Halloween Costume ideas 2015
Latest Post

आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक अन् आरोग्य क्षेत्राची घडी सुधारणे आवश्यक


देशांची एकंदर परिस्थिती बिघडण्यात देशाच्या नेतृत्वाचे अपयश झाकून नेले तर विकास सोडा प्रेत उचलायलाही लोक भेटणार नाहीत, अशी अवस्था होऊन जाईल. तेव्हा डोळ्यातून अश्रुधारा टपकाविण्यापेक्षा ठोस काम करण्याची गरज असते. हताश होवून बसण्यापेक्षा मनाशी खूनगाठ बांधून देशाच्या उभारणीत प्रत्येकाने हातभार लावावा लागतो. त्यासाठी नेतृत्व करणाऱ्याला अगोदर बदलणे हे राज्यकारभारसाठी आवश्यक असते. 

सद्यपरिस्थिती पाहता महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोलचा दर 104 रूपयांच्या पुढे सरकला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या आर्थिक घडामोडीबद्दल जी आकडेवारी सादर केलेली आहे, त्यानुसार भारत सामुहिक गरीब होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याच्या दिसून येत आहे. दोन वर्षाच्या कालावधीत भारताच्या सकल घरेलू उत्पादनामध्ये 10 कोटी 56 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घसरण -7.3 टक्के एवढी मोठी आहे. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याने अर्थव्यवस्था कोलमडून पडलेली आहे. 2019-20 मध्ये भारतीय नागरिकांचे दरडोई वार्षिक उत्पन्न 62 हजार 056 रूपये इतके होते. ते 2020-21 मध्ये घटून 55 हजार 783 रूपये इतके झाले. या अकडेवारीचा उपयोग करून अर्थतज्ज्ञ लोकांनी अंदाज वर्तविला आहे की, अनेक कुटुंब या काळात जी दारिद्र रेषेच्या वर होती ती दारिद्र रेषेच्या खाली आली आहेत. 

एप्रिल मध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले त्यावेळेस भारतामध्ये कोरोनाची लाट पसरलेली होती. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन करावे लागले. याचा सर्वात वाईट परिणाम ग्रामीण भारतातील 50 कोटी लोकांवर इतका झाला की अनेक कुटुंब उपासमारीच्या खाईत लोटले गेले. याच काळामध्ये आत्महत्यांचे सत्र वाढले, गुन्हेगारी वाढली, ग्रामीण भागात नैराश्य पसरले, अनेकांना मानसिक रोगांची लागण झाली. 1 ते 24 मे च्या दरम्यान, भारतात सुमारे 78 लाख नवीन कोरोनाबाधितांची संख्या नोंदविण्यात आली व या दुसऱ्या लाटेमध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण इतके भयानक होते की, कोरोनामुळे मरणारा प्रत्येक तिसरा व्यक्ती भारतीय होता. त्यातही भारतात नोंदविला गेलेला प्रत्येक दूसरा मृत्यू ग्रामीण भागातील होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ग्रामीण भागावर फारसा परिणाम झाला नव्हता मात्र शहरी भागामध्ये लॉकडाऊन झाल्यामुळे गावी परतलेल्या लोकांनी ग्रामीण भागात वायरस पसरविण्यास सुरूवात केली आणि दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात  रूग्णांचे आणि मृत्यूंचे प्रमाण वाढले. ग्रामीण भागात काय घडले असावे, याचा विचारही उरात धडकी भरवणारा आहे. ग्रामीण भागात पोहोचलेली ही दुसरी लाट आधीच गरीब असलेल्या जनतेसाठी प्रचंड मोठा धक्का होती. आर्थिक तज्ज्ञांचा अंदाज आहे की, ग्रामीण भागात राहणारे 50 कोटीहून अधिक लोक या महामारीमुळे आर्थिक दुष्टचक्रात अडकतील व त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सरकारने केवळ पॅकेज जाहीर करून जमणार नाही तर जमीनीवर प्रत्यक्षात त्यांना काम देवून त्यांच्या हातात पैसा खेळत राहील, याची व्यवस्था करावी लागेल. तेव्हा कुठे ग्रामीण भागातील आर्थिक गाडा रूळावर येईल, त्यालाही कित्येक महिने लागतील. सरकारने अशी ठोस उपाययोजना केली नाही तर मात्र ग्रामीण भागातील लोक उध्वस्त होतील. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार असे दिसते की, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण 14.71 तर ग्रामीण भागात 14.34 टक्के इतके होते. हा दर गेल्या 45 वर्षातील सर्वात अधिक दर होता. 

केंद्र सरकारने 2014 पासून आखलेली आर्थिक धोरणे नागरिकांच्या मुळावर आली आहेत. नोटाबंदी ते कृषी कायद्यापर्यंत केलेले सर्वच कायदे नुकसानकारक ठरत आहेत. कोरोना विषाणूने तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. शिक्षणाचे तेन तेरा होत आहे. अनेकतेत एकात्मता या देशाच्या ब्रिदाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. एव्हाना काही वर्ष असेच चालले तर ते ढासळल्याशिवाय राहणार नाहीत. अशा परिस्थितीत नागरिकांना ठोस निर्णय घेवून देशाच्या उभारणीसाठी स्वतःला तयार केले पाहिजे. चूक काय आणि बरोबर काय हे माध्यमांतील पेड बातम्या न पाहता आंतरआत्म्याला विचारले पाहिजे की, देशात जे होत आहे व जे होवू घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, ते खरोखरच आमच्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयोगी आहे का? याचा विचार करून नागरिकाना ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. 

- बशीर शेख



त्याचे नाव घेतले की अंगावर शहारे येतात. बहुतांश लोक त्याचे नाव घेणेही पसंत करत नाहीत. किंबहुना अधिकतर लोक भयभीत होतात यातही महिलांची आघाडी आहे. 

त्यूला जरी माणूस पसंत करत नसेल तरी माणसाला मृत्यू येणारच. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. यापासून माणसाला सुटका नाही. हे माहित असतानाही आपण गाफील असतो. मृत्यूनंतर काय? हा प्रश्न सहसा आपल्याला पडत नाही का? आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या, जीवनाची अगदी मायक्रोप्लानिंग करतात. पण जगणं संपल्यानंतर काय? याला काहीच महत्त्व देत नाही, याची प्लानिंग करायची असते हे ही पुष्कळ लोकांना माहित नसते. कोणी मरण पावलं की आपल्याला थोडसं दुःख होतं, जवळची व्यक्ती असली की जास्त दुःख होते. हे दुःख सहसा तीन दिवस ताजे राहते. पुन्हा आपण हळूहळू त्या व्यक्तीला विसरून जातो. एक वर्ष गेले की असं वाटतं ती व्यक्ती कित्येक वर्षांपासून आपल्यापासून लांब गेली आहे. 

कोरोनाच्या आधी आपल्याला कोठे जायचे झाल्यास आपण किती योजना करत होतो आठवते ना? कोणी जायचे? कधी जायचे? कसं जायचे, किती दिवस राहायचे? सोबत काय घेवून जायचे? शिदोरीला काय करायचे? परत येताना काय आणायचे? अश्या अनेक प्रश्न आपल्याला पडत होते. मृत्यूही दुसऱ्या जीवनाचा एक प्रवास आहे. अशीच योजना आपल्याला मृत्यूची करायची आहे, कारण कधी जावं लागेल? कसं जावं लागेल? आपली किती मानसीक व अध्यात्मीक तयारी करायची आहे हे आपल्याला काहीच माहित नाही.

मृत्यू म्हणजे कम्पलसरी ए्नप्लोजन. बळजबरीने आपल्याला या जीवनापासून त्या जीवनात घेवून जाणे, खुशीने अथवा नाखुशीने जायचे मात्र आहेच. मृत्यू हा जीवनाचा अंत  नसून एक नव्या जीवनाची सुरूवात होय. मृत्यू असा प्रतिस्पर्धी आहे ज्याच्याशी संघर्ष करताना शेवटी पराजयच आपल्या नशीबी येतो. मृत्यूशी काही वेळा आपल्याला जिंकल्यासारखे वाटत जरी असले तरी एक न एक दिवस आपण हारणारच.

मृत्यू असे द्वार आहे ज्याच्यातून प्रत्येकाला जायचेच आहे. मलीकलमौत कधीच आपली परवानगी घेवून येत नाहीत की कोणाच्या अडचणीची काळजी करत नाहीत. न सांगता कधीही मृत्यू येवू शकतो म्हणून अत्यंत हुशार आहे ती व्यक्ती जी आपल्या प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस समजून चांगले आचरण करते. 

खरोखर जीवंत कोण? 

जी व्यक्ती दुसऱ्यांच्या मृत्यूमध्ये आपला मृत्यू बघते म्हणजेच जी व्यक्ती दुसऱ्यांच्या मृत्यूपासून शिकते तीच खरोखर जीवंत होय. मरणारे मेले पण आपल काय? 

आपल्यालाही एक दिवस मरण येईल आणि जग सोडून जावे लागणार म्हणून हे निश्चित केले पाहिजे की आपल्या मृत्यूनंतर लोक आपली आठवण काय म्हणून करतील त्या प्रमाणे आपण आपले जीवन व्यतीत करावे. उदाहरण जर आपल्याला वाटत असेल की मेल्यानंतर मला सत्यवादी म्हणून ओळखले जावे तर ’’खोटं ’’ हे शब्द आपल्या जीवनाच्या शब्दकोषातून काढून टाकले पाहिजे. जर तुम्ही लोकहितचिंतक म्हणून ओळख बनवू इच्छितात तर लोककल्याणाच्या कामाला जीवनाचा उद्देश बनवायला हवे. पण हे सगळे करताना लोकांसाठी नाही तर अल्लाहला खुश करण्याची नियत ठेवली पाहिजे. अन्यथा लोकतर खुश होतील पण अल्लाहच्या दरबारी ते स्वीकार होणार नाही. 

मनुष्य आपली सगळी शक्ती खर्च करून जास्तीत जास्त पैसे कमाविण्यासाठी प्रयत्न करत असतो. का तर सुख उपभोगण्यासाठी? पण खरोखर तो खुश असतो का? त्याला सुख मिळते का? क्षणिक सुख मिळाले तरी डिप्रेशनमध्ये जाणे, मानसीक ताण जे सावरता न आल्याने आत्महत्या करून घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. 

माणूस आपल्या लेकरांच्या तेजस्वी भविष्यासाठी स्वतः झीजत असतो. तेवढ्यातच मृत्यू येतो आणि त्याला अशा भविष्याकडे नेतो ज्याची त्याने काहीच तयारी केलेली नसते. माणूस जास्तीत जास्त जीवन जगण्याची इच्छा बाळगतो परंतु, मृत्यू त्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी सज्ज असतो. 

कोणाची पदवी, कोणची लोकप्रियता, कोणाचे ऐश्वर्य, कोणाची सत्ता, काही म्हणजेच काहीच त्याला मृत्यू पासून वाचवू शकत नाही. जीवंत लोकांसाठी मृत्यू हे एक रिमायंडर आहे. 

आपण वाढदिवस साजरा का करतो? 

आपल्याला वाटते आपण मोठे झालो पण खऱ्या अर्थाने काय होते? एक एक वर्षे आपण जुनं होतो, मृत्यूच्या एक वर्ष जवळ जात असतो. आपण साजरा करत असलेल्या वाढदिवस पार्टीमध्ये मृत्यूही येवून जणू आपल्याला सांगत असतो की, तू तुझ्या नातेवाईक, मित्र मैत्रीण पासून एक वर्ष लांब गेला आणि माझ्या एक वर्ष जवळ आला आहेस. पण ही बाब आपल्या लक्षात येत नाही तर आपण मोठे झाल्याच्या भ्रमात मृत्यूचे सिलेब्रेशन करत असतो.

खरंतर आपण विचार केला पाहिजे की माझे वय एवढे झाले आणि मी काय चांगले काम केले आहे? दुसऱ्यांसाठी ? स्वतःसाठी तर जनावरे जगतात, माणसाला ईश्रवाने जनहितासाठी निर्माण केले आहे. बसून विचार करा कधी कुण्या गरीब परिवाराची मदत आपण केली आहे का? आपल्या नातेवाईकांपैकी कोणी गरजवंत तर नाही? कोणी दुःखी तर नाही? त्यांची विचारपूस करण्याचा विचार आपण केला आहे का? रंजले, गांजलेल्यांसाठी आपले नियोजन काय आहे? कधी समाजात रूजलेल्या रूढी, परंपरा पासून माणसाला मुक्त करण्याचा विचार आपण केला का? जेवढा खर्च आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी करतो तेवढा कुण्या गरजवंताला देऊन पहा मनास समाधान वाटेल नक्कीच.

आपण लहान असताना शाळेत मातीचा प्रकार शिकलेले असतो आठवते ना? पण मोठे झाल्यावर ते सगळे विसरून माणसाला दोन प्रकार दिसतात. 1. उभी माती 2. आडवी माती. आणि माणसाचा पैसा, वेळ हे सर्व आडव्या मातीला उभारण्यात खर्च होत असते म्हणजेच माणूस घर बांधणीवर त्याच्या डेकोरेशनवर खूप लक्ष देत आहे पण कधी विचार केला का एवढा खर्च करून बांधलेले आलीशान घर, बंगले, महाल सोडून माणूस का बरं जातो (माफ करा त्याला बाहेर काढले जाते)

श्वास संपला की सारे संपले असे आपल्याला वाटत असले तरी हे जग फक्त एक ट्रेलर आहे. अस्सल चित्रपट तर मेल्यानंतरच सुरू होणार. हे जीवन एक परीक्षागृह आहे. आपल्याला एक ठरावीक वेळ दिलेला आहे. (माहित नाही किती) ती संपताच आपल्याला जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, म्हणून ईश्वराने दिलेल्या प्रश्नपत्रिका आपल्याला अगदी अचूक सोडविणे गरजेचे आहे जेणेकरून जेव्हा निकाल समोर येईल तेव्हा आपण यशस्वी व्हावे.

मृत्यू अगोदर माणसाला खूप कामे दिसतात, करायची असतात, पण मृत्यूला याच्याशी काही देणे घेणे नाही, ईश्वराचा आदेश आला आणि यमदूत हजर! आपण म्हणतो एखादी व्यक्ती अपघाताने मेली हे आपल्यासाठी व त्याच्यासाठी अपघात होवू शकते पण हे पूर्णनियोजित असते. आपण जेव्हा आईच्या पोटात असतो. तीन महिन्यानंतर सगळे लिहिले जाते आपण कोठे जन्मनार, काय होणार, कोठे मरणार एवढे की (उर्वरित आतील पान 7 वर)

जेथे मरणार त्या ठिकाणची मातीही आपल्या शरीरात टाकली जाते (आहे ना अद््भूत). मेडिकल सायन्स अजून हे सिद्ध करू शकले नाही हे वेगळेपण एक दिवस जरूर सिद्ध करेन. जसं डीएनएला शोधलं ज्याच्यात आपल्या पूर्ण अस्तित्वाची माहिती असते. माणूस म्हणून ही माणसाची आत्मा नेहमीच राहणार आहे. तिला मरण नाही म्हणून आपल्याला गैरसमज होतो किंवा आपल्याला मृत्यूची आठवण सहसा येत नाही कारण आपल्या डीएनएमध्ये ती कोडिंग नाही. आपण मेल्यानंतर ही मरत नाही फक्त या जगातून त्या जगात प्रवेश करतो. प्रत्येक माणूस चालत आहे, त्याचे चालणे हे मृत्यूवर संपते. मग येथून तो उडायला लागतो, स्वर्ग किंवा नर्काकडे. आपल्याला माहित आहे की मेल्यानंतर पटकन आपल्याला स्वर्गात किंवा नर्कात टाकले जात नाही तर बरजख (एक आड पडदा) आहे. या दुनियेत आणि त्या दुनियेमध्ये. चांगल्या आत्म्यांना इल्लियीन मध्ये आकाशांच्या वर तर वाईट आत्म्यांना सिज्जिन जमीनीखाली ठेवण्यात येते. प्रलयाचा दिवस येईपर्यंत. न्यायनिवाडा होईपर्यंत. 

मृत्यूनंतर काय होते?

1. माणसाचे नाव सर्वप्रथम हरवते, लोक त्याला डेडबॉडी शव (मय्यत) म्हणून ओळखायला लागतात. ज्या नावाला गाजवण्यासाठी त्याने पूर्ण जीवन समर्पित केलेले असते. नमाजे जनाजा अदा करण्यासाठी ’जनाजा आणा’ म्हणतात. माणसाचे नाव घेऊन नाहीत म्हणत. साहेबांना कबरमध्ये घालताना ’मय्यत’ म्हटले जाते. 

2. त्याचा माल वारसदार वाटून घेतात.

3. लेकरं जगविण्यासाठी तो रात्रंदिवस एक करतो. त्याला फक्त कब्रस्तान किंवा स्मशानघाटापर्यंतच साथ देतात. परंतु त्याने केलेली पुण्याई मेल्यानंतरही साथ देते आणि त्याचा मोबदला त्याला मिळणार म्हणून चांगले कर्म करावे हेच आपला खरे इन्व्हेस्टमेंट (निवेश) आहे.

ज्यांना आपण जीवापाड प्रेम करतो ते आपल्याला सोडून का जातात? कोठे जातात? हे असे नियम का आहे? आपण याला मोडू शकतो का? आपली भेट आपल्याला सोडून गेलेल्या आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी वगैरे यांचयशी पुन्हा होऊ शकते. एक मोठी स्पेस निर्माण होते आयुष्यात प्रियजन गेल्यावर भेटावेसे वाटते पण कधी? 

वरील प्रश्नांचे उत्तर :

हे अल्लाहने केलेले नियम आहेत. प्रत्येक सजीवाला मृत्यू येणार म्हणजे येणारच. म्हणूणच आपले प्रियजन आपल्याला सोडून जातात. आपल्याला जन्म आणि मृत्यू देणारा अल्लाहच आहे. त्याच्या आदेशाविना कोणी बाळ जन्मू शकत नाही की कोणी मरू शकत नाही. बळजबरीने जसे टाईम ओव्हर झाल्याने उत्तरपत्रिका आपल्यापासून हिसकावून घेतली जाते तशीच मृत्यू येवून आपली आत्मा हिसकावणार. 

हा अल्लाहचा नियम आपण मोडूच शकत नाही. आपली भेट आपल्या पालकांशी व नातेवाईकांशी नक्की होणार आहे म्हणून उदास होऊ नका. मृत्यू ही झोपेची थोरली बहीण आहे. जसं दररोज आपण झोपेतून उठतो तसेच मेल्यानंतर ही कित्येक वर्षे ओलांडले असतील. अल्लाह प्रलयाच्या दिवशी सगळ्यांना परत उठविणार म्हणून मृत्यू हे जीवनाचा अंत आहे असं समजण्याची घोडचूक करू नका. जसं 6,7,8 तास झोपून उठल्यानंतर ही आपल्याला वाटते की काही मिनीटच आपण झोपले तसंच माणसाला प्रलयाच्या दिवशी वाटेल या जगात अर्धा किंवा एकच दिवस राहिले. 

आपल वय काय आहे? अगदी बरोबर सांगा आणि विचार करा की यांच्या आदी आपण कोठे होतो? या जगात आपण आपल्या इच्छेने आलो का? का आपण आपल्या इच्छेने आपले राष्ट्र, जिल्हा, शहर, गांव, घर, आई-वडिल, भाऊ-बहीण, पती-पत्नी, मातृभाषा, रंग, उंची वगैरे निवडले आहे का? मग हे सगळे आपल्यासाठी निवडणारा कोण? निश्चितच एक मात्र अल्लाह. आपले इतके चांगले सुंदर अस्तित्व ही अल्लाहची देणगी आहे. आभार मानावे आणि तोच आपल्याला मृत्यूही देणार. मृत्यूला चव ही असते? माहित आहे का? ’’प्रत्येक जीवाला मृत्यूचा आस्वाद घ्यावा लागणार आहे. मग तुम्ही सर्व आमच्याकडेच परतवून आणले जाणार आहात.’’ (सुरे अल अनकबूत)

म्हणून चिंता करण्यासाठी हा मुद्दा मुळीच होऊ शकत नाही की या जगात आपला जीव कसा वाचवावा. परंतु, चिंतेची बाब तर ही आहे की या जगात ईमान कसे शाबूत ठेवावे आणि ईशभक्तीची निकड कशी पूर्ण करावी. अल्लाहकडे हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांचा अंत चांगला होवो आणि मृत्यूचा आस्वाद आपल्याला चांगला लागो. (आमीन.)

- डॉ. सीमीन शहापूरे

8788327935



सोलापूरचा कुर्बान हुसेन यांच्याएवढी उपेक्षा स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कोणाच्याच वाट्याला आलेली नसेल ! वीस-एकवीस वर्षांच्या आयुष्यात कुर्बान हुसेन सातत्याने ‘रयतेचे कोतवाल व वकील’ राहिले. लोकमान्यांचा वसा घेतलेला हा तरुण संपादक. त्याने लोकमान्यांच्याच अपेक्षेप्रमाणे ‘रयतेचे वकीलपद’ स्वीकारले होते. परंतु  निर्भीड राष्ट्रीय वृत्तीचा तो मुसलमान संपादक 'साधा खुनी' म्हणून फासावर जाण्याची वेळ आली तरी महाराष्ट्रातील कोणत्याही वृत्तपत्राने त्याची दखल घेतली नाही. केसरीकारांनीदेखील त्यांचे शब्द खर्ची घातले नाही. असे का झाले असावे हे कोडे अनाकलनीय आहे. कुर्बान हुसेन यांनी सोलापूरमधील कापड गिरण्यांमधून विखुरलेल्या अठरापगड जातींचा गिरणी कामगार सर्वप्रथम ‘कामगार संघा’च्या माध्यमातून एकत्र आणला. त्या गिरणी कामगाराला अंत्रोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चळवळीशी जोडून घेतले. हजारोंच्या संख्येमध्ये असणारे सोलापूरचे गिरणी कामगार राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्याने राष्ट्रीय चळवळीची ताकद कमालीची वाढली. कुर्बान हुसेन यांचे ते कार्य साम्राज्यशाहीच्या नजरेत खुपेल असेच होते. कुर्बान हुसेन यांना लेखणीएवढीच प्रभावी वाणी लाभली होती. सोलापुरात युवक संघाचा कोणताही कार्यक्रम असा झाला नाही, की ज्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे भाषण झाले नाही.

ब्रिटिश सरकारने कुर्बान हुसेन यांना खोट्या खटल्यात अडकावले आणि त्यांना मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे यांच्याबरोबर फाशी दिले. सोलापूरचे ते चार सुपुत्र 12 जानेवारी 1931 रोजी फासावर गेले. निदर्शने व हरताळ पाळून त्या अत्याचाराचा निषेध देशभरात केला गेला. मुंबई काँग्रेसने 17 जानेवारी हा दिवस 'सोलापूर दिन' म्हणून पाळण्याचा कार्यक्रम जाहीर केला. कुर्बान हुसेन यांचा आत्मत्याग बहुसंख्य मुसलमानांच्या गावीदेखील नव्हता. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कुर्बान हुसेन यांच्याएवढी उपेक्षा कोणाच्याच वाट्याला आलेली नसेल!    

अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचा जीवनपट अवघ्या एकवीस वर्षांचा, पण अत्यंत विस्मयकारी असा. ते फ्रेममेकरच्या कुटुंबातील गिरणी कामगार तरुण, वयाच्या सतराव्या वर्षी एका साप्ताहिकाची सुरुवात करतात आणि अल्पावधीत साम्राज्यशाहीच्या रोषाचा धनी होत हौतात्म्य पत्करतात हे सारे रोमांचकारी आहे. लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा प्रभाव कुर्बान हुसेन यांच्यावर होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या साप्ताहिकाचे नाव 'गजनफर' म्हणजेच सिंह असे ठेवले होते. मुसलमान समाजात विचार जागृती करणे हा ‘गजनफर’चा उद्देश होता. ते ‘गजनफर’च्या शीर्षस्थानी ‘समतावादी आणि ऐक्यप्रवर्तक साप्ताहिक’ असा उल्लेख करत असत. कुर्बान हुसेन यांची भाषा शिवरामपंत परांजपे यांच्याशी नाते सांगणारी होती. त्यामुळे साम्राज्यशाहीच्या हस्तकांनी त्यांचा धसका घ्यावा यात नवल नव्हते. कुर्बान हुसेन स्वतः कापड गिरणी कामगार असल्याने कामगारांचे प्रश्‍न त्यांना नवे नव्हते आणि कामगारांना संघटनेची जाण नसल्याने मालकवर्ग त्यांची कशी अडवणूक करतो हे त्यांनी अनुभवलेले होते. कामगार संघटना बांधण्यात सक्रिय असल्याने खुद्द कुर्बान हुसेन यांना नोकरी गमावावी लागली होती. त्यामुळे आर्थिक आपत्ती तर नित्याचीच. ‘गजनफर’च्या प्रकाशनातही विलंब व खंड होत असे.

'गजनफर' साप्ताहिकाचा अंक

कुर्बान हुसेन यांनी ‘गजनफर’चे सुमारे शंभर अंक प्रसिद्ध केले. त्यांपैकी थोडे उपलब्ध आहेत, पण तेवढे वाचल्यानंतरही ‘गजनफर’कारांना फाशी देण्याची आवश्यकता सरकारला का भासली असावी याचा स्पष्ट अंदाज येतो. मागासलेल्या मुसलमान समाजाला राष्ट्रीय चळवळीकडे ओढणे हे काम अवघड होते. कारण त्याला विरोध होता तो स्वत:चे पुढारीपण टिकवणाऱ्या खानबहादूर आणि खानसाहेबांचा ! कुर्बान हुसेन यांना अशा धर्मबंधूंशी झगडावे लागले. त्यांनी म्हटले आहे, की “आमच्या समाजातील झब्बुशाही पुढारीवर्ग म्हणजे शुद्ध फद्दी किंमतीचा ढब्बू आहे. नुसत्या शाब्दिक चलाखीवर लोकांना झुलवून पुढारीपण कायम टिकवण्याचीच त्यांच्या रक्‍ताला सवय आहे. त्यामुळे तो निष्क्रियतेचा मूर्तिमंत पुतळा बनला आहे... त्यांचा पुढारीपणा कायम ठेवण्यासाठी तो नाही नाही ते वाममार्ग योजत असतो. त्यांचा कार्य करण्याचा वकूब नाही, त्यांना कष्ट करण्याची हिंमत नाही आणि कर्तृत्वशाली समाजसेवेची तोंडओळखही नाही ! पण त्यांना पुढारीपणाची हौस, मोठेपणाचा हव्यास आणि त्यांच्या रक्‍तात श्रेष्ठपणाची फाजील महत्त्वाकांक्षा... त्यामुळे त्यांनी किती कर्त्या नवजवानांना कारस्थानाच्या खड्ड्यात गारद केले आहे याचा समग्र इतिहास लिहिल्यास तो एक प्रचंड ग्रंथ होईल. एखादा तरुण त्याच्या तडफदार कर्तृत्वाने पुढे सरकत आहे, मुसलमान जनता त्याच्याकडे वळत आहे असे दिसून येताच या झब्बूढब्बूशाही पुढारीवर्गाने चमकत्या नवतरुणाला त्याच्याच माणसाकडून त्याच्याच मालकीच्या घराबाहेर काढवून, शहरत्याग करण्यास भाग पाडून देशोधडीला लावले आहे. अशा दुष्टबुद्धिप्रधान ढब्बूशाहीला ‘गजनफर’चा जन्म आणि त्याची अव्याहत गर्जना कशी खपणार?"  

‘गजनफर’कारांना पहिला लढा असा धर्मबंधूंशी द्यावा लागला. तो अग्रलेख हे खरे तर त्यांचे आत्मकथनच होय. साम्राज्यशाहीने हिंदू-मुसलमान अशी तेढ निर्माण करून राष्ट्रीय चळवळीला गालबोट लावण्याचा प्रयत्न चार दशकांहून अधिक काळापासून चालवलेला होता. हिदुस्थानात वेळोवेळी होणारे जातीय दंगे हे राष्ट्रीय चळवळीला मारक होत होते. हिंदू-मुसलमान ऐक्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत होती. साम्राज्यशाहीच्या प्रेरणेमधून पॅन इस्लामसारख्या चळवळी देशात मूळ धरत होत्या, त्यापासून राष्ट्रीय चळवळीला धोका आहे हे कुर्बान हुसेन जाणून होते. म्हणूनच “हिदु-मुसलमानांची अत्यल्पशी तेढसुद्धा होत असलेल्या राजकीय उलाढालीचा सत्यानाश करण्यास पुरेशी आहे. असली तेढ निर्माण करणाऱ्या आगलाव्यांचा आणि त्यांना उचलून धरणाऱ्या जात्यभिमानी प्रतिष्ठितांचा प्रत्येक राष्ट्रीयाने खरपूस समाचार घेण्यासाठी कंबर कसणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे" असे विचार त्यांच्या लेखनातून प्रकटले.

हिंदू-मुसलमानांना चिथावण्याचा जो आरोप सरकारवर येतो त्याचे निराकरण सरकारने करण्याची आवश्यकता आहे अशी सूचनादेखील ‘गजनफर’कार करताना दिसतात. मुसलमान समाजामधील जे प्रस्थापित नेतृत्व त्या काळी सोलापुरात होते त्यांनी कुर्बान हुसेन यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले. दुसरीकडे, हिंदुहिताचा बेगडी कळवळा दाखवत मुसलमानांविषयी विकृत लिखाण करणाऱ्यांनादेखील त्यांनी वेळोवेळी फटकारले. त्यामुळे सोलापुरातील हिंदुत्वनिष्ठांचीदेखील त्यांच्यावर गैरमर्जी झाली. घनश्यामदास बिर्ला हे हिंदुसभेचे पाठीराखे होते. त्यांना मानपत्र देण्याचा घाट सोलापूरच्या हिंदुत्वनिष्ठ म्युनिसिपल मेंबरांनी घातला. तेव्हा सोलापूरचे मानपत्र म्हणजे 'मजुरांचे मानपत्र' ते बिर्ला शेठजींसारख्या भांडवलवाल्याला देणे म्हणजे फाजील भाटगिरी आहे असे कुर्बान हुसेन यांनी सुनावले. त्यावर बिर्ला शेठजींना ते असेंब्लीचे सभासद असल्याने मानपत्र द्यावे असा बचाव हिंदुत्वनिष्ठांनी केला. त्यावर ‘गजनफर’कारांनी असेंब्लीचे सभासद असणाऱ्या, देशभक्त तात्यासाहेब केळकर यांना ते मानपत्र का देण्यात येत नाही असा बिनतोड सवाल हिंदुत्वनिष्ठांना केला.

कुर्बान हुसेन यांनी गिरणी कामगार संघाची सोलापुरातील शाखा बांधली. त्यांच्याकडे संघाचे सेक्रेटरीपद होते. त्यामुळे त्यांचे गिरणी मालकांशी वाद हे नित्य होत. काटकसरीच्या नावाखाली वीस-पंचवीस वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या कामगारांना ‘लक्ष्मी मिल’मधून काढून टाकले होते. मालकांची ती कारवाई म्हणजे 'सेवकद्रोह' होय असे कुर्बान हुसेन म्हणतात. त्यांनी ती नवी व्याख्याच केली ! ते म्हणतात, “तारुण्याचा काळ ज्यांनी गिरणीच्या नोकरीत खर्ची घातला म्हणजे तारुण्याच्या उसळत्या रक्‍ताचे पाणी करून ज्या नोकरीत या इमानी जीवांनी गिरणीचे हित चिंतले, त्यांनाच आता तारुण्य ओसरल्यावर बडतर्फीची गोळी घालणे हा शुद्ध बेईमानपणा नव्हे काय? पोटाला पुरत नाही म्हणून नोकराने अधिक मागितले तर तो स्वामिद्रोह, शुद्ध बेईमानपणा समजणाऱ्या या गिरणीवाल्यांचा हा शुद्ध गळेकापूपणा नव्हे काय? नोकराच्या जोमदार उत्साहाचा पूर्ण उपयोग करून घेतल्यावर आयुष्याच्या उतरणीला लागलेल्या नोकरांना असे बडतर्फ करणे म्हणजे सेवकद्रोह नाही का होत?" कुर्बान हुसेन यांनी जगभरातील कामगार चळवळीला ‘सेवकद्रोहा’ची ही नवीनच संकल्पना भेट दिली !

सोलापूरच्या युवक संघाचे अध्वर्यू होते कृ.भी. अंत्रोळीकर. योगायोग असा, की अंत्रोळीकर यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूरच्या मजूर संघाचे कार्यदेखील चालत असे आणि त्याला जोड होती ती तालीम संघाच्या कार्याची ! अशा विविध संघटनांच्या माध्यमातून सोलापूरचे तरुण राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात कार्यरत होते. सामाजिक जाणिवेचा एक प्रवाह सोलापूरच्या युवकांत निर्माण झालेला होता. त्यातूनच अनेक नवे कार्यकर्ते घडले. अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हा त्यांच्यापैकीच एक !

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत येणारा प्रत्येक सण, उत्सव याचा उपयोग लोकांचे लक्ष राष्ट्रीय चळवळीकडे वेधण्यासाठी करायचा अशी युवक संघाची कार्यपद्धत होती. त्याप्रमाणे सिद्धरामेश्वराची यात्रा, होलिकोत्सव आणि शिवजयंती यांचा उपयोग केला जाई. कुर्बान हुसेन यांनी रमजान ईदचादेखील त्यासाठी उपयोग करावा असे ठरवले. त्या निमित्ताने त्यांनी 'स्वदेशी' या विषयावर लेखन केले. ते वाचल्यावर या कोवळ्या युवकाच्या लेखणीचे भय साम्राज्यसत्तेला का वाटले याची कल्पना येते. कुर्बान हुसेन यांच्या लेखनातील जहालता काही और आहे. त्यांनी रमजान शरीफचा पवित्र महिना आत्मशुद्धीसाठीचा आहे हे सांगून 'खैरात' या विषयावर अन्नदान करण्यासाठी व ते करून पुण्याई मिळवण्याचे आवाहन केलेले आहे. ते राष्ट्रीय चळवळीशी निगडित आहे आणि उपाशीपोटी मरत असणाऱ्या देशी कामगारांची आठवण करून देणारे आहे. ते असे -  'रमजान शरीफची आनंदी 'ईद' साजरी करताना आपल्या शेजारी उपाशी-अर्धपोटी राहणाऱ्या बांधवांची आठवण झाली नाही तर सबंध महिन्याच्या उपासतापासादी उपायांनी मिळवलेली आत्मशुद्धी फोलच होईल ! परदेशी कपडा खरेदी करताना एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की रमजाने शरीफच्या उपासतापासाने पवित्र झालेल्या आपल्या शरीरावर तो चढवला जाणार आहे. आपल्या कोट्यवधी देशबांधवांच्या मुख्यत: विणकर वर्गाच्या सोन्यासारख्या संसाराला मातीत मिळवणाऱ्या, त्यांच्या अन्नात माती कालवणाऱ्या परदेशी कपड्यांची खरेदी करताना हेही लक्षात घेतले पाहिजे की डाक्का, कालिकत वगैरे प्रसिद्ध ठिकाणच्या विणकर वर्गाच्या तोडलेल्या अंगठ्यांतून वाहणाऱ्या रक्‍तात परदेशी कापडाची पैदास आहे ! दीनदुबळ्या विणकरांच्या पवित्र रक्‍ताने विटाळलेला कपडा अंगावर घालून 'ईद' साजरी केल्यास सबंध महिन्यात केलेली आत्मशुद्धी फोलच होणार नाही का?”

‘गजनफर’कार कुर्बान हुसेन यांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. तरी त्यांचे भाषेवरील प्रभुत्व डोळ्यांत भरावे असे आहे. स्वदेशीचा पुरस्कार करताना तर त्यांच्या लेखणीला आगळेच तेज चढते. ते सांगतात, “मुसलमान बंधूंनो! निदान ईदच्या पाक दिवशी तरी 'नापाक’ परदेशी कपडा अंगावर घालू नका! या आपल्या अर्धपोटी मोमीन बंधूला पोटभर अन्न घाला, म्हणजे त्यांनी विणलेला कपडा खरेदी करा आणि त्या रूपाने मिळणारे अन्नदानाचे पुण्य लाथाडू नका ! हातमागावरील कपडा घेण्याने तुमच्या खिशातून जाणारा पैसा परदेशात जात नाही तर तो या उद्‌योगधंद्यात फिरता फिरता वाढीस लागतो आणि बेकार झालेल्या आपल्या असंख्य बांधवांना भरपूर अन्न देतो हे विसरू नका. मुसलमान बंधूनो ! रमजाने शरीफच्या पवित्र महिन्याचा पवित्रपणा राखण्यासाठी स्वदेशी कपडाच खरेदी करा...”

देशप्रेमाचा तो रमजान पार पडला खरा, पण त्यानंतर काही महिन्यांतच ‘गजनफर’कार अटकेत पडले. आणि पुढे फाशी गेले !

- अनिरुद्ध बिडवे

मो.: 9423333912

महेन्द्रनगर करमाळा, (सोलापूर)

(साभार : thinkmaharashtra.com)



राष्ट्रीय प्रसारण मानक प्राधिकरणाने (एनबीएसए) गेल्या बुधवारी म्हणजे १६ जून २०२१ रोजी ‘टाइम्स नाऊ’ आणि कर्नाटकातील दोन प्रादेशिक चॅनेल्स, ‘न्यूज-१८ कन्नड’ आणि ‘सुवर्णा न्यूज’ या तीन वृत्तवाहिन्यांना २०२० च्या सुरुवातीला कोरोनाव्हायरसच्या पहिल्या लाटेदरम्यान निजामुद्दीन मरकजच्या कव्हरेजमध्ये तबलिगी जमातविरूद्ध ‘द्वेष भडकवल्या’बद्दल वेगवेगळ्या प्रमाणात दंड भरण्याचे निर्देश दिले. न्यूज-१८ कन्नडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि २३ जून रोजी प्राइम टाइम (रात्री ९ च्या आधी) मजकूर आणि आवाज या दोन्हींमध्ये माफी मागण्यास सांगितले तर सुवर्णा न्यूजला ५०,००० रुपये दंड भरण्याचे निर्देश देण्यात आले. दोन्ही प्रादेशिक चॅनेलना त्यांच्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया चॅनेलवरून सात दिवसांच्या आत 'घृणास्पद' सामग्री काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. २०२० मध्ये ‘कॅम्पेन अगेन्स्ट हेट स्पीच’ (सीएएचएस) ने दाखल केलेल्या तक्रारींनंतर ‘एनबीएसए’ने हे आदेश जारी केले. या तक्रारीत हे अधोरेखित करण्यात आले होते की द्वेषपूर्ण भाषण संपूर्ण समुदायांना अमानवी बनवते आणि त्यांना सजग हिंसाचाराचे लक्ष्य बनवते. २०२० मध्ये स्थापन झालेला तक्रारदार सीएएचएस प्रसारमाध्यमांमध्ये विकल्या जात असलेल्या अल्पसंख्याक समुदायांविरूद्ध द्वेषपूर्ण सामग्रीचा मागोवा घेतो. त्यानंतर या गटाने एनबीएसए आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे जाऊन नैतिक आणि सांस्कृतिक मानकांचे उल्लंघन केल्याबद्दल टीव्ही चॅनल्स आणि प्रकाशनांना पूर्णतः जबाबदार धरले.

एनबीएसए ही न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनची (एनबीए) नियामक संस्था आहे, जी भारतातील विविध चालू घडामोडी आणि वृत्तदूरचित्रवाणी प्रसारकांची खाजगी संघटना आहे. एनबीएसए ने आदेशात म्हटले आहे की, हे कार्यक्रम पूर्वग्रहदूषित, प्रक्षोभक होते आणि विशिष्ट धार्मिक गटाच्या भावनांची कोणतीही चिंता न करता संवेदनशीलतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. प्रसारित करण्यात आलेली सामग्री ‘शुद्ध अनुमानावर’ आधारित होती आणि स्वर, कार्यकाल आणि भाषा ‘मूर्ख, पूर्वग्रहदूषित आणि अनादरपूर्ण’ होती. तसेच या चॅनेल्सच्या कार्यक्रमांनी द्वेषाला प्रोत्साहन दिले आणि ते पसरवले ज्यामुळे लोकांच्या जीवनावर परिणाम झाला असावा. एनबीएसएला नीतिशास्त्र आणि प्रसारण मानकांच्या संहितेचे उल्लंघन करणाऱ्या चॅनेल्स आणि निःपक्षपातीपणा आणि वस्तुनिष्ठतेशी संबंधित स्वयं-नियमनाच्या तत्त्वांविरूद्ध दंड जारी करणे बंधनकारक आहे. त्यात असे आढळले की अभेद्य कार्यक्रम वांशिक आणि धार्मिक सलोख्याशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन देखील आहेत.

प्रसारण वॉचडॉगने टाईम्स नाऊला "टेलिकास्टिंगसाठी फटकारले... एका संवेदनशील विषयावर एक कार्यक्रम ज्यामुळे समुदायांमध्ये जातीय मतभेद निर्माण होऊ शकतात" आणि प्रसारकाला सल्ला देण्यात आला आहे की "त्या व्यक्तींना पॅनेलिस्ट बनण्यापासून टाळावे जे सार्वजनिक क्षेत्रात ओळखले जातात आणि त्यांची मते विक्षिप्त आणि टोकाची मते आहेत".

भारतीय मुस्लिमांना प्रसारमाध्यमांमध्ये नेहमीच वाईट कव्हरेज मिळते आणि सकारात्मक कव्हरेज मिळू शकेल असे काहीही नेत्रद्दीपक न केल्याबद्दल या समुदायावर दोषारोप केला जातो. देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याकांविरूद्ध स्वातंत्र्यानंतर सुरू असलेली ही खूप काळ प्रचारात असल्यामुळे नाविन्य नष्ट झालेली एक कथा आहे. मुस्लिम शेवटच्या टप्प्यावर आहेत, आत्म्यांना शोधत आहेत, त्यांच्या नसलेले दोष स्वत:मध्ये शोधत आहेत कारण कारण दोषपूर्ण रेषा मीडियामध्ये आहेत ज्याने संपूर्ण समुदायाला काळ्या ब्रशने माखले आहे.

भारतीय माध्यमे मुस्लिमांची इतकी अवहेलना का करतात? मुस्लिमांच्या प्रसारमाध्यमांच्या कव्हरेजमध्ये येण्यापूर्वी भारतीय माध्यमांचे स्वरूप आणि चारित्र्य आणि समाजाला आकार देण्यात ती काय भूमिका बजावते हे समजून घेणे आवश्यक आहे. 

१९९० च्या दशकात जेव्हा प्रसारमाध्यमे सरकारी नियंत्रणातून बाहेर पडली आणि कॉर्पोरेट कार्टेलने या संप्रेषण नेटवर्कवर नियंत्रण ठेवणे सुरू केले तेव्हा काही वेळातच प्रसारमाध्यमांची संख्या वाढली आणि सर्वांवर व्यावसायिक आस्थापनांचे नियंत्रण आले. या कॉर्पोरेट माध्यम आस्थापनांची दुहेरी उद्दिष्टे होती, एक नफा कमावण्यासाठी आणि दुसरे म्हणजे त्यांच्या स्वत:च्या मोठ्या व्यावसायिक हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी सरकारची बाजू घेणे.

येथे प्रचंड वाचकवर्ग / प्रेक्षकवर्ग आणि प्रचंड जाहिरात सूचीबद्ध करण्यासाठी त्याच्या प्रभावी घटकामुळे नकारात्मक बातम्यांची मोठी भूमिका आहे. इस्लामशी संबंधित या धारणेतील नकारात्मक सामग्रीमध्ये मुस्लिम, इस्लामी जिहाद, काश्मीर आणि पाकिस्तान या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बातम्या आहेत. याचे कारण त्या हिंदू बहुसंख्य समुदायात मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग / प्रेक्षकवर्ग निर्माण करतात आणि त्या मुस्लिमांशी संबंधित असल्याने या भोवऱ्यात अडकतात. माध्यमांचा मूलभूत निकष म्हणजे मोठ्या वाचकवर्ग/प्रेक्षकसंख्या मिळविण्यासाठी प्रभावी घटक असू शकणाऱ्या बातम्या शोधणे ज्या महसूल निर्मितीत रूपांतरित होऊ शकतात. माध्यमांमध्ये असा गैरव्यवहार आता काही काळापासून सुरू आहे आणि मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्यापक परंपरा बनली आहे आणि सर्व प्रकारची माध्यमे चांगले आर्थिक परतावा मिळविण्यासाठी पत्रकारितेच्या या मॉडेलचे समर्थन करतात. माध्यमांमध्ये प्रचंड वर्गणी आणि जाहिराती आणण्यासाठी मुस्लिमांची नकारात्मक प्रोफाइलिंग काश्मीरविरोधी, पाकिस्तानविरोधी नेहमीच्या गोष्टींव्यतिरिक्त सामान्यत: इस्लामी जिहाद, लव्ह-जिहाद, निकाह हलाला, तिहेरी तलाक, मुस्लिम वैयक्तिक कायदा, गोमांस खाणे, तबलिगी जमात इत्यादी मुद्द्यांचा वापर करण्यात येतो. 

भारतात मुस्लिमांना प्रसारमाध्यमांमध्ये वाईट कव्हरेज मिळण्याची आणखी काही कारणे आहेत. २०१४ मध्ये विद्यमान सरकार सत्तेवर आल्यापासून देशात मुस्लिमविरोधी वातावरण वाढविण्यासाठी सुनियोजित आणि सुव्यवस्थित राजकीय प्रकल्प सुरू आहेत. येथे असे गेम प्लॅन अंमलात आणण्यासाठी माध्यमांची मदत घेतली जाते. परिणामी, भारतीय प्रसारमाध्यमे आता सरकारी प्रचार कमी करू लागली आहेत. एक कुटिल मन मुस्लिमांविरूद्ध जे काही करू शकते ते भारतीय माध्यमांनी बनावट आणि प्रमाणाबाहेर केले आहे. हे बहुसंख्य समुदायात भीती निर्माण करण्यासाठी आहे ज्यामुळे ते मुस्लिमांचा द्वेष करू लागतील आणि त्याच वेळी जातीय हिंसाचाराद्वारे लक्ष्य केल्याबद्दल मुस्लिम समुदायात भीती निर्माण होऊ शकते. प्रसारमाध्यमांनी मुस्लिमांवर आघात केल्याने हिंदू व्होट बँक मजबूत होईल, या सरकारच्या कथनाला यामुळे चांगलेच बळ मिळते.

मुस्लिमविरोधी बातम्यांमध्ये बहुसंख्य समुदायावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व शाब्दिक मसाला कपोलकल्पित असल्यामुळे बहुसंख्य माध्यमांनी भारतीय मुसलमानांविरूद्ध धर्मांधपणाचे आणि द्वेषाचे प्रदर्शन केल्याचे आढळून येते. यामुळे त्यांना सरकारच्या चांगल्या नियोजनांमध्येही ठेवण्यात आले आहे कारण यामुळे सत्ताधारी व्यवस्थेच्या राजकीय अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या हिंदुत्ववादी अजेंड्यास चालना देण्यात मदत होते. राजकीय फायद्यासाठी समाजाला जातीयवादी करण्यासाठी हिंदुत्वच्या सहकार्याचे माध्यम कोब्रापोस्टडॉटक़ॉम वेबसाइटच्या शोध पत्रकारांनी महत्त्वाच्या माध्यमांशी संपर्क साधला आणि सत्ताधारी पक्षाला राजकीय फायदा मिळवण्यासाठी समाजात जातीयवाद पसविण्यासाठी व हिंदुत्व सामग्री प्रकाशित / प्रसारित करण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात पैशांची ऑफर दिली. सर्व प्रसारमाध्यमांनी समाजात जातीय कलह निर्माण करण्यासाठीच्या मोहिमांमध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शविली आणि जातीय आधारावर समाजाचे ध्रुवीकरण करण्यास तयार असल्याचे उघड झाले, जेणेकरून त्यांना राजकीय लाभांश मिळू शकेल. ही गोष्ट कोब्रापोस्टडॉटकॉम ने २०१८ मध्ये उघडकीस आणली.

गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथे अडकलेल्या तबलिगी जमात सदस्यांचे मीडिया कव्हरेज हे मुस्लिमांबद्दल द्वेषपूर्ण मोहीम राबवण्यासाठी मीडियाद्वारे सरकारच्या सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण होते. विमानतळावरच परदेशी तबलिगी सदस्यांची चाचणी न केल्याबद्दल सरकारवर टीका करण्याऐवजी, प्रसारमाध्यमांनी तबलिगी जमात आणि मुस्लिमांना देशात कोरोना विषाणू आणण्यास जबाबदार धरले. मात्र मार्चच्या अखेरीस हिंदू मंदिरांतील मंडळींना परवानगी का दिली, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी सरकारला विचारला नाही आणि त्याआधी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ते मरकजवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते.

पत्रकारितेच्या नीतिमत्तेच्या बाजूने उभे राहण्याऐवजी प्रसारमाध्यमांनी तबलिगी जमातने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजाला राक्षसी बनवणे पसंत केले. ही एक सुनियोजित योजना होती, जिथे सरकारच्या व्होट बँकेचा खप, जाहिराती आणि नियोजन या सर्वांचा समावेश होता. तबलिगी जमातच्या बातम्यांच्या कव्हरेजमध्ये भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये इस्लाम आणि मुस्लिमांविरूद्ध कट्टरतेबद्दलची एक पॅथॉलॉजिकल व्यस्तता आणि वेड निर्माण झाले होते. प्रसारमाध्यमांनी मुस्लिमांविरुद्ध केलेल्या या जोरदार टीकेमुळे तबलिगी मरकजची अकाल तख्त आणि काहींनी मौलाना साद यांची संत जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी तुलना केली.

प्रसारमाध्यमांद्वारे मुस्लिमांवरील अशा द्वेषपूर्ण आघातामुळे सामाजिक पातळीत प्रचंड घसरण होते. दिल्लीतील तबलिगी जमातच्या कृत्यांसाठीच देशभरातील मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आले, भारतात अनेक ठिकाणी रस्त्यावर अत्याचार करण्यात आले. भाजपच्या अनेक आमदारांनी हिंदूंना मुस्लिम भाजी विक्रेत्यांवर बहिष्कार घालण्यास आणि त्यांना त्यांच्या परिसरात प्रवेश न देण्यास उघडपणे सांगितले. प्रसारमाध्यमांनी केलेल्या हल्ल्यामुळेच जातीय ध्रुवीकरणाच्या अशा निंदनीय घटनेचे वृत्तवाहिन्यांवर प्रसारण केले गेले. मुस्लिमांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या बातम्यांकडे सुलभतेने दुर्लक्ष केले गेले. हिंदू समाजात राजकीय चळवळीसाठी एकतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने मुस्लिमांचे नकारात्मक प्रोफाइलिंग निश्चितपणे केले गेले आहे. वाचकांवर आणि प्रेक्षकांच्या मनावर जास्तीत जास्त प्रभाव निर्माण करण्यासाठी हे केले जात आहे. निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या 'आम्ही विरुद्ध ते' या जादूई राजकीय फॉर्म्युल्यावर लक्ष केंद्रित केले गेले.

अशा सुविचारी राजकीय योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रसारमाध्यमे हा एक गट आहे. मुस्लिमांच्या नावाने समान शत्रू विकसित केल्याने आणि हिंदू घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केल्याने सत्ताधारी त्यांचे तारणहार बनतील त्यामुळे त्यांची व्होट बँक सुरक्षित होईल अशी रणनीती आहे. असे करताना, मुस्लिमविरोधी बातमीचा परिणाम आणि अशा नकारात्मक अहवालाचे मूल्य त्यांना श्रीमंत बनवू शकते हे माध्यमांना चांगले ठाऊक आहे. त्याचबरोबर हेदेखील त्यांना माहीत आहे की मुस्लिमांकडे त्यांच्याविरूद्ध अशा हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी कोणतेही साधन नाही. याचे कारण मुस्लिमांच्या मदतीला धावून येऊ शकणारे सरकारचे भागीदार हे सरकारसमर्थक आहेत आणि मुस्लिमविरोधी प्रचारामुळे सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा होणार असल्याने ते प्रसारमाध्यमांच्या मुस्लिमविरुद्ध द्वेषाचे उघड प्रदर्शनाकडे दुर्लक्ष करतात.

भारतातील मुस्लिमांनी त्यांना वाईट कव्हरेज देण्याऱ्या माध्यमांच्या आणि सरकारच्या सहकार्यात्मक प्रयत्नांच्या विरोधात उभे राहण्याची हीच खरी वेळ आहे. ‘गोदी मीडिया’विरुद्धच्या लढाईत मुस्लिमांनी उभे राहून, एकत्र येऊन देशात माध्यम प्रकल्प सुरू करण्यासाठी आघाडी करावी लागते. टीव्ही मीडिया, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅप नेटवर्किंग ग्रुप्सच्या युगात मुस्लिम समुदायाची स्वतःची माध्यमे येईपर्यंत असा कोणताही लढा निर्माण होऊ शकत नाही. पण आतापर्यंत तथाकथित 'गोदी मीडिया'च्या अशा प्रकारच्या अपमानाला तोंड देण्यासाठी कोणताही मजबूत मीडिया प्लॅटफॉर्म स्थापन करण्यात मुस्लिमांना सपशेल अपयश आले आहे. तथाकथित 'गोदी मीडिया'ने केलेल्या मुस्लिमविरोधी प्रचाराला प्रतिसाद देऊ शकणाऱ्या समविचारी लोकांचा उच्चभ्रू गट तयार करण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी पुढे येण्याची वेळ आली आहे. मुस्लिम उच्चभ्रू गट आणि समविचारी बिगर मुस्लिम एकत्र येऊ शकतात आणि भारताच्या माध्यम बाजारपेठेत आपला वाटा कसा वाढवावा याबाबतच्या योजना आखू शकतात.

एक प्रमुख मीडिया हाऊस स्थापन करण्यासाठी आणि मुस्लिमविरोधी द्वेष पसरवणाऱ्या प्रसारमाध्यमांना प्रत्युत्तर देण्यासाठी संसाधने असलेल्या मुस्लिमांशी हातमिळवणी करण्याची गरज आहे. असे करण्यात अडचणी आहेत, परंतु असा एक प्लॅटफॉर्म आहे जेथे मुस्लिमांना अपेक्षित असलेली माध्यमे अजूनही देशात कार्यरत राहू शकतात. जर असे माध्यम व्यावसायिकरित्या सत्य आणि शोधपत्रकारांच्या ट्रेलब्लेझरद्वारे चालवले जात असेल, तर अशा माध्यम प्लॅटफॉर्मचा भारतीय समाजावर नक्कीच प्रामाणिक आणि अर्थपूर्ण परिणाम होईल.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

भ्रमणध्वनी : ८९७६५३३४०४


निश्चितच रात्र आणि दिवसाच्या एकापाठोपाठ येणे अवकाश आणि पृथ्वीमध्ये जे काही निर्माण केले गेले आहे त्यामध्ये प्रामाणिक लोकांसाठी संकेत आहेत. (पवित्र कुरआन-१०:०६)

रात्र आणि दिवस हे सातत्याने आणि अविरतपणे चालू आहेत. यामध्ये फार मोठे बोध आहेत. रात्र विश्रांतीसाठी मानली जाते तर दिवस उद्योगशीलतेस चालना देतो. अंधकारांची तुलना संकटांशी केली जाते. त्यानंतर येणारा प्रकाशमान दिवस पुन्हा सुखसमृद्धीची चाहूल देतो. रात्र आणि दिवस यांमधील फेरबदल निराशेकडून आशेकडे स्थित्यंतर मानले जाते. त्याचबरोबर रात्र आणि दिवसाचे एकापाठोपाठ येत राहाणे हे पृथ्वी गोल असल्याचे वैज्ञानिक सत्य आहे. तसेच त्याच्या फेराफेरीने दिनगाणन करणे शक्य होतो. माणसाने उघड्या डोळ्यांनी जर निसर्गाचे अवलोकन केले तर अनेक अचंबित करणारी सत्ये उकलू शकतात. निसर्गामुळे माणसाचे जीवन सुखी-समाधानी व्हावे म्हणून अल्लाहने मुक्त हाताने देणग्या दिल्या आहेत, किंबहुना देणग्यांचा वर्षाव केला आहे.

तोच आपल्या कृपेची शुभवार्ता देणाऱ्यास पाठवतो. मग त्या ढगांच्या जड ओझ्यांनी भरले जातात. त्यांना मृत शहरांकडे (कोरड्या ओस पडलेल्या जमिनीकडे) पाठवतो. आणि त्या ढगांतून पाऊस वर्षवतो. त्याद्वारे सर्व प्रकारची पिके येतात. चांगल्या जमिनीतून चांगलीच पिके येतात आणि वाईट जमिनीतून निकृष्ट दर्जाची पिके निघतात. (पवित्र कुरआन-७:५७)

पाऊस पडण्याची प्रक्रिया आणि त्या पावसाने कोणत्या जमिनीत कसले पीक येते याचे उदाहरण देऊन अल्लाहच्या सांगण्याचा असा अर्थ आहे की त्याची कृपा प्रत्येक माणसाला लाभते, पण त्या कृत्यापासून जी माणसे चांगल्या वृत्तीची, सदाचारी असतात आणि जे दूरदृष्टीचे लोक असतात त्यांना अल्लाहच्या कृपेचा लाभ होत नसतो.


शिष्टाचाराचे महत्त्व

माणसाने धैर्याने वागावे. आपल्या वर्तणुकीत दृढता असावी. मनाची अस्थिरता नको. आपला स्वार्थ साधण्यासाठी खोटे-नाटे बोलू नये. अल्लाहच्या नावाने खोट्या शपथा घेऊ नये. भ्याड आणि मनाने कमकुवत असतात ती माणसे खोट्या शपथांचा आश्रय घेतात. सत्याने वागणाऱ्या माणसांच्या संगतीत राहाण्याने सत्याबद्दलची वृत्ती वाढते, चुकीच्या मार्गाने जाण्यास कुणी धजत नाही. अत्याचार आणि दुष्कृत्यांपासून तो आपोआप विभक्त होतो. या आदेशांचा कुरआनात ठिकठिकाणी उल्लेख आला आहे. “अल्लाह धैर्यवानांबरोबर असतो. त्याला दृढनिश्चयी लोक आवडतात. अल्लाहच्या नावाने खोटे बोलणारा अत्याचारी आहे. भुसभुशीत जमिनीवर बांधलेली इमारत टिकत नाही. अल्लाह न्यायाचा, भलाईचा आणि नातेवाईकांना देण्याचा आदेश देतो. निर्लज्जता, दुष्कृत्य आणि अत्याचारांपासून रोखतो. तुम्हाला बोध गृहण करण्याचे आदेश देतो. अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो. तुम्ही ज्या गोष्टी अमलात आणत नाहीत अशी गोष्ट इतरांना सांगावी हे अल्लाहला आवडत नाही. वाह्यात गोष्टीकडे लक्ष देऊ नका. असत्याचे साक्षी बनू नका. उत्पात माजवणाऱ्यांना अल्लाह पसंत करत नाही. जर सत्य गोष्ट तुमच्या जवळच्यांच्या विरोधात जात असेल तरी सत्याची कास सोडू नका. अल्लाह अत्याचारींना मार्गदर्शन करत नाही. त्यांना चांगल्या प्रकारे जाणतो. ज्या लोकांना धनसंपत्तीची लालसा असते त्यांचे अधःपतन होते.” (पवित्र कुरआन)

माणसाने दिलेला शब्द पाळावा. दिलेला शब्द मोडल्यास माणसाची विश्वासार्हता नष्ट होते. तात्पुरत्या फायद्यासाठी केव्हाही असत्याची बाजू घेऊ नये. अत्याचारी माणसांचे नैतिक अधःपतन अटळ असते. असा माणूस अल्लाहच्या नजरेतून खाली उतरतो. त्याला एक दिवस अल्लाहसमोर उभे राहायचे आहे याची त्याने जाण ठेवावी.

- सय्यद इफ्तिखार अहमद



देशातील लोकसभा निवडणुका अजून लांब असल्या तरी विरोधी पक्षांनी आतापासूनच मोर्चोबांधणीला सुरुवात केली ही चांगली बाब आहे. गेली सात वर्षे चाललेला देशाचा कारभार आम नागरिकांपासून राजकारणी, विचारवंत, पत्रकार मंडळी सर्वांनीच पाहिला आहे. भारत देशोधडीला लागला असतानाही सध्याच्या सत्ताधाऱ्यांना याची तिळमात्र देखील चिंता नाही, हीच सर्वांत मोठी चिंतेची बाब आहे. देशात जे काही घडत आहे त्याला विविध कारणे असू शकतील. कोरोनामुळे आर्थिक स्थिती कशी खालावली याला कुणी जबाबदार नसले तरी जे काही घडत आहे त्यावर मात करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत, ही मोठी चिंता! सध्याच्या सरकारला नेमके काय हवे आहे हे जनतेसमोर येत नाही. त्यांच्या मनात देश कोणत्या पातळीपर्यंत पोलोचवायचा आहे हे ते सांगत नाहीत. त्यांचा खरा अजेंडा काय हे कळू देत नाहीत. म्हणून नागरिक आणि त्याचबरोबर इतर पक्ष आणि विचारवंत, कायदेतज्ज्ञ, पत्रकार वगैरे यावर विचारविनिमय करण्यासाठी शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जमले होते. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रमंच याद्वारे सभेचे आयोजन केले गेले. सुरवाताली आगामी निवडणुकांविषयी कोणती रणनीती आखली गेली नसली तरी असा विचार या देशाच्या राजकीय आणि वैचारिक शक्तींनी केला ही महत्ताची गोष्ट आहे.

या बैठकीत इतर विरोधी पक्ष सपा, आप, लोकदल वगैरे आठ पक्षांना निमंत्रण दिले गेले होते. यात काँग्रेसला वगळण्यात आले हा सध्याच्या रणनीतीचा भाग असावा कारण प्रत्येकाला माहीत आहे की देशात जर दुसरी आघाडी निर्माण करायची असेल तर काँग्रेसला वगळून चालणार नाही, तसे केल्यास ही दुसरी नव्हे तर तिसरी आघाडी होईल. आणि भूतकाळात तिसऱ्या आघाडीचे राजकारण यशस्वी झाले ले खरे असले तरी काँग्रेस पक्ष आधी बाहेरून पाठिंबा देते नंतर तो पाठिंबा काढून पहिल्या आघाडीची वाट मोकळी करत असतो, हा त्या पक्षाचा इतिहास आहे. याचे कारण नेहरू-गांधी वगळता उर्वरित काँग्रेस पक्षाची वैचारिक बांधिलकी संघाशी आहे. म्हणून काँग्रेसला बाहेर ठेवणे म्हणजे सुरुवातीला धोका पत्करण्यासारखे आहे. शिवाय इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसची स्थिती आजदेखील बरी आहे. सर्वांत जास्त खासदार आणि प्रांतीय विधानसभा त्याच्याकडे आहेत.

लोक म्हणतील म्हणजे विरोधी, शरद पवार यांची पंतप्रधान व्हायची संधी दोन वेळा हुकल्याने ते पंतप्रधान होण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्नात आहेत. ही जरी वास्तविकता असली तरी देशात आजच्या घडीला पवारांसारकखा दुसरा कोणताही नेता पंतप्रधान होण्याच्या लायकीचा नाही आणि दुसरे असे की कोणता नेता देशभरात असा असेल ज्याला पंतप्रधान होणे आवडणार नाही?

खरे पाहता शरद पवारांची मोठी चूक १९९८ सालीच झाली, जेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादीची स्थापना केली होती. ते कितीही दूरदर्शी असले तरी १९९८ नंतरची देशातील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे हे त्यांना कळाले नव्हते. ते भाजपकडून सोनिया गांधी यांच्या घराणेशाही आणि परदेशी मूळच्या राजकारणाला बळी पडले. त्यांना हे दिसले नव्हते की काँग्रेस पक्षात देशपातळीवरचा एकही नेता असा नव्हता जो पंतप्रधानपदाच्या लायकीचा असावा. त्यांनी पक्ष सोडला. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह रावांना पंतप्रधान करण्यात आले, त्या वेळी पवार काँग्रेसमध्ये होते. नरसिंह रावांना त्यांचे आव्हान नको होते. म्हणून त्यांनी पवारांना महाराष्ट्रात पाठवून दिले होते. पण नरसिंह रावांनंतर शरद पवारांना पंतप्रधान होता आले असते. त्यांनी अशा वेळी पक्ष सोडला जेव्हा काँग्रेस पक्षाला २००९ च्या निवडणुकीत यश मिळाले खरे पण पंतप्रधानपदासाठी त्या पक्षाला मनमोहन सिंग यांची निवड करावी लागली होती. या काळात जर ते काँग्रेस पक्षात असते तर त्यांना नक्कीच पंतप्रधानपदी बसवण्याव्यतिरिक्त काँग्रेसकडे पर्याय नव्हता.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७



statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget