Halloween Costume ideas 2015
Latest Post

चिंचवड (वकार अहमद अलीम) - शांती ही मानसिकतेमध्ये आहे तर प्रगती ही ऐहिकता आहे. मुक्ती ही अध्यात्मिकता आहे. आपले दुःख, पिडा, विकारांवर रामबाण उपचार आहे का? ज्यावेळेस आपले चित्त आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी लागते, तीच खरी शांती असते. अनेकत्वाने अशांती निर्माण होते तर एकत्वाने शांती निर्माण होते, असे भावपूर्ण उद्गार गुरूकुल विद्याभवनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भागवत गुरूजी यांनी काढले.    
    जमाअत-ए-इस्लामी हिंद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे शाहुनगर येथील धम्मचक्र विहारात मंगळवार 16 जानेवारी  रोजी सायंकाळी ’इस्लाम, शांती, प्रगती व मुक्ती’ या विषयावरील आयोजित परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जमाअत-ए-इस्लामी हिंदचे केंद्रीय प्रचार व प्रसार विभागाचे सचिव मौलाना मुहम्मद इक्बाल मुल्लासाहेब तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रनिर्माण जनपरिषद महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष पी.आर. सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक जमाअतचे महाराष्ट्र सचिव इम्तियाज शेख यांनी केले. ते म्हणाले, मोहिमेचा उद्देश हा व्यापक प्रमाणात जनसंवादाद्वारे वैचारिक देवाण-घेवाण करणे असून, ऐहिक व पारलौकीक जीवन सकल मानवांचे सफल व्हावे असे इम्तियाज शेख यांनी सांगितले. त्यांनी मोहिमेचे स्वरूप व हेतू स्पष्ट केला.
    न्याय, समता, बंधुता तथा स्वतंत्रता हे भारतीय संविधानाचे सार असून त्याद्वारेच राष्ट्राची एकता आणि अखंडता निर्माण करण्याचे ध्येय संविधानकर्त्यांनी ठेवले होते, असे मार्मिक टिपण करू, शांती आणि मुक्तीपेक्षा प्रगती या विषयावर अधिक भर देत पी.आर सोनवणे म्हणाले, जगातील 180 देशात मानवी निर्देशांकामध्ये ह्युमन इंडेक्समध्ये भारत 131 व्या स्थानावर आहे. पहिल्या 10 स्थानावरील देशांनी मानवतेसाठी बरेच काही केले आहे तर 100 च्या वरील देशांनी मानवतेसाठी काहीच केले नसल्याची जळजळीत टिकाही सोनवणे यांनी केली. शांती, प्रगती मृत लोकांसाठी नसून ते जीवंत माणसांसाठी असल्याचेही ते म्हणाले. जगातील सुमारे साडे सात अब्ज मानवी लोकसंख्या एकाच आई-बाबाची संतान असून, त्यातील एकाचाही जन्म वा मृत्यू, व्यक्तीच्या इच्छेनुसार झालेला नाही. तर या सृष्टीचा एकमेव निर्माणकर्ता, पालनकर्ता अल्लाकडूनच जन्म व मृत्यू येत असतो. मानवाच्या सुखसोईसाठी निर्मात्याने सूर्य, चंद्र, पर्वत, ढग, पाणी, हवा, पीके, धान्य, फळे यांची निर्मिती केली. पण माणसाची निर्मिती मात्र स्वतःसाठी केली. मानवाच्या ऐहिक व पारलौकीक सफलतेसाठी ह. आदम (अ.) हे प्रथम प्रेषित तर अंतिम प्रेषित ह. मुहम्मद (सल्ल.) यांना पृथ्वीवर पाठविले. अल्लाहने प्रेषितांवर आपल्या ग्रंथाचे अवतरण केले. अंतिम प्रेषितांवर, अंतिम ग्रंथ कुरआन अवतरण करून, समस्त मानवजातीचे मार्गदर्शन केले. त्यानुसार मानवाने आचरण केल्यास शांती, प्रगती व मुक्ती शक्य आहे, असे मत जमाअतचे प्रसार व प्रचार विभागाचे सचिव मौ. इक्बाल मुल्लासाहेब यांनी अध्यक्षीय समारोप व्यक्त केले.
    यावेळी विविध समाज घटकातील महिला, पुरूष,   सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्कृष्ट सुत्रसंचालन अजीमोद्दीन शेख यानी केले.

-मिनाज शेख, पुणे
    लाऊडस्पीकरवर अजान दिल्याने अल्लाह जास्ती खूश होतो का?
उत्तर-    सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजान ही अल्लाहसाठी नव्हे तर भक्तांना नमाजसाठी बोलविण्यासाठी असते. अल्लाहसाठी ज्या काही उपासना केल्या जातात, उदा॰ नमाज, कुरआन पठण, प्रवचन इ. या सर्व लाऊडस्पीकरशिवाय केल्या जातात आणि हळू आवाजात केल्या जातात. फक्त अजान ही लाऊडस्पीकरवर दिली जाते.
    भक्तांना नमाजसाठी लाऊडस्पीकरशिवाय बोलविले जाऊ शकते का? जसे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात होत असे.
उत्तर-    पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वी अजान ही एका उंच ठिकाणी उभे राहून दिली जात असे. जे लोक अजान ऐकत होते ते पुढे इतरांपर्यंत पोहचवत होते. परंतु आजच्या काळात अशी स्थिती शक्य नाही. कारण पूर्वी साधी बैठी घरे होती आणि आता मोठमोठ्या इमारती आहेत. तसेच आजकाल गाड्यांचे आवाज, हॉर्नस् या सर्वांपुळे तोंडी अजान दिली तर ती सर्वांपर्यंत पोहचणे अशक्य आहे.
    अजानशिवाय मस्जिदीमध्ये ठरल्या वेळी लोक प्रार्थनेसाठी (नमाज) का येऊ शकत नाहीत?
उत्तर- नमाजच्या सर्व वेळा या सूर्योदय आणि सूर्यास्तावर अवलंबून असतात. प्रत्येक तीन-चार दिवसांनी नमाजच्या वेळांमध्ये काही मिनिटांचा फरक होत असतो. हा फरक आपल्या भौगोलिक ठिकाणांवरही अवलंबून असतो. त्यामुळे सर्वच ठिकाणी आणि रोज एकच ठराविक वेळ नसते. तसेच पहाटेची (फजर) आणि संध्याकाळची (मगरीब) या दोन नमाजांसाठी खूप कमी वेळ असतो. त्यामुळे वेळेत नमाज पूर्ण करण्यासाठी अजान हा सोयीस्कर मार्ग पडतो.
    तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की अजानसाठीकाही अ‍ॅप किंवा बल्क एसएमएस यांचा वापर होऊ शकतो का?
उत्तर-    खरे पाहता, असे अ‍ॅप मोबाईलवर आलेले आहेत. पण जरा विचार करा, प्रत्येक मुस्लिम बांधवाने जर असे अ‍ॅप मोबाईलवर ठेवले तर एकाच वेळी किती अजान सुरू होतील! वर्दळीच्या ठिकाणी, शाळा, दवाखाने, महानगरपालिका, बसस्टॉप, रेल्वे स्टेशन या व अशा अनेक ठिकाणी एवढे मोबाईल वाजणे सुरू होतील की तो एक मोठा प्रश्न होऊन बसेल! त्यापेक्षा मस्जिदीमध्ये एकच मुअजिन (अजान देणारा) जर अजान देतो तर ते जास्त सहज व परिणामकारक ठरते.
    अजानव्यतिरिक्त इस्लाममध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना लाऊडस्पीकरची गरज आहे?
उत्तर-    कोणतीच नाही. कोणतीही प्रार्थना, प्रवचन इथपर्यंत की लग्नांमध्ये आणि वलिमांमध्येदेखील लाऊडस्पीकरची गरज नसते.
    इस्लाममध्ये असे कोणते उत्सव आहेत का ज्यामुळे ध्वनिप्रदूषण किंवा इतर प्रकारचे प्रदूषण होऊ शकते?
उत्तर-    नाही. इस्लाममध्ये फक्त दोनच उत्सव साजरे होतात जे कोणतेही प्रदूषण पसरवित नाहीत. (१) रमजान ईद- यात फक्त प्रार्थना व दानधर्म केला जातो. (२) बकरी ईद- यातसुद्धा मांस हे गरिबांपर्यंत पोहचवून त्यांची भूक भागविली जाते. फटाके वाजवून ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण केले जात नाही किंवा इतर कसल्याही प्रकारचा गाजावाजा केला जात नाही.
    अजानचा कालावधी खरेच इतका जास्त असतो का?
उत्तर-    अजानच्या वेळेचे मूल्यमापन- एक अजान- दीड ते दोन मिनिटे. पाच वेळची अजान- आठ ते दहा मिनिटे. म्हणजे एका दिवसात फक्त १० मिनिटे.
    याचाच अर्थ इतर ध्वनिप्रदूषणांच्या कारणांशी अजानची तुलना केल्यास अतिशय अल्प प्रमाणात म्हणजेच दिवसातून फक्त दहा मिनिटेच अजानचा आवाज ऐकू येतो.
    सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतक्या वर्षांत त्रासदायक न वाटणारी अजान आजच का त्रासदायक वाटू लागली?
उत्तर-    कारण अजान व संपूर्ण मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलविण्यात आला आहे. मतपेटीच्या राजकारणामुळे एका समाजाबद्दल तिरस्काराची भावना पेरण्यात आली आहे आणि म्हणूनच इतकी वर्षे त्रास न देणारी अजान आज अचानक त्रासदायक वाटू लागली. ज्या नेत्यांना समाजातील दारू, बलात्कार, भ्रष्टाचार, नशा, मॉब लिंचिंग, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, दलितांवर होणारे अत्याचार इ. भयानक घटनांपेक्षा अजानचा आवाज जास्त क्रूर वाटतो. त्यांच्या हेतूंबद्दल हास्यास्पद शंका येणे साहजिक आहे.

    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मी मेराजच्या रात्री काही लोकांना पाहिले की त्यांचे ओठ आगीच्या कातरीने कापले जात होते. मी जिब्रिल (अ.) यांना विचारले की हे कोण लोक आहेत? जिब्रिल (अ.) म्हणाले की हे पैगंबरांच्या जनसमुदायाचे भाषण करणारे लोक आहेत. हे लोकांना पुण्यकर्म आणि ईशभिरूतेचा आदेश देत होते आणि स्वत:ला विसरत होते.’’ (हदीस : मिश्कात)
    माननीय हरमला (रजि.) यांच्या कथनानुसार, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हटले, ‘‘आपण मला कोणती गोष्ट करण्याचा आदेश देत आहात?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘सदाचाराने वागा आणि दुराचारापासून अलिप्त राहा आणि पाहा, तू सभेतून उठून बाहेर गेल्यानंतर तुझी लोकांनी चांगल्या गुणवैशिष्ट्यामुळे आठवण करावी असे तुला वाटत असेल तर तू स्वत:मध्ये चांगली गुणवैशिष्ट्ये निर्माण कर आणि तुझ्या गैरहजेरीत लोक तुझ्या बाबतीत काही म्हणतील जे तुला आवडत नाहीत, त्यापासून स्वत:ला अलिप्त ठेव.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीरकण : लोकांनी आपली चांगल्या गुणवैशिष्ट्यामुळे आठवण करावी, असे मनुष्याला वाटत असेल तर त्याने तसलीच कामे करावयास हवीत आणि लोकांनी आपली वाईट गुणवैशिष्ट्यांमुळे आठवण करावी असे मनुष्यास वाटत नसेल तर त्याने अशा वाईट गुणवैशिष्ट्यांपासून दूर राहिले पाहिजे.
    एका मनुष्याने माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास (रजि.) यांना म्हटले,
    ‘‘मला दीनचे काम करायचे आहे. सत्कर्म करण्यास सांगू इच्छितो आणि दुष्कर्म करण्यापासून रोखू इच्छितो.’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही त्या स्तरापर्यंत पोहोचला आहात?’’ तो म्हणाला, ‘‘होय, आशा आहे.’’ इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘कुरआनच्या तीन आयती तुम्हाला अपमानित करतील याची तुम्हाला भीती वाटत असेल तर अवश्य दीनचे काम करा.’’ तो म्हणाला, ‘‘त्या कोणत्या आयती आहेत?’’ इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, पहिली आयत ही आहे–
    ‘‘तुम्ही लोकांना सत्कर्माचा आदेश देता आणि स्वत:ला विसरता?’’ (अल बकरा)
    इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’
    दुसरी आयत ही आहे–
    ‘‘तुम्ही ती गोष्ट का सांगता जी स्वत: करीत नाही?’’
    इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’
    आणि तिसरी आयत ही आहे–
    शुऐब (अ.) आपल्या जनसमुदायाला म्हणाले, ‘‘ज्या वाईट गोष्टींपासून मी तुम्हाला रोखतो, त्या हिरिरीने स्वत: कराव्यात अशी माझी इच्छा नाही. (तर मी त्यांच्यापासून खूप दूर राहीन. माझ्या कथनी व करणीमध्ये तुम्हाला फरक आढळणार नाही.)’’ (सूरह हूद)
    इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘या आयतीवर चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली आहे काय?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’ तेव्हा इब्ने अब्बास (रजि.) म्हणाले, ‘‘जा, अगोदर तुम्ही स्वत:ला सत्कर्माचा आदेश द्या आणि दुष्कार्म करण्याची मनाई करा. हे दीनचा काम करणाऱ्याचे पहिले लक्ष्य आहे.’’ (हदीस)
स्पष्टीकरण : हा मनुष्य स्वत:ला विसरला होता आणि दुसऱ्यांना दीनच्या गोष्टी सांगण्याची हौस बाळगत होता. माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी योग्य सद्यस्थितीचा अंदाज लावून चांगला सल्ला दिला.

  माननीय उसामा बिन जैद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एक मनुष्य अंतिम निवाड्याच्या दिवशी आणला जाईल आणि आगीत पेâकला जाईल. त्याच्या आतड्या आगीत बाहेर निघून पडतील. मग त्या आगीत अशाप्रकारे घेऊन फिरेल जसे गाढव आपल्या चक्कीभोवती फिरतो. तेव्हा दुसरे नरकवासी लोक त्याच्याजवळ जमा होतील आणि विचारतील की हे अमक्या, ही तुझी काय अवस्था आहे? तू तर आम्हाला जगात पुण्यकर्म करण्यासाठी सांगत होतास? आणि दुष्कर्म करण्यापासून रोखत होतास? (असे पुण्यकर्म करूनसुद्धा तू येथे कसा काय आलास?) तो मनुष्य म्हणेल की मी तुम्हाला पुण्यकर्म करण्यास सांगत होतो आणि स्वत: त्यांच्या जवळदेखील जात नव्हतो आणि दुष्कर्मांपासून तुम्हाला रोखत होतो मात्र स्वत: करीत होतो.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

(२६०) आणि तो प्रसंगदेखील नजरेसमोर असू द्या जेव्हा इब्राहीम (अ.) यांनी सांगितले होते, ‘‘माझ्या पालनकत्र्या! मला दाखव की तू मृतांना कशाप्रकारे जिवंत करतोस.’’ फर्माविले, ‘‘काय तुझी यावर श्रद्धा नाही?’’ त्याने सांगितले, ‘‘श्रद्धा तर आहेच परंतु मनाचे समाधान इच्छितो.’’२९६ फर्माविले, ‘‘बरे तर चार पक्षी घे आणि त्यांना आपल्याशी माणसाळून टाक. नंतर त्यांचा एकएक तुकडा तू एकाएका पर्वतावर ठेवून दे. नंतर त्यांना हांक दे. ते तुझ्याकडे धावत येतील. चांगले समजून घे की अल्लाह अत्यंत सामथ्र्यवान आणि बुद्धिमान आहे.’’२९७
(२६१) जे लोक२९८ आपला माल अल्लाहच्या मार्गात खर्च करतात,२९९

२९६) म्हणजे तो आत्मविश्वास व आत्मसमाधान जो डोळयाने पाहिल्यानंतर प्राप्त होतो.
२९७) ही घटना आणि वरील घटनांचे काही लोकांनी विचित्र अर्थ काढले आहेत. परंतु पैगंबरांच्या सोबत अल्लाहचा जो मामला आहे, त्याला जर चांगल्या प्रकारे ग्रहण केले तर ओढातान करून अर्थ काढण्याची वेळ येणार नाही. मुस्लिमांना या जीवनात जी सेवा करावयाची आहे; त्याच्यासाठी केवळ परोक्षवर ईमान (श्रद्धा) ठेवणे आणि न पाहता मानणे पुरेशे आहे. परंतु पैगंबरांद्वारा जी सेवा अल्लाह घेऊ इच्छित होता, त्यासाठी हे आवश्यक होते की सत्याला त्यांनी आपल्या डोळयांनी पाहावे. म्हणजे जगाला या सत्याकडे येण्याचे आमंत्रण व आवाहन त्यांनी जोमाने करावे. त्यांना जगाला पूर्ण आवेशाने आणि आत्मविश्वासपूर्ण सांगावयाचे होते की तुम्ही लोक तर कल्पनाविलासात राहाता. परंतु आम्ही प्रत्यक्ष डोळयांनी पाहिलेले सत्य तुमच्यापुढे ठेवत आहोत. तुमच्याकडे गुमान (कल्पना) आहे तर आमच्याकडे प्रत्यक्ष ज्ञान आहे. तुम्ही आंधळे आहात तर आम्ही डोळे (दृषी) राखणारे आहोत, याचमुळे पैगंबरांच्या समोर ईशदूत आपल्या असली स्वरुपात प्रकट होत असत. त्यांना आकाश व जमिनीच्या शासन व्‌यवस्थेंचे अवलोकन करविण्यात आले. पैगंबरांना स्वर्ग (जन्नत)आणि नरक (जहन्नम) त्यांच्या डोळयांसमोर दाखविण्यात आले आणि मेल्यानंतर पुनर्जवित करण्याचे दृष्‌य त्यांना प्रत्यक्ष दाखविण्यात आले. परोक्षावर ईमान आणण्याच्या या टप्प्याचे हे सद्‌गृहस्थ पैगंबर नियुक्ती अगोदरच अनुभव घेत होते. पैगंबर नियुक्तीनंतर त्यांना प्रत्यक्ष डोळयांनी पाहिलेल्या साक्षीवर ईमानची देणगी दिली जात आणि ही देणगी त्यांच्याचसाठी विशेष होती. (तपशीलासाठी पाहा, अध्याय 11, तळ टीप क्र. 17, 18, 19 व 34)
२९८) वार्ताक्रम आता त्याच विषयाकडे वळला आहे जो आयत क्रं. 244 मध्ये सुरु झाला होता. या व्याख्यानाच्या प्रारंभी ईमानधारकांना आवाहन केले होते की ज्‌या महान ध्येय पूर्तसाठी तुम्ही ईमान राखले आहे, त्याच्यासाठी तन मन धन अर्पण करा. परंतु एखादा जनसमुदाय जोपर्यंत त्याचा आर्थिक दृषिकोन पूर्णबदलत नाही तोपर्यंत स्वत:चा स्वार्थ आणि राष्ट्रीय स्वार्थापासून वर उठून एका महान नैतिक उद्देशासाठी तन मन धन अर्पण करण्यास तयार होऊ शकत नाही. भौतिकवादी जे एक पैशासाठी जीव देतात व पैसे कमविण्यासाठीच जगतात, अशांची नजर नेहमी नफा आणि तोट्याच्या तराजूकडे लागलेली असते. अशी मंडळी कधीही महान नैतिक उद्देशप्राप्तीसाठी पैसे खर्च करणार नाहीत. प्रत्यक्षात काही नैतिक उद्देशांसाठी त्यांनी खर्च केला तरी प्रथम आपल्या स्वत:च्या फायद्याचा, आपल्या कुटुंबाच्या किंवा समाजाच्या फायद्याचा हिशेब लावतात. या मनोवृत्तीसह मनुष्‌य इस्लामी जीवनमार्गावर एक पाऊलसुद्धा पुढे टाकू शकत नाही. या जीवनव्‌यवस्थेची (दीन) मागणीच मुळात ही आहे, की भौतिक लाभ आणि हानिपलीकडे विचार करून केवळ अल्लाहचे वचन प्रभुत्वशाली बनविण्यासाठी आपले सामथ्र्य, आपला वेळ आणि आपली संपत्ती खर्च करा. या मार्गावर चालण्यासाठी तर विशेष नैतिक गुणांची आवश्यकता आहे. यासाठी दृषिकोनाची व्यापकता, धैर्यशीलता, हृदयाची विशालता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ईशप्रसन्नतेची ज्वाला मनात धगधगणे आवश्यक आहे. सामुदायिक जीवनातील व्‌यवस्थेत असे परिवर्तन आवश्यक आहे, की लोकांच्या मनात भौतिकवादी नैतिकतेऐवजी हे नैतिक गुण वृद्धिंगंत व्‌हावेत. म्हणून येथून सतत तीन (रूकूअ) प्रभागापर्यंत (आयत क्र. 261 ते 281 पर्यंत) याच मानसिकतेला घडविण्यासाठी निर्देश आलेले आहेत.
२९९) संपत्ती खर्च करणे आपल्या स्वत:च्या गरजा भागविण्यासाठी असेनात की आपल्या मुलांबाळांसाठी, नातेवाईकांसाठी किंवा दीनदुबळयांसाठी खर्च करणे असेल. तसेच जनहित कार्यात किंवा धर्म प्रचार प्रसार कार्यात संपत्ती खर्च करणे असेल. अथक परिश्रमाद्वारा उद्देश प्राप्ती ईशमार्गदर्शनानुसार आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्तीसाठी असेल तरच हे सर्व प्रयत्न व खर्च अल्लाहच्या मार्गातील असेल.

– सीमा देशपांडे
मुक्ती (निजात) म्हणजे मनुष्याची सुटका किंवा नरकापासून संरक्षण म्हणून परिभाषित करतो. ज्याला हिंदूमधे मुक्ती व इस्लाममधे निजात संबोधतात.
  आज मनुष्य हा मनुष्य राहिला नसून भौतिकतेचे एक चालते-फिरते यंत्रच झाले आहे. त्याची सर्व धावपळ ही आपल्या स्वैर इच्छांची पूर्तता आणि भौतिकवाद व चंगळवादापर्यंत मार्गाचा अवलंब करुन जीवनातील भोगवस्तू प्राप्त करण्यासाठी पिसाट लांडग्याप्रमाणे सैरावैरा धावतच सुटला आहे. पण मृत्यू म्हटले की त्याचा थरकाप उठतो आणि तो सतत ह्याच संभ्रमात असतो की त्याला वाटत की दुसऱ्याला मृत्यू येऊ शकतो पण मला नाही. त्यामुळे त्याला मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या जीवनाची साधी आठवणसुद्धा होत नाही. तो हे पण विसरु लागला आहे की ईश्वरच मनुष्याला जन्म देतो, तो या जगात वावरताना ईश्वरच त्याची परीक्षा घेतो आणि ईश्वरच त्याला मृत्यू पण देतो.  मग मृत्यू हे अटळ सत्य आहे तर मृत्यूनंतर काय? मनुष्याच्या परीक्षेचा निकाल कुठे लागेल? मनुष्याला मुक्ती कशी मिळेल? चला तर प्रत्येक धर्माचा याबद्दल काय दृष्टिकोन आहे... पुनर्जन्म हा समज की गैरसमज काही लोक हे मानतात की हेच जीवन मूळ व अंतिम असून मृत्यू जीवनाचा अंत होय. पण... हेच अंतिम जीवन मानणारे लोक इतकेच सांगू शकतात की आम्हाला अजिबात हे माहीत नाही की मृत्यूपश्चात जीवन आहे की नाही! मात्र तो छातीठोकपणे असे मुळीच सांगू शकत नाही, आम्हाला माहीत आहे की मृत्यूपश्चात जीवनच नाही.
काही लोकाना वाटते की मृत्यूनंतर परलोक जीवन आहे आणि त्यात स्वर्गप्राप्तीसाठी अशी श्रद्धा ठेवावी की समस्त मानवजात ही जन्मजात गुन्हेगार व पापी आहे. मात्र मानवजातीच्या पापाचे प्रायश्चित्त स्वत: ईश्वरपुत्राने सुळावर आपल्या प्राणाचा बळी देऊन केले आणि तिला पापातून मुक्त केले. म्हणून या ईश्वरपुत्रावर श्रद्धा ठेवावी, तर निश्चितच स्वर्गप्राप्ती होईल. पण... ईश्वर निराकार असताना ईश्वर पुत्र कसा धरतीवर येईल बर? मग  तो सर्व मानवजीतीला पाप मुक्त करुन गेला तर त्याना धर्माची गरज काय? आणि जनावर व मनुष्यात काय असमानता आढळून येईल जेणेकरुन फक्त मनुष्यालाच पारलौकिक जीवन लाभेल.
काही लोकाना वाटते की मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत नव्हे! मनुष्य या ऐहिक जीवनातील चांगल्या व वाईट कर्माचे अथवा पाप-पुण्याचे फळ भोगण्यासाठी वारंवार या सृष्टीत जन्म घेतो. तो कधी कृमी-कीटक तर कधी पशु-पक्षी, कधी झाडे-झुडपे आणि कधी तो ८४ लक्ष योनीतून भ्रमण केल्यानंतर मनुष्य योनीत जन्म घेतो. पण... माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार त्याचा पुनर्जन्म होत असेल तर हे समजणे आवश्यक आहे ईश्वराने कुठल्या ग्रंथात हे नियम नमूद केले आहेत का की कोणत्या पुण्यकर्माच्या पुरस्कारापोटी कोणाचा जन्म (पशु-पक्षी, कृमी-कीटक, वनस्पती) मिळतो आणि कोणत्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी कोणता जन्म मिळतो? तसेच, आजपर्यंत कोणत्या डॉक्टरने किवा शास्त्रज्ञाने मनुष्याचे मृत शरीराची चाचणी करुन हे सांगू शकले का की तो पूर्वी कुठल्या रुपात जन्मला होता किंवा पुढे कोणत्या रुपात जन्म घेणार आहे. 
एक विचारसरणी अशीदेखील आहे की ऐहिक जीवन प्रत्येक मनुष्यासाठी परीक्षा आहे त्यासाठी आपल्या एकमेव निर्मात्याने (ईश्वर) मानवास बुद्धी व विवेकसामथ्र्य दिले आहे. त्याद्वारे मानवाने मृत्यूनंतरचा (स्वर्ग किंवा नरक) विचार करुन ऐहिक जीवन व्यतीत करावे. म्हणजेच जर मानवाने एका ईश्वरावर श्रद्धा ठेवली आणि त्याच्या नियमावालीनुसार जीवन व्यतीत केले तर त्याला स्वर्गप्राप्ती होईल आणि याउलट एका ईश्वराला न मानता नियमाचे उल्लंघन केले तर त्याला नरकप्राप्ती होईल. पण... या चारपैकी चौथी विचारसरणी सत्याच्या खूप जवळ असल्याचे स्पष्ट दिसून येते. ती सांगत आहे की मृत्यू म्हणजे आपल्या जीवनाचा अंत नाही; आपल्या वास्तविक जीवनाची ही सुरुवात आहे. कारण आपल्या भावी नशिबाचा(स्वर्ग-नरक) आपल्या सध्याच्या मानवी जीवन कामकाजाच्या आधारावर निर्णय घेतला जात आहे, आपण परलोकात स्वत:साठी योग्य स्थान (स्वर्ग) मिळवण्यासाठी पृथ्वीवरील एका ईश्वरावर श्रद्धा व  ईशनियमावलीनुसार जीवन व्यतीत करू शकतो, किंवा आपण त्यांना दूर पेâवूâन देऊन आपल्यास नरकात शिक्षा म्हणून दोषी ठरवू शकतो.
यावरुन हे नक्कीच लक्षात येते की, मृत्यू अंतिम नाही आहे परंतु ते या जगाच्या जीवनातून नंतरच्या जीवनाचे संक्रमण आहे. ज्याला परलोक जीवन म्हणतात.
परलोक जीवन हे नंतरच्या जीवनाच्या प्रवेशद्वारासारखे आहे आणि स्वर्ग किंवा नरक प्राप्त करणे हे ईश्वराच्या (अल्लाह) एकत्वामध्ये शुद्ध विश्वास आणि ईश्वराची (अल्लाह) मंजुरी ही ह्या जीवनात आपली आचारसंहिता व वर्तणूक ह्यावर अवलंबून आहे.
‘‘सरतेशेवटी प्रत्येकाला मृत्यू आहे आणि तुम्ही सर्वजण आपापले पुरेपूर मोबदले कयामतच्या दिवशी प्राप्त करणार आहात. यशस्वी खर्या अर्थी तोच आहे जो तेथे नरकाग्नीपासून वाचेल व स्वर्गामध्ये दाखल केला जाईल. उरले हे जग, तर ही केवळ एक भुरळ पाडणारी बाब आहे.’’ (कुरआन ३:१८५)
मनुष्याला परलोकाची गरज का?
जसे... ऐहिक जीवनात एकाने जर एकाचा खून केला तरी एकदाच फाशीची शिक्षा होईल आणि दहा जणांचा खून केले तरी एकदाच शिक्षा होईल पण त्याला नऊ जणांच्या खुनाची शिक्षा कुठे मिळेल?
माणसाचे विचार, क्रिया व हालचाली, आवाज सुरक्षित ठेवण्याचे कारण काय?
चोराला शिक्षा मिळाली तर त्याचे दु:ख घरच्यांना होते मग फक्त चोरालाच शिक्षा कुठे मिळणार?
प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया होत असते, जसे एका व्यक्तीने दुसऱ्याला मारले तर तो जखमी होतो, उपाशी व्यक्तीने जेवण केले तर त्याची भूक मिटते, रोगीने औषध पिले तर बरा होतो. मात्र काही क्रिया अशादेखील असतात ज्यांची प्रतिक्रिया दिसून येत नाही जसे आपण एका आंधळ्याला मार्ग दाखविला, स्वत: उपाशी राहून भुकेल्याला भोजन दिले. गरजुंना दान दिले. मग अशा कामांच्या प्रतिक्रिया का दिसून येत नाहीत?
दुष्कर्म करणारा श्रीमंत माणूस गरीब होत नाही व सत्कर्म करणारा गरीब माणूस श्रीमंत होत नाही असे का?
मग.. हा प्रत्येक मनुष्यासाठी परिपूर्ण न्याय आहे का? आणि हा न्याय ऐहिक जीवनात मिळणे शक्य आहे का?
मनुष्याच्या कर्माचा न्याय कुठे होतो?
सर्वच नाती अथवा सबंधांचे खास केंद्र असते. जसे, डॉक्टर-पेशंट भेटण्याचे ठिकाण दवाखाना, वकील अर्जदाराच्या भेटण्याचे ठिकाण न्यायालय, शिक्षक-विद्याथ्र्याचे ठिकाण शाळा.. तसे ईश्वर-मानवाचे भेटण्याचे ठिकाण कोणते? ते ठिकाण दुसरे कोणते नसून परलोकच होय.
कुरआन काय सांगतो..
आणि हे ऐहिक जीवन काही नाही परंतु एक खेळ आणि मनोरंजन. वास्तविक जीवनाचे घर तर पारलौकिक घर आहे, हाय, या लोकांनी जाणिले असते. (कुरआन २९:६४)
त्या दिवसाच्या संकटापासून आपला बचाव करा जेव्हा तुम्ही अल्लाहकडे परत जाल, तेथे प्रत्येक माणसाला त्याने कमाविलेल्या पुण्य व पापाचा पुरेपूर मोबदला मिळेल आणि कोणावरही कदापि अन्याय होणार नाही..(कुरआन २:२८१)
जन्म-मृत्यू प्रवास
१. पवित्र जग जेथे ईश्वराने सर्व आत्मे बनविले.
जेव्हा तुझ्या पालनकत्र्याने दूतांना सांगितले, ङ्गमी मातीपासून एक मानव बनविला आहे, मग जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा! (कुरआन ३८:७१-७२)
२. गर्भाशय जेथे आत्मा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो.
जसे सर्वानाच माहीती आहे की आपण ऐहिक जीवनाचा प्रवास आपल्या मातेच्या गर्भाशयातून सुरू करतो. जेव्हा स्त्री गर्भवती राहली की घरचे व स्वत: ती पण मुलगाच पाहिजे म्हणून आतोनात नवस, ज्योतिष्य, डॉक्टरकडे वेगवेगळे उपचार यासारखे विविध उपाय करत राहतात. आणि स्वत:ची इच्छा पूर्ण झाली नाही की मात्र स्त्रीलाच दोष देतात. तसेच काहीजण १२० दिवसानंतर चाचणी करुन तपासतात मुलगा की मुलगी  आणि मुलगी असेन तर गर्भपात करतात. पण सत्य हे आहे की आईच्या गर्भात काय आहे हे फक्त ईश्वरच जाणतो.
तोच तर आहे, जो तुमच्या मातेच्या गर्भाशयात तुमचा आकार हवा तसा घडवितो, त्या जबरदस्त बुद्धिमानाशिवाय इतर कोणी ईश्वर नाही. (कुरआन ३:६)
३. ऐहिक जीवन
जिथे आपण सर्व मर्यादित वेळेसाठी जगतो. हे जीवन आपले परीक्षाकाळ आहे. ईश्वर आपल्याला इथे अजमावून पाहणार आहे की आपण ईशमार्गाने जीवन व्यतीत केले की भौतिक जीवनाप्रमाणे... 
ह्यावर कुराआन काय सांगतो:
ज्याने मृत्यू आणि जीवन निर्माण केले जेणेकरून तुम्हा लोकांना अजमावून पहावे की तुमच्यापैकी कोण अधिक चांगले कृत्य करणारा आहे. आणि तो जबरदस्तही आहे आणि क्षमाशीलदेखील(कुरआन ६७:२)
प्रत्येक मनुष्य फक्त स्वैर इच्छांची पूर्तता करणे हेच जीवनाचे ध्येय घेऊन बसलाय पण हे कितपत त्याच्या कामाला येईल व ह्या भोगवस्तूंचा कितपत आनंद लुटेन?
आपला हा समज असतो की समाजाला लपून काही वाईट कृत्य (अनैतिक संबंध, लाच खाणे, गरजुंचे पैसे लुबाडणे, चोरी करणे, खोटे बोलणे, मानवांची हत्या करणे इत्यादी) केले तर काहीच फरक पडत नाही. असे केल्याने ते समाजापासून स्वत:ला वाचवू शकतील पण ईश्वरापासून कसे वाचतील?
४. मृत्यू
 मृत्यू हे अंतिम जीवन नसून ते फक्त ह्या जीवनातुन पुढील जीवनात संक्रमण आहे. ह्यावर कुराआन काय सांगतो:
प्रत्येक जीवितास मृत्यूची चव चाखावयाची आहे. आणि आम्ही चांगल्या व वाईट स्थितीत आणून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सरतेशेवटी तुम्हाला आमच्याकडेच रुजू व्हायचे आहे. (कुरआन २१:३५)
मग मृत्यूनंतर काय?
५. बरजख (पित्रलोक)
हा टप्पा म्हणजे मृयूनंतर व पुनरुत्थानाच्या आधीचा कालावधी. बरजखमधील पहिले ठिकाण कबर आहे. कबरमधे आस्तिकाच्या मृत शरीराचा सुगंध येतो तर काफिर (अविश्वासु) चा दुर्गंध येतो. जेव्हा आस्तिकचा आत्मा जीवित केला जातो तेव्हा तो सहजपणे बाहेर येतो पण काफिर (अविश्वासु) चा आत्मा बाहेर येण्यास प्रचंड वेदना होतात जणू काही त्याचे जीवितपणे आतडे ओढून काढत आहे.
तेथे मृत व्यक्तीचा आत्मा दोन देवदूतांसह (मुनकिर व नाकिर) भेटतो. देवदूत आस्तिकाना (मोमिन/विश्वासु) रेशीम वस्त्रे परिधान करुन भेटायला येतात व त्याचा आत्मा बाहेर यायला सांगतात तेव्हा तो आत्मा ईश्वराची स्तुती करत येतो. देवदूत काफिर (अविश्वासु) ला  अंगावर काळी रग परिधान करुन भेटायला येतात व त्याचा आत्मा बाहेर यायला सांगतात तेव्हा त्याला शाप देतात.
मग प्रत्येक मनुष्याला त्याच्या श्रद्धेबद्दल प्रश्नावली करतात. आणि इतर प्रश्न पुनरुत्थानाच्या दिवशी सोडले जातात.
मात्र काफिरसाठी (अविश्वासु) स्वर्गाचे दार उघडले जाणार नाही. उलट त्यासाठी नरकचे दार उघडले जाईल आणि न्यायाच्या दिवसापर्यंत त्याला नरकाच्या शिक्षाला सामोरे जावे लागेल.असे का?
बरजखचे प्रकार:
१. प्रथम गट: अविश्वासु व अत्याचारी जे अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानाच्या दिवसावर ऐहिक जीवनावर विशास ठेवत नाहीत. ते स्वत:ला मुक्त समजले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले आणि कोणत्याही वाईट गोष्टी करण्यापासून स्वत:ला थांबविले नाही व दुसऱ्याला ते करण्यापासून परावृत्त केले. त्यांना बरजखांममध्ये खूप कठीण जीवन मिळेल आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा दंड दिला जाईल. परंतु ते नरकाच्या शिक्षांच्या तुलनेत काहीच नाही.
२. दुसरा गट: ज्यांनी सर्वसमर्थ अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवला होता आणि ज्यांनी त्यांच्या धार्मिक कर्तव्यांचा अवलंब केला आणि प्रतिबंधित कृत्यांपासून निर्भय केला. त्यांना बरजखांमधे एक चांगले जीवन मिळेल आणि त्यांना आशीर्वाद दिला जाईल, जे नंदनवनात त्यांच्यासाठी राखून ठेवलेल्या आशीर्वादांचे एक नमुना असेल.
३. तिसरे गट: जे लोक सर्वशक्तिमान अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवत होते आणि त्यांच्या धार्मिक कर्तव्ये पार पाडतात; परंतु कधीकधी लक्षावधीत त्यांनी एक अनिवार्य कर्तव्य सोडून दिले किंवा बेकायदेशीर कृत्य केले; परंतु ते मरणापर्यंत त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला आणि माफी मागितली. त्यांना बरजखमध्येही शिक्षा होणार नाही.
४. चौथा गट: ज्यांनी सर्वसमर्थ अल्लाह, प्रेषित आणि पुनरुत्थानांवर विश्वास ठेवला आणि त्यांची धार्मिक कर्तव्ये पार पाडली; परंतु कधीकधी लक्षावधीत त्यांनी एक अनिवार्य कर्तव्य सोडून दिले किंवा बेकायदेशीर कृत्य केले; परंतु त्यांनी आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करून आणि दैवी क्षमा मिळविण्याशिवाय मरण पावले. ते त्यांच्या पापांप्रमाणेच बरजखमध्ये शिक्षा करतील आणि त्याद्वारे ते शुध्द होतील. न्यायाच्या दिवशी ते पवित्र प्रेषित आणि पवित्र इमामांच्या (त्याप्रमाणे) मध्यस्थी घेऊन पश्चात्ताप करतील आणि मग त्यांच्या कर्मांच्या हिशोबाप्रमाणे ते नंदनवनात पाठविले जातील.
विश्वासू (मोमिन) चा असा गैरसमज आहे की त्याने एका ईश्वरावर श्रद्धा ठेवली की काही केल्या तो स्वर्गात जाणार... नाही कदापि नाही. जोपर्यंत त्याचे कृत्य आणि श्रद्धा ईश्वराच्या नियमावलीची पूर्तता करत नाही ( ईमान, कुरआन वाचणे व त्याला समजून दैनंदिन जीवनात त्याची अंमलबजावणी करणे, लोकांशी भेदभाव न करता करुणामय वर्तणूक ठेवणे आणि लोकाना हक्क, संयम याचे उपदेश देऊन एका ईश्वराकडे आमंत्रण देणे) आणि चुकलेच तर त्याची जाणीव होऊन मरण्यापूर्वी ईश्वराची माफी मागत नाही तोपर्यंत कोणीही स्वत:चे नरकापासून संरक्षण करु शकत नाही मग तो विश्वासू (मोमिन) असो वा अविश्वासू (काफिर).
६ प्रलय (कयामत)
कयामत म्हणजे हे जग बुडणे जेथे आपण आज निवांत जगत आहोत. कयामतचे चिन्हे म्हणजे एक रणशिंग फुंकणे आहे. कुरआननुसार, जग बुडणाच्या शेवटी व कयामत घटनेपूर्वी, रणशिंग दोनदा उडेल आणि हे महत्वाचे प्रसंग म्हणजे कयामत ची निशाणी जवळ आहे.
रणशिंग कसे दोनदा उडेल? प्रथम जगातील सर्व लोक मरतील आणि बरजखच्या जगात प्रवेश करतील. आणि दुसऱ्यांदा बरजखमधील सर्वजण कयामतसाठी पुन्हा जिवित केले जातील.
प्रलयाच्या दिवशी पूर्ण सौर यंत्रणा विस्कळीत होईल.
७ परलोक जीवन  (न्यायाचा दिवस)
पुनरुत्थनाचा दिवस हा एक मनुष्याची नवीन जीवनाची सुरुवात होईल ज्याचा कधीही अंत होणार नाही. हा दिवस न्यायाचा दिवस आहे.
‘‘हा तो दिवस आहे जेव्हा कोणत्याही माणसासाठी काही करणे कुणाच्याही आवाक्यात नसेल. निर्णय त्या दिवशी अल्लाहच्याच अखत्यारीत असेल.’’ (कुरआन ८२:१९)
त्या दिवशी, सर्व लोक जीवित होतील व त्यांच्या श्रद्धेप्रमाणे आणि कर्मांनुसार त्यांना ईश्वराकडून बक्षीस देण्यात येईल.
सर्व ईश्वरासमोर नमस्तक होऊन एकत्र उभे राहतील, तेव्हा ईश्वर (अल्लाह) देवदूतांना आदेश देईल की प्रत्येक मनुष्याच्या कर्माचे पुस्तक उघडा. मग देवदूत पुस्तक उघडतील जेथे मनुष्याच्या ऐहिक जीवनाच्या कर्माची नोंदणी असेल ज्याला अरबीमधे किरामन कतिबीन (सन्मानीय निरीक्षक) असे म्हणतात.
स्वर्गामधील फळ हे सत्कर्म करणार्या व ईशभीरू लोकांचे शांतीचे स्थळ आहे. कुरआनात ईश्वराने वचन दिले आहे– ‘‘मी तुमच्यापैकी कोणाचेही कृत्य वाया घालविणार नाही मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तुम्ही सर्वजण परस्परांशी संबंधित आहात, म्हणून ज्या लोकांनी माझ्यासाठी स्वदेश त्याग केला आणि ज्यांना माझ्या मार्गात आपल्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि जे छळले गेले आणि माझ्यासाठी लढले व मारले गेले - त्यांचे सर्व अपराध मी माफ करून टाकीन व त्यांना अशा उपवनांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील. हा त्यांचा मोबदला आहे अल्लाहजवळ आणि सर्वोत्तम मोबदला अल्लाहजवळच आहे.’’ (कुरआन ३:१९५)
आज आपण कळत-नकळत पणे हे सत्य विसरुन जात आहेत कारण आपण कुरआन विसरुन जात आहे जी अल्लाह (ईश्वर) ने आपल्याला देणगी दिलेली आहे. आज आपण वाडवडील, विद्वान काय म्हणत आहेत तेच अनुसरण करत आहेत पण कुरआनप्रमाणे काय चूक आणि काय बरोबर हे बघतच नाही. या जगात दर दिवशी १५१,००० पेक्षा जास्त लोक मृत्यू पावतात. आपण अत्यंत आभारी आहोत अल्लाहचे (ईश्वर) की तो आपणास अजूनही वेळ देत आहे आपल्या मुक्तीसाठी जेणेकरुन आपण आपल्यात सुधारणा करु.
जेव्हा जेव्हा आपत्ती येईल तेव्हा म्हणतील की, ‘‘आम्ही अल्लाहचेच आहोत, आणि अल्लाहकडेच आम्हाला परत जायचे आहे.’’ (कुरआन २:१५६)
चला तर मग आपण सर्व स्वत:ला व आपल्या परिवाराला व आपल्या भाऊ-बहिणीना अल्लाह (ईश्वर) च्या क्रोधापासून वाचवू आणि अर्थातच इन्शाअल्लाह स्वत:ला व या समाजाला स्वर्गाच्या मार्गाने जाण्यास मार्गदर्शन करु. ‘‘काळाची शपथ, मानव वस्तुत: तोट्यात आहे, त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कर्मे करीत राहिले. आणि एकमेकांना सत्याचा उपदेश आणि संयमाचा आदेश देत राहिले.’’ (कुरआन १०३:१-३)

पिंपरी चिंचवड :
‘‘ईश्वराने जगाची निर्मिती ही मानव कल्याणासाठी केली आहे, मानवाने ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत केल्यास जीवनात शांती व निस्वार्थी भावनेने कार्य केल्यास प्रगती आणि दिव्य कुरआनात दर्शविलेला मार्ग आत्मसात केल्यास मानवाची प्रगती, जीवनात शांती व वाईट विचारातून मुक्ती मिळविता येते असे प्रतिपादन जमात ए इस्लामी हिंदचे वेंâद्रीय प्रचार प्रसार विभागाचे सचिव मौलाना मुहम्मद इक्बाल मुल्ला यांनी येथील परिसंवादात केले.
जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या वतीने ‘इस्लाम : शांती विकास व मुक्तीसाठी’ या शीर्षका अंतर्गत १२ जानेवारी ते २१ जानेवारी राज्यस्तरीय मोहीम राबवित आहे. या मोहिमे अंतर्गत दिनांक १६. ०१. २०१८ रोजी जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शाखेतर्पेâ आयोजित करण्यात आलेल्या भव्य परिसंवाद मौ. मुल्ला बोलत होते.
या परिसंवादाचे आयोजन चिंचवड येथील धम्मचक्र विहार शाहू नगर येथे करण्यात आले होते. या परिसंवाद कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते गुरुकुल विद्याभवनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भागवत गुरुजी, राष्ट्र निर्माण जनपरिषद महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष पी. आर. सोनवणे साहेब, जमात ए इस्लामी हिंदचे वेंâद्रीय प्रचार प्रसार विभागाचे सचिव मौलाना मुहम्मद इक्बाल मुल्ला, प्रा. शेख अब्दुल रहेमान हे उपस्थित होते. या परिसंवादात ‘इस्लाम : शांती, प्रगती व मुक्तीसाठी’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन प्रमुख वक्त्यांकडून करण्यात आले.
आध्यात्मिकतेतून, मानवाच्या विचारातून आणि आचरणातून प्रगती व शांती तसेच वाईट प्रवूत्तीतून मुक्ती कशी मिळविता येते या विषयावर गुरुकुल विद्याभवनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भागवत गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या भारताचे संविधान व संविधानाचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनात राष्ट्र निर्माण जनपरिषद महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष पी. आर. सोनवणे यांनी स्पष्ट करून सांगितले.
जमात ए इस्लामी  हिंद महाराष्ट चे सचिव इम्तियाझ शेख यांनी संस्थे चे कार्य व  इस्लाम, शांती ,विकास व मुक्ती साठी या शीर्षकांतर्गत १२ जानेवारी ते २१ जानेवारी राज्यस्तरीय मोहीम राबवित असलेल्या मोहिमेचे महत्व आपल्या प्रास्तावने मध्ये स्पष्ट केले शांतीशिवाय कोणाची प्रगती होत नाही. त्यामुळे समाजात शांती नांदावी, एकमेकांबद्दल आदर वाढावा, सहिष्णुता नांदावी, समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती व्हावी, एकमेकांबद्दल आदरभाव, प्रेम वाढावे यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने या मोहिमेअंतर्गत विविध महाविद्यालये, रुग्णालये, जनजागृती रॅली काढल्या जात आहेत. नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती, निराशा घालविण्याचा प्रयत्न केला जात असून द्वेषभावनेचा विनाश करण्यात येत आहे, अशी माहिती जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेचे सचिव इम्तियाझ शेख यांनी दिली.
तसेच या मोहिमेला पिंपरी-चिंचवड शहरासह देशभरात सर्वच घटकांतील नागरिकांचा, बुद्धिजीवींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे समन्वयक अजिमोद्दीन शेख यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच विविध जातीधर्माचे असंख्य नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

-शाहजहान मगदुम
मोदी सरकारने मुस्लिमांना हज यात्रा करण्यासाठी देण्यात येणारे अनुदान संपुष्टात आणण्याचा अतिशय स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हज अनुदान हळू हळू करून संपुष्टात आणण्याचा केंद्र सरकारला आदेश दिला होता. सरकारने त्यावर ताबडतोब निर्णय घेऊन हे अनुदान पूर्णत: संपुष्टात आणून आपली हिंदू मतपेढी दृढ करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. म्हणजे मुस्लिमांचे तुष्टीकरण रद्द करून हिंदूंचे तुष्टीकरण करण्याचा खेळ आता सरकारने चालविला आहे. या निर्णयामुळे मुस्लिमांचे फारसे नुकसान झालेले नाही. देशातील अनेक मुस्लिम संघटनांनी हजसाठी दिले जाणारे अनुदान रद्द करण्याची वेळोवेळी मागणी केली होती. कारण त्याद्वारे मुस्लिमांचे लाड पुरविले जातात असा त्यांच्यावर आरोप केला जात होता. वास्तविक पाहता सरकार कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयाच्या आडून आपला फायदा कसा होईल याचा थेट विचार केलेला असतो. त्यामुळे या निर्णयाच्या बाबतीतही तेच घडले असल्याची शंका आल्याशिवाय राहात नाही. काही विश्लेषकांच्या मते अनुदान रद्द करण्याच्या निर्णयामागे काहीतरी गौडबंगाल असायला हवे. एअर इंडियाचे शेअर मोजक्या किमतीवर विकण्याचे षङयंत्र असू शकते. कदाचित सरकार एअर इंडियाचे शेअर स्वस्त दराने विकण्याचा सरकारचा डाव असावा. काही दिवसांपूर्वी एअर इंडियामध्ये विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विदेशी कंपन्या एअर इंडयिामध्ये ४९ टक्के गुंतवणूक करू शकतात. मुस्लिमांना देण्यात येणारे हज अनुदान बंद केल्याने एअर इंडियाला फार मोठे नुकसान सोसावे लागेल, हे स्पष्ट आहे. परिणामस्वरूप एअर इंडियाच्या शेअरचा भाव कमी होईल आणि त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल. सरळ सरळ ७०० कोटी रुपयांचे अनुदान एअर इंडियाला मिळत होते, जे मुस्लिमांना देण्यात आलेले हज यात्रेसाठीचे अनुदान म्हटले जात होते. त्यामुळे या विमान कंपनीच्या प्रवाशांची संख्या आपोआपच वाढत होती. हज अनुदान रद्द केल्यामुळे आता प्रवासी मिळणार नाहीत आणि कंपनी तोट्यात येईल. सरकारी धोरणानुसार हज अनुदानामुळे मुस्लिम बांधवांना एअर इंडियामध्येच प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विमान कंपनीद्वारे मिळणाऱ्या अनेक सेवांचा लाभ योग्य प्रकारे मिळत नव्हता. आता त्यांच्याकडे उत्तम प्रकारचे आंतरराष्ट्रीय पर्याय असतील. आता हज प्रवासी विदेशी विमानांद्वारे विशेषत: अरब राष्ट्रांच्या विमानांच्या सेवेचा लाभ घेतली. हाजींची संख्या वाढल्यामुळे त्या कंपन्यांकडून हज प्रवाशांना विशेष ऑफरदेखील देण्यात येतील त्यामुळे निश्चितच मुस्लिमांचा हज प्रवास सध्याच्या तथाकथित अनुदानासह होणाऱ्या प्रवासापेक्षा स्वस्तदेखील असू शकतो! हज यात्रेकरूंना एकूण अनुदान २५ हजार रुपये मिळत होते. प्रवासासाठी एकूण २ लाख रुपयांच्या जवळपास खर्च होत होता. या बचतीच्या आमिषापोटी त्यांना अनेक सेवांना मुकावे लागत होते. कारण हा पैसा एअर इंडियाला देण्यात येत होता आणि एअर इंडिया प्रवाशांशी मन मानेल तसे वागत होती. मुस्लिम लोक नेहमीच या हज अनुदानाचा विरोध करीत आले आहेत. कारण अनुदानाच्या आडून संपूर्ण समुदायाचे शोषण केले जात होते. निश्चितच आता ते थांबेल. वास्तविक पाहता हजची पवित्र यात्रा करणे हे प्रत्येक मु्स्लिम व्यक्तीचे वैयक्तिक कर्तव्य आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अनुदानाची गरज नाही. हे तर सरकारकडून भारतीय मुस्लिमांना इंदिरा गांधींच्या काळापासून धोका दिला जात आहे. सामान्य लोकांना माहीत आहे की सरकार हज यात्रा करण्यासाठी मुस्लिमांना सरकारी अनुदान मिळते. मात्र या पवित्र यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांना उघडपणे दिलेला धोका आहे. खरे तर मुस्लिमांना या अनुदानाच्या नावाखाली बदनाम करण्यात येत होते. मात्र या अनुदानाद्वारे इंडियन एअर लाइन्स कंपनीला पोसले जात होते. एअर इंडिया कंपनी आता पूर्णत: डबघाईला आलेली आहे. तिच्या विक्रीची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. या कंपनीचे कोअर एअरलाइन्स बिझिनेस, रिजनल आर्म, ग्राऊंड हॅण्डलिंग आणि इंजीनियरिंग ऑपरेशन्स अशा चार भाग करून तिचे निगुंतवणुकीकरण केले जाणार आहे. एयर इंडियाचे वाढते कर्ज भागविण्यासाठी केंद्र सहकारने एफडीआयला मंजुरी दिली आहे. मार्च २०१७ मध्ये एअर इंडियाचे एकूण कर्ज ४८,८७७ कोटी होते, पैकी १७,३६० कोटी रुपये विमान कर्ज होते आणि ३१,५१७ कोटी भांडवली कर्ज होते. एफडीआयची मंजुरी मिळताच सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची सरकार विक्री करणार असल्याचे नागरी विमान राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले आहे. निर्गुतवणुकीची ही प्रक्रिया या वर्षी पूर्ण केली जाईल. या निर्णयामुळे भांडवलदार तर खूश होतीलच त्याचबरोबर मुस्लिमेतर मतदारदेखील खूश झाल्याशिवाय राहणार नाहीत.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget