजे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या विशेष अतिथी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्य मुनिसा आबेदी यांनी केले. पाहुणे आणि ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद सर, पदाधिकारी अस्लम पठाण, गणी सय्यद, करीम शेख यांच्या हस्ते ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नाईट हायस्कूल एज्य. कॉलेजचे प्राचार्य सुनिल पाटील, शकूर सय्यद, लियाकत भाई, अकबर खान, मुख्तार सय्यद, राजूभाई, मिलिंद केदारे यांचे अनमोल  सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नसीम खान यांनी केले तर एजाज सय्यद यांनी उपस्थितांचे आभार मानले.

उदगीर :
उदगीर तालुक्यात अन्न सुरक्षा आयोगाअंतर्गत अनेक लाभधारकांना शिधा (राशन) मिळत नाहीत तसेच मंजूर कोट्यातूनही राशन कमी मिळण्याच्या तक्रारीत वाढ झाली आह़े पीडित  लाभधारक तहसील कार्यालयात वारंवार जाऊनदेखील त्यांना कोणी दाद घेत नाहीत, त्यांच्या तक्रारींचे निवारण होत नसल्याने मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीच्या वतीने उदगीर येथे  ‘अन्नाचा अधिकारजगण्याचा अधिकार’ या शिर्षकाखाली आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आल़े.
आंदोलन उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाल़े आंदोलनात विविध राजकीय, सामाजिक संघटना, पक्षांचा समावेश होत़ा यावेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राजकुमार अतनुरे  म्हणाले, राशन हा गरीबांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहि़जे महागाईने जगणे दुभर केले आह़े त्यात राशन मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आह़े प्रशासनाने हा प्रश्न  ऐरणीवर आणून लाभधारकांना राशन उपलब्ध करून द्याव़े राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील म्हणाले, राशनकार्ड काढण्यासाठीच्या अटीही सुलभ कराव्या़त उपजिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष  देऊन उदगीर तालुक्यातील राशनधारकांचे प्रश्न मार्गी लावावे़त कुठलाही गरीब यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्याव़ी आज जवळपास ५०० नागरिकांनी तक्रार अर्ज दिले आहे़त  त्याचा तात्काळ निपटारा करावा, अशी मागणीही त्यांनी केल़ी यावेळी शेख समीर हाश्मी, अजीज अहमद सरवर म्हणाले, एमपजीजे गरीब लोकांना हक्क देण्यासाठी वारंवार आंदोलन  करीत आह़े आंदोलनस्थळी खाजोद्दीन शेख, बिस्मील्लाबी शेख, भालचंद्र, नागशे, सुंदरबाई कांबळे, मतीन शेख आदींस ६०० नागरिकांनी नवीन फार्म भरल़े
यावेळी मौलाना रहेमान, मौलाना फारूख, मौलाना जियाओद्दीन, मौलाना अजीज पटेल, फारूकी रफियोद्दीन, फारूक चाऊस, ड़ॉअजगर, शमशोद्दीन जरगर शेख, हिसामोद्दीन सर, कदम  सर, नागसेन भदंत, जकी पटेल, एमपीजे जिल्हाध्यक्ष वसी हाश्मी, शेख मुंतजीब आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होत़ी उपजिल्हाधिकारी यांनी मागण्यांचे निवेदन घेतल़े  यावेळी त्यांना सांगितले की, तालुक्यात राशन धारक कुटुंबातील सर्व सदस्यांचे थंब फक्त १० टक्केच पूर्ण झाले आहे़त अजून हजारो कुटुंब यापासून वंचित आहे़त २९ जानेवारी त्याचा  अंतिम दिनांक होत़ा याची दखल घेत त्यांनी एक महिना अवधी वाढवित असल्याचे जाहीर केल़े. निवेदनात म्हटले की, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आयोग अधिनियमांतर्गत गरीब लोकांसाठी  अन्न सुरक्षा एक अधिकार आह़े मात्र या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाह़ी कायद्यांतर्गत अन्न सुरक्षा सुविधेपासून एकही गरीब आणि दुर्बल व्यक्ती वंचित राहता कामा  नय़े ए़नप़ीए़स अंतर्गत १ कोटीहून अधिक प्राप्त लाभधारक प़ीड़ीए़स प्रणालीतील तांत्रिक त्रुटीमुळे शिधा (राशन) वाटप दुकांनातून शिधा प्राप्त करण्यास असमर्थ आहे़त जोपर्यंत शेवटच्या  व्यक्तीच्या प़ीड़ीए़समध्ये यशस्वीरित्या नोंदणी केली जात नाही तोपर्यंत एकाही पात्र लाभार्थ्याला खाद्य सुरक्षेपासून वंचित केले जाऊ नय़े कुटुंबप्रमुखाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजार  रूपयांवरून १ लाख रूपये करण्यात याव़े तसेच राज्यभरता अन्न सुरक्षा योजनेत ऑक्टोबर २०१४ पासून राशन पासून वंचित करण्यात आलेल्या एप़ीए़ल केसी कार्डधारकांचा  पुन्हा समावेश करण्यात याव़ा.

बुरखा म्हणजे काय व कशासाठी? हे जाणून घेणे आवश्यक आह़े बुरखा प्रयोजनामागील भूमिका जाणून घेतल्याशिवाय त्याचे फायदे व तोटे लक्षात येणार नाही़त ते समजून घेतल्यानंतर  आम्हाला कोणत्या दिशेने प्रगती करावयाची आहे, हे निश्चित करता येईल व बुरखा प्रगतीस अडथळा निर्माण करतो किंवा नाही याबद्दल निर्णय देता येई़ल॰ ‘हिजाब’ या अरबी शब्दाचे  उर्दू भाषांतर ‘परदा’ असे करण्यात आले आह़े ‘हिजाब’ हा शब्द कुरआनोक्तीतून घेण्यात आला आह़े त्या आयतीत अल्लाहने पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांच्या घरात नि:संकोचपणे ये-जा  करणाऱ्यांना मनाई केल़ी घरातील महिलांकडून काही हवे असेल तर ते पडद्याआडून मागावे, असे आदेश देण्यात आल़े याच आदेशाच्या अनुषंगाने बुरखापद्धत अस्तित्वात आल़ी तद्नंतर  बुरख्यासंबंधात आलेल्या इतर आदेशांना बुरख्याचे आदेश (अहकामे हिजाब) असे संबोधण्यात आल़े बुरखाबाबतच्या आदेशाचें तपशीलवार वर्णन कुरआनच्या चोवीस व तेहतीस या दोन  अध्यायात (सूरहमध्ये) दिले गेले आह़े ज्यात म्हटले आहे, ‘‘ महिलांनी आपल्या घरात मोकळेपणाने व थाटाने वावराव़े इस्लाम धर्माच्या प्रसारापूर्वीच असभ्य राहणीमान सोडून द्यावे व  नटून सजून आपल्या सौंदर्याचे सर्वत्र प्रदर्शन करत फिरू नय़े घराबाहेर जाताना डोक्यावर एक चादर पांघराव़ी ज्या दागिन्याचे मधुरनाद (ध्वनि) निर्माण होत असल असे दागिने काढून  ठेवावे़त घरातील सदस्यांसमोर वावरताना विशेष खबरदारी बाळगाव़ी ज्यांच्याशी विवाह करता येतो (गैरमहरम) अशा नातेवाईकांसमोर शृंगार करून जाण्याचे टाळाव़े घरातील आप्तजना  (महरम) समोर जातानासुद्धा आपल्या वक्षस्थळावर ओढनी (दुपट्टा) पांघरून आपले संपूर्ण शरीर आच्छादित होईल असे वस्त्र धारण कराव़े’’ पुरूषांना आदेश देण्यात आले आहेत, ‘‘त्यांनी  आपल्या आयाबहिणींच्या खोलीत जाताना परवानगी द्यावी जेणेकरून अचानक प्रवेशाने बेसावध बसलेल्या महिलांवर खजील होण्याची पाळी येणार नाह़ी’’ यालाच ‘परदा’ (बुरखापद्धत) म्हणता़त॰ पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी याबाबत अधिक खुलासा करताना म्हटले आहे, ‘‘स्त्रियांनो, आपल्या सख्ख्या भावा व वडिलांसमोर जातानासुद्ध चेहरा, हाताचा पंजा व  घोट्यापर्यंत पायाव्यतिरिक्त संपूर्ण शरीर वस्त्राने आच्छादित करूनच जाव़े असे पारदर्शक व घट्ट वस्त्र धारण करू नये की ज्यातून शरीर प्रदर्शन घडेल, तसेच आपल्या घरातील  आप्तजनां (महरम) शिवाय इतर कोणत्याही नात्याच्या पुरूषासोबत एकांतात बसू नय़े’’ पैगंबरांनी स्त्रियांना सुगंध (अत्तर वगैरे) लावून घराबाहेर जाण्याबाबतही मनाई केलेली आह़े  मस्जिदीत महिलांना नमाज पढण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले होत़े एकाच रांगेत स्त्री- पुरूषांनी नमाज अदा करण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे नमाज  अदा झाल्यानंतर महिला निघून जाईपर्यंत पैगंबर मुहम्मद (सल़्ल) व इतर मुस्लिम पुरूष मस्जिदीत आपल्या बसल्या ठिकाणावरून उठत नस़त या आदेशाची कुरआनातील सूरह  (अध्याय) नूर व अहजाब आणि पैगंबराच्या आदेशा (अहादीस)मध्ये पडताळणी करता येई़ल बुरख्यामध्ये हल्ली बरीच विविधता दिसून येत़े मात्र बुरख्याबाबतच्या मूळ तत्त्वात व  उद्देशांत फरक झालेला नाह़ी मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही, मात्र मला सांगावेसे वाटते की जे लोक सांगतात की ‘बुरखा आमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करतो,’ ते  दुंतोडीपणाचे धोरण प्रगट करीत आहे़त त्यांचे वक्तव्य अल्लाह व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांच्या विरोधात आह़े दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार, अल्लाह
व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी आमच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण केले आहे़त खरोखर आम्ही जर अशा प्रकारचे विचार बाळगत असू तर आम्ही स्वत:ला मुस्लिम कसे  मानावे?
ज्या अल्लाह व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असा अन्याय केला आहे ते त्यांच्यापासून पूर्णत: अलिप्त का होत नाहीत? अल्लाह व पैगंबर मुहम्मद (सल़्ल) यांनी बुरख्याचा आदेश  दिलेलाच नाही, असे म्हणताच येणार नाह़ी मी आताच सांगितले आहे की, ज्याची इच्छा असेल त्याने कुरआन वा हदीसचे अध्ययन करू शंकासमाधान करून घ्याव़े एखाद्यास हदीसच्या  अध्ययनाने समाधान होत नसेल तर त्यांनी कुरआनचे आदेश पडताळून पाहावे़त बुरखा पद्धतीबाबत थोडे बारकाईने अभ्यास केल्यास तीन महत्त्वाचे उद्देश लक्षात येती़ल
(१) पुरूष व स्त्रियांच्या चारित्र्यांचे रक्षण करण्यात यावे व अशा दुर्वर्तनांपासून त्यांना अलिप्त ठेवावे, जे स्त्री-पुरूषांच्या स्वैर सहजीवनामुळे निर्माण होता़त
(२) स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात याव़े नैसर्गिकरित्या जी कर्तव्ये स्त्रियांनी पार पाडावयाची आहेत ती त्यांनी निश्चितपणे पार पाडावीत व ज्या जबाबदाऱ्या पुरूषांच्या वाट्यास  येतात त्या त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण कराव्या़त
(३) कुटुंबव्यवस्था मजबूत व सुरक्षित कराव़ी कुटुंबव्यवस्था जीवनाच्या इतर व्यवस्थांपेक्षा अधिक महत्त्वाची बाब आह़े बिनबुरख्याच्या कुटुंबव्यवस्थेने महिलांना कुटुंबात गुलामांचा दर्जा प्राप्त झाला आह़े त्या सर्व प्रकारच्या हक्कांपासून वंचित झाल्या आहे़त तसेच ज्यांनी महिलांना त्यांचे हक्क तर दिले आहेत मात्र बुरख्याच्या बंधनातून मुक्त ठेवले आह़े, अशा कुटुंबाची  व्यवस्था अस्तव्यस्त झाली आह़े इस्लाम स्त्रियांना सर्व अधिकारसुद्ध देऊ पाहतो, त्याचबरोबरच घरातील व्यवस्थाही सुरक्षित ठेवू इच्छित़ो हे केवळ बुरखापद्धतीचा अवलंब केल्यानेच  शक्य होऊ शकत़े मी आपणांस विनंती करते की आपण कृपया उपरोक्त तीन उद्देशांवर शांतपणे विचार कराव़ा चारित्र्यरक्षणाचा समस्येबाबत जर कोणी उदासीन असेल तर त्यांच्या  बाबतीत मी काही करू शकत नाह़ी जे चारित्र्याबाबत गंभीर आहेत त्यांनी विचार करायला हवा की ज्या समाजात स्त्रिया नटून थटून-स्वैराचरण करत असतील व पुरूषांसोबत सर्वच  क्षेत्रात एकत्र काम करीत असतील तर तेथील लोकांचे चारित्र्य कसे व कुठवर सुरक्षित राहू शकेल? आपल्या देशात जसजशी स्वैराचारी परिस्थिती निर्माण होत आहे तसतशी लैंगिक  अपराधांची संख्या वाढत चालली आह़े त्याबाबत वर्तमानपत्रात आपण रोजच वाचत असत़ो बुरखा पद्धतच लैंगिक अपराधाचे मूळ कारण आहे, तसेच बुरखा न राहिल्यास लोकांमधील  स्त्रियांबद्दल कुतूहल व आकर्षण आपोआप कमी होईल, असे म्हणणे व मानणे साफ चुकीचे आह़े ज्या काळात बुरखा पद्धत नव्हती त्या काळातसुद्धा लैंगिक आकर्षण कमी झाले नव्हत़े  त्यांच्या वासनासक्तीने चरमसीमा गाठली होत़ी नम्रतेने समाधान होत नव्हते, म्हणून उघडपणे कामक्रीडा होऊ लाली व आता तर लैंगिकसंबंधाचे परवाने देऊन ही वासनात्मक भूक शमण्याचे चिन्ह दिसत नाह़ी अमेरिका, इंग्लंड व इतर देशांच्या वर्तमानपत्रात अनेक लैंगिक अपराधांबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत असता़त ही समाधानकारक परिस्थिती मानली जाईल  काय?
ही केवळ वैयक्तिक चारित्र्यची समस्या नसून संपूर्ण सामाजिक संस्कृतीचा प्रश्न बनला आह़े समाजात सहजीवनाची प्रथा जितकी जास्त वाढत आहे तितकाच जास्त स्त्रियांच्या शृंगारिक प्रसाधनाचा खर्च वाढत जात आह़े हा वाढता खर्च काबाडकष्ट करून मिळालेल्या रास्त कमाईने पुरा होत नाही म्हणून लाच, अफरातफर व इतर भ्रष्टाचाराने वाढता खर्च पूरा केला जात  आह़े त्यामुळे पूर्ण समाज पोखरला जात आह़े कोणत्याच कायद्याची योग्यरित्या अंमलबजावणी होऊ शकते नाह़ी जे लोक आपल्या स्वत:च्या इच्छांवर ताबा ठेवू शकत नाहीत ते  दुसऱ्यावर शिस्तीचे नियम कसे लागू करू शकतील? जो आपल्याच कौटुंबिक जीवनात विश्वासपात्र नसेल तो समाज व देशाशी एकनिष्ठ कसा राहू शकेल?
स्त्री-पुरूषांचे कार्यक्षेत्र वेगळे असावे ही एक नैसर्गिक व्यवस्था आह़े स्त्रीला मातृत्वपद देऊन तिचे कार्यक्षेत्र दाखवून देण्यात आले आह़े पुरूषाला पितृत्वाचा अधिकार देऊन इतर जबाबदाऱ्या  त्याच्यावर सोपविण्यात आल्या आहे़त स्त्री-पुरूषांच्या शरीररचनेत आवश्यक ते फरक निर्माण करून, दोहोंना वेगळी मानसिकता, शारीरिक क्षमता व गुण प्रदान करण्यात आले आहे़त मातृत्वाची जबाबदारी कौशल्याने पार पाडता यावी म्हणून तिला अधिक संयम व सहनशील प्रवृत्ती प्राप्त झाली आह़े तिच्या ममत्व व कोमल भावनांमुळे बालकांचे संगोपण व  पालनपोषण अत्यंत सहृदयपणे पार पाडले जात़े पुरूष त्या मानाने कणखरवृत्तीचा असत़ो त्याच्यावर कुटुंबाच्या रक्षणाच्या व उदरनिर्वाहाच्या कठीण जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहे़त  स्त्री - पुरूषांचे नैसर्गिक कार्यक्षेत्र वाटप जर आपणास मान्य नसतील तर जगास मातृत्वाला मुकावे लागेल व परिणामत: संपूर्ण मानवसमाज हैड्रोजन वा अणुबॉम्बविना संपुष्टात येई़ल  स्त्रियांनी मातृत्वाच्या नैसर्गिक जबाबदारीबरोबरच पुरूषांसह राजकीय, आर्थिक, औद्योगिक व इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा करणे म्हणजे महिलांवर अन्याय व अत्याचार  करणे आह़े मानवजातीच्या उत्पत्ती व सेवा - शुश्रुसेची संपूर्ण जबाबदारी ती एकटीच पार पाडीत असत़े त्यात पुरूषांचा काडीमात्र सहभाग नसत़ो या उलट पुरूषांच्या जबाबदारीतही तिने  सहभागी व्हावे व कितपत न्याय्य ठरेल?
स्त्रियांनी परिस्थितीनुरूप अन्यायकारक जबाबदाऱ्यांचा स्वीकार केला आह़े एवढेच नव्हे तर आता तर अधिकाधिक सामाजिक स्वातंत्र्य व अधिकार मिळविण्याकरिता त्यांनी सामूहिक चळवळी सुरू केल्या आहे़त आपण मातृत्वाचा उपहास केला आह़े गृहणीचा अपमान केला आह़े महिलांनी घरात राहून केलेल्या सेवा-शुश्रुसेला तुच्छ लेखले आह़े तिच्या सेवाकार्याचे महत्त्व पुरूषांचे राजकारण, उद्योगधंदे व युद्धच्या जबाबदाऱ्यांपेक्षा कमी मानता येणार नाह़ी बिचाऱ्या स्त्रियांनी विवश होऊन पुरूषांच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहे़त पुरूषांची कामे न केल्यास  तिला सन्मानजनक वागणूक देण्यास पुरूष तयार होत नव्हत़ा इस्लामने महिलांना घरगुती स्त्रीसुलभ जबाबदाऱ्या पार पाडण्याचा आदेश दिला होत़ा मातृत्व व बालकांच्या संगोपनाच्या  उदात्त कार्यामुळे तिला समाजात सन्मानजनक स्थान प्राप्त होत़े मात्र आता कुटुंब व्यवस्थेबाबतचा आपला दृष्टिकोनच बदलत चालला आह़े आपला आग्रह आहे की स्त्रियांनी मातेची  कर्तव्ये पार पाडावीत, त्याबरोबरच तिने उच्चशिक्षण प्राप्त करून मॅजिस्ट्रेटसारखे पद भूषवावे, पुरूषांच्या मनोरंजनासाठी नृत्य व संगीताच्या महफिलीही सजवाव्या़त अशा अनेक  प्रकारच्या कामांचे ओझे तिच्यावर लादले गेल्यामुळे ती एकही जबाबदारी पूर्णत: समाधानकारकपणे पार पाडू शकत नाह़ी ज्या कामाकरिता तिचा जन्म झालेला नाही, जे तिच्या शरीराला  पेलवणार नाही, जे तिच्या व्यक्तिमत्वाला शोभणार नाही अशी कामे तिच्यावर सोपवण्यात आली आहे़त मात्र तिचे कौतुक झालेच तर ते केवळ तिच्या सौंदर्य व स्त्रीत्वामुळचे होते!

– सय्यद परवीन रिजवी

खुदा जाने ये बदमस्तीयाँ नया रंग लायेंगी
कहां तक और बिगडेगा अभी अपना चलन साकी’’
माहितीने समृद्ध जग लोकांची लक्ष देण्याची योग्यता आणि एकाग्रता हिरावून घेईल’’ असे विधान नोबेल लॉरेट हरबट सीमान यांनी केले होते. आज ते विधान मूर्त स्वरूपात  आपल्यासमोर उभे आहे. आपल्यातील बहुसंख्य लोकांच्या पाठांतराची क्षमता कमालीची कमी झालेली आहे. अगदी जवळच्या लोकांचे मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला पाठ नाहीत.  चंगळवादाने समृद्ध झालेल्या जीवन शैलीने आपल्यामध्ये कमालीचे बदल घडवून आणलेले आहेत. आता आपण रात्री उशीरापर्यंत जागतो आणि दिवसा उशीरापर्यंत झोपतो. कित्येक लोक  तर असे आहेत की ज्यांनी गेल्या कित्येक वर्षे सूर्य उगवताना पाहिलेला नाही.
चुकलेल्या या जीवनशैलीमुळे अनेकांना अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत. या नवीन जीवन पद्धतीमध्ये पैसा आणि वस्तूंनी लोकांचे जीवन व्यापून टाकलेले आहेत. पैसा किती कमवावा आणि कसा कमवावा, यासाठी असलेली पारंपारिक नैतिक चौकट उध्वस्त होऊनही बराच कालावधी लोटलेला आहे.
परिणामी एकाग्रता, सत्य, समर्पण, प्रेम, त्याग आणि माणुसकी यासारख्या मुल्यांचा ऱ्हास झालेला आहे. प्रेम ही संज्ञा फक्त लैंगिक संबंधापूर्ती उरलेली आहे. स्त्री-पुरूषांचे नाते नर आणि मादी या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. बाकीच्या नातेसंबंधातील प्रेमभावना सुगंध नसलेल्या टवटवीत फुलासारख्या झालेल्या आहेत. त्यामुळे वरून जरी समाज सुदृढ आणि  संपन्न दिसत असला, लोक सुंदर, गुटगुटीत आणि सभ्य दिसत असले तरी, वाढत्या आत्महत्यांनी त्यांच्या संपन्नतेतील फोलपणा उघडकीस आणलेला आहे.
दारिद्रयामुळे लोक आत्महत्या करतात असा सिद्धांत मांडून शेतकऱ्यांच्या आत्महत्येंचे उदाहरण पुरावा म्हणून पुढे केले जात असले तरी हा सिद्धांत खोटा आहे हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. हे खरे असते तर शेतकऱ्यांपेक्षाही जास्त गरीब असलेल्या मुस्लिम समाजात आत्महत्येंचे प्रमाण नगण्य का आहे? या प्रश्नाचे उत्तर या सिद्धांत मांडणाऱ्यांकडे नाही.
शिवाय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत, स्त्रीयांपासून पुरूषांपर्यंत, मध्यमवर्गीयांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्व प्रकारचे लोक नियमितपणे का आत्महत्या करीत आहेत? याचा शोध घेणे मनोरंजक  ठरेल.
चुकीची जीवनशैली सारासार नियंत्रणही नाकारणारे व्यक्ती स्वातंत्र्य, जीवनमान सतत उंचावत ठेवण्यासाठी व्याजी कर्ज घेण्याची सवय, ऐपतीपेक्षा जास्त खर्च करण्याची तयारी, रात्रंदिवस मनोरंजनात व्यग्र राहणे, अति लैंगिक सक्रीयता, वस्तूंमध्ये आनंद शोधण्याची मानसिकता, पती-पत्नीच्या नात्याला क्षीण करणाऱ्या साधनांचा विपूल उपयोग, चंगळवादी जीवनशैलीचा अंगीकार, व्याजाला नफा समजण्याची घोडचूक या सगळ्या गोष्टी आजच्या समाज जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. या गोष्टी जरी जीवनात असतील तरी  जीवन कुठल्याही क्षणी आत्महत्येच्या टोकापर्यंत जाऊ शकते.
या कृत्रिम जीवन शैलीमुळे उत्पन्न होणाऱ्या स्ट्रेसमुळे मधूमेह, र्नतदाब, ब्रेन अटॅक (पक्षाघात) किंवा हार्टअटॅक (हृदयघात) सारख्या व्याधी मागे लागू शकतात. भारतीय नागरिकांमध्ये या  आजारपणाची सातत्याने होणारी वाढ ही चिंताजनक स्तरावर पोहोचलेली आहे. असामाधानी आणि कृत्रिम जीवनशैलीचे फलित आत्महत्या किंवा अकाली मृत्यूमध्ये होत असल्यास त्याचे  नवल ते काय?
उपाय
वल नफ्स रागेबत अज अरगबतहा
व अज इरतेदाली खलील तख्नआ
अरबी भाषेमधील वरील शेरचा अर्थ असा की जो आपल्या जीवाचे जेवढे चोचले पुरवील तेवढे ते वाढतच जातात. त्यांना अंत नसतो व जो आपल्या जीवाचे चोचले पुरविण्यास ठामपणे नकार देतो तर त्याचा जीव तो देईल तितक्यात समाधानी राहतो. इस्लामी जीवनशैलीचे हेच वैशिष्ट्ये आहे. प्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीत ही ’ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू  द्यावे समाधान’ ही शिकवण माणसाच्या जीवनास समृद्ध करण्यासाठी पुरेशी होती. पण हिंदू आणि मुस्लिम दोहोंतील बहुसंख्यांनी आपापल्या धर्मातील मूळ शिकवणी विसरून चंगळवादी,  भांडवलशाही आणि असभ्य जीवनशैलीचा अंगिकार केल्यामुळे जीवन स्ट्रेसफुल (तणावग्रस्त) तर मृत्यू हा अचानक आणि वेदनादाई होत आहे.
गुंतागुंतीच्या जीवन शैलीमुळे होणाऱ्या आत्महत्याचे वर्णन करण्यासाठी भय्यूजी महाराजांसारख्या व्यक्तीची आत्महत्या व त्यामागील उघडकीस आलेल्या कारणांएवढे स्पष्ट उदाहरण दूसरे  असूच शकत नाही. कोट्यावधी रूपये धर्मादाय कार्यात खर्च करणारे अनेक राज्यातील सरकारे बनविण्यात मोलाची भूमिका बजावणारे, अनेक व्हीआयपींचे धर्मगुरू असणारे, भय्यूजी  किती कृत्रिम जीवन जगत होते हे जर का लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.
लक्षात ठेवा मित्रानों! कठीण परिस्थितीत जो धर्म माणसाला नैतिकतेवर टिकून राहण्यास मदत करतो तो इस्लाम आहे. भारतात सर्वाधिक गरीब मुस्लिम समाज आहे. हे सत्य  न्यायमूर्ती सच्चर यांच्या अहवालाद्वारे अधोरेखित झाले आहे. भारतीय मुस्लिम म्हणजे गरीबीचे मूर्तीमंत उदाहरण. दाटीवाटीने उभी असलेली मोहल्ल्यातील कच्चीपक्की घरे, कल्तानी  पोत्यांचे दारावर असलेले मळकट पडदे, निळ्या पॉलीथीनचे आडोसे, उघडी गटारे, त्यातून वाहनारा मैला, त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी, त्यातून डासांची उत्पत्ती, कुपोषणामुळे वाढ  खुंटलेली मुले, कमी एच.बी. (ह्युमोग्लोबिन) असल्या कारणाने पिवळ्या पडलेल्या कृष महिला, शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण नसल्याने तासन्तास वॉटस्अप आणि  फेसबुकमध्ये मुंडके घालून बसलेले तरूण, आपल्या मुलींच्या खर्चिक निकाहसाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याचा आणि प्रतिष्ठेचा विचार न करता सातत्याने श्रम  करणारे मध्यम वयीन पुरूष, भूमीहीन आणि सरकारी सुविधांपासून वंचित असणाऱ्या व त्यामुळे अत्यंत दयनीय स्थितीमध्ये जगणाऱ्या या समाजाकडे डोळस नजरेने पाहिले की, एक  सत्य लक्षात आल्यावाचून राहत नाही की, केवळ मजबूत इस्लामी जीवनशैलीमुळेच हे लोक अशा या आभाळाएवढ्या अडचणींवर मात करूनही जगत आहेत.
म्हणून असे म्हणावे लागेल की, गरीबी नव्हे तर चुकीच्या जीवनशैलीमुळे भारतात आत्महत्या वाढत आहेत.

इस्लामची मुलभूत शिकवण
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’जरी इब्ने आदम (मानव) कडे एका डोंगराएवढे सोने असेल तरी त्याला वाटेल की असा आणखीन एक डोंगर असायला हवा होता.’ या  हदीसमध्ये माणसाच्या संपत्तीविषय लालसेचे अत्यंत मार्मिक असे उदाहरण देउन स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. डोंगराएवढे सोने असल्यास खरे तर माणसाला दूसऱ्या कशाचीच  इच्छा करण्याची गरज भासू नये. मात्र माणूस इतका लालची असतो की थडग्याच्या मातीनेच त्याची लालसा समाप्त होते. याच लालसेमुळे माणसाचे सुख आणि चैन नष्ट होत असते.  आरोग्य आणि प्रतिष्ठा नष्ट होत असते. आश्चर्य म्हणजे तारूण्यामध्ये लाभलेल्या आरोग्याची वाट लावून माणसं धन कमावतात आणि त्याच धनाने, धन कमावताना नष्ट झालेल्या आरोग्याला पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. यासारखा दूसरा वेडेपणा नाही. इस्लाममध्ये नशीबावर विश्वास ठेवण्याची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे सातत्याने कर्म केल्यानंतरही मनासारखी धनप्राप्ती करता आली नाही तरी मुस्लिम या अपयशाला आपले नशीब समजून गप्प बसतो. आहे त्या पैशामध्ये संतुष्ट होउन जीवन जगतो. अल्लाहची आठवण सातत्याने ठेवतो. पाच वेळेसच्या नमाजातून त्याला जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असते. त्यातून त्याला आत्मीक आनंदाची अनुभूती मिळते आणि जगण्याची उमेद कायम  राहते. या शिवाय, रोजा, जीक्र इत्यादी प्रार्थनांमधून मिळालेल्या प्रेरणेमुळे तो मोठ्यातले मोठे अपयश सुद्धा पचवू शकतो. सातत्याने होणाऱ्या जातीय दंगलींमध्ये सर्वकाही जळून राख  झाल्यावर सुद्धा नव्याने पुन्हा अ,ब,क पासून जीवनाची सुरूवात करण्याची भारतीय मुस्लिमांची जिद्द फिन्निस पक्षाची आठवण करून देणारी आहे.
मुफ्ती मुहम्मद शफी उस्मानी म्हणतात,
’’ खुदा की याद और उसकी इताअत से मुसलमानों को ऐसी रगबत
होती है जैसे के, मता-ए-हयात-ए-दुनिया (जगातील जीवन
जगण्याच्या वस्तू) से काफिर (अल्लाह आणि प्रेषित सल्ल.
यांचा इन्कार करणारा) को होती है.’’
याचा अर्थ जीवनाला समृद्ध करणाऱ्या वस्तूंबद्दल जेवढे प्रेम मुस्लिम्मेत्तरांना असते तेवढेच प्रेम मुस्लिमांना अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताच्या वचनांविषयी असते. लोक आज वस्तूंमध्ये  समाधान शोधत आहेत. त्यांचा असा ठाम विश्वास आहे की, वस्तू असल्या की समाधान आपोआप मिळते. घरात सामान, ऑफिसमध्ये सामान, सोबत सामान, गाड्या, बंगले, बँक  बॅलन्स, वाहने या गोष्टी माणसाला शारीरिक सुख तर देऊ शकतात मात्र आत्मिक समाधान देऊ शकत नाहीत. यांच्या आधारे कोणीही संतुष्ट जीवन जगू शकत नाही. म्हणून लोक  आत्महत्या करतात.
माणसांच्या गरजा कधीच संपत नाहीत. ती एक हवस असते जी कधीच पूर्ण होत नाहीत. दुसऱ्या एका ठिकाणी प्रेषित सल्ल. यांनी म्हटले आहे की, ’’ वो कामियाब हो गया जिसने  इस्लाम कुबूल किया और उसे बकद्रे जरूरत रोजी मिल गई और उसीपर अल्लाह तआला ने उसको किनात नसीब फरमा दी’’(संदर्भ : मुस्लिम : 2473) म्हणजे ती व्यक्ती यशस्वी  झाली जिन्हें जाणून बुजून इस्लामचा स्विकार केला व त्याला अल्लाहने जगण्यापूर्ती संसाधनं दिली आणि संतुष्टी प्रदान केली. एका ठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले की,  ’’तुम्हें अगर कोई भी परेशानी लाहक हो जाए तो नमाज की तरफ रूजू करो.’’ (संदर्भ : हदीस नं. अबु दाऊद 1321)
एकंदरित आत्महत्यापासून दूर रहावयाचे असल्यास पूर्वग्रह दुषित न ठेवता सहज जगण्याची प्रेरणा देणाऱ्या दिव्य इस्लामचा सर्वांनी खुल्या मनाने अभ्यास करावा व आपल्या जीवनाला  समृद्ध करावे. कारण सुखी जीवन जगण्याचा दूसरा मार्गच उपलब्ध नाही. तपासून पाहा, अनुभव घेऊन पाहा, दुसऱ्यांच्या जीवनाचे अवलोकन करून पाहा, कसेही पहा,
देअर इज नो वे बट इस्लाम. 

- एम.आय.शेख
8459538348

मुंबई (नाजिम खान)-
अन्नाचा अधिकार भारतीय नागरिकांचा एक मौलिक अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानेदेखील आपल्या एका निकालात म्हटले होते की देशात कोणीही नागरिक उपाशीपोटी मरता कामा  नये, याची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून स्वस्त धान्यापासून वंचित लोकांना वाऱ्यावर सोडले असल्याचे परखड उद्गार मूव्हमेंट फॉर पीस अँड  जस्टीस फॉर वेल्फेअर’ (एमपीजे) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी काढले. ‘अन्नाचा अधिकार जगण्याचा अधिकार’ अशा घोषणा देत महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून  आलेल्या राशन (शिधा) पासून वंचित असलेल्या नागरिकांना राज्य सरकारकडून भीक नव्हे तर अधिकार हवा असल्याची मागणी करत मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने धरणे  आंदोलन करण्यात आले, त्याप्रसंगी रमेश कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एमपीजेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुहम्मद सिराज म्हणाले, इ.सन २०१३ मध्ये अन्न सुरक्षा कायदा पास झाला तेव्हा महाराष्ट्र राज्यात ८ कोटी ७७ लाख लोक अन्न सुरक्षेचा लाभ घेत  होते. मात्र उपरोक्त कायद्यांतर्गत सात कोटी लोकांना अन्न सुरक्षा देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार १ कोटी ७७ लाख लोक अन्न सुरक्षेपासून वंचित झाले होते.  तत्कालीन सरकारने बाजारभावाने केंद्र सरकारकडून धान्य घेऊन त्या वंचित झालेल्या लोकांना सब्सिडी देऊन या योजनेद्वारे लाभान्वित केले होते. मात्र इ.सन २०१४ मध्ये राज्यात  आपले सरकार स्थापित झाल्यानंतर त्या लोकांना सब्सिडीवर आधारित शिधा (राशन) मिळणे बंद झाले.
शिधा वितरण प्रणालीमध्ये सुधारणा घडविण्याच्या उद्देशाने डिजिटल प्रणाली अवलंबिण्यात आल्यामुळे देखील एक कोटी १० लाख लोक अन्न सुरक्षेच्या लाभापासून वंचित झाले. अशा  प्रकारे राज्यात एकूण २ कोटी ८७ लाख लोकांना अन्न सुरक्षेपासून वंचित करण्यात आले आहे.
मुहम्मद सीराज पुढे म्हणाले, देशातील सर्वांत संपन्न अर्थव्यवस्था असलेल्या महाराष्ट्रात देखील उपासमारीने मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.  एमपीजे मुंबई अध्यक्ष शब्बीर देशमुख  म्हणाले, राज्यात टी.पी.डी.एस. अंतर्गत लाभधारक लोकांना शिधा (राशन) मिळत नसल्याच्या आणि मंजूर कोट्यातून कमी मिळण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पीडित लाभधारक  सरकारी कार्यालयात वारंवार जाऊनदेखील त्यांना कोणी दाद घेत नाही आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण होत नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत गरीब लोकांसाठी अन्न सुरक्षा  एक अधिकार आहे. अन्न सुरक्षा सुविधेपासून एकही गरीब आणि दुर्बल व्यक्ती वंचित राहता कामा नये. एन.पी.एस.ए. अंतर्गत १ कोटीहून अधिक पात्र लाभधारक पी.डी.एस.  प्रणालीतील तांत्रिक त्रुटीमुळे शिधा (राशन) वाटप दुकानांतून शिधा प्राप्त करण्यास असमर्थ आहेत. जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीची पी.डी.एस.मध्ये यशस्वीरित्या नोंदणी केली जात नाही  तोपर्यंत एकाही पात्र लाभार्थ्याला खाद्य सुरक्षेपासून वंचित केले जाऊ नये. कुटुंबप्रमुखाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात यावी. अन्न सुरक्षा  योजनेत ऑक्टोबर २०१४ पासून शिधा (राशन) पासून वंचित करण्यात आलेल्या १.७७ कोटी ए.पी.एल. केसरी कार्डधारकांचा पुन्हा समावेश करण्यात यावा, इत्यादी जनहितार्थ  मागण्यांबाबत त्वरित गांभीर्याने विचार करून राज्याला उपासमारमुक्त बनविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी सीराज यांनी या वेळी केली.

आपल्या देशात अनेक कारणांनी जातीय व धार्मिक हिंसाचारांच्या रक्तरंजित घटना घडतात. त्यात अनेक निरपराध मुस्लिम मारले जातात. यात गुन्हेगारांना काही राजकीय पक्ष वाचवतात. यामुळे दंगलीत सहभागी असणारे व दंगलींना खतपाणी घालणारे देशात खुलेआम फिरत असतात. या पाश्र्वभूमीवर दिल्लीतील शीख दंगल प्रकरणी काँग्रेसचे नेते  सज्जनकुमार यांना शिक्षा झाली. त्याप्रमाणे बाबरी मस्जिद, गुजरात दंगल, मुजफ्फरनगर दंगल व गोध्राकांड घडविणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा होईल काय व मुस्लिम समाजाला न्याय मिळणार का?
आपल्या देशात अनेक कारणांनी तसेच जातीय हिंसाचारांच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ ही मोठी चिंताजनक बाब आहे. अशा हिंसाचारांमध्ये निरपराध नागरिकांना जीव गमवावा  लागतो. अनेक जण जायबंदी होतात, तर समाजाबरोबरच देशाचेही आर्थिक नुकसान होते. त्यामुळेच अशा प्रवृत्तींना वेळीच अटकाव करणे तसेच त्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर  कारवाई होणे गरजेचे ठरते. मात्र अशा गंभीर प्रकरणांतही राजकीय हस्तक्षेप होणं त्यातून हल्लेखोरांना पाठीशी घातलं जाणं, त्यांच्यावरील कारवाईस टाळाटाळ होणं असे प्रकार समोर  येतात, ही बाब समाजासाठी व आपल्या देशासाठी हानिकारक ठरणारी असते. म्हणूनच अशा घटनांमध्ये न्यायालयाकडून संबंधितांना योग्य न्याय दिला जावा अशी अपेक्षा असते. त्या  दृष्टीने आपली न्यायव्यवस्था आपलं कर्तव्य चोखपणे बजावत आहे, ही समाधानाची बाब म्हणालयला हवी.
या पाश्र्वभूमीवरदिल्लीतील १९८४ मधील शीखविरोधी दंगल प्रकरणी काँग्रेसचे नेते सज्जनकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोवावली. यामुळे या दंगलीतील  पीडितांना दिलासा मिळणं साहजिक असलं तरी ही न्यायालयीन लढाई इथंच थांबणारी नाही. इंदिरा गांधी यांच्या हत्येनेंतर देशभरात निरपराध शिखांचं शिरकाण करण्यात, त्यात निष्पाप शिखांचा बळी गेला. महाराष्ट्रातही श्रीरामपूर, कोपरगावला मोठ्या रक्तरंजित घटना घडल्या होत्या. दिल्लीतही जातीय दंगली झाल्या. त्यातल्या एका प्रकरणात काँग्रेसनेते सज्जनकुमार  यांना शिक्षा ठोठावण्यात आली. दिल्लीत आणि संपूर्ण भारतात जे काही घडलं ते मानवतेला काळीमा फासणारं होतं. फाळणीनंतर इतकं मोठं नृशंस हत्याकांड घडलं नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. परंतु गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर जे झालं ते नृशंस हत्याकांड नव्हतं का, असा प्रश्न पडतो. इतका नरसंहार करणाऱ्यांना मात्र उशिरा शिक्षा का  होते?
दिल्लीतील शीख हत्याकांडानंतर आरोपींना शिक्षा झाली, परंतु आपल्या देशात गुजरात दंगल, मुजफ्फरनगर, हाशिमपुरा दंगल आणि बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात आल्यानंतरची  दंगल करणाऱ्यांना व बाबरी मस्जिद पाडणाऱ्यांना शिक्षा न्यायालय कधी देणार आणि कधी मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देणार आहे? अजून किती वर्षे मुस्लिम समाज न्यायाची  वाट पाहाणार? या दंगलीत हात असणाऱ्यांना शासन होईल यासाठी आवश्यक ती कारवाई न्यायालयानं करायला पाहिजे होते. अशा अनेक जातीय दंगली आपल्या देशात झाल्या आहेत  आणि असे अनेक सज्जनकुमार आपल्या देशात मोकाट फिरत आहेत. शिखांचे हत्याकांड होऊन त्यांचा निकाल लागण्यास ३४ वर्षे लागत असतील तर हा शीख समाजाला मिळालेला  न्याय नाही. या दंगलींच्या निकालाला इतकी वर्षं लागली तर ज्या दंगलीत अनेक आरोपी आहेत त्यांना शिक्षा करण्यासाठी अजून किती वर्षं लागतील, याचा विचार न्यायालय करणार  कधी? वास्तविक पाहता भारत देश स्वतंत्र झाल्यापासून हे सर्व प्रकार थांबायला पाहिजे होते. परंतु या दंगलींत वाढच होत आहे.या दंगलींमुळे देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली  आहे.
जगातील कुठलाही धर्म जातीयता, वर्णव्यवस्था यांचे समर्थन करीत नाही. परंतु काही स्वार्थी आणि अधर्मी लोक स्वत:च्या फायद्यासाठी आणि समाजात असलेले आपले वर्चस्व टिकवून  ठेवण्यासाठी जातियतेचा वणवा सर्वत्र पसरविण्याच्या प्रयत्नात असतात. आपल्या देशात कोणत्याही समाजाची प्रगती आणि विकासाची चिंता नाही. विकासापेक्षा जातियतेला भारतात  जास्त महत्त्व दिले जाते. यामुळे भारतीय मुस्लिम समाज राजकीय क्षेत्रात पिढ्यानपिढ्या मागे राहिला. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात फार मोठे योगदान असूनही समाजाला अजूनही  राजकीय भागीदारी मिळालेली नाही, याची येथील मुस्लिम समाजाला आजही खंत वाटते. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही काही सामाजिक विषमतेविषयीची मानसिकता मात्र सरकार  आणि राज्यकर्त्यांची अजूनही बदललेली नाही. या जातीय व्यवस्थेमुळे जाती दंगली होतात आणि निरपराध मुस्लिम मारला जातो. त्यांना कोणत्याही पक्षाचा आमदार, खासदार, न्याय मिळवून देत नाही. अनेक जातीय दंगलींत मरणारे निष्पाप जीव व आज हयात असलेले त्यांचे कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहात आहेत. आपल्या देशात ज्या दंगली होतात त्या  मंदिर-मस्जिद विवादामुळे, यास जबाबदार म्हणजे येथील राजकारणी. भारतात सांप्रदायिक दंगली घडतील असे पोषक वातावरण तयार करणयाचे कार्य आजकाल मोठ्या प्रमाणात काही  समाजकंटक आणि राजकीय हस्तक करीत असल्याचे आपणास जाणवते. कारण जात आणि धर्माच्या नावावर हिंदू-मुस्लिमदलित- सवर्ण असे संघर्ष निर्माण करून आपणास पाहिजे ते  सर्व राजकीय फायदे हेच पुढारी करून घेतात.

- गुलाब नजीर पिंजारी
निंभोरा- रावेर (जि.जळगाव)
मो.९६८९०३५७९२

जानेवारीचा राष्ट्रीय सण, प्रजासत्ताक दिनाच्या तयारीला सगळीकडे सुरूवात झाली॰ राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, शासकीय, निमशासकीय, संस्थासंघटना सगळीकडे  देशभरात एकच लगबग़॰॰ ‘सण’ भारतीयांचा आला॰ सण प्रजेची सत्ता आणि एका-एका मताची महत्ता सांगणारा सण॰॰॰ गणतंत्र, लोकांप्रत लोकांनी स्वत:हून अर्पण करून घेतलेल्या, डॉ॰  बाबासाहेबांच्या अथक अभ्यासू परिश्रमातून साकारलेल्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची रूजवात झाली याची आठवण देणारा सण - सोहळा॰ देशप्रेमाची भरती ऊधाणली॰ मोडक्या  शाळेपासून, झोपडीतल्या गळक्या छतांतून, पॉश मॉल्सपासून, व्यसन केंद्राच्या इमारतीतून गाव घरे वस्त्या वाड्यांतून, जंगलातून॰॰ तिरंगा ध्वज अभिमानाने फडकला॰
देशभक्तीच्या गाण्यांनी अवघं आसमंत दोन दिवस भरून गेलं॰ गारठ्याथंडीची पर्वा न करत प्रभातफेरीतल्या घोषणांतून गावं-रस्ते- मैदाने दणाणून गेले॰ सोशल मीडिया, मिडीया झळाळून  उठला॰
दोन-चार फोटो झब्बा-कुर्ता दाढीवाले चाचा- मामू देशभक्त म्हणून गाजले॰ गोरक्षा करत गौशाळा चालविणाऱ्या मुस्लिम नावाच्या कुटुंबाला ‘पद्म’ पुरस्काराने घोषित झाला॰ रोहित, नजीब,  मोहसिन, जावेद, अख्लाक, तौसिफ, आसिफाला देश विसरला॰
२६ जानेवारीच्या दुपारनंतर निवडक उच्च ठिकाणी सत्यनारायणाचा प्रसाद वाटला गेला॰ देव देशधर्माचा गौरव द्विगुणीत करत पुन्हा धर्मांध खेळाची सुरूवात झाली॰ सिलेक्टीव्ह देशभक्ती,  हंगामी देशप्रेम, गोंधळलेली सहिष्णुता, जाणवत जाणारे ठळक उपरेपण, फॅसिझमच्या गडद नोंदी यांची सरमीसळ सुरूच आहे॰ जाती, धर्म, भाषा, प्रांत, राजकीय विसारणी यांवर  आधारित द्वेष, हिंसा दंगलीने भरलेल्या आणि भारलेल्या वातावरणात ‘देशप्रेमाचा ऊरूस’ सजला॰ थिएटर सिनेमामधून राजकीय व्यक्तीप्रेमाचा केंद्र करून सांस्कृतिक दहशतवाद घट्ट  होतोय॰ मनोरंजन, कलात्मकतेच्या नावावर तद्दन द्वेषमानसिकता सबळ करणारे साहित्य-सिनेमे पडद्यावर येताहेत॰ बायोपिकचे आलेले उदंड पीक़॰॰॰ माणुसकीचा दुष्काळ ठरविणारी  आहे॰
मॉब लिंचिंग आणि केवळ मुस्लिम म्हणून देशभक्ती सिद्धता करण्याच्या विषारी प्रचाराला बळी पडलेल्या अनेक तरूणांची आठवण करत, देशातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था  व्यथित होऊन आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सणा दिवशी प्रवास करू नये, अशी नोटीस काढते हे आभाळाएवढे दुर्देव॰ बरोबर याच्या उलट उत्तरपूर्व भारतात सिटीजन संशोधन  विधेयकाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनावर बहिष्कार घालत ३० हजाराहून अधिक तरूण लोक विद्यार्थी रस्त्यावर मोर्चाने उतरतात॰ पोस्टर, घोषणांनी आकांत भरलेला॰ त्यातली एक  घोषणा धक्का देते सगळ्या ‘जयहिंद’च्या नाऱ्यातील घोषणा ‘‘हॅलो चायना, बाय-बाय इंडिया’॰॰ झेंडावंदन करून भयाने शांत बसणारी न फिरणारी मुले कुठली? इंडिया - भारतातली॰  आणि राष्ट्रवादाचा डोस देत विष पसरवणारी संघीय पिलावळ कुठे तर परदेशात॰ परदेशावरून आठवले, स्वाईन फ्लू पासून सगळ्याच भल्या मोठ्या रोगांची लागण घेऊन सारे देशप्रेमी  नेते सध्या परदेशात उपचारासाठी आहेत॰ रामदेवबाबांच्या योगाचा रामबाण उपाय काही बहुतेक चालला नाही॰ रामदेवांच्या मात्रा काही केल्या चालेना॰ अर्थात त्यांच्या गुडघे दुखीवर त्यांनी  अमेरिकन डॉक्टरांनाच कन्सल्ट केलंय॰ या सगळ्या पार्श्वभूमीवर नोटाबंदीचा घोटाळा ते राफेलची डील याचा ससेमिरा पाठी लागू नये म्हणून अर्थमंत्री सुद्धा उपचारार्थ परदेशीच आहे॰ हमी  विदेश दौरा करणारे पीएम॰मात्र ‘मन की बात’ मधल्या नियोजित प्रौढ शाळेत बढाई मारून जाताहेत किंवा अगदी सकाळी कचरागाडीतून कैलाशखेर सोबतचा आवाज कानाला फसवत आहेच॰ पद्म आणि भारतरत्न सारख्या मानप्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या यादीवरून पुन्हा एकदा प्रतिक्रियांचा बोचरा पाऊस पडतोय॰ सोईस्कर आणि निवडणुकांच्या रंगीत महानाट्यांत युती  नितीचा बनावटी डाव खेळला जातोय॰ ईवीएमचा विवाद, खुनांची मालिका, आरोपांचे सत्र, आरक्षणाचे गाजर, आर्थिक निकषाचे तुणतुणे सगळं आलबेल वेल सुरूय॰ आणि आपण  देशभक्तीच्या प्रमाणपत्रासाठी किव आणणारी धडपड करतोय॰ भारत हमको जान से प्यारा है ‘म्हणत-गात’ जोश ओसरल्यावर हंगामी आंदोलकांचे आदर्श आण्णादादा वगैरे सारख्या  त्यागी महापुरूषांनी या हंगामात पुन्हा झोपेतूनच लोकपाल आंदोलन उभारण्याची हाकारी दिलेली आहे॰ पुन्हा सेल्फी पॉईंट उभारून नवीन पक्षांची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी मिडीया प्रायोजित मांडव उभे राहतील बहुतेक़.
या मिडीयाने आपल्या सामान्य नागरिकांच्या मनमेंदूत एवढा घट्ट विश्वास रोवलाय की मेंदू मिडीयाचलित झाला आहे॰ क्रांती परिवर्तनाच्या पोकळ फेसबुकी गप्पांशिवाय काहीच करता  येऊ नये॰ इतकी डाटाव्यस्त तरूणाई ‘पकौडे सेंटर’ च्या शोधात आहे॰ मिडीयातून नेत्यांच्या घरच्या आनंदीसोहळ्याचे प्री-पोस्ट चित्रण - प्रक्षेपण इमानाने सुरू आहे॰ अरबपतीकरोड पतींनी  आपल्या दारात कोंटीचा हत्ती बांधावा हे ठिकाय, पण गल्ली-लोकलची कुत्री सुद्ध दावणीला बांधली गेलीयत॰ लोकशाहीचा विजय असो, संविधानाचा विजय असो, गणतंत्र विजया असो॰  गनयंत्रांचा खचाखच साठा सापडलेल्या साधक-सनातन्यांचा जाहीर जामिन सत्कार वगैरे सुरूय॰ रस्त्यावर साधा भारतीय मात्र ‘प्लास्टिकच्या झेंड्याचा अवमान चुकूनही’ घडू नये म्हणून काळजीने आपली कामं करतोय॰ हीच काळजी प्रस्थापित सरकार नागरिकांची वाटणी घालून घेतंय, योगी-बाबा साधूंचे पेन्शन लागू॰ आणि घसा कोकलून, स्वहत्येचा मार्ग पत्करून, लोकशाहीवादी मोर्चे काढून आपल्या हक्क न्यायासाठी झगडणाऱ्यांच्या संघर्षाला दाद मिळत नाही॰ सवर्ण आरक्षणाचा बाणा लगेच पास होतो॰ काय आपण लोकशाहीप्रधान देशात  आहोत? माजी न्यायमुर्तींच्या मिडीयासमोर येऊन कैफियती मांडल्यापासून आजपर्यंत॰ विचारवंतांच्या क्रूरहत्या झाल्यनंतरही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबून झाल्यावर,  मॉबलिंचिंगच्या निर्घूण कत्तली नंतर... शिक्षणातून सर्वसामान्य गरिबाला दूर सारल्यावर आपल्या हक्कासाठी बहुजनांच्यामध्ये दरी निर्माण केल्यावर, भारतीयांवर वर्णवर्गवादाचा भार  दिल्यावर, सांस्कृतिक दहशतवादाची मुळे डोक्यात खुपसल्यावर कट्टरतेच्या धार्मिक गोळीचा ओव्हरडोज पाजल्यावर बांधावरल्या आत्महत्यानंतर कामगारांच्या उपाशी पोटापर्यंत भूकेला  लाथाडल्यावर छद्मी इतिहासाचे मृत्यूलेख परंपरेच्या नावाखाली निर्माण करत पुढील पिढ्या नासवणाऱ्या प्रस्थापितांच्या भूमिकेवर राष्ट्रप्रेमाचे लायसन्स देणाऱ्या उथळ संघी संस्थाबहर  केवळ द्वेष-जहर रोवणाऱ्या एकूण व्यवस्थेवर॰॰॰ आपण सर्व जोपर्यंत केवळ भारतीय म्हणून एकसाथ प्रहार नाही करत तोपर्यंत॰॰॰ मत-मनाची किंमत जाणून समता- एकता - प्रेम  बंधुतेच्या शिकवण्यांची जाणीव होऊन डीजिटलपेक्षा जीवलग माणुसकी, आपली होत नाही तोपर्यंत आपण सॅल्यूट करायला पात्र नाही॰ जानेवारीचा सण खऱ्या अर्थाने उदात्त, मुक्त,  खुल्या मानवतेला साद देणारा सण या निमित्ताने केवळ संविधानाने दिलेल्या ‘आम्ही भारतीय’चा आवाज काळजातून बुलंद केला, तरच देशातले हिटलरी क्लोनिंगला पायाखाली तुडवता येईल॰
जय हिंद॰

- साहिल शेख
866869110

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget