Halloween Costume ideas 2015
Latest Post


पती-पत्नींत, भावा-भावात, भाऊ-बहीणीत, बहिणी-बहीणीत, आईवडील-मुलांत, सासु-सुणेत, शेजारी-शेजारी राष्ट्रांमध्ये भांडण लावणारा कोण आहे तो? कोण आहे तो माणसाला धर्म, जातपात मध्ये विभाजीत करणारा? कोण आहे तो माणसामध्ये धर्माच्या मोठ-मोठ्या भिंती उभी करणारा? कोण आहे तो धर्माचा नाव होऊन माणसात भांडण लावणारा? कोण आहे तो माणसाला निर्दयी, पापी, दुष्ट बनविणारा? कोण आहे तो दारू पिण्यास, गुटखा खाण्यास, बिडी, सिगारेट, तंबाखू, गांजा, चरस, जुगाराचे व्यसन लावणारा?

भ्रष्टाचार, व्याभिचार, सामुहिक, बलात्कार, आत्महत्या, व्याजाचे व्यवहार या सर्व गोष्टी करण्यास माणसास प्रवृत्त करणारा कोण आहे तो? न दिसणारा, पण आपल्या शरीरात रक्तासारखा भ्रमण करणारा, आपल्या मनात, डोक्यात विविध प्रकारचे वाईट विचार आणणारा कोण आहे तो? समस्त मानवजातींचा शत्रू कोण आहे आहे ते त्याला आपला हेवा आहे, मत्सर आहे, इर्शा आहे. त्याला आपण चांगले राहिलेले पहावत नाही आणि आपणही दुःखी, नाऊमेद झाल्यास तो खूप आनंदीत होतो. तो आपल्याला स्वर्गात जाण्यापासून रोखण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्याची मनोकामना आहे की आपण त्याच्यासोबत नर्कात जावेे. 

पवित्र रमजान महिन्यात तो बंदीस्त होता आता परत रमजान समाप्त झाले की तो सुटला आहे त्याचे अनुयायी आपल्या सोबत आहेत. होय तो सैतान आहे!   

शैतानाच्या प्रमुखाचे नाव इब्लीस आहे. ज्याने अल्लाहच्या आदेशाची अवज्ञा केली आणि आदम (अलैसलाम) यांच्या संततीच्या आधीन राहण्यास नकार दिला. यालाच शैतान म्हटले आहे. हे केवळ एखाद्या शक्तीचे नाव नसून ते सुद्धा मानवाप्रमाणे एक निश्चित असे व्यक्तीमत्व धारण केलेले  अस्तित्व आहे म्हणून कुरआन खुलासा करतो की शैतान, जिन्नपैकी होता जे इशदूत (फरिश्ते) पेक्षा वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. 

मानवाच्या निर्मिती अगोदर अल्लाहने फरिश्ते (इशदूत) आणि जिन्न यांची निर्मिती केली होती. आदम आणि हव्वा (अलैसलाम) यांच्या सत्य घटनेस नाकारणे म्हणजे येणाऱ्या पिढीने कोरोनाला नाकारणे होय. 

जगातील तीन मोठे धर्मांचे अनुयायी म्हणजेच  ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लामचे अनुयायी आदम आणि ईव्ह च्या घटनेला सत्य मानतात. एखादी गोष्ट आपल्यासमोर नाही घडली की त्याला नाकारायचेच का? आदम आणि इवचे अस्तित्व नाकारणे म्हणजे आपले आई-वडिलांना नाकारने आपले अस्तित्वच त्यांचा पुरावा आहे. 

कुरआनमधील सुरे अलऐराफ (11-25) मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे की,

11) आम्ही तुमच्या निर्मितीचा प्रारंभ केला मग तुम्हाला स्वरूप दिले मग दुतांना सांगितले की,  आदम समोर नतमस्तक व्हा (सज्दा करा) या आज्ञेनुसार सर्व नतमस्तक झाले परंतु इब्लीस नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. 

12) विचारले, ’’तुला कोणत्या गोष्टीने नतमस्तक होण्यासून रोखले. जेव्हा मी तुला आज्ञा दिली होती? ’’म्हणाला’’ मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तू मला अग्नीपासून निर्माण केले व त्याला मातीपासून. 13) फरमाविले, असे होय, तर तू येथून खाली उतर, तुला, अधिकार नाही येथे मोठेपणाचा अहंकार करावा. चालता हो, की वस्तूतः  तू त्यांच्यापैकी आहेस जे स्वतः आपला अपमान इच्छितात. 

14)  तो म्हणाला, ’’ मला त्या दिवसापर्यंत सवलत दे, जेव्हा हे सर्व दुसऱ्यांदा उपस्थित केले जातील. 15. फर्माविले, ’’ तुला सवलत आहे.  16. म्हणाला, ’’ बरे तर ज्या तऱ्हेने तू मला मार्गभ्रष्ट केले आहेस, मी सुद्धा आता तुझ्या सरळ मार्गावर असलेल्या या मानवाच्या पळतीवर राहीन.  17. पुढून आणि मागून, उजवीकडून व डावीकडून चोहोबाजूंनी मी त्यांना घेरेन आणि तुला त्यांच्यापैकी बहुतेक कृतज्ञ आढळणार नाहीत. 18. फर्माविले, चालता हो येथून, अपमानित व धिःकारित. विश्वास ठेव की यांच्यापैकी जे तुझे अनुकरण करतील तुझ्यासहीत त्या सर्वांनिशी नरक भरून टाकीन. 

19. आणि हे आदम तू आणि तुझी पत्नी दोघे या स्वर्गामध्ये रहा. येथे जी वस्तू खाण्याची तुमची इच्छा असेल खा, परंतु, त्या वृक्षाच्या जवळ फिरकू नका, नाहीतर अत्याचाऱ्यांपैकी व्हाल. 

20. मग शैतानने त्यांना बहकाविले जणेकरून त्यांचे गुप्तांग जे एकमेकांपासून लपविले गेले होते त्यांच्या समोर उघड झाले. त्याने त्या दोघांना सांगितले. ’’ तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला या वृत्ताची जी मनाई केली आहे त्याचे कारण याशिवाय काहीही नाही की एखाद्या वेळेस तुम्ही देवदूत बनू नये अथवा तुम्हाला अमरत्व लाभू नये.

21. आणि त्याने शपथ घेउन त्यांना सांगितले की मी तुमचा खरा हितचिंतक आहे. 

माणूस आपल्या हितचिंतकावर खूप विश्वास करतो आणि कोणी शपथ घेउन सांगतो तर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. 22. अशा प्रकारे त्या दोघांना फसवून त्याने हळूहळू आपल्या वळणावर आणले. सरतेशेवटी जेव्हा त्यांनी त्या वृक्षाचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघडे झाले आणि ते आपल्या गुप्तांगाना स्वर्गातील पानांनी झाकू लागले तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना पुकारले, ’’काय मी तुम्हाला त्या वृक्षापासून रोखले नव्हते आणि म्हटले नव्हते की शैतान तुमचा उघड शत्रू आहे? 

23. दोघे बोलते झाले, ’’हे पालनकर्त्या आम्ही स्वतःवर अत्याचार केला, जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस व दया केली नाहीस तर खचितच आम्ही तोट्यात राहू’’ 24. फर्माविले, ’’ चालते व्हा, तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि तुमच्यासाठी एका विशिष्ट मुदतीपर्यंत पृथ्वीवर निवासस्थान व जीवनसामग्री आहे. 25. आणि फर्माविले, तेथेच तुम्हाला जगणे व तेथेच मरणे आहे आणि त्यातूनच तुम्हाला सरतेशवेटी काढले जाईल. 

या आयातींमधून आपल्याला स्पष्ट होते की कसं शैतानाने अहंकार आधीन जाऊन अल्लाहची अवज्ञा केली व अल्लाहच्या मार्गावर मानवाला चालू न देण्याची जणू शपथच घेतली आहे. आधी समस्त मानवजात एक अल्लाहच्या मार्गावर होती शैतानने मार्गभ्रष्ट करून माणसांत धर्म-जात-पात निर्माण केली. 

सैतानच्या चाली (ट्रिक्स)

1. लोकांना त्यांच्या परमेश्वर (अल्लाहच्या) उपासनेपासून रोखणे.

2. वाईट गोष्टींना चांगले करून दाखविणे जसं की मेकअप केल्यानंतर चेहरा चांगला दिसतो पण तो काही वेळासाठीच. मेकअप हा पूर्णपणे उणीवांना भरत नाही तर फक्त वरवरच चांगले भासवितो. तसेच शैतान व्याजाला नफा (इंट्रेस्ट) नाव देऊन कधी ... म्हणून त्याला चांगले करून दाखवतो, दारूला हेल्थ आणि बॉडी बिल्डींगचे आणि दुःख विसरण्याचे साधन म्हणून दाखवितो. 

3. दारू, जुगार मार्फत लोकांत शत्रूत्व घालतो. अ‍ॅक्सीडेंट, बलात्कार आणि गुन्ह्यांमागे दारूच असते. जॅकपॉट, कॅसिनो हे स्टँडर्ड जुगार आहेत.

4. अल्लाहची आठवण (जिक्र)पासून माणसाला रोखतो. 5. नमाज खराब करण्यासाठी सैतानचा स्पेशल टाईप आहे त्याचे नाव ’’खिनझीब’’ आहे हा नमाजमध्ये येऊन माणसाला बहकावितो. सर्व पेंडिंग कामाची आठवण करून देतो. 

6. रागात आणणे : आज कारागृहात जे लोक आहेत अधिकांश त्यांच्यातले रागामध्ये येऊनच गुन्हे केलेले आहेत. राग आल्यावर उभे असाल तर बसा, बसलेले असाल तर झोपा, राग आल्यानंतर पाणी अवश्य पिले पाहिजे कारण सैतान अग्नीपासून बनलेला आहे आणि पाणी अग्नीला विझवते. अल्लाहची शरण घेणे. आऊजू बिल्लाही मिनश्शैतानी निर्रजिम (मी अल्लाहची शरण घेतो शैतान धिःकारलेल्यापासून) चे पठण करणे. 7. शैतान आपल्याला चेहऱ्यांमध्ये बदल करायला लावतो. (प्लास्टिक सर्जरी, आयब्रोट्रिमिंग) आणि दातांमध्ये गॅप बनविण्यास लावतो. 8. आई-वडिलांचे आज्ञापालन करू न देणे. आई-वडिलांचे आज्ञापालन न करणारा नरकात जाणार आहे आणि हेच शैतान इच्छितो. 9. नातेवाईकांचे हक्क न अदा करण्यास प्रवृत्त करतो. एकमेकांविषयी वाईट विचार मनात घालतो. 10. वायफळ खर्च करणारे शैतानचे बंधू असतात. विनाकारण मॉलमध्ये जाऊन वायफळ खर्च केला जात आहे आजकाल तो शैतानच्या मोटीव्हेशन मुळेच. 12. गर्भपात करण्यास प्रोत्साहित करतो. संततीला ओझे आहे असे दाखवितो. लिव्हिंग स्टँडर्ड हाय करायचा असेल तर त्यांना मारून टाकावे जास्त संततीचे पालनपोषण कसे करावे? अश्या निगेटीव्ह थॉट्स माणसाच्या मनात घालतो, अल्लाह सुरे बनी इसराईल मध्ये फरमावितो की आपल्या संततीला दारिद्रयाच्या  भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा, वस्तुतः त्यांना ठार करणे एक मोठे अपराध आहे. 

13. व्याभिचार : शैतान माणसाला व्याभिचारासाठी प्रोत्साहित करतो आणि अल्लाहचा फरमान आहे की, व्याभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग. हा आदेश प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा आहे आणि संपूर्ण समाजासाठी सुद्धा आहे. केवळ व्याभिचार कार्यापासूनच नाही तर त्याला प्रोत्सहन देणाऱ्या गोष्टींपासून व उत्प्रेरकांपासून. 14. शैतान खोट्या इच्छा आकांक्षा आणि आशा दाखवून आपल्या फेऱ्यात अडकवितो. 15. भयानक स्वप्न शैतानाकडूनच असतात म्हणून पैगंबरांचा आदेश आहे की भयानक स्वप्न आल्यास डाव्या बाजूला धुतकारून, आडंग बदलून झोपावे व 3 दिवस कोणाला सांगू नये. 16. माणसाला माणसावर जादू टोणे, करणी-धरणी करायला लावतो. 17. अश्लील गाणींद्वारा माणसाला इंन्टॉक्सीकेट करतो. 

शैतानची कमजोरी (निगेटीव्ह पॉईंटस्)

1. अल्लाह समोर सज्द-ए-तिलावत केल्यास शैतान रडतो, आदमच्या संतानला सजद्याच्या हुकूम झाला. त्यांनी केला आणि स्वर्गात जाणार, मलाही हुकूम झाला होता मी नाही केला आणि नर्कात जाणार. 

2. दुपारी थोडावेळ झोपणे (कैलूला करणे). सैतान कैलूला करत नाही. 

3. पाप झाल्यास अल्लाहकडे क्षमा मागितल्यासही शैतान चिडतो. आणि अल्लाह परम दयाळू, कृपाळू आणि क्षमा करणारा आहे. तो कितीही वेळा माफ करायला तैय्यार आहे, त्याला आवडते की माणसाने गुन्हा केल्यास त्याची क्षमा मागावी, ’’सर्वात चांगले गुन्हेगार ते आहेत की जे पटकन झालेल्या चुकांची माफी मागतात आणि परत न करण्याच्या निश्चय करतात. 

सैतानापासून बचाव कसं करावे?

1. कधीही राग आला, निगेटीव्हीटी आली. उदासीनता झाली तर अल्लाहच्या शरणी जा (अऊझुबिल्लाही मिनशैतानी निर्रजीम) म्हणत दररोज सकाळी 10 वेळा 3 सायंकाळी 10 वेळा. 2. कोणत्याही कामात जलदबाजी, घाई, गडबड न करणे केलेल्या गुन्ह्यांची माफी मागणे. 3. अल्लाहशी संबंध मजबूत ठेवणे, कुरआन पठाण करणे. 5. मृत लोकांची, आत्म्यांची भिती मनात न ठेवणे कारण मेल्यानंतर आत्मा परत येत नाही ती ’बरजख’ मध्ये असते. 6. संध्याकाळी दिवस मावळण्याच्या वेळी लेकरांना घरात घेऊन ’’ बिस्मील्लाह’’ म्हणून घराचा दार लावून घ्या अन्यथा शैतान घरात शिरतो आणि बिसमिल्लाह न बोलून जेवण केल्यास खूप आनंदीत होतो की राहण्यासोबत जेवण्याचीही सोय झाली. कारण अल्लाहचा नाव न घेता खाणे ही शैतानच्या पोटात जाते आणि जेवूनही न जेवल्यासारखे वाटतेे. 7. कपडे बदलनाता बिस्मील्लाह म्हणणे, वॉशरूमचे दार नेहमी बंद ठेवणे आणि वॉशरूम जाण्याआदीही बिसमिल्लाह म्हणणे. प्रत्येक चांगल्या कामाची सुरूवात बिस्मील्लाहने केली की तेे लवकर पूर्ण होतेे. 8. शक्यतो रागावर नियंत्रण ठेवणे. पैगम्बर सल्ल. ने सांगितले आहे की, खरा बहादूर (शूर) व्यक्ती तो असतो जो रागाच्या भरात स्वतःवर नियंत्रण ठेवतो. 

9. परस्त्री सोबत एकांतात बसू नये. 10. एकट्या स्त्रीने लांबचे प्रवास करू नये. जेव्हा एकटी स्त्री घराबाहेर पडते तेव्हा शैतान तिचा मागे लागतो तिला टक लावून पाहतो. 

11. सूरे अलबकराची नित्याने तिलावत करणे. ज्या घरात या सुरहची तिलावत केली जाते सैतान त्या घरात शिरूच शकत नाही. 

12. आयतुल कुर्सींची तिलावत करणे. 13. जांभळी आल्यानंतर तोंडावर डाव्या हाताच्या पाठीमागचा भाग ठेऊन लाहोलवला कुवता म्हणणे. 14. शैतानाच्या प्लानींग लोकांना समजून सांगणे. 15. शिवीगाळ करू नये. शिव्या दिल्याने शैतान खूश होतो. इस्लामची शिकवण आहे की कुणाला शिवी देऊ नये. शैतानालाही शिवी देऊ नये. तर माणसाला शिवी द्यायचा विचारही करू नये. 16. सैतान आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपल्याला बहकविण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सावधान अल्लाह सर्वांचा शेवट चांगला करो. सैतानापासून आपले रक्षण करावे. आमीन. 


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935


जेंव्हा बुद्धीमान माणसे या ब्रह्मांडांच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, या ब्रह्मांडाची रचना अतिशय गणिती पद्धतीने तयार केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की ज्या ईश्वराने मानवाला बुद्धी देऊन विचार करण्याची शक्ती दिली त्या मानवाला बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती त्याने दिली नसेल. आज जगात बहुसंख्य लोक स्वतःच्या बुद्धीने वाईट मार्गाचा अवलंब करत असल्यामुळे संपूर्ण मानववंश संकटात सापडलेला आहे. 

कोविड-19 हे एक षडयंत्र असून, त्याद्वारे जागतिक लोकसंख्या कमी करून एक न्यू वर्ल्ड लागू करण्याचा अंतरराष्ट्रीय शक्तींची योजना आहे अशी एक थिअरी मांडली जात आहे, ज्यात मुठभर श्रीमंत देशांचा एकाधिकार असेल व ते आपल्या मनाप्रमाणे जगाची सुत्रे हलवतील. खरे तर यूएसएसआर (युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक)च्या पाडावानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली  भांडवलशाही देशांनी अशा एका न्यू वर्ल्ड ऑर्डरची घोषणा केलेलीच आहे. त्यांनी वर्ल्ड बँक, आयएमएफ सारख्या वित्तीय संस्था उभ्या करून आपल्या शर्तींवर गरीब देशांना कर्ज देऊन त्यांना आपले बटिक बनविलेलेच आहे. याच व्यवस्थेला अधिक सुदृढ करून कोविडनंतरच्या काळात नव्याने लागू करण्याचा त्यांचा मानस असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे जी की पूर्णपणे भांडवलशाही व्यवस्थेवर आधारित आहेत. 

न्यू वर्ल्ड ऑर्डरची सुत्रे अमेरिका, युरोप आणि इजराईलच्या हातात आहेत. ही सर्व राष्ट्रे ज्यू आणि ख्रिश्चन वंशाची आहेत म्हणून मुस्लिमांचा या न्यू वर्ल्ड ऑर्डरला विरोध आहे असे मुळीच नाही. उलटपक्षी ज्यू आणि ख्रिश्चन या लोकसमुहांना मुस्लिम,’’अहले किताब’’ समजतात व त्यांच्या पवित्र ग्रंथांना (तौरात आणि बायबल) ईश्वरीय ग्रंथ मानतात. त्यांच्या प्रेषितांना म्हणजेच सुलैमान अलै. (सॉलोमन) आणि ईसा अलै. (जीजस ख्राईस्ट) यांना ईश्वराचे प्रेषित मानतात. मुस्लिमांचे ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांशी मतभेद यासाठी नाहीत की ते वेगळ्या धर्माचे आहेत तर मतभेद आणि विरोध त्यांच्या धर्मद्रोही वर्तणुकीला आहे. 

अनेक वाईट प्रवृत्ती ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये खोलपर्यंत रूजलेल्या आहेत, त्यात त्यांना आनंद येत आहे. इस्लाम त्या प्रवृत्तींना संपवू इच्छितो आणि ते लोक त्यांना संपवू देत नाहीत. उदा. फ्री सेक्सचे शिक्षण तौरात किंवा बायबलमध्ये तर दिलेले नाही पण यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. व्याज, जमाखोरी, नफाखोरी, भ्रष्टाचार, समलैंगिकता तसेच  अश्लिलतेचे शिक्षण त्यांच्या धार्मिक ग्रंथांनी दिलेले नाही मात्र त्यांनी त्याला सामाजिक मान्यता दिलेली आहे. मुस्लिमांचा त्यांच्या या प्रवृत्तीला विरोध आहे. या लोक समुहांनी आपल्या धार्मिक ग्रंथांच्या तरतुदींची अवहेलना केली म्हणून तर ईश्वराने अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर कुरआनचे अवतरण करून वर नमूद अपप्रवृत्तीचा नायनाट करण्याची जबाबदारी त्यांच्या व त्यांच्या अनुयायांवर टाकली आहे. प्रेषितांचे वारसदार म्हणून मुस्लिमांना या लोकांच्या खलप्रवृत्तींचा नायनाट करून एक न्यू वर्ल्ड ऑर्डर स्थापन करावा लागेल, ज्या योगे पृथ्वीवर राहणाऱ्या 7 अब्ज लोकांचे हित साधले जाईल. 

इस्लामिक न्यू वर्ल्ड ऑर्डर 

इस्लामिक न्यू वर्ल्ड ऑर्डर हा शब्द वाचून वाचकांना कदाचित आश्चर्य वाटत असेल मात्र ही काही नवीन संकल्पना नाही. प्रेषित सल्ल. यांच्यावर कुरआन अवतरित करून याची घोषणा 1442 वर्षांपूर्वीच करण्यात आलेली आहे.

न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हटल्याबरोबर जगातील गरीब देशांना आर्थिकदृष्ट्या गुलाम करून, त्यांच्या संसाधनांची लूट करून सैन्य शक्तीने जगावर सत्ता गाजविण्याचे  चित्र डोळ्यासमोर येते. मात्र इस्लामिक न्यू ऑर्डरमध्ये या गोष्टींना स्थान नाही. लोकांना त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगून, तार्किकदृष्या वादविवाद करून, अत्यंत प्रेमाने त्यांचे मन परिवर्तन करून मानवकल्याणासाठी त्यांना प्रेरित करणे हा या न्यू इस्लामिक वर्ल्ड ऑर्डरचा उद्देश आहे. ज्यू आणि ख्रिश्चन धर्माचाही हाच उद्देश होता, ज्याचा त्यांना विसर पडला. आपल्या धार्मिक आस्थेला उध्वस्त करून त्यांनी राक्षसी आकाराची आणि प्रवृत्तीची भौतिक प्रगती साधली आहे. आता हीच प्रगती त्यांना नष्ट करू पाहत आहेत. कोविड-19 मुळे या नष्टचर्येची सुरूवात झालेली आहे हे नष्टचर्य एवढ्यावरच थांबणार नसून कोविड-19 पेक्षाही खतरनाक व्हायरसचा लवकरच जगाला सामना करावा लागेल असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अ‍ॅन्टोनिओ गुटेरस यांनी याच आठवड्यात भाकित केलेले आहे. कोविड-19च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा चालू असतांनाच गुटेरस यांचे हे भीतिदायक वक्तव्य पुढे आलेले आहे. 

भांडवलशाही व्यवस्थेच्या आधीन देशांनी आपल्या सैतानी कृत्यांनी पृथ्वीला प्रचंड नुकसान पोहोचवलेले आहे. अवाजवी आणि अवाढव्य औद्योगिकरण करून ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन वाढवून पृथ्वीचे हिरवेपन ओरबडून घेतले आहे. अणुऊर्जेचा दुरूपयोग - (उर्वरित पान 2 वर)

करून महाविनाशक युद्धास्त्रे तयार करून जगाला विनाशाच्या टोकावर आणून ठेवलेले आहे. चुकीच्या जीवन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करून लोकांच्या आरोग्याशी खेळ केलेला आहे. साधे जीवन सोडून किचकट जीवनाकडे लोकांना बोलावून त्यांचे जीवन तणावग्रस्त केलेले आहे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी मानवी लैंगिक प्रवृत्तीचे बाजारीकरण करून लोकांना स्वैराचाकडे प्रवृत्त करून कुटुंब व्यवस्था उध्वस्त केलेली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून आसमानी असो का सुलतानी असो अनेक संकटे पृथ्वीवर एकानंतर एक कोसळत आहेत. या मागचा ईश्वरी मन्सुबा लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये मुलभूत परिवर्तन आणून ईश्वराला अपेक्षित असा आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. आताही सावध झालो नाही तर गुटेरस यांनी केेलेल्या भाकीतासारखे अनेक भाकीते त्यांना करावी लागतील आणि लोकांचा असाच विनाश होत राहील. 

कुरआन प्रणित आदर्श समाज रचनेची मुलभूत तत्वे

आदर्श समाज हा, ’’समाज को बदल डालो’’ अशा घोषणा दिल्याने बनत नाही. त्यासाठी कुरआनने दिलेल्या तत्वांची जाणीवपूर्वक जोपासना करून सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अशात ती तत्वे कोणती? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. ती तत्वे खालीलप्रमाणे-

आदर्श समाजनिर्मितीचा पाया कुठलाही वंश, राष्ट्र, भाषा, त्वचेचा रंग आणि लिंगावर आधारित ठेऊन जमणार नाही. जगातील सर्व माणसं आपसात भाऊ-बहीण आहेत. या एकाच मुलभूत तत्वावर आदर्श समाजाची पायाभरणी केली जाऊ शकते. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, 1. ’’लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी  बनविली आणि एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एकमेकांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.’’ (सुरह अन्नीसा : आयत नं.1)

2. ’’अल्लाहशिवाय कोणाचीच भक्ती करू नका, माता पित्यांशी, नातेवाईकांशी, अनाथ व गोरगरीबांशी चांगले वागा’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.83). 

3. ’’जे लोक राग गिळून टाकतात व दुसऱ्याचे अपराध माफ करतात असे सदाचारी लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत.’’ (संदर्भ : आलेइमरान आयत नं. 134).

4. ’’जी संपत्ती अल्लाहने तुम्हाला दिलेली आहे त्यापासून मरणोत्तर जीवन बनविण्याची काळजी घ्या आणि जगातीलही आपला वाटा विसरू नका. उपकार करा ज्याप्रमाणे अल्लाहने तुमच्यावर उपकार केलेले आहेत. आणि जमीनीवर उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करू नका, अल्लाहला उपद्रवी (लोक) आवडत नाहीत.’’ (सुरे अलकसस आयत नं. 77). 

5. ’’अहंकार करू नका’’ (सुरह अल नहल आयत नं.23). 6. ’’लोकांच्या चुका माफ करा, त्यांच्याकडे कानाडोळा करा, काय तुम्हाला आवडत नाही की अल्लाहने तुम्हाला माफ करावे ’’ (सुरे अन्नूर आयत नं.22) .

7.’’लोकांशी नम्रतेने बोला. सर्वात वाईट आवाज गाढवाचा आहे’’ (सुरह लुकमान आयत नं.19) 8. ’’आपसात एकमेकांना टोमणे मारू नका. आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावाने करू नका.’’ (सुरे अलहुजरात आयत नं.11)

9. आई-वडिलांची सेवा करा (बनी ईसराईल आयत क्र. 23) 

10. आई-वडिलांना ब्र सुद्धा म्हणू नका (बनी ईसराईल आयत क्र. 23)

11. आई-वडिलांच्या आज्ञेशिवाय त्यांच्या खोलीत प्रवेश करू नका. (सुरे नूर आयत क्र. 58). 

12. देवाणघेवाणीच्या व्यवहाराचा दस्त तयार करत चला. (सुरे बकरा : 282)

13. कुणाचेही अंधानुकरण करू नका. (बनी इसराईल, आयत नं. 36). 

14. जर कर्जदार अडचणीत असेल तर त्याला मुदतवाढ द्या. (सुरे बकरा 280). 

15. व्याज घेऊ नका. (सुरे बकरा 278). 

16. लाच घेऊ नका. (सुरे मायदा : 42). 

17. वचनभंग करू नका (सुरे अर्रराद : 20). 

18. दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. (सुरे हुजरात आयत नं.12). 

19. सत्यात- असत्याची भेसळ करू नका. (सुरे बकरा : आयत नं. 42).

20. लोकांमध्ये न्याय प्रस्थापित करा. (सुरे स्वॉद : 26). 

21. सत्यासाठी ताकदीने उभे रहा. (सुरे निसा : 135). 

22. मयताच्या वारसांमध्ये त्याची संपत्ती वाटून टाका. (सुरे निसा आयत नं.8). 

23. महिलांचाही मयताच्या संपत्तीमध्ये वाटा आहे. (सुरे निसा : 7). 

24. अनाथांच्या मालमत्तेवर कब्जा करू नका. (सुरे निसा : आयत नं.2). 

25. अनाथांचे संरक्षण करा (सुरे निसा : 127). 

26. दुसऱ्यांची संपत्ती गरजेशिवाय खर्च करू नका. (सुरे निसा : 6)

27. लोकांची आपसात तडजोड करत चला. ( सुरे हुजरात : 10). 

28. गैरसमज करून घेऊ नका. (सुरे हुजरात 12). 

29. चहाड्या लावू नका (सुरे हुजरात 12). 

30. लोकांचे रहस्य शोधत फिरू नका (सुरे हुजरात : 12)

31. दान करत चला. (सुरे बकरा : आयत नं. 271). 

32. गरीबांना जेवू घाला. (सुरे : मुदस्सीर : 44). 

33. गरजवंतांना शोधून त्यांची मदत करा. (सुरे बकरा : 273). 

34. वायफळ खर्च करू नका. (सुरे फुरकान आयत नं.67)

35. दान केल्यावर उपकार केल्यासारखे वागू नका. (सुरे बकरा : 262).

36. पाहुण्यांचा सन्मान करा. (सुरे अलजारियात : 24, 27)

37. अगोदर स्वतः पुण्य कर्म करा त्यानंतर लोकांना सांगा (सुरे बकरा : 44). 

38. जमिनीवर वाईट गोष्टींचा प्रसार करू नका. (सुरे  अनकबूत : आयत क्र. 36). 

39. लोकांना मस्जिदमध्ये जाण्यापासून रोखू नका. (सुरे बकराः 114)

40. फक्त त्यांच्याशी लढा जे तुमच्याशी लढतील. (सुरे बकरा : 190) 

41. युद्धाच्या दरम्यान शिष्टाचाराचे पालन करा. (सुरे बकरा 190). 

42. युद्ध समयी पाठ दाखवून पळून जावू नका. (सुरे अनफाल आयत नं. 15).

43. धर्माच्या बाबतीत कठोरता नाही. (सुरे बकरा : 256). 

44. सर्व प्रेषितांवर श्रद्धा ठेवा (सुरे निसाः 150). 

45. मासीकपाळदरम्यान पत्नीशी लैंगिक संबंध स्थापन करू नका. (सुरे अलबकरा : 222). 

46. बाळाला दोन वर्षापर्यंत आईचे दूध पाजवा (सुरे बकरा : 233)

47. लैंगिक दुराचारापासून दूर रहा. (बनी ईसराईल : 32). 

48. पात्र लोकांना सत्ताधारी बनवा. (सुरे बकरा : 247). 

49. कोणावरही त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे लादू नका (सुरे बकरा : 286). 

50. दांभिकतेपासून लांब रहा. (सुरे बकरा : 14-16). 

51. ब्रह्मांडाच्या रचना आणि आश्चर्यांवर सखोल विचार करा. (सुरे आलेइम्रान : 190). 

52. स्त्री-पुरूषांना आपापल्या कृत्यांचा बरोबर मोबदला दिला जाईल. (सुरे आलेइम्रान : 195).

53. काही नातेसंबंधांमध्ये लग्न निषिद्ध आहेत. (सुरे निसा : 23). 

54. पुरूष कुटुंबाचा प्रमुख आहे. (सुरे निसा : 34). 

55. कंजुशी करू नका. (सुरे निसा : 37). 

56 इर्ष्या करू नका. (सुरे निसा : 54). 

57. एकमेकाची हत्या करू नका (सुरे निसा : 29). 

58. चुकीच्या माणसाची वकीली करू नका (सुरे निसा : 135). 

59. गुन्हेगारी आणि अत्याचारीं लोकांची मदत करू नका. (सुरे मायदा : 2). 

60. चांगल्या कामामध्ये एकमेकांची मदत करा. (सुरे मायदा : 2.) 

61. बहुसंख्यांक म्हणजे सत्याची कसोटी नव्हे. (सुरे मायदा : 100). 

62. चांगल्या मार्गावर रहा. (सुरे अनआम : 153). 

63. गुन्हेगारांना शिक्षा देऊन त्याचे उदाहरण लोकांसमोर ठेवा (सुरे मायदा : 38). 

64. गुन्हेगारी आणि अत्याचार संपविण्यासाठी प्रयत्नशील रहा.  (सुरे अनफाल : 39). 

65. मेलेले जनावराचे व वराहाचे मांस तसेच रक्त निषिद्ध आहे. (सुरे मायदा : 3). 

66. दारू आणि इतर अमली पदार्थापासून दूर रहा (सुरे मायदा : 90). 

67. जुगार खेळू नका (सुरे मायदा : 90). 

68. हेराफेरी करू नका. ((सुरे एहजाब : 70). 

69. चहाडी करू नका. (सुरे हमजा : आयत क्र. 1). 

70. खा आणि प्या मात्र वायफळ खर्च करू नका. (सुरे अलआराफ : 31). 

71. नमाजच्या वेळेस चांगले कपडे परिधान करा. (सुरे आराफ : 31). 

72. तुमच्याकडे जे लोक मदत मागतील किंवा संरक्षण मागतील त्यांना ते द्या. (सुरे तौबा :6). 

73. स्वच्छता कायम राखा. (सुरे तौबाः 108). 

74. ईश्वराच्या कृपेपासून निराश होवू नका. (सुरे अलहज्र : 56). 

75. अनावधानाने झालेल्या चुकांना ईश्वर क्षमा करतो. (सुरे निसा : 17). 

76. लोकांना बौद्धिकतेकडे आणि चांगल्या उपदेशाद्वारे ईश्वराकडे बोलवा.  (सुरे नहलः125). 

77. कोणीही कोणाच्या दुष्कृत्यांचे ओझे वाहनार नाही. (सुरे फातीर : 18)

78. दारिद्रयाला घाबरून आपल्या संततीची हत्या करू नका. (सुरे नहेल :31).

79. ज्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान नाही त्या संबंधी चर्चा करू नका. (सुरे नहेल : 36).

80. कोणाचाही मागोवा काढत फिरू नका. (सुरे हुजरात : 12). 81. परवानगीशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करू नका. (सुरे नूर :27)

82. ईश्वर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे संरक्षण करतो. (सुरे युनूस 103). 83. जमीनीवर नम्रतेने चाला. (सुरे फुरकान : 63).

84. स्वतःच्या वाट्याचे काम स्वतःच करा. (सुरे तौबा : 105). 85. अल्लाहसोबत कोणाला सामील करू नका. (सुरे कहफ : 110 )

86. सत्याची साथ द्या, असत्यापासून लांब रहा. (सुरे तौबा 119). 87. स्त्रीयांनी आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करू नये. (सुरे नूर : 31 )

88. अल्लाह शिर्क व्यतिरिक्त इतर गुन्हे माफ करू शकतो. (सुरे निसा : 48). 

89. अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका. (सुरे जमर : 53). 

90. वाईट गोष्टींचा नायनाट चांगल्या गोष्टीने करा. (सुरे हामीम सज्दा : 34). 

91. आपसात चर्चा करून मग निर्णय करा. (सुरे शुरा : 38)

92. तुमच्यापैकी तो जास्त प्रतिष्ठित आहे जो जास्त चारित्र्यवान आहे. (सुरे हुजरात :13)

93. इस्लाममध्ये वैराग्याला मान्यता नाही. (सुरे हदीद :27). 

94. अल्लाह ज्ञानी लोकांना महत्त्व देतो. (सुरे अल मुजदला : 11). 

95. मुस्लिमेत्तरांसोबत उदारता आणि शिष्टाचाराने वागा. (सुरे अल मुमतहेना : 8). 

96. स्वतःला लालसेपासून दूर ठेवा. (सुरे निसा : 32)

97. अल्लाहकडे क्षमा मागत चला. तो मोठा क्षमाशील आहे. (सुरे बकरा : 199). 

98. ज्याने भिक्षा मागितली त्याला झिडकारू नका. शक्य असेल तेवढे त्याला द्या. (सुरे अलजही : 10). 

99. मरणोत्तर जीवनामध्ये यशस्वी होणे ईश्वराकडे चारित्र्यवान लोकांसाठी आहे. (सुरे  अज्जुख्रुफ आयत 35). 

100. निर्विवादपणे अल्लाह चारित्र्यवान लोकांना पसंत करतो. (सुरे तौबा : 07).

तसे पाहता कुरआनमधील सर्व निर्देशांची अंमलबजावणी आदर्श समाजरचनेसाठी त्यातील 100 निर्देश मी वाचकांच्या सोयीसाठी या ठिकाणी उधृत केलेले आहेत. या तत्वांशिवाय दुसऱ्या कुठल्याच तत्वांवर आदर्श समाजाची रचना शक्य नाही. बुद्धिजीवी लोकांनी नक्कीच वरील तत्वांचा विचार करावा. हा केवळ एका लेखकाचा कल्पना विलास आहे, असे समजून याकडे दुर्लक्ष करू नये. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, आम्हा सर्वांना आदर्श समाजरचनेसाठी पुढाकार घेण्याची सन्मती दे. आमीन. 


- एम.आय.शेख


भारताच्या दक्षिण-पश्चिम सागरी तटापासून 200 ते 440 किलोमीटर लांब लक्षद्वीप नावाचा एक द्विप समुह आहे. सदरचे द्विप हे केंद्रशासित प्रदेश आहे. या ठिकाणी विधानसभा किंवा विधानपरिषद नाही. हा देशातील सगळ्यात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ फक्त 32 वर्ग किलोमीटर आहे. जमीनीचा आकार 4200 वर्ग किलोमीटर आहे. याची क्षमता फक्त एका जिल्ह्याएवढी आहे. कवररत्ती नावाचे गाव लक्षद्विपची राजधानी आहे. हा द्विप समूह केरळ उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येतो. केंद्र शासित प्रदेश म्हणून याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. येथील लोकसंख्या फक्त 70 हजार आहे. यात 96 टक्के मुस्लिम आहेत. येथून फक्त एक खासदार निवडून जातो. सध्या मोहम्मद फैजल हे खासदार म्हणून लोकसभेमध्ये प्रतिनिधीत्व करत आहेत. 

अलिकडे शांत असणारे हे द्विप अचानक प्रकाशझोतात आले आहे. 5 डिसेंबर 2020 रोजी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती या द्विपकल्पाचे प्रशासक म्हणून केंद्रशासनाने केली. गुजरातचे राहणारे प्रफुल्ल पटेल यांनी लक्षद्विपमध्ये ते सर्व नवीन प्रयोग सुरू केले जे यापूर्वी गुजरातमध्ये करण्यात आलेले आहेत. 96 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या द्विपकल्पात  त्यांनी बीफ बॅनचे नोटिफिकेशन आणलेले असून, स्थानिक पंचायत निवडणुकांमध्ये त्या लोकांना निवडणूक लढण्यास प्रतिबंध करण्याची त्यांची योजना आहे ज्यांना दोन पेक्षा जास्त मुलं असतील. याशिवाय, लोकांना अटक करण्यासाठी गुंडा अ‍ॅ्नट (युएएसए-2021) आणण्याचीही त्यांची योजना आहे. खा. मोहम्मद फैजल यांनी प्रशासक पटेल यांच्यावर नाराजी व्यक्त करतांना पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, पटेल या छोट्याशा द्विपमध्ये 50 मीटर रूंद सडकेचे निर्माण करू पाहत आहेत. स्मार्ट सिटी प्रोजे्नट अंतर्गत नवीन सरकारी इमारती बांधू पाहत आहेत. आम्ही विकासाच्या विरूद्ध नाहीत. परंतु, त्यांच्या हे लक्षात येत नाही. की छोट्या छोट्या द्विपसमुहामध्ये असे मोठे निर्माण प्रकल्प घेतल्याने लोकांच्या अडचणीमध्ये वाढ होईल. पटेल यांची कार्यशैली एकाधिकारशाहीची आहे. निवडून आलेल्या स्थानिक प्रतिनिधीबरोबर चर्चा करण्याची त्यांची तयारी नाही. 29 जानेवारीला त्यांनी अ‍ॅन्टीसोशल अ‍ॅ्नटीव्हिटी रेग्युलेशन ड्राफ्ट तयार करून घेतला आहे. हा ड्राफ्ट मंजूर झाल्यास कोणत्याही नागरिकाला एक वर्षापर्यंत तुरूंगात ठेवण्याचा अधिकार शासनाला मिळेल. एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) च्या आकडेवारीअनुसार लक्षद्वीपमध्ये देशातील इतर कुठल्याही भागाच्या तुलनेत सर्वात कमी गुन्हे घडतात. अशा ठिकाणी अशा कठोर कायद्याची गरज काय? असे नागरिकांकडून संतप्त प्रश्न विचारला जात आहे. खा. फैसल यांनी हे ही सांगितले की, येथील नागरिकांचे प्रमुख अन्न बीफ हे मिड्डे मीलमधून पटेल यांनी वगळण्याचे निर्देश दिलेले आहेत.’’ थोडक्यात पटेल हे स्थानिक नागरिकांची कोंडी करू पाहत आहेत. 


ज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असं पत्र मुंबई पोलीस आयुक्त परमबीी सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. तत्पूर्वी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेली स्फोटकांची गाडी, मुनसुख हिनेन यांचा मृत्यू आणि  या प्रकरणात सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वाझे यांना एनआयए केलेली अटक  या प्रकरणी परमबीर सिंह वादाच्या भोवऱ्यात सापडले. दरम्यान परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असा आरोप अकोल्याचे पोलिस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी केला असून सिंग यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. या संपूर्ण तपासात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या  भ्रष्टाचार प्रकरणात सापडलेल्या  रोख रकमेचे आकडे पाहिल्यावर सामान्य माणसाचे डोळे विस्फारले जातात. एवढ्या पैशचे हे लोक करतात तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. लाचखोर मंडळींना असले प्रश्न कधीच पडत नाहीत. उलट त्यांची भूक सतत वाढतच असते. दागदागिने, मोटारगाडया, जमीन-जुमला अशा मालमत्तेमध्ये लाचखोर सरकारी अधिकारी आपला पैसा गुंतवत असतात. या मंडळींनी गोरगरीब मंडळींनाही नाडलेले असते.  हल्ली सरकारी सेवेत येताना किती कमवायचे, हा उद्देश मनात ठेवूनच नोकरीला सुरुवात केली जाते. अनेकदा निवड, नियुक्ती होण्यासाठी सरकार दरबारी जे दाम मोजले जाते, त्याची पुरेपूर वसुली नोकरी सुरू झाल्यावर केली जाते.

आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी लाखो रुपये मलिदा म्हणून चारले जातात. मग हा मलिदा सर्वसामान्यांच्या खिशातून वसूल केला जातो. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून लाचखोर अधिका-यांना सापळ्यात पकडण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात चांगलेच वाढले आहे. असे असले तरी लाचखोरांची संख्या कमी झालेली नाही. याचाच अर्थ लाचखोरांना कुणाचाच धाक उरलेला नाही. पकडले गेलो तरी आपल्यावरचे आरोप न्यायालयात सिद्ध होणार नाहीत, याची या अधिकाऱ्यांना खात्री असते. आपल्यावरचे आरोप कसे टिकणार नाहीत, यासाठी आपल्या विरुद्धच्या खटल्यात आरोपपत्रात जाणूनबुजून त्रुटी ठेवण्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा खर्च करण्याची लाचखोर अधिका-यांची तयारी असते. यामुळे लाच घेताना पकडले जाऊनही या आरोपाबद्दल शिक्षा झालेल्या अधिका-यांचे प्रमाण खूपच कमी आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हाही सरकारी विभागच आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी मंडळींना कोणत्या ना कोणत्या मार्गाने गळाला लावले जाते, असे सरकारी अधिकारी सर्रास सांगतात.

आरोप सिद्ध न झाल्यामुळे या अधिकारी लोकांचा सरकारी सेवेत परतण्याचा मार्ग मोकळा होतो. हे अधिकारी उजळ माथ्याने वावरू लागतात. आपला समाजही असा उफराटा आहे की. येथे जातीबाहेर लग्न केलेल्या तरुण-तरुणीला, बलात्कार झालेल्या तरुणीला, समाजातून बहिष्कृत केले जाते. मात्र लाच घेताना पकडलेल्या व्यक्तींना अशा कोणत्याच प्रकारच्या शिक्षेचा सामना करावा लागत नाही. लाच घेतली म्हणजे फार मोठे पाप केले नाही, अशी समाजातील बहुसंख्यांची मानसिकता असल्याचे दिसते. यामुळे लाच घेणारे निर्ढावत चालले आहेत. पैशाच्या जोरावर आपण कोणालाही विकत घेऊ शकतो, अशा गुर्मीत ही लाचखोर मंडळी वावरत असतात. लाचखोराच्या मुलाशी अथवा मुलीशी लग्न करू नये. अथवा लाचखोराच्या कुटुंबाशी कोणत्याच प्रकारचे सबध ठेवू नये, अशा प्रकारचा फतवा एखाद्या जात पंचायतीने काढल्याचे ऐकीवात नाही. याचाच अर्थ भारतीयांना लाच घेणे, हा फारसा गंभीर गुन्हा वाटत नाही. समाजाची ही मानसिकता बदलल्याखेरीज लाचखोरांची संख्या घटणार नाही. लाचखोर आणि त्यांच्या कुटुंबाला समाजाच्या कडकडीत बहिष्काराला  सामोरे जावे लागेल त्यावेळी त्यांना आपल्या गुन्ह्याच्या गंभीरतेची जाणीव होईल आणि  असे ‘सचिन वाझे’, परमबीर सिंह पुन्हा निर्माण होणार नाहीत. 

एखादा अधिकारी लाच घेताना पकडला गेल्यावर त्याच्या बाबतीत चार दिवस कुजबूज होते. नंतर लोक सुद्धा ही घटना विसरून जातात आणि त्या अधिकाऱ्याचे आयुष्य निर्धोकपणे पुढे सुरू राहते. एकही सरकारी खाते असे नाही, की जेथे एक दमडीही न घेता . नागरिकांचे काम नीट केले जाते. शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत लाच घेणाऱ्यांची एक जबरदस्त साखळी असते. ही साखळी भेदून सामान्य माणसाला आपल्या अडकलेल्या फाईलवर किंवा कागदपत्रांवर संबंधित अधिका-यांचा सही शिक्का मिळवताच येत नाही. सरकारी खात्यांमध्ये सामान्य माणसाला अनेक पद्धतीने नाडले जाते. राज्यकर्ते मंडळींना तसेच लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचाराबद्दल नेहमीच शिव्याशाप दिले जातात. मात्र मंत्री, आमदार, खासदारांबरोबरच सरकारी अधिकारीही वाढत्या भ्रष्टाचाराला तेवढेच किंबहूना अधिक प्रमाणात जबाबदार आहेत.

भ्रष्टाचाराचे मार्ग, राजमार्ग आणि बाह्यवळण मार्ग हे अधिकाऱ्यांकडूनच राज्यकर्त्यांना दाखवले जातात. मुंबईत सरकारी जमिनी गृहनिर्माण संस्थेसाठी मिळवून त्यात फ्लॅट लाटण्याचा उद्योग वरिष्ठ पदावरील सरकारी अधिकारी कसे करतात, हे मध्यंतरी एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेतून दिसले होते. अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये व्यावसायिक कारणांसाठी गाळे बांधायचे आणि त्यातूनच इमारती उभारण्याचा खर्च वसूल करायचा. या पद्धतीने सचिव पदावरच्या अनेक अधिकाऱ्यांनी मुंबईत आलिशान सदनिका मिळवल्या आहेत. याचबरोबर त्यांच्या नावावर मुंबईत अथवा महाराष्ट्रात स्व:मालकीचे घर नाही, असे खोटे प्रतिज्ञापत्रक सादर करून मुख्यमंत्री कोटयातून मुंबई-पुण्यात घरे लाटणा-या सरकारी अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. राज्यकर्त्यांनाही असे अधिकारी आपल्या अडचणीच्या काळात उपयुक्त ठरत असतात. त्यामुळे दोघेही एकमेकांना सांभाळून घेत असतात. भ्रष्टाचारमुक्त राज्य देण्याच्या घोषणा सर्वच पक्ष करतात. मात्र सरकारी अधिकाऱ्यांची मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत सरकारमधील भ्रष्टाचार सुरूच राहणार आहे. अण्णा हजारे यांनी लोकपालच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते त्यावेळी भ्रष्ट सरकारी अधिका-यांची काही काळ घाबरगुंडी उडाली होती. मात्र या कायद्यातील पळवाटांमुळे असे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी सुटतात. त्यामुळे सरकारी आणि प्रशासकीय संस्थांमधील भ्रष्टाचार मुक्तीसाठी जालीम उपाय आवश्यक आहे. याविषयी तज्ज्ञांनी विचारमंथन करणे अगत्याचे आहे.

- सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद पुरस्काराने, तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’ पत्रकार पुरस्काराने सन्मानित कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)



ब्लॅक फंगसचा कहर पाहाता औषधींचा व इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसत आहे. यामुळे काळा बाजार सुध्दा होत आहे. यावर लागणारी औषधे व ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन ताबडतोब उपलब्ध करावी. म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)चा कहर पाहाता सर्वांनीच सावध रहाने गरजेचे आहे. करोना महामारीची पहिली लाट संपत नाहीच तर दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात महाभयंकर थैमान निर्माण केले. यात आतापर्यंत २ लाख ९७ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

सध्याच्या परिस्थितीत दुसऱ्या लाटेचा कहर थोडाफार मंदावत आहे. तोच सरकारच्या माहीतीनुसार देशातील २३ राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये ब्लॅक फंगसचे केसेस सामोर आले आहे. यात  १० राज्ये जास्तच प्रभावित आहेत. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, दिल्ली, गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेशात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)ने कहर निर्माण केल्याचे दिसून येते. हा अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.

भारतातील ब्लॅक फंगसच्या मृत्यूच्या टक्केवारीमध्ये एकट्या महाराष्ट्रात ७० टक्के मृत्यूचे प्रमाण म्हणजे चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत देशभरात ब्लॅक फंगसचे ८८४८ पेक्षा जास्त केसेस आल्याचे सरकारी माध्यमातून  सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे ब्लॅक फंगसमुळे देशभरात २२० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. देशात अहमदाबादमध्ये करोनाने बरा झालेल्या १३ वर्षीच्या मुलाला ब्लॅक फंगस झाल्याची घटना मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे ही पहिलीच घटना आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर ब्लॅक फंगसच्या २००० पेक्षा जास्त केसेस आढळून आल्या व ९० लोकांचे प्राण गेले. त्यामुळे देशातील ९ राज्यात म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस)ला महामारी घोषित करण्यात आली आहे. ब्लॅक फंगस हा आजार करोना महामारीच्या काळात जगात कुठेही आढळून आला नाही. परंतु भारतात या आजाराने थैमान माजवील्याचे दिसून येते. यापाठोपाठ व्हॉइट फंगसने सुध्दा भारतात प्रवेश केल्याचे दिसून येते आणि पुढे चालून तिसरी लाट आपल्या डोक्यावर आहेच.

त्याचपाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक,गुजरातसह समुद्र किनारी राज्यांना चांगलाच तडाखा दिला. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी, वित्तीय हानी झाल्याचे दिसून येते आणि आता "यास" हे चक्रीवादळ तौक्ते ची पुनरावृत्ती करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रासह संपूर्ण भारत अत्यंत कठीण परिस्थितीत असल्याचे दिसून येते.

अशा परीस्थितीत करोना महामारी आणि त्यापासून निर्माण होणारे नवनवीन आजार यापासून प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहाण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन सरकारने व डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. करोना काळात बीपी, शुगर किंवा इतर आजार असलेल्यांनी सतर्क रहाण्याची गरज आहे. देशातील प्रत्येकांनी मास्क घालुनच घराच्या बाहेर निघाले पाहिजे. कारण करोना महामारी नवनवीन आजारांना जन्म देतांना दिसत आहे. त्यामुळे घराच्या बाहेर निघताना लहान-मोठ्यांनी मास्क बांधूनच बाहेर निघावे.

करोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना जास्त धोका असल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सर्व यंत्रणा सुसज्जीत केली आहे. परंतु ब्लॅक फंगसने महाराष्ट्रासह देशाची चिंता वाढवीली आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती विविध कारणांमुळे कमी झाली आहे, तसेच ज्या रूग्णांच्या रक्तात आयर्न म्हणजेच फेरेटिनचे प्रमाण जास्त आहे, अशा रूग्णांना म्युकरमायकोसिसचा (ब्लॅक फंगस)चा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. असेही सांगण्यात येते की ऑक्सिजनचा तुटवडा असतांना कदाचित  जुने ऑक्सिजन सिलेंडर रूग्णांना लावण्यात आले असल्याने त्यांनाही ब्लॅक फंगसचा आजार होऊ शकतो असेही मत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. ऑक्सिजन सिलेंडर बनविण्यासाठी "डिस्टिल्ड वॉटर"चा वापर करण्यात येतो; परंतु कदाचित साध्या पाण्याचा वापर केलेल्या  ऑक्सिजन सिलेंडरचा वापर रूग्णांवर केला असेल तर ब्लॅक फंगस हा आजार होऊ शकतो असे अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या प्रकृतीची काळजी स्वत:च घेतली तर आपण येणाऱ्या नवनवीन आजारांवर मात करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला प्रकृती खराब वाटत असेल तर डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

करोना महामारी नंतर भारतात ब्लॅक फंगस आणि व्हॉइट फंगसने प्रवेश केला आहे. याला रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारांनी यावर लागणारी औषधे मुख्यत्वेकरून "एम्फोटेरेसिन बी" हे इंजेक्शन उत्पादन वाढवीण्यावर जोर दिला पाहिजे. एम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची किंमत सहा हजारच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. हे इंजेक्शन एका रूग्नांला २०-२० इंजेक्शन द्यावी लागतात. त्यामुळे खाजगी रुग्णालय असो वा सरकारी रुग्णालय असो ही इंजेक्शन रूग्नांणा मोफत देण्याची सुविधा सरकारने ताबडतोब केली पाहिजे. कारण लॉकडाउनमुळे, महागाईमुळे व महामारीमुळे ८० टक्के लोकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बीकट हलाखीची झाली आहे.

मास्कच्या बाबतीत सांगायचे झाले तर एका सर्वेक्षण अहवालाच्या माहितीनुसार अर्धा भारत मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच देशातील ५० टक्के लोक आताही मास्क वापरत नसल्याची गंभीर बाब सामोर आली आहे हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आजची भयावह परिस्थिती पहाता सर्वांनीच काळजीपूर्वक मास्क बांधूनच घराच्या बाहेर निघावे. कारण करोना महामारीच्या काळात कोण गेले.. .कोण राहिले... हे कोणालाच कळले नाही. अनेक कुटुंब करोना महामारीने उद्ध्वस्त केली, आपुलकीची भावना धुळीस मिळवली, आप्तापासून तर नातेवाईकांपर्यंत सर्वांना या महामारीने दुर लोटले. मृत्युनंतरचे क्रियाकर्म संपूर्ण संपुष्टात आणण्याचे काम या महामारीने केले. म्हणजेच मानवजातीची संपूर्ण सुख-शांती हीरावण्याचे काम करोना महामारीने केले.

अशी कल्पना कोणीच केली नव्हती की शांतीचा दुत मानल्या जाणाऱ्या भारतात प्रेतांचा ढीग लागेल. २०२१ ने महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला करोना महामारीने मृत्यूच्या खाईत लोटले व सर्वांना दु:खी केले. करोना महामारीचा मृत्यूचा कहर संपतच नाही तर ब्लॅक फंगसने महाराष्ट्रासह देशाच्या २३ राज्यात प्रवेश केला. यात महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावीत आहे. म्हणजेच मृत्यूचे थैमान सुरूच आहे. याला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने समन्वय साधून लोकांचे प्राण वाचवले पाहिजे. दु:खाची बाब म्हणजे आताही व्हॅक्सीन, रेमडेसीव्हीर, ऑक्सिजन, ॲम्फोटेरिसिन-बी यावर मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू असल्याचे दिसून येते याला ताबडतोब रोखले पाहिजे. त्याचप्रमाणे या कठीण घडीला राजकीय पुढाऱ्यांनी एका-मेकांचे उखाड-पाखड करने बंद करून देशाच्या जनते प्राण कसे वाचविता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

ब्लॅक फंगसने उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲम्फोटेरिसिन-बी या औषधांच्या उत्पादनासाठी आणखी पाच कंपण्यांना परवाने देण्यात आले आहे. यावरून स्पष्ट होते की "ब्लॅक फंगस" महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आपले पाय पसरू शकतो याला नाकारता येत नाही. ब्लॅक फंगसला महामारी घोषित केली आहे व यावर वापरल्या जाणारे ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे रूग्णांना ८ ते २५ हजार रुपये दराने हे इंजेक्शन घ्यावे लागत आहे व काळाबाजार होत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोब या इंजेक्शनची व्यवस्था केली पाहिजे व लोकांचे प्राण वाचवीले पाहिजे. अन्यथा गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण परीस्थिती अत्यंत गंभीर व बिकट आहे. करोना महामारी व ब्लॅक फंगस पासून सावध रहाण्यासाठी मास्कचा वापर, गर्दिचे ठिकाण टाळने,सोशल डिस्टगसिंग व वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.


माणसाकडे अमाप संपत्ती एकवटली तर मग त्यापासून अपराधी वृत्ती जन्माला येते. एक तर लुबाडून सार्वजनिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे, गडगंज संपत्ती गोळा करणे याला कोणतीही मर्यादा नसते. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, अशा प्रवृत्तीचे लोक एकमेकांच्या पुढे जाण्यात कोणत्याही नैतिक नियमांचे पालन करत नसतात आणि धनसंपत्ती बाळगण्यात ते एकमेकांशी वैरभाव करतात. असे लोक स्वतःला आणि इतरांनादेखील कबरीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राहात नाहीत. मोजक्या लोकांकडे संपत्तीची सर्व साधने एकवटल्यास साहजिकच वंचितांचा त्यांच्याविरूद्ध द्वेषभाव निर्माण होतो. आधुनिक विचारवंतांच्या दृष्टीनेदेखील समाजामध्ये काही उणिवा असतात. वंशवाद, पिळवणूक, नैसर्गिक साधनांची असमान वाटणी यामुळे समाजात आंतरिक कलह निर्माण होतो. पण या विचारवंतांकडे या उणिवांवर मात करण्याची विचारधारा नसते. म्हणून अशा संपन्नवर्गाविरूद्ध समाजामध्ये वैरभाव निर्माण होतो. पुढे जाऊन सामाजिक बंड होतात. जगात जिकडेतिकडे अनाचार माजलेले आपण पाहात आहोत ते याच कारणामुळे, पण सत्ताधारीवर्ग यावर युद्धाचे, आतंकवादाचे आवरण चढवितात. पवित्र कुरआनच्या शिकवणी फक्त गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या सुधारासाठीच नाहीत. अल्लाहने प्रेषित पाठवून साऱ्या मानवजातीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची ताकीद दिली. पवित्र कुरआनात म्हटले आहे की अल्लाहने जर माणसाला विपुल साधने दिली असती तर त्यांनी धरतीवर बंड माजवले असते. ज्यांना अल्लाहने विपुल प्रमाणात दिले आहे त्यांनी त्या साधनसंपत्तीचा लोककल्याणासाठी वापर करावा. हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. नुसते दानधर्म नाही. कारण त्यांनी हे स्वतः कमवलेले नसून तो अल्लाहचा वारसा आहे. म्हणून साऱ्या मानवांचा त्यावर हक्काधिकार आहे. (पवित्र कुरआन – ४२, ३०, ५०)


नैराश्याला थारा नको

प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण आहे की, जर तुमच्या समोर प्रलय येऊलागला आणि आता काही क्षणांतच हे जग संपून जाणार आहे, जगाची शेवटची घटिका समोर येताना दिसत आहे. आणि अशा वेळी जर तुमच्या हातात एखाद्या फळझाडाचे रोपटे असेल तर ते लावून टाका, ते फेकून देऊ नका. घाबरून जाऊ नका. तुम्ही जे कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्ण करा.

प्रेषितांनी असे सांगितले नाही की आता या भीतीच्या वातावरणात तुम्ही काय करू शकता, शेवटची घटिका समोर दिसत आहे, आता एखाद्या झाडाचे रोपटे लावल्याने काय होणार आहे, कितीतरी वर्षे लागतील त्याला फळे यायला. आता काही क्षणांतच सर्व काही संपून जाणार आहे. तुम्ही फक्त ईश्वराच्या नावाचे स्मरण करा. सर्व काही सोडून द्या. प्रेषित म्हणाले, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. बाकी त्या झाडाचे काय होणार याची काळजी करणे तुमचे काम नाही.

मानवी जीवनात झाडाचे काय आणि किती महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे. झाड लावणे म्हणजे माणसाने स्वतःचे जीवन दान देण्यासारखे आहे. जगाचा शेवट समोर दिसत असताना देखील प्रेषितांनी अशी शिकवण दिली की तुम्ही आपल्या जगण्याची इच्छा सोडता कामा नये. पुढे काय होणार हे तुमच्या सकारात्मक क्रियाशक्तीवर अवलंबून आहे. जी काही आपत्ती कोसळणार आहे ती कोसळणारच, पण तिच्या कोसळण्याआधीच तुम्ही निराश होता कामा नये. शेवटपर्यंत संघर्ष करा. जगातले सर्व अडथळे, कठीण प्रसंग आणि नैराश्य माणसाच्या इच्छाशक्तीसमोर काहीच नसतात. या शिकवणीत प्रेषितांना हेच सांगायचे आहे की आणखी इच्छाशक्ती ढळू देऊ नका. समोर डोंगरासारख्या समस्या असल्या, शत्रुंचे बलाढ्य सैन्य असले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपण प्रयत्न केलेच पाहिजेत, कारण जे काही माणसाला लाभते ते प्रयत्नांती लाभते. समोर उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड दिल्याशिवाय आपले ध्येय साधता येत नाही. पक्का विश्वास करून संघर्ष करत राहा. पुढे काय होणार याची काळजी करू नका. अशा विश्वासाने आपण आपल्या हातातील रोपटे जमिनीत लावून टाका, पुढे काय होईल हे पाहणे तुमचे काम नाही.

प्रेषित मुहम्मद (स.) यांना जीवे मारण्याची एक योजना मक्केच्या लोकांनी आखली होती, ती प्रेषितांना कळली. प्रेषित आपले एक अनुयायी अबूबकर (र.) यांना घेऊन मक्केबाहेर एका गुहेत जाऊन लपून बसले होते. इतक्यात मारेकरी त्या गुहेपर्यंत पोहोचले. अबूबकर काहीसे घाबरले. त्यावर प्रेषित त्यांना म्हणाले, “घाबरू नका. दुःखी होऊ नका. ईश्वर आपल्या बाजूने आहे.” त्या मारेकऱ्यांनी इकडेतिकडे पाहिले आणि निघून गेले.

- सय्यद इफ्तिखार अहमद



माणसाकडे अमाप संपत्ती एकवटली तर मग त्यापासून अपराधी वृत्ती जन्माला येते. एक तर लुबाडून सार्वजनिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे, गडगंज संपत्ती गोळा करणे याला कोणतीही मर्यादा नसते. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, अशा प्रवृत्तीचे लोक एकमेकांच्या पुढे जाण्यात कोणत्याही नैतिक नियमांचे पालन करत नसतात आणि धनसंपत्ती बाळगण्यात ते एकमेकांशी वैरभाव करतात. असे लोक स्वतःला आणि इतरांनादेखील कबरीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राहात नाहीत. मोजक्या लोकांकडे संपत्तीची सर्व साधने एकवटल्यास साहजिकच वंचितांचा त्यांच्याविरूद्ध द्वेषभाव निर्माण होतो. आधुनिक विचारवंतांच्या दृष्टीनेदेखील समाजामध्ये काही उणिवा असतात. वंशवाद, पिळवणूक, नैसर्गिक साधनांची असमान वाटणी यामुळे समाजात आंतरिक कलह निर्माण होतो. पण या विचारवंतांकडे या उणिवांवर मात करण्याची विचारधारा नसते. म्हणून अशा संपन्नवर्गाविरूद्ध समाजामध्ये वैरभाव निर्माण होतो. पुढे जाऊन सामाजिक बंड होतात. जगात जिकडेतिकडे अनाचार माजलेले आपण पाहात आहोत ते याच कारणामुळे, पण सत्ताधारीवर्ग यावर युद्धाचे, आतंकवादाचे आवरण चढवितात. पवित्र कुरआनच्या शिकवणी फक्त गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या सुधारासाठीच नाहीत. अल्लाहने प्रेषित पाठवून साऱ्या मानवजातीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची ताकीद दिली. पवित्र कुरआनात म्हटले आहे की अल्लाहने जर माणसाला विपुल साधने दिली असती तर त्यांनी धरतीवर बंड माजवले असते. ज्यांना अल्लाहने विपुल प्रमाणात दिले आहे त्यांनी त्या साधनसंपत्तीचा लोककल्याणासाठी वापर करावा. हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. नुसते दानधर्म नाही. कारण त्यांनी हे स्वतः कमवलेले नसून तो अल्लाहचा वारसा आहे. म्हणून साऱ्या मानवांचा त्यावर हक्काधिकार आहे. (पवित्र कुरआन – ४२, ३०, ५०)

-०-०-०-

नैराश्याला थारा नको

प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण आहे की, जर तुमच्या समोर प्रलय येऊलागला आणि आता काही क्षणांतच हे जग संपून जाणार आहे, जगाची शेवटची घटिका समोर येताना दिसत आहे. आणि अशा वेळी जर तुमच्या हातात एखाद्या फळझाडाचे रोपटे असेल तर ते लावून टाका, ते फेकून देऊ नका. घाबरून जाऊ नका. तुम्ही जे कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्ण करा.

प्रेषितांनी असे सांगितले नाही की आता या भीतीच्या वातावरणात तुम्ही काय करू शकता, शेवटची घटिका समोर दिसत आहे, आता एखाद्या झाडाचे रोपटे लावल्याने काय होणार आहे, कितीतरी वर्षे लागतील त्याला फळे यायला. आता काही क्षणांतच सर्व काही संपून जाणार आहे. तुम्ही फक्त ईश्वराच्या नावाचे स्मरण करा. सर्व काही सोडून द्या. प्रेषित म्हणाले, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. बाकी त्या झाडाचे काय होणार याची काळजी करणे तुमचे काम नाही.

मानवी जीवनात झाडाचे काय आणि किती महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे. झाड लावणे म्हणजे माणसाने स्वतःचे जीवन दान देण्यासारखे आहे. जगाचा शेवट समोर दिसत असताना देखील प्रेषितांनी अशी शिकवण दिली की तुम्ही आपल्या जगण्याची इच्छा सोडता कामा नये. पुढे काय होणार हे तुमच्या सकारात्मक क्रियाशक्तीवर अवलंबून आहे. जी काही आपत्ती कोसळणार आहे ती कोसळणारच, पण तिच्या कोसळण्याआधीच तुम्ही निराश होता कामा नये. शेवटपर्यंत संघर्ष करा. जगातले सर्व अडथळे, कठीण प्रसंग आणि नैराश्य माणसाच्या इच्छाशक्तीसमोर काहीच नसतात. या शिकवणीत प्रेषितांना हेच सांगायचे आहे की आणखी इच्छाशक्ती ढळू देऊ नका. समोर डोंगरासारख्या समस्या असल्या, शत्रुंचे बलाढ्य सैन्य असले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपण प्रयत्न केलेच पाहिजेत, कारण जे काही माणसाला लाभते ते प्रयत्नांती लाभते. समोर उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड दिल्याशिवाय आपले ध्येय साधता येत नाही. पक्का विश्वास करून संघर्ष करत राहा. पुढे काय होणार याची काळजी करू नका. अशा विश्वासाने आपण आपल्या हातातील रोपटे जमिनीत लावून टाका, पुढे काय होईल हे पाहणे तुमचे काम नाही.

प्रेषित मुहम्मद (स.) यांना जीवे मारण्याची एक योजना मक्केच्या लोकांनी आखली होती, ती प्रेषितांना कळली. प्रेषित आपले एक अनुयायी अबूबकर (र.) यांना घेऊन मक्केबाहेर एका गुहेत जाऊन लपून बसले होते. इतक्यात मारेकरी त्या गुहेपर्यंत पोहोचले. अबूबकर काहीसे घाबरले. त्यावर प्रेषित त्यांना म्हणाले, “घाबरू नका. दुःखी होऊ नका. ईश्वर आपल्या बाजूने आहे.” त्या मारेकऱ्यांनी इकडेतिकडे पाहिले आणि निघून गेले.

- सय्यद इफ्तिखार अहमद

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget