Halloween Costume ideas 2015
Latest Post

‘‘खिर्द ने कह भी दिया तो क्या हासिल
दिल व निगाह मुसलमां नहीं तो कुछ भी नहीं।’’

(इक्बाल और कुरआन – डॉ. अल्लामा इक्बाल)
    ‘इक्बाल और कुरआन’ हे पुस्तकच अल्लामा इक्बालचा कल इस्लाम, मुस्लिम समाजाकडे होता हे अधोरेखित होण्यास पुरेसे आहे. तर बांगेदरातील त्याचें इस्लाम, मुसलमान, नबी करीम (स.) यांच्याविषयीचे लेखनही त्यानुषंगाने बोलके आहे. त्याचबरोबर शिकवा-जवाब-ए-शिकवा, दुआ तराना-ए-मिल्ली मधून समाजाविषयीची तळमळ स्पष्ट होते.
    मुस्लिम समाजाबरोबरच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांबाबतची विशेषत: सारे जहां से अच्छा, हिंदुस्तानी बच्चों का कौमी गीत आणि राम ना इमामे हिंद संबोधून त्यांनी त्यांचे राष्ट्रप्रेमही तेवढ्याच तळमळीचे आहे हेच सुस्पष्टपणे दाखवून दिले आहे.
    तरीही त्यांच्यावर पाकिस्तानचे जनक म्हणून बिनबुडाचे आरोप होत असतात ते पूर्वग्रहदूषितेमुळेच, यात शंका नसावी. हे हिंदुस्तानी बच्चों का कौमी गीत यातील शेरच्या पुढील ओळींवरून समजून येते-
‘‘बंदे कलीम जिसके परबत जहां के सीना
नुहे नबी का आकर ठहरा जहां सफीना
रफअत है जिस जमीं की बामे फलक का जीना
जन्नत् की जिंदगी है जिसकी फिजां में जीना
मेरा वतन वहीं है’’

    १८५७ सालचा स्वातंत्र्य लढा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक आदर्श होता. १९०५-०६ मध्ये मुस्लिम लीग, हिंदू महासभा यांची स्थापना झाली. त्याच दरम्यान बंगालची धर्माधिष्ठित फाळणी इंग्रज सत्ताधाऱ्यांनी केली आणि पुन्हा द्वेषभावनेने समाज जो ग्रासला गेला तो केवळ बंगालच्या फाळणीपर्यंत न थांबता संपूर्ण देश दुभंगला. त्यानंतर स्वातंत्र्याची जबाबदारी आली. मात्र द्वेषाचे बीज पेरून न बसता ते वाढेल कसे याचीच काळजी अधिक घेण्यात आली. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्याची जबाबदारी डोक्यावर राहिलीच नाही. परिणामी बाबरी मस्जिद शहीद झाली. मुस्लिमांविरोधात बोलण्यातच राष्ट्रवाद ठरू लागला अर्थात तो तसा बेगडीच. डॉ. अल्लामा इक्बालना पाकिस्तानेच जनक ठरविताना हेच विष डोक्यात शिरले असावे. आज याच विषाचा उद्रेक झाला असल्याकारणाने पं. नेहरूंसारख्या ख्यातनाम मुत्सद्दीमुळे भारताची ओळख जागतिक पातळीवर शांतीचा कट्टर पुरस्कर्ता व आर्थिक सुबत्तेचा म्हणून ओळखली जात होती. त्याच भारत देशात आजी पंतप्रधानांच्या पराकाष्टेच्या प्रयत्नांना परदेशातून निराशाजनक प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. आधीच पेरलेल्या बिजांचा तो परिणाम तर नसेल ना – अशा वेळी पुढील शेर स्मरतो-
‘‘न समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंददोस्तांवालों।
तुम्हारी दास्तां-तक न होगी दास्तानों में।’’
    हे बोलदेखील त्याचेच ज्यांनी जगाला हे निक्षून सांगितले होते की,
‘‘क्या बात है के हस्ती मिटती नहीं हमारी (गीत सारे जहां से अच्छा)’’
    डॉ. अल्लामा इक्बाल यांच्याबाबत शोधनने जी लेखमाला प्रसिद्ध केली आहे ती आज अत्यावश्यकच होती. धन्यवाद!
    डॉ. इक्बाल मजुरांप्रती कसे भावूक होते हे जे दाखवून दिले आहे तेदेखील देशोधडीला लागलेले मिलमजूर, शेतमजूर असोत की घरमजूर, त्यांची मजुरी अविश्वासाच्या भावनेतून रोजच्या रोज निदान खेडेगावातून दिली जात नसते असा अनुभव आहे. मला वाटते की मुस्लिमांकडून तरी असे घडू नये, कारण पैगंबरे इस्लाम (स.) यांचे फर्मान – ‘‘मजुरांची मजुरी त्यांचा घाम वाळणयापूर्वी त्यांच्या हातात ठेवा.’’ असे आहे. डॉ. इक्बाल यांनी याच फर्मानाला आपल्या लिखाणांत प्राधान्य दिले असावे.
    इंग्रज निघून गेले असले तरी त्यांच्या इंग्रजी भाषेचे अतिक्रमण हे आहेच आणि ते इतर अनेक भाषांप्रमाणे उर्दू भाषेवरही आहे. परिणामी उर्दू भाषेतून आजवर ज्या मुस्लिमांनी साहित्यादि अनेक क्षेत्रांत केलेल्या कार्याबाबतची माहिती इस्लाम व मुसलमानांचे शत्रू एक तर पुढे येऊ देत नाहीत आणि नष्टही करू पाहत आहेत. ताजमहल हे ताजे उदाहरण. अशा वेळी ‘शोधन’मधून महान मुसलमान लेखक, कवी, गणितज्ज्ञ, शास्त्रज्ञ, वैद्यकीय क्षेत्र, खगोलशास्त्र, तंत्रज्ञान अशा नानाविध क्षेत्रांत आपला ठसा जागतिक पातळीवर उमटवून गेले आहेत, उमटवत आहेत अशांची माहिती देऊन आणि अन्य प्रत्यक्ष चर्चासत्राद्वारे घडवून आणल्यास इस्लाम जागृतीचे कार्य यशस्वी होण्यास उपयुक्त ठरेल.
- बशीर अमीन मोडक.

-शाहजहान मगदुम
सुमारे अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच सन २००७ मध्ये हैद्राबादमधील मक्का मस्जिदमध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सोमवार १६ एप्रिल रोजी असीमानंदसहित सर्व पाच आरोपींना न्यायालयाद्वारे निर्दोष मुक्त करण्यात आल्यानंतर याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. या घटनेचा तपास एनआयएनेदेखील केला होता. एनआयएचे वकील एन. हरिनाथ हे रा. स्व. संघाशी संलग्न असल्यामुळे या तपासाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. सुरूवातीला या प्रकरणाचे तपासकार्य एसआयटी, सीबीआय आणि नंतर एनआयएकडे सोपविण्यात आले होते. या प्रकरणाशी अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेचा हात असल्याचा संशय आल्यामुळे आणि या संघटनेविरूद्ध काही पुरावे हाती आल्यामुळे सीबीआयने या संघटनेशी संबंधित स्वामी असीमानंदला अटक केली. अटक करण्यात आलेल्या काही लोकांचे धागेदेरो मालेगाव आणि समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाशी जुळले होते. तेव्हा भगव्या दहशतवादाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता. सन २०१० साली सीबीआयने या खटल्याचे आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने या प्रकरणात ६८ साक्षीदारांचे जबाब घेतले होते त्यापैकी ५४ साक्षीदारांनी आपला जबाब नाकारला. नाकारणाऱ्या या साक्षीदारांमध्ये डिपेâन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे वैज्ञानिक व्ही. व्यंकटराव यांचाही समावेश होता. यानंतर सन २०११ मध्ये सीबीआयने तपासकार्य एनआयएकडे सोपविले. या प्रकरणी दहा लोकांची नावे आरोपी म्हणून नोंदविण्यात आली होती. मात्र यापैकी फक्त पाच देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद उर्फ नाबा कुमार सरकार, भारत मोहनलाल रातेश्वर आणि राजेंद्र चौधरी, यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. या वेळी एकूण २२६ प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्यात आले होते मात्र अनेकांनी साक्ष देण्यास नकार दिला, यामध्ये कर्नल श्रीकांत पुरोहित आणि झारखंडचे मंत्री रणधीर कुमार सिंह यांचाही समावेश आहे. न्यायालयासमोर ४११ दस्तऐवज सादर करण्यात आली. स्वामी असीमानंदने २०११ मध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या कबुली जबाबात म्हटले होते की अजमेर दर्गाह, हैद्राबादमधील मक्का मस्जिद आणि इतर अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचा आणि त्यांच्या इतर काही हिंदू दहशतवादी संघटनांचा हात आहे. मात्र नंतर असीमानंद यांनी आपला कबुली जबाब नाकारताना म्हटले होते की तसे त्यांनी एनआयएच्या दबावाखाली कबूल केले होते. या खटल्याच्या तपासादरम्यान या प्रकरणाचा प्रमुख आरोपी व रा. स्व. संघाचा कार्यकर्ता सुनील जोशी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अशा परिस्थितीत सर्व आरोपी पुराव्याअभावी दोषमुक्त होण्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रकरणात राजकारणाचा हस्तक्षेप असल्याची पाल चुकचुकल्याशिवाय राहात नाही. या निकालाचे दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. अतिशय गंभीर प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने आमच्या तपासयंत्रणेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहाते. जर सर्व आरोपी निर्दोष आहेत तर मग खरे गुन्हेगार कोण आहेत? असाही प्रश्न उपस्थित होतो. हल्ल्यात ठार झालेल्या निर्दोष व्यक्तींच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा ही न्यायालयीन प्रक्रियेची धारणा असते. मात्र काँग्रेस व भाजप या निर्णयाच्या निष्कर्षांचे आपल्या सोयीनुसार स्पष्टीकरण करतील आणि राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्नही करतील. कोणत्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली होती? असा प्रश्न एनआयएला विचारायला हवा होता. मागील आठ वर्षांत त्यांच्याविरूद्ध मजबूत पुरावा का शोधण्यात आला नाही? जर पुरावे नव्हते तर त्यांना अटक का केली? गंभीर स्वरूपाच्या घटनेनंतर गुन्हेगारांना अटक न होणे हे व्यवस्थेच्या अपयशाचेही उदाहरण आहे. मक्का मस्जिद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांनी निकालाच्या काही काळानंतर दिलेला राजीनामा बरेच काही सांगून जातो. अगोदर मालेगाव व अजमेर प्रकरणात आणि आता मक्का मस्जिद प्रकरणात आरोपींना ज्या प्रकारे निर्दोष मुक्त करण्यात आले त्यावरून असे वाटते की हिंदू दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी सत्ताधारी राजकीय पक्षांनी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. राजकीय पक्षांद्वारे चालविण्यात येत असलेले हे प्रयत्न भारतासारख्या लोकशाही देशाला आगामी काळात घातक ठरणार आहेत. देशात हिंदू दहशतवादी घटनांमधील आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्याचा क्रम सुरू राहणे याद्वारे चुकीचा संदेश प्रसारित होतो. हा क्रम यापुढे थांबवायलाच हवा. कारण दहशतवादी घटनांमध्ये वित्त-प्राणहानी काल्पनिक नसते. मक्का मस्जिद बॉम्बस्फोटात नऊ लोकांचा बळी गेला होता. अशा प्रकारच्या निर्णयामुळे किंवा अशा प्रकारच्या तपासकार्यामुळे न्याययंत्रणेची वा तपासयंत्रणेची विश्वासार्हता टिकून राहील? अशाने ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल?                    

-कलिम अजीम, अंबाजोगाई
भारतात यापूर्वी कधी बलात्काराचं जाहीर समर्थन झालं असावं असं माझ्या ऐकिवात नाही, किंबहूना नसेलच; पण सध्या भारतात ‘देशभक्ती’च्या नावाखाली ते केलं जातंय. इतकंच नव्हे तर मोर्चे काढून आरोपींना अडकवू नये अशा धमक्या देत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत. हिंदू वकील आणि एसएसपी मृत आसिफाचा खटला चालविण्यासाठी पुढे आल्याने अचानक हा मुद्दा राष्ट्रवादी करण्यात आला. हाच मुद्दा भावनेच्या भरात भाजपत्रस्तांनी उचलून देशभर आंदोलने सुरू केली आणि भाजपला हवं असलेलं हिंदू-मुस्लिम दूहीचं राजकारण यशस्वी झालं. रामराज्याच्या धर्मयुद्धासाठी बलात्कार आणि हत्या कशा नैतिक आहेत, याची जाहीर वाच्यता सुरू झाली आहे. या भाजपच्य षड्यंत्राला मुस्लिम बळी पडले असून ठिकठिकाणी संघटनेतर्फे स्वतंत्र मोर्चे आणि निषेध सभा घेण्यात येत आहेत. तीन महिन्यांपासून आसिफाच्या न्यायदानासाठी लढणारे एका झटक्यात हिंदू झाले आहेत. भाजपच्या सत्ताकृपेने निर्माण झालेली ही दरी कथित रामराज्याच्या संकल्पनेचा उदय म्हणावा लागेल का? असा प्रश्न मोहल्यातील मोर्चे पाहून निर्माण झाली आहे.
कठुआमधील पीडित बकरवाल कुटुंबाची बाजू घेणारे (हिंदू) एसएसपी व वकील न्यायदानासाठी हट्टी झाले, यामुळे भाजपने त्याला राष्ट्रवादाचा रंग दिला. आरोपींविरोधात चार्जशीट दाखल होताच अजेंड्याप्रमाणे जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. या जाहीर भूमिकेनंतर मानवतेविरूद्धचा गुन्हा अचानक हिंदू-मुस्लिम झाला. मोर्च्यातून दिल्या गेलेल्या घोषणा केवळ बलात्काराच्या समर्थनासाठी नव्हत्या तर रामराज्याच्या स्थापनेच्या धर्मेयुद्धासाठी होत्या. खोऱ्यात जम्मू विरूद्ध काश्मीर अशी राजकीय विभागणी आहे. जम्मूत हिंदू बहुसंख्य तर काश्मिरात ते अल्पसंख्य आहेत. जम्मूतून बकरवाल (मेंढपाळ) मुस्लिमांना हुसकावून लावण्यासाठी चिमुरड्या आसिफाचा बळी घेण्यात आला. काश्मिरीद्वेष आणि त्यात मुस्लिमविरोधी अजेंडा राबवून देशभरात हा मुद्दा हिंदू-मुस्लिम म्हणून पेटवण्यात येत आहे. घटना घडून तीन महिने उलटले आहेत, या तीन महिन्यांत मृत आसिफासाठी न्यायादानासाठी काश्मिरी पंडित असलेले नागरिक कुठल्याही प्रसिद्धीशिवाय झटत होते. पण बलात्काराच्या समर्थनार्थ दिलेल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणेमुळे हा मुद्दा देशभरात चर्चेत येऊन राजकीय वादंग निर्माण झालं.
या राजकीय वादळानंतर फेसबुकवरील भाजपभक्ताच्या कॉमेंट वाचल्या तर हे ‘धर्मयुद्धा’साठी हे वादळ पेटवलं जात आहे हे लक्षात येईल. सामाजिक कार्यकर्ते व खटला लढवणाऱ्या एसएसपी, वकिलांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. बलात्कार समर्थक संस्कृतीचे पाईक जघन्य गुन्ह्याला नैतिक म्हणत त्यात जात-धर्म खेचून त्याची हिंदू-मुस्लिम अशी वर्गवारी करत आहेत. अशा अराजक वृत्तीमुळे इतर देशातील प्रसारमाध्यमे ‘तुमचा प्रवास विकृतीकडे’ अशा बातम्या मुख्य मथळ्याखाली लावत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची छी: थू: होताना चौकीदार असलेले प्रधानसेवक ‘मगरमच्छ के आँसू’ गिळत कारवाईचं पोकळ आश्वासन देत आहेत.
उन्नाव व कठुआ बलात्काराबद्दल देशभरात भयंकर राग व्यक्त केला जात आहे. दोन्ही गुन्ह्यात थेटपणे भाजप व हिंदुत्ववादी संघटनेचे समर्थक सामील आहेत. या आरोपींना वाचवण्यासाठी देशभरात हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा उघडल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे सरकार व त्यांचे मंत्री मागच्या सरकारमध्ये झालेल्या अशा प्रकारच्या झालेल्या गुन्ह्याचा पाढा वाचून दाखवायची स्पर्धा लागलेली आहे. एका अर्थाने सरकार गुन्ह्याचे पॅरामीटर्स मोजपट्टी लावून मोजत आहे. यावरून सरकारची नैतिकता किती खालच्या दर्जाची आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
भाजपने सत्तेत येण्यापूर्वी ‘बेटी बचाव’ची घोषणा दिली होती. कोणापासून बेटी बचाव असं त्या वेळी सांगण्यात आलं नव्हतं. पण देशात घडणाऱ्या अलीकडच्या काही घटना पाहता भाजपच्या घोषणेचा नेमका अर्थ अभिप्रेत झाला आहे. त्यांनी या घोषणेचा नेमका शोधायला भारतीय जनतेला मदत केली आहे. त्यामुळे मतदार बंधुनी जागे होऊन ‘आमच्या घरी लहान मुली राहातात बीजेपी सदस्यांनी इकडे येऊ नये’ असे बोर्ड लावले आहेत.
भाजपच्या योगी-भोगी पदाधिकाऱ्यांना घाबरून अनेक ठिकाणी ‘बेटी छुपाओ’च्या घोषणा दिल्या जात आहेत. अनेक शहरांत ‘भाजपकडून बेटी बचाव’ असे पोस्टर्स हातात घेऊन लोकं रस्त्यावर उभे ठाकले आहेत. बॉलीवूडमध्येही संतापाची मोठी लाट उसळली असून सेलिब्रिटींनी ‘मी हिंदू आहे’, ‘मी भारतीय आहे’ असे पत्रके घेऊन भाजपच्या ‘आरोपी बचाव’ नीतीचा निषेध केला आहे. भाजपच्या ‘आरोपी बचाव’ भूमिका व बलात्कारी सत्ता-संस्कृतीविरोधात  देशात हडकंप माजला आहे. शाळा, कॉलेज, सभा-संमेलनं, चौक, मार्केट, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालये, इंटरनेट सगळीकडे भाजपच्या या धोरणाचा निषेध सुरू आहे.
इतका हाहाकार माजली असतानाही भाजप बचाव मोडमध्ये आहे. उन्नावच्या घटनेत हायकोर्टाला आदेश द्यावे लागले की आरोपीला अटक करा, पण राज्याच्या भगव्या वेषधारी सरकारने आरोपीला सीबीआयच्या सुरक्षित झोनमध्ये आसरा देऊ केला आहे. यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी थेट आरोपीला वाचवण्याची मोहीम उघडल्याचं भाजपच्याच आमदाराने उघड केलं आहे.
उन्नाव व कठुआची घटना देशात 'आरोपी बचाव' सत्ता-संस्कृती रुजत आहे याचे उदाहरण आहे. कठुआत आरोपीने मंदिसारख्या पवित्र ठिकाणी आठ वर्षाच्या चिमुरडीला कैद करून तिच्यावर पाशवी अत्याचार केला. इतकंच नव्हे तर या गुन्ह्यात आपला मुलगा व पुतण्याला सामील करून त्यांच्याकडून लहान बालिकेवर अत्याचार करवून घेतला. इथपर्यंत ही मालिका थांबली नाही तर मुलीला संपवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांनीदेखील मुलीला ठार मारण्यापूर्वी भोगण्याची इच्छा व्यक्त करून ती पूर्ण केली. अशा प्रकारे त्या आठ वर्षाच्या अबोध बालिकेला क्रूर सैतानांनी मंदिरात संपवलं. इतक्या क्रूरपणे त्या बालिकेला ठार मारण्यात आले.
मुस्लिमांना देशातून हाकलून लावणे, त्यांच्या संपत्तीची हानी करणे, त्यांना त्रास देणे, वेळप्रसंगी त्यांना ठार मारणे असं उदिष्ट्ये काही धर्मवादी बाळगून आहेत. याच हेतूसाठी त्यांनी आपलं राजकीय, सामाजिक जीवन समर्पित केलं आहे. त्याचाच भाग म्हणून देशात गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाजाविरोधात हेट क्राईमचा कट रचला जात आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात हेट क्राईमच्या तब्बल ३७ घटना घडविण्यात आल्या. यात ११ मुस्लिमांना ठार मारण्यात आलं आहे. तर गोरक्षकांनी मॉब लिंचिंग करून २६ मुस्लिमांना संपवलं आहे. आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार संघटना एमनेस्टी इंटरनॅशनलने या वाढत्या हेच क्राइमवर चिंता व्यक्त केली होती. राजसमंद व कठुआची घटना हेट कार्ईमचा कळस होती. मुस्लिमांच्या हत्येचं मिरवणुका-रॅल्या काढून उदात्तीकरण करणे हेट क्राईमला मान्यता मिळाल्याचे सोदाहरण होतं. क्रूरपणे हत्या करून त्याचे समर्थन करणारा गट उघडपणे बाहरे येणे हे मुस्लिमविरोधात वातावरण भडकवत ठेवण्याचं एक षडयंत्र आहे.
लहान मुलीची हत्या मुस्लिमद्वेषी सूडभावनेपोटी झाल्याचं सिद्ध आहे. असं असलं तरी पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी सर्वप्रथम हिंदूच पुढे आले आहेत. कुठलंही जात-धर्म पुढे न करता त्यांनी चिमुरड्या आसिफाच्या कुटुंबीयाला कायदेशीर मदत व सहकार्य दिलं. वकील असो वा एसएसपी यांनी प्रयत्न करून खटला जलदगती चालविला जावा यासाठी विषेश प्रयत्न केले. बार काऊंसिलच्या धमकीला भीक न घालता वकील सक्षमपणे उभ्या आहेत. थोडक्यात  काय तर आरोपीविरोधात पोलीस व वकील उभे राहिल्यानं स्थानिक भाजप पुढाऱ्यांनी मुद्दा हिंदू-मुस्लिम केला. आज ही घटना मानवतेच्या दृष्टिकोनातून नव्हे तर हिंदू-मुस्लिम प्रश्न समजून पाहिली जात आहे. जे हिंदुत्ववाद्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात चार्जशीट दाखल करताच ही समस्या राष्ट्रीय करून वातावरण हिंदू विरुद्ध मुस्लिम करण्यात आलं.
आठ वर्षांच्या चिमुरडीची बलात्कार करून हत्या करण्याला धर्मयुद्धाचा रंग देण्यात आला आणि संघ-भाजपला हवा असलेला अजेंडा सर्व भारतीयांनी भावनेच्या ओघात उचलला. तीन महिन्यांपासून केवळ निनावी लोकं कुठल्याच प्रसिद्धीविना कायदेशीर प्रक्रिया रेटत होते, पण मोर्चे-आंदोलनामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की निषेध करू नये पण, तो पॉलिटिसाईज होता कामा नये. पण दुर्दैवीने तो राजकीयच केला जातोय.
उन्नावची घटना कठुआ प्रकरणामुळे हिंदू-मुस्लिम झाली आहे. या निमित्ताने संघ भाजप उघडा पडला आहे. रामराज्याची संकल्पना लेकीबाळी अब्रूवरून रचली जात असेल तर सर्वांना एकदा विचार करावाच लागेल. कठुआत बलात्काराचा बचाव करताना मॉब ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होता. याचा अर्थ आठ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून क्रूर पद्धतीने हत्या करणे धर्मयुद्धाचा भाग आहे का? ज्या पद्धतीने मृत मुलीचा खटला घेणाऱ्या वकिलाला वकिलांनीच खटला सोड नसता जीवे मारू अशी धमकी रामराज्याचा भाग आहे का? रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांनी शस्त्रे घेऊ नाचणे, ड्युटीवर असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे, राम राज्याच्या स्थापनेची पोचपावती होती का?  काही वेळासाठी असं मानू या की इथंपर्यत ठीक आहे, पण हे संघवादी कुठले रामराज्य आणू पाहत आहे? मुलींच्या अब्रूची लक्तरे फाडणे, जात आणि धर्माच्या नावाने सामान्य जीवांना क्रूर पद्धतीने ठार मारणे, मानवजातींपेक्षा गायींना अधिक महत्त्व देणे, विज्ञान व विवेक नाकारून मूलतत्त्ववाद, अनिष्ठ रुढीपरंपरा लादणे हीच का रामराज्याची संकल्पना? राजकीय नेत्यांना असं रामराज्य हवं असेल तर भारतीय नागरिकांनी जरा थांबून विचार करण्याची गरज आहे. थोडसं स्तब्ध होऊन आपण कुठे जात आहोत हे शांतचित्ताने समजून घेण्याची गरज आहे. खरंच विज्ञान आणि विवेक नाकारणारे राम राज्य अभिप्रेत असेल तर लोकशाही मूल्यांची ओरड कशाला? संसदीय लोकशाही चालवण्याचं ढोंग कशाला करता?
गेल्या २५ वर्षांत देशाचं समाजकारण रामाच्या नावाने गढूळ करण्यात आलं आहे. गेल्या चार वर्षांत कुठलाही मुद्दा हिंदू राष्ट्राशी जोडून हिंदू विरूद्ध मुस्लिम भडकवण्यात आला. प्रसारमाध्यमे, ब्यूरोक्रट्स, शाळा, कॉलेज, विद्यापीठे, शासनात रामराज्याची कल्पना संचारली आहे. आता प्रशासकीय विभागामध्येही रामराज्ये रेटण्याचं काम सुरू झालं असून, राजसमंद आणि कठुआसारख्या घटना घडवून त्या राज्याची पायाभरणी केली जात आहे. हत्या आणि बलात्काराला राजकीय मान्यता देण्याची भाषा सुरू आहे. येत्या काळात धर्मायुद्धाच्या नावाने घरात घुसून आया-बहिणीचे वस्त्रहरण केले जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. धर्माच्या नावाने दरोडे घालण्याची परवानगी मागितली जाईल, रामराज्याच्या नावाने खंडणी उकळणे अधिकृत करण्याची मागणी केली जाईल. हवंय ना असं रामराज्य..! हीच का रामराज्याची संकल्पना?
गेल्या वर्षी जून महिन्यात झारखंडमध्ये दोन हिंदू तरूणांची हिंसक झुंडीने हत्या केली. ते दोन तरूण आम्ही हिंदू आहोत आम्हाला मारू नका अशा गयावया करत होते. पण उन्मादी झुंडीच्या डोक्यात रक्त संचारलं होतं, कारण काहीच वेळापूर्वी त्यांनी ४ मुस्लिम तरुणांची हेट क्राईममधून खांबाल बांधून हत्या केली होती. त्यामुळे झुंडीला या तरुणांना ठार मारायचेच होते. त्यामुळे झुंड ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती. अखेर त्या दोघांना त्यांच्या पत्नी व मुलांसमोर ठार मारले. मानवद्वेष ही वृत्ती काम राज्याची देणं असेल तर कुणाला हवंय हे हिंदू राष्ट्र?
भगवान रामाच्या नावाने सुरु झालेला हा हेट क्राईमचा प्रवास कुठे घेऊन जाईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, मानवेताला काळिमा फासवणारी बलात्कार व हत्यची घटना पॉलिटीसाईज करून हिंदू-मुस्लिम रंग देणे, रामराज्य व हिंदूराष्ट्राची पायाभरणी भगवान रामाला मान्य आहे का? भगवान रामाच्या नावाने आमच्या आया-बहिणीवर जर बलात्कार होत असेल व त्याचे समर्थन केले जात असेल तर नक्कीच आम्हा सर्वांना शांत मनाने विचार करण्याची गरज आहे.
कलीम अजीम, अंबाजोगाई

– एम. बी. शेख
कोल्हापूर

    राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार साहित्यातून प्रभावीपणे पुढे यावेत, या विचारांचा शासनावर दबाव निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योजक एम. बी. शेख यांनी येथे केले.
    येथील संत गाडगे महाराज अध्यासन आणि करवीर साहित्य परिषदेतर्फे आयोजित ग्रंथपुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या कार्यक्रमास उद्योजक एस. एन. पाटील प्रमुख उपस्थित होते.
    उद्योजक शेख म्हणाले, साहित्यातून सर्वसामान्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. संत गाडगे महाराज अध्यासन आणि करवीर साहित्य परिषदेने सन्मानित केलेल्या साहित्यिक, लेखकांच्या साहित्य, लेखनातून त्याचे दर्शन घडते. अध्यासनाने अविरतपणे साहित्यसेवा सुरू ठेवावी.
    उद्योजक पाटील म्हणाले, प्लास्टिकमुक्तीचे आपण सर्वांनी समर्थन करावे. साहित्यिकांनी आपल्या लेखनातून प्लास्टिकचे दुष्परिणाम मांडावेत.
    या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत ग्रंथ पुरस्कार, पुस्तक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
    या वेळी परीक्षक श्याम कुरळे, डॉ. जी. पी. माळी, डॉ. अ. आ. दिवाण, आदींनी मनोगत व्यक्त केले.
    सुनीलकुमार सरनाईक, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. सु़जय पाटील, गजानन रेळेकर, मनोहर दिवाण यांना संत ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुधा पाटील, प्रतीक पाटील, नवनाथ गोरे, अरुणकुमार यादव, आ. क. कुरुंदवाडे, कल्लप्पा पाटील, जयश्री वानवे, अनिल चव्हाण यांना कर्मवीर साहित्य परिषदेच्या पुस्तक पुरस्काराने गौरविण्यात आले.
    कार्यक्रमास सुधाताई पाटील, मुरलीधर देसाई, युवराज कदम आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यासनाचे अध्यक्ष प्राचार्य रा. तु. भगत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. टी. आर. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. एम. डी. देसाई यांनी आभार मानले.

पुणे –
    अन्यायाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावतो. संरक्षणासाठी आपण पोलिसांकडे धाव घेतो. समाजात राहात असताना येणाऱ्या विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी शासनाकडे दाद मागतो. मात्र यापैकी कुणाकडूनही दखल न घेतली गेल्यास लोक आपले गाNहाणे वृत्तपत्रांकडे मांडतात. त्यामुळे प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची खरी शक्ती असल्याचे मत माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र संपादक परिषद आयोजित पत्रकारिता साहित्यगौरव पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कारार्थींच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.
    महाराष्ट्र संपादक परिषद ही कोणत्याही संघटनेशी समांतर किंवा स्पर्धात्मक कार्य न करता पत्रकारितेच्या उद्दिष्टांसाठी कार्यरत असणारी संघटना आहे. राज्य व केंद्र सरकारदरबारी पत्रकार तसेच वृत्तपत्रे यांचे प्रश्न मांडण्यासोबतच पत्रकारांसाठी परिषदेतर्फे विविध उपक्रमही राबविण्यात येतात. आदर्श पत्रकारिता व साहित्य गौरव पुरस्कार योजनेमधून राज्यस्तरीय मानवंत व गुणवंत पत्रकारांचा दरवर्षी परिषदेतर्फे सन्मान करण्यात येतो.
    प्रतिभाताई पाटील पुढे म्हणाल्या, समाजातील अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी वृत्तपत्रांना पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे लोकशाहीत वृत्तपत्रांच्या जबाबदाऱ्यांना अधिक महत्त्व आहे.
    महाराष्ट्र राज्य पतसंस्था फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब कोयटे (संपादक, व्रेâडिट न्यूज) कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होत़े संपादक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे (ज्येष्ठ संपादक, दै. देशोन्नती), अध्यक्ष संजय मलमे (संपादक, दै. पुण्यनगरी), कार्याध्यक्ष रमेश खोत, सचिव एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये व्यासपीठावर उपस्थित होते.
    ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच न्यूज १८ लोकमतचे दिनेश केळुस्कर, रत्नागिरी (स्व. शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार), अशोक वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार, नवी दिल्ली (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार), नीला खोत, ज्येष्ठ पत्रकार, जालना (लोकमान्य टिळ्क स्मृती पुरस्कार), नवनाथ दिघे, ज्येष्ठ पत्रकार, दिव्य मराठी, शिर्डी (विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मृती पुरस्कार), राजेश जगताप, शोध पत्रकार, दै. पुढारी, ठाणे (आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार), शौकतअली मिरसाहेब, ज्येष्ठ पत्रकार, अकोला (प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार), संदीप आचार्य, वरिष्ठ सहसंपादक, लोकसत्ता, मुंबई (गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार), देवेंद्र पळणीटकर, संपादक, दै. ऐक्य, सातारा (भुरीबाई केसरीमलजी जैन पुरस्कार) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
    प्रकाश पोहरे म्हणाले, ‘आपल्यामधला पत्रकार कधीही मरू न देणे, ही काळजी संपादकाला घ्यावी लागत़े संपादकपद सांभाळणे आव्हानात्मक असून नवीन पिढीने या क्षेत्रात येताना पुरेशी तयारी करणे गरजेचे आह़े’
    सर्व पुरस्कारविजेत्या पत्रकार, संपादकांना शुभेच्छा देऊन विजय बाविस्कर यांनी पत्रकारितेचा गाभा आणि गाभारा शाबूत ठेवण्याचे आवाहन केल़े
    पुरस्कारविजेत्यांच्या वतीने संदीप आचार्य यांनी मनोगत व्यक्त केल़े  प्रा. हेमंत सामंत यांनी सूत्रसंचालन केले.

    माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘आपल्या जनसमुदायाच्या बाबतीत ज्या गोष्टीपासून सर्वाधिक मला भय आहे ती म्हणजे माझा जनसमुदाय आपल्या इच्छांचे म्हणणे ऐकू लागेल आणि भौतिक जग प्राप्त करण्यासाठी लांबलचक दिवास्वप्ने पाहू लागेल तेव्हा त्याच्या स्वअभिलाषेचे म्हणणे ऐकण्याच्या परिणामस्वरूप तो सत्यापासून दूर होईल आणि भौतिक जग प्राप्त करण्याच्या आकांक्षा परलोकापासून गाफील करतील. (लोकहो! या जगाने कूच केले आहे, ते जाऊ लागले आहे आणि परलोकाने कूच केले आहे, ते येऊ लागले आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे मानणारे आहेत जे त्याच्यावर प्रेम करतात. तुमच्यासाठी उत्तम आहे की तुम्ही जगाचे लोभी बनू नका, तुम्ही या वेळी अनुसरणाच्या घरात आहात आणि हिशोबाची वेळ अजून आलेली नाही आणि उद्या तुम्ही हिशोबाच्या घरात (परलोकात) असाल, तेथे अनुसरणाची कसलीही संधी मिळणार नाही.’’ (हदीस : मिश्कात)
    पैगंबर मुहम्मद (स.) एका मनुष्याला उपदेश करताना म्हणाले, ‘‘तुम्ही पाच गोष्टींची पाच गोष्टींपूर्वी कदर करा- आपल्या तारुण्याला वृद्धत्व येण्यापूर्वी, आपल्या आरोग्याला आजारापूर्वी, आपल्या खुशालीला आपल्या दारिद्र्यापूर्वी, आपल्या पुâरसतीला व्यस्ततेपूर्वी आणि आपल्या जीवनाला मृत्यूपूर्वी.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : तारुण्यात खूप अनुसरण करा, कारण जख्ख वृद्धत्वाच्या स्थितीत इच्छा असूनदेखील काहीही करू शकणार नाही. आपल्या निरोगीपणाचा परलोकाच्या तयारीत वापर करा, कदाचित आजारी पडाल आणि काहीही करू शकणार नाही. जेव्हा अल्लाह खुशाली देईल तेव्हा त्यापासून आखिरतचे कार्य करा, कदाचित तुम्ही गरीब व्हाल. मग अल्लाहच्या मार्गात संपत्ती खर्च करण्याची संधी मिळणार नाही. या संपूर्ण जीवनाची कदर करा आणि ते अल्लाहच्या कार्यात व्यतीत करा अन्यथा मृत्यू येऊन अनुसरणाच्या सर्व संधी संपुष्टात येतील.
    माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) नमाजसाठी मस्जिदमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिले की काही लोक मोठमोठ्याने हसत होते. पैगंबर म्हणाले, ‘‘जर तुम्ही सुख नष्ट करणाऱ्या मृत्यूला अधिक आठवले असते तर त्याने तुम्हाला हसण्यापासून रोखले असते. मृत्यूची मोठ्या प्रमाणात आठवण करा, तो सुख नष्ट करणरा आहे आणि कबर दरदिवशी म्हणते की मी वाटसरूंचे घर आहे, मी एकांताची कोठडी आहे, मातीचे घर आहे आणि जेव्हा एखादा मोमिन भक्त कबरीत दफन केला जातो तेव्हा कबर त्याचे स्वागत करते. म्हणते की तू माझ्या पाठीवर चालणाऱ्यांपैकी मला सर्वाधिक प्रिय होतास. आज तुला माझ्या ताब्यात देण्यात आले आहे. पाहा मी तुझ्याशी किती चांगला व्यवहार करते ते.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘त्या मोमिन भक्तासाठी ती कबर त्याची दृष्टी जेथवर पोहोचेल इतकी ती विशाल बनते. त्याच्यासाठी स्वर्गाच्या दिशेने एक दरवाजा उघडला जातो. जेव्हा एखादा दुराचारी अथावा एकेश्वरत्व नाकारणारा दास दफन केला जातो तेव्हा कबर त्याचे स्वागत करीत नाही. ती म्हणते की तू माझ्याकरिता माझ्या पाठीवर चालणारांपैकी सर्वाधिक अप्रिय मनुष्य होतास. आता तुला माझ्या हवाली करण्यात आले आहे आणि तू माझ्याजवळ आला आहेस. पाहा, मी तुझ्याशी किती वाईट व्यवहार करते ते.’’ पैगंबर म्हणतात, ‘‘मग कबर त्याच्यासाठी आकुंचित पावते आणि इतकी अरुंद होईल की त्याच्या फासळ्या एकमेकांत अडकतील.’’ असे म्हणत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका हाताची बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांमध्ये अडकविली. त्यानंतर म्हणाले, ‘‘त्याच्यावर ७० अजस्र साप सोडण्यात येतील. त्यांच्यापैकी प्रत्येक साप इतका विषारी असेल की जमिनीवर त्याने फुंकर मारली तर त्याच्या विषाच्या परिणामामुळे त्या जमिनीवर कधीही काहीही उगवू शकणार नाही. मग हे सर्व अजस्र साप त्याच्या दंश करतील आणि चावा घेतील. असेच अंतिम निवाड्याचा दिवस येईपर्यंत त्याच्याशी होत राहील. तो अल्लाहच्या दरबारात हिशोब देण्यासाठी उभा केला जाईल.’’ मग पैगंबर म्हणाले, ‘‘कबर मनुष्याकरिता स्वर्गाच्या बागांपैकी एक बाग बनते अथवा नरकाच्या खड्ड्यांपैकी एक खड्डा.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : जेव्हा एखादा मनुष्य आपल्या क्षमतेनुसार जगातील दुष्टव्यांचा सामना करीत पारलौकीक जीवनाची तयारी करता करता मरण पावतो. दरम्यानच्या जीवनात ज्याला कबर म्हटले जाते, त्याच्याशी अल्लाह कृपा करतो आणि तो आनंदित होतो. जो मनुष्य जीवनभर वाईट कर्म करीत राहतो आणि पश्चात्ताप व्यक्त न करता मरण पावतो तेव्हा त्याच्याशी काहीसा तसाच व्यवहार केला जाईल जसा न्यायालयात हजर होण्यापूर्वी कारावासात होत असतो. हदीसच्या शेवटच्या भागाचा अर्थ आहे की मनुष्याने हवे तर आपल्या वर्तणुकीद्वारे कबरीतील जीवनाला आरामदायक व सुखमय जीवन बनवावे अथवा मग दुराचाराच्या स्थितीत हे जीवन व्यतीत करावे आणि मग कबरीतील शिक्षेला सामोरे जावे.

(८) ते अल्लाहजवळ प्रार्थना करीत असतात की, ‘‘हे पालनकर्त्या! जेव्हा तू आम्हास सरळमार्गावर आणले आहेस तर आमची मने वक्रतेत गुंतवू नकोस. आम्हाला तुझ्या औदार्याच्या भांडारातून कृपा प्रदान कर, कारण तूच खऱ्या अर्थाने उदार आहेस.
(९) हे पालनकत्र्या, नि:संशय तू एके दिवशी सर्व लोकांना एकत्रित करणार आहेस, ज्या दिवसाच्या आगमनाबद्दल कसलीही शंका नाही, तू आपल्या वचनापासून मुळीच ढळणारा नाहीस.’’
(१०) ज्या लोकांनी द्रोहाचा मार्ग अवलंबिला आहे, त्यांना अल्लाहपासून वाचविण्यासाठी त्यांची धनसंपत्ती उपयोगी पडणार नाही किंवा त्यांची संततीदेखील. ते नरकाग्नी चे इंधन बनून राहतील.
(११) त्यांचा शेवट तसाच होईल, जसा फिरऔनचे सोबती व त्यांच्या पूर्वी अवज्ञा करणाऱ्यांचा झाला आहे. कारण त्यांनी अल्लाहच्या संकेतांना (निशाण्या) खोटे ठरविले. परिणामस्वरूप अल्लाहने त्यांच्या अपराधांसाठी त्यांना पकडले आणि सत्य असे आहे की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे.
(१२) म्हणून हे पैगंबर (स.)! ज्या लोकांनी तुमचे आवाहन मान्य करण्यास नकार दिला आहे, त्यांना सांगून टाका की, ती वेळ जवळच आहे जेव्हा तुम्ही पराभूत व्हाल, व नरकाकडे तुम्हांस हाकून नेले जाईल, व नरक (जहन्नम) फारच वाईट स्थान आहे. 
(१३) त्या दोन्ही गटांमध्ये तुमच्यासाठी बोधचिन्ह होते, जे (बदरच्या युद्धात) एक दुसऱ्याशी भिडले. एक गट अल्लाहच्या मार्गात लढत होता आणि दुसरा गट द्रोह करणारा होता. पाहणारे उघड्या डोळ्यांनी पाहात होते की, द्रोह करणाऱ्यांचा गट ईमानधारकांच्या गटापेक्षा दुप्पट आहे.  पण (परिणामाने सिद्ध करून दाखविले की) अल्लाह आपल्या विजयाने व साहाय्याने हवे त्याला मदत देतो.डोळसपणा बाळगणाऱ्यांसाठी त्यामध्ये उत्तम बोध दडलेला आहे.१०
(१४) लोकांकरिता वासनाप्रिय गोष्टी,– स्त्रिया, संतती, सोन्या-चांदीचे ढीग, निवडक घोडे, पशू आणि शेतजमिनी– अत्यंत मोहक बनविल्या गेल्या आहेत, पण या सर्व वस्तू तर क्षणिक ऐहिक जीवनाची सामग्री आहे. खरे पाहता जे सर्वोत्तम ठिकाण आहे, ते अल्लाहजवळ आहे.

८) तपशीलासाठी पाहा, अध्याय २ रा टीप क्रं. १६१.
९) जरी वास्तविक फरक तिप्पट होता तरी पाहणाऱ्याला वाटत होते की शत्रूंचे सैन्यदल मुस्लिमांपेक्षा दुप्पट आहे.
१०) बदर युद्धाची घटना त्या वेळी घडली जेव्हा नुकतेच मदीना येथे इस्लामी शासन प्रणाली सुनिश्चित होऊ लागली होती. तो इस्लामी शासनप्रणालीचा प्रारंभकाळ होता. म्हणून त्याच्या प्रत्येक घटनांचा आणि परिणामांचा स्पष्ट उल्लेख करून लोकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. या युद्धांत तीन गोष्टी अगदी प्रकर्षाने समोर आल्या. एक म्हणजे मुस्लिम आणि विरोधक व (एकेश्वरवादी आणि अनेकेश्वरवादी) ज्या पद्धतीने एकमेकांपुढे उभे ठाकले होते; त्याने दोघांमधील नैतिक फरक अगदी स्पष्ट जाणवत होता. एकीकडे विरोधकांच्या बाजूला मद्यपान, नर्तिकासह नाचगाणे आणि खूप मौजमजा चालली होती तर दुसरीकडे मुस्लिमांच्या लष्करात ईशभय व सदाचार, अत्युच्च दर्जाची नैतिकता, नमाजचे अनुपालन, रमजानच्या रोज्यांचे अनुपालन करुन अल्लाहसमोर तळमळीने प्रार्थना केली जात होती. दोन्ही सैन्यदलांना पाहून स्पष्ट जाणवत होते की दोघांपैकी कोण अल्लाहच्या मार्गात लढत आहे.     दुसरे म्हणजे मुस्लिम लोकांनी आपल्या अल्पसंख्य आणि युद्धसामग्रीच्या अभाव असूनसुद्धा सुसज्ज आणि अधिक सैन्यदल बाळगणाऱ्या विरोधकांना पराजयाची धूळ चारली, ती याचमुळे की अल्लाहची मदत त्यांना प्राप्त् होती. तिसरी गोष्ट म्हणजे अल्लाहच्या प्रभावशाली शक्तीपासून बेपर्वा जे लोक आपल्या सुसज्ज आणि अधिक संख्या बळावर पुâलून गेलेले होते त्यांच्यासाठी ही घटना एक चेतावणी होती की अल्लाह कशाप्रकारे काही गरीब, निर्वासित व मदीनेतील मूठभर शेतकऱ्यांद्वारे अरबस्थानातील कुरैशसारख्या सशक्त शिरजोर कबिल्याला पराजित करू शकतो जो सर्व अरबांचा सरदार कबिला होता.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget