Halloween Costume ideas 2015
Latest Post

Punishment

ह़क वो नहीं जिसपर लोग कायम हो

ह़क वो है जिसपर दलील कायम हो

जेव्हा कुठे घृणास्पद गुन्ह्याची घटना घडते तेव्हा अनेक लोक शरई शिक्षांची मागणी करू लागतात. दस्तुरखुद्द एल.के. आडवाणी यांनी निर्भयाच्या घटनेनंतर तर राज ठाकरे यांनी कोपर्डीच्या घटनेनंतर अशी मागणी केली होती. हाथरसच्या मागासवर्गीय मुलीवर झालेल्या कथित सामुहिक बलात्कार आणि खुनाच्या घटनेनंतर ही जनसामान्यांमधून आरोपींना शरई शिक्षा देण्याची मागणी समाजमाध्यमातून पुढे आली. अधून-मधून शरई शिक्षा देण्याची मागणी यासाठी उठते की, आपल्या देशात लागू असलेली फौजदारी न्यायव्यवस्था ही कुचकामी आहे. ब्रिटिश फौजदारी न्यायव्यवस्थेची नक्कल असलेली आपली न्यायव्यवस्था कुठल्याही अशा गुन्ह्यांमध्ये न्याय देण्यास सक्षम नाही ज्यात पीडित हे मागासवर्गीय, अल्पसंख्यांक किंवा गरीब असतील. 

शरई फौजदारी न्यायव्यवस्था ही ईश्‍वरीय कायद्यावर आधारित असल्यामुळे त्रुटीमुक्त आहे. यामधून कोणीही वाचू शकत नाही. याचा विश्‍वास लोकांना असल्यामुळे सामान्य असो की असामान्य सर्व स्तरातून शरई शिक्षांची मागणी अधून-मधून उठत असते. 

शरई शिक्षा हा विषय एक दुर्लक्षित विषय आहे. जेव्हा कधी घृणास्पद गुन्हे घडतात आणि मीडियामधून त्यासंबंधीची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि समाजमन उद्वेलित होते तेव्हापुरती ही मागणी पुढे येते व कालौघात मागे पडते. या कायद्याला एकीकडे रानटी म्हणायचे आणि दुसरीकडे त्याचीच मागणी करायची ही विसंगती का? शरई शिक्षा म्हणजे नेमके काय? त्यांचा उपयोग भारतात शक्य आहे काय? या शिक्षांचे स्त्रोत काय? याबाबतीत साधक-बाधक चर्चा कधीच होत नाही. हाथरसच्या घटनेनंतर पुन्हा ही मागणी पुढे आल्याच्या  निमित्ताने या विषयात थोडक्यात माहिती द्यावी, या उद्देशाने हा लेखन प्रपंच. 

हे सत्य आहे की, शरई शिक्षांची तरतूद ज्या देशात असेल तिथे गुन्हेगारी तग धरू शकत नाही. परंतु फक्त कठोर शिक्षा दिल्याने गुन्हे थांबतात असेही नाही. आपल्या देशात साधारणपणे खुनाच्या गुन्ह्यात मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. अनेक लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे, तरीपण रोज खुनाच्या घटना घडतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, केवळ कठोर शिक्षा दिल्याने गुन्हेगारी थांबत नाही. 

गुन्हेगारी कशी थांबते?

गुन्हेगारीसाठी उत्प्रेरक म्हणून जी काही कारणं असतात ती अगोदर समाजामधून नष्ट करावी लागतात व त्यानंतर कठोर शिक्षेची तरतूद करावी लागते तेव्हा गुन्हेगारी थांबते. केवळ कठोर शिक्षा दिल्याने थांबत नाही. उदाहरणार्थ बलात्कार्‍याला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यापूर्वी पुरूष बलात्कार करण्यासाठी का प्रेरित होतात? त्या कारणांचा शोध घेऊन ती कारणे अगोदर समाजामधून नष्ट करावी लागतात आणि त्यानंतरही कोणी बलात्कार केला तर त्याला मृत्यूदंड दिल्याने त्याचा परिणाम होतो. 

बलात्काराला प्रेरित करणारी समाजात जी कारणे आहेत त्यात अश्‍लील संगीत, अश्‍लील मालिका, अश्‍लील सिनेमे, पॉर्नोग्राफी, स्त्री-पुरूष यांच्यात अनावश्यक जवळीक निर्माण होईल अशी मुक्त समाजव्यवस्था, गर्भनिरोधक साधनांची प्रचूर उपलब्धता इत्यादी. ही कारणे नष्ट करण्यासाठी इस्लाम अगोदर स्त्री आणि पुरूष दोघांनाही समाजात कसे वागावे, यासाठीची आचारसंहिता प्रस्तावित करतो आणि शासनाला त्या आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी बाध्य करतो. 

पुरूष हे स्वभावाने पॉलिगॉमस (अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवण्यास इच्छुक) असल्याने त्याच्या या स्वाभाविक इच्छेची पुरती करण्याची व्यवस्था इस्लाम पुरूषांना एकापेक्षा जास्त विवाहाची परवानगी देवून करतो. म्हणजे एकीकडे बलात्कार असो का व्याभिचार दोहोंना प्रतिबंध करण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न करण्याचे निर्देश सरकारला देतो, तर दुसरीकडे समाजातील पुरूषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याची कायदेशीर परवानगी देतो. यातून पुरूषांची लैंगिक गरज कायदेशीररित्या पूर्ण होत असल्यामुळे त्यांना व्याभिचार किंवा बलात्कार करण्याची गरजच पडत नाही. एवढे असूनही जर एखादा विकृत व्यक्ती बलात्कार करतच असेल तर मात्र त्याच्या चुकीला माफी नाही. त्याला सार्वजनिक ठिकाणी मृत्यूदंड देण्याची तरतूद इस्लाम करतो. 

दूसरे उदाहरण कन्या भ्रृणहत्येचे देता येईल. कोणताही समाज असो कन्या भ्रृणहत्या करण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे महागडे लग्नसोहळे होत. इस्लाममध्ये, ”निकाह को आसान बनाओ” असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे. जेव्हा समाजामध्ये लग्न सोहळे न राहता ते सहज करण्यासारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा कन्याभ्रुणहत्या करण्याची गरजच शिल्लक राहत नाही. 

तीसरे उदाहरण चोरांचे हात कापण्यासंबंधीचे घेऊया. हे सत्य आहे की, ज्या हाताने चोरी केली तो हात छाटण्याच्या शिक्षेची तरतूद शरियतमध्ये केलेली आहे. मात्र ती शिक्षा देण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्यासाठी जो रोजगार हवा असतो तो पुरविण्याची जबाबदारी शरियतने शासनावर टाकलेली आहे. शासन जर ही जबाबदारी पूर्ण करत असेल तर कोण चोरी करेल?

वरील तिन्ही उदाहरणावरून एक गोष्ट चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आली असेलच की माणसांच्या स्वाभाविक गरजा पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. ती जबाबदारी शासन पूर्ण करत असतांनासुद्धा काही असामाजिक तत्व जर गुन्हे करत असतील तर मात्र त्यांना कठोर शिक्षा करण्याची तरतूद शरियतमध्ये आहे. असा अनुभव आहे की, ज्या देशातील सरकारे आपल्या नागरिकांच्या स्वाभाविक गरजा पूर्ण करतात त्या देशात गुन्हेगारी जवळ-जवळ नसतेच. त्यातूनही जर गुन्हेगार निपजलेच तर त्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकी असते व त्यांनाही सार्वजनिक ठिकाणी जबर शिक्षा दिल्या गेल्याने ज्यांच्या मनामध्ये गुन्हा करण्याची सुप्त इच्छा जागृत झालेली असते ते लोक आपल्या डोळ्यांनी जबर शिक्षा पाहून आपल्या इच्छेवर स्व:च ताबा मिळवितात व गुन्हे करण्यापासून दूर राहतात.

ही व्यवस्था औषधासारखी आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी माणसाने सकस आहार घेणे, व्यायाम करणे आणि वाईट व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. असे करूनही जर का आजार झालाच तर मात्र औषध घेणे प्रसंगी शल्यचिकित्सा करणे हाच उपाय हातात राहतो. गुन्हेगारीचेही तसेच आहे. अगोदर समाजामध्ये पवित्र वातावरण निर्माण करण्याची शासनाची आणि समाजाची सामुहिक जबाबदारी असते. ती पूर्ण केल्यावरही जर गुन्हेगार निपजत असतील तर त्यांच्यावर कठोर शिक्षेची शल्यचिकित्सा केली जाते. तेव्हाच त्याचा फायदा होतो व समाजातून गुन्हेगारी संपुष्टात येते, नुसते मृत्यूदंड दिल्याने ती संपुष्टात येत नाही 

या पार्श्‍वभूमीवर आपल्या देशातील परिस्थिती पाहूया. हत्या, चोरी, बलात्कार आणि इतर गुन्हे करण्यासाठी पोषक असे वातावरण आपण एकीकडे तयार करतो किंबहुना अशा वातावरणाला उत्तेजना देतो, एवढेच  नव्हे तर त्यामधून उत्पन्नाची नवीन-नवीन साधणे तयार करतो. भ्रष्टाचार करतो, दारू विकतो, अश्‍लील मालिका, चित्रपटे, पॉर्नोग्राफीमध्ये गुंतवणूक करून त्यातून आर्थिक लाभ उचलतो आणि या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम जेव्हा सामुहिक बलात्कार किंवा इतर भीषण गुन्हेगारीच्या स्वरूपाने समोर येतो तेव्हा मात्र साळसूदपणे आपण आरोपींना मृत्यूदंडाची मागणी करून मोकळे होते. यापेक्षा मोठा भंपकपणा दूसरा कोणता असेल? ज्याप्रमाणे वीटॅमिनच्या गोळ्या खाल्यामुळे कुपोषण दूर होत नाही त्यासाठी पौष्टिक आहाराच घ्यावा लागतो त्याचप्रमाणे समाजातून गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी केवळ कठोर शिक्षा देऊन उपयोग नाही, त्यासाठी गुन्हेगार तयार करण्यासाठी जी कारणं समाजात तयार होतात ती अगोदर बंद करावी लागतात तेव्हाच कठोर शिक्षेचा फायदा होतो, त्याशिवाय नाही. 

आदर्श सामाजिक वातावरण कसे निर्माण होते?

आदर्श सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी इस्लाम आपल्या मानणार्‍यांना दिवसातून पाच वेळेस नमाजची व्यवस्था देतो. वर्षाला तीस दिवसाचे उपवास करण्याची तरतूद करतो. आपल्या संपत्तीतून जकात, सदकात आणि फितरा देण्याची व बैतुलमाल तयार करण्याचा आदेश देतो व त्यातून समाजातील गरजवंतांची मदत करण्याची तरतूद करतो. महिलांना लैंगिक अत्याचारापासून वाचविण्यासाठी जन्मापासूनच मुला-मुलींचे स्वतंत्र संगोपन करण्याचे निर्देश देतो. कारण स्त्री-पुरूष हे एकमेकांकडे चुंबकासारखे आकर्षित होत असतात. म्हणून त्यांना लहानपणापासून वेगळे ठेवण्याची शिफारस करतो. स्त्रीला पर्दा, हिजाबच्या माध्यमातून सुरक्षित करतो तर पुरूषांना सुद्धा समाजात वावरतांना कसे वावरावे याची आचारसंहिता देतो. 

म्हणजे पहा ! अगोदर पवित्र सामाजिक वातावरणाची निर्मितीसाठी कल्याणकारी शासनाची व्यवस्था, मग पुरूषांच्या लैंगिक गरजांच्या पूर्ततेची त्यांच्या प्रवृत्तीनुसार सनदशीर तरतूद आणि मग कठोर शिक्षेची व्यवस्था. थोडक्यात गुन्हेगारी आपल्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ती तयारच होणार नाही, याची सर्व प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी समाज आणि शासन यांना इस्लाम बाध्य आणि प्रोत्साहित करतो आणि मगर एवढे केल्यावरही जर कोणी गुन्हा करत असेल तर मात्र दगडाने ठेचून मारण्याचे आदेश देतो.

आपल्याकडे दारूच काय ड्रग्ससुद्धा 24 तास उपलब्ध आहेत. अश्‍लिल सिरियल्स, उद्यपित करणारे चित्रपट, लैंगिक भावना चाळवणार्‍या वेबसाईट, बोटाच्या एका क्लिकवर रात्रं-दिवस उपलब्ध आहेत. स्त्री-पुरूष स्वातंत्र्याच्या नावाखाली सैराट संस्कृतीला समाजमान्यता मिळालेली आहे. अशा परिस्थितीत केवळ शरई शिक्षा देऊन अशा प्रकारच्या घृणित गुन्हेगारीला आळा घालता येईल, अशी कोणाची समजूत असेल तर ती फोल आहे. 

एक अंतिम उदाहरण घेऊन विषय संपवूया. कल्पना करा की ’अ’ ने ’ब’ च्या वडिलांची हत्या केली. प्रचलित कायद्याप्रमाणे पुराव्या अभावी ’अ’ सुटून जाईल. समजा शिक्षा झालीच तर ती जन्मठेपेची होईल. म्हणजे ’ब’चे वडिलही गेले आणि त्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून ’अ’ची तुरूंगात मरेपर्यंत जेवणाची सोय झाली. याला न्याय म्हणायचे काय? आता याच प्रकरणातील शरई व्यवस्था पहा. दोष सिद्धीनंतर काझी (न्यायाधीश) ’ब’ला विचारणार ”तू सांग ’अ’चे काय करायचे? त्याला मृत्यूदंड द्यायचा? की तू त्याला क्षमा करणार? की त्याच्याकडून नुकसान भरपाई घेणार?” या तीन पर्यायांपैकी एक पर्याय निवडीचे स्वातंत्र्य ’ब’ला आहे. त्याच्या मर्जीप्रमाणे त्या दोषसिद्ध झालेल्या गुन्हेगाराला कोण शिक्षा देईल. मात्र जगातील प्रचलित कायद्यामध्ये ’ब’ ला कोणीच विचारत नाही. ’अ’ला माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजे ’ब’च्या वडिलांची हत्या झाली आणि ’अ’चा गुन्हा माफ करणार राष्ट्रपती ! याला न्याय म्हणायचे का? 

राहता राहिला प्रश्‍न शरई शिक्षा रानटी आहेत काय? तर त्याचे उत्तर असे की, या शिक्षा रानटी नाहीत  मात्र कठोर जरूर आहेत. वादविवादासाठी असे गृहित धरूया की, या शिक्षा रानटी आहेत, तर माझे म्हणणे असे की, हत्या, बलात्कार, ड्रग्स यासारखे सारखे रानटी कृत्य करणार्‍यांना रानटी शिक्षा द्यायलाच हवी हे सुद्धा निसर्ग नियमाला धरूनच आहे. समाजातील भविष्यात होवू घातलेल्या गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी अशा शिक्षांची नित्तांत आवश्यकता असते. म्हणूनच सऊदी अरब सारख्या देशांमध्ये वर्षोनवर्षे गंभीर गुन्हे होत नाहीत. 

असो ! एका लेखामध्ये शरई न्यायव्यवस्थेचा यापेक्षा अधिक आढावा घेता येणे शक्य नसल्याने महत्वाचे तेवढे मुद्दे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.   बाकी हा एक मोठा विषय आहे. याचा स्वतंत्र अभ्यास करणे गरजेचे आहे.

अंदाज अगरचे के बहोत शूक नहीं हैं

शायद के उतर जाए तेरे दिल में मेरी बात.


- एम.आय. शेख


Madina

“आणि हे प्रेषित आम्ही तुम्हाला अखिल मानवजातीसाठी खूशखबर देणारा व सावधान करणारा बनवून पाठविले आहे.” (कुरआन)

  • प्रेषित मुहम्मद (स.) केवळ मुस्लिमांचेच नाहीत तर सर्वांचे प्रेषित आहेत. (बॅ. बाबासाहेब भोसले.
  • प्रेषित मुहम्मद (स.) एक थोर प्रेषित होते. त्यांनी अरबांना जगाचे मार्गदर्शक केले. त्यांनी अरबांच्या हाती जगाच्या संस्कृतीची मशाल दिली. (साने गुरुजी)
  • प्रेषित मुहम्मद (स.) यांचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. त्यांनी वेगवेगळ्या देवीदेवतांच्या जागी केवळ एकाच स्वामीवर श्रद्धा ठेवण्याची शिकवण दिली. त्यांनी जगातील वाईट चाली आणि अंधश्रद्धा मुळातून उखडून टाकल्या. (साने गुरुजी)
  • प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ना केवळ फौज, कायदा, शासन आणि राज्य अस्तित्वात आणले किंबहुना तत्कालीन जगाच्या एक तृतीयांश लोकसंख्येच्या अंतःकरणासही स्पर्श केला. एवढेच नव्हे तर त्यांनी वाद, धर्म, विचार, आस्था इत्यादींचे स्वरूप बदलून टाकले. (लेमर टाइम)
  • विनोबा भावे यांनी म्हटले आहे की प्रेषित मुहम्मद (स.) महापुरुष होते. त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर आले की माझी समाधी लागते.
  • मी, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या चरित्राचा अभ्यास केला आहे. ते महान मानव होते. माझ्या मते त्यांना मानवतेचे मुक्तिदाता म्हटले पाहिजे. माझी धारणा आहे की जर त्यांच्यासारखा मनुष्य वर्तमान विश्वाचा अधिनायक झाला असता तर त्याने विश्वाच्या समस्त जटील समस्यांचे अशा प्रकारे निराकरण केले असते की मानव विश्व अपेक्षित सुख-शांतीच्या संपत्तीने संपन्न झाले असते. (बर्नार्ड शॉ)
  • मायकेल हार्ट यांनी “दि हंड्रेड” नावाच्या पुस्तकात एकूण १०० जणांची यादी केली आहे. ज्यांनी मानवी जीवनावर प्रभाव पाडला आहे त्या यादीत प्रेषित मुहम्मद (स.) यांचे नाव पहिल्या स्थानावर आहे. (संदर्भ- पवित्र कुरआन ज्ञानाचे मूळ स्रोत, लेखक- दत्तप्रसन्न साठे, प्रकाशक- इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंबई) 
  • पवित्र कुरआन व प्रेषित मुहम्मद (स.) यांचे उपदेश हे अखिल मानवजातीसाठी आहेत.

समानता

“हे लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष आणि एका स्त्रीपासून निर्माण केले आणि तुम्हाला समुदाय व कुटुंबांत विभाजित केले जेणेकरून तुम्ही एक दुसऱ्याला ओळखावे. निःसंशय तुमच्यापैकी अधिक प्रतिष्ठित तो आहे जो अधिक ईशपरायण आहे.” (कुरआन)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे, एका अरबाला एखाद्या अरबेतरावर कोणतेही श्रेष्ठत्व प्राप्त नाही आणि एका अरबेतराला अरबावर सुद्धा नाही, ना एखाद्या गौरवर्णीयाला कृष्णवर्णीयावर. आणि कृष्णवर्णीयाला गौरवर्णीयावर. ईशपरायणतेव्यतिरिक्त वंशाच्या पायावर कोणतेही श्रेष्ठत्व नाही.

शांतता-

पवित्र कुरआनच्या अध्याय क्र. ५ मधील आयत क्र. ३२ मध्ये म्हटले आहे,

“ज्याने एखाद्या माणसाला नाहक अथवा पृथ्वीवर उपद्रव माजविण्याच्या कारणाविना ठार केले त्याने जणू सर्व लोकांची हत्या केली आणि ज्याने एका माणसाचे प्राण वाचविले तर त्याने समस्त मानवांना जीवनदान दिले.” (कुरआन)

न्याय-

पवित्र कुरआनचा अटळ नियम आहे की माणसाशी न्याय केला जावा, महान अल्लाहचा आदेश आहे,

“एखाद्या समूहाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून तोंड फिरवावे. न्याय करा, हे ईशपरायणतेच्या अधिक जवळ आहे.” (कुरआन)

प्रेषित मुहम्मद (स.) यांचे संदेश वर्ण, भाषा, देश इत्यादी तमाम भेदांच्या पलीकडे जाऊन समस्त मानवजातीला संबोधित करतात. त्यांचे काही उपदेश खालीलप्रमाणे-

  • मजुराला घाम वाळण्यापूर्वी मजुरी अदा करा. (हदीस)
  • काबाडकष्टाने हातावर घट्टे पडलेल्या एका कष्टकऱ्याच्या हाताला चुंबन घेऊन प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, तो श्रद्धावंत होऊच शकत नाही जो पोटभर जेवतो परंतु त्याचा शेजारी मात्र उपाशी राहतो. (हदीस)
  • प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, वैध उपजीविका कमविण्यासाठी प्रयत्न करणे ही एक उपासना आहे जशा इतर उपासना. (हदीस)
  • प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, द्वेष करण्यापासून दूर राहा, कारण द्वेष चांगल्या गोष्टींना (चांगुलपणाला) खाऊन टाकतो, जसे अग्नी लाकडाला भस्म करते किंवा गवताची राख करत. (हदीस)
  • प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, शंका घेण्यापासून सावध राहा. कारण शंका घेणे मोठे खोटारडेपणा आहे. एकमेकांचे द्वेष धुंडत बसू नका. एकमेकांची हेरगिरी करू नका, एकमेकांच्या पाळतीवर राहू नका. एकमेकांचा मत्सर करू नका. एकमेकांवर रागवू नका. एकमेकांकडून तोंड फिरवू नका. (हदीस)
  • प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जो अत्याचारीला व अत्याचार करण्यास बळ देतो आणि त्याला माहीत असते की तो अत्याचारी आहे तर अशा मनुष्य इस्लामचा त्याग केला आहे. (हदीस)
  • पर्यावरण संवर्धनासाठी व वैश्विक समतोल राखण्यासाठी प्रेषितांचे मार्गदर्शन मोलाचे आहे.
  • “एखादे झाड तोडावे लागले तर त्याऐवजी एक नवीन झाड लावावे व जोपासावे एखाद्याने वृक्ष रोपण करून त्याची निगा राखली तर जोवर जग त्यापासून लाभान्वित होईल तोवर त्याच्यासाठी शाश्वत पुण्याई आहे.” (हदीस)

- मोहम्मद खालीद जकी, 

चोपडा, 

मो.- ८९८३१०४६९९


ज्या दोन दिग्गज बहुजन नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपला सत्तेच्या दालनात एन्ट्री दिली यात माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांचा सिंहाचा वाटा आहे. या दिग्गज नेत्यांनी जर भाजपला साथ दिली नसती तर आज भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणात जे महत्त्व प्राप्त आहे ते त्याच्यासाठी दिवास्वप्नच ठरले असते.

शिवसेनेनं मराठी माणसांची बाजू घेऊन राजकारणात प्रवेश केला त्या वेळी राज्यात केवळ काँग्रेस पक्षच सत्तेवर होता. त्यास इतर कोणत्याही राजकीय शक्तीचे आव्हान नव्हते. काँग्रेसने सेनेला पाठिंबा दिला, एवढेच नव्हे तर सेनेच्या स्थापनेसाठीही तो अनुकूल होता. खरे पाहता काँग्रेसला राज्यातील डाव्या पक्षांचं राजकारण संपवायचे होते. विशेषतः मुंबईतून त्यांना हद्दपार करायचे होते. यामध्ये काँग्रेसला यश आले. सुरवातीस काँग्रेसचा डाव सेनेला मुंबईपुरतेच मर्यादित ठेवायचा होता. पण राम मंदिराच्या राजकारणाने देशाचं राजकारण ढवळून निघाले. तेव्हा सेनेनं मराठी माणसाचं हित सोडून हिंदुत्व अंगीकारलं. नंतर मुंबईबाहेर आपला प्रभाव सुरू केला. छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज बहुजन नेत्यांनी बहुजनांना सेनेत दाखल करून घेण्याची धुरा सांभाळली. अशा प्रकारे ज्या वंचित बहुजनांना काँग्रेसने म्हणजेच मराठा समाजाने कायम उपेक्षित ठेवले होते, त्यांना आता सेनेत आधार मिळाला. पण जेव्हा १९९४ साली प्रथमच सेना-भाजपचे युती सरकार महाराष्ट्रात जन्माला आले अशा वेळी त्याच भुजबळांना ज्यांनी सेनेला सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवले होते त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी न देता मनोहर जोशींना ते पद सोपवले. तेव्हापासूनच छगन भुजबळ नाराज होते. नंतर सेनेशी बंड करून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दुसरीकडे भाजपने सेनेच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करीत एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने बहुजनांची मोठ्या प्रमाणात साथ मिळवली. २०१४ साली सेना-भाजप युतीला सत्तेची दुसरी संधी मिळाली. या वेळी मात्र गोपीनाथ मुंडे नव्हते. पण २००९ पासून २०१४ पर्यंत जे एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते त्यांना मुख्यमंत्रीपदावर नियुक्त न करता ज्या देवेंद्र फडणवीसांना नागपूरपलीकडे कोणी ओळखत नव्हते त्यांना मुख्यमंत्री केले. आधी खडसेंना मंत्रीपद दिले, नंतर त्यांच्यामागे भूखंड घोटाळ्यापासून विनयभंग प्रकरणात गुंतवून ठेवले. पाच वर्षे वाट पाहूनसुद्धा खडसे आपला मानसन्मान परत मिळवू शकले नाहीत. सुमारे चाळीस वर्षे भाजपची लाचारी बाळगल्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आपल्या जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. याच काळात फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये टाकले. अशा प्रकारे भाजपने आधी गोपीनाथ मुंडे, नंतर भुजबळ आणि आता खडसे या शक्तिशाली बहुजन नेत्याचा प्रभाव संपवून टाकला. भुजबळ राष्ट्रवादीत असतानादेखील आणि राष्ट्रवादीचा भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला असूनही फडणवीसांनी भुजबळांचे हाल केले, पण राष्ट्रवादीने त्यांच्या बचावासाठी काहीही केल्याचे एकिवात नाही. आता भुजबळ आणि नुकतेच एन्ट्री घेतलेले खडसे यांच्या साहाय्याने शरद पवार काँग्रेसपासून दुरावलेल्या बहुजनांमध्ये आपल्या पक्षाचा प्रभाव पाडण्याचा आणि नंतर त्यास मतदानात रूपांतरीत करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ज्या पक्षाचा मुलाधार मराठा समाज आहे त्यास हे कितपत पटणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आधी भुजबळ आणि आता एकनाथ खडसे, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या यांना मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवण्यामागे काही केल्या पेशवाई विचारांचे सरकार सत्तेवर नेहमी असावे हा यामागे हिंदुत्ववादी विचारधारेचा डाव आहे हे सर्वांना माहीत आहे. राज्यात शरद पवार एकीकडे मराठा समाज आणि बहुजनांना एकत्रित करून आपली राजकीय शक्ती बळकड करीत आहेत. त्याच वेळी ते शिवसेनेची हिंदू व्होट बँक पूर्णतः भाजपच्या पदरात जाऊ नये यासाठी सेनेला कोणती हानी होता कामा नये याची काळजी घेत राहाणार आहेत. राज्यात खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याने या पक्षाची शक्ती अधिक बाढणार आहे. आधीपासून पक्षात असलेल्या भुजबळांना खडसेंची साथ मिळेल आणि या दोघांमुळे मोठ्या संख्येने बहुजनवर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित होईल. सध्या राष्ट्रवादीत जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल तटकरेंसारखे तरुण आणि प्रभावशाली नेते आहेत. त्याचबरोबर अशाच प्रकारचे भुजबळ आणि खडसेंसारखे दिग्गज नेते राष्ट्रवादीत आहेत. या सर्वांच्या तोडीचा एकही नेता भाजप आणि काँग्रेसकडे नाही. त्याचबरोबर राष्ट्रवादी सोडून ऐन निवडणुकीच्या काळात जे नेते भाजपला मिळाले आहेत ते जर परतले तर या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल. काँग्रेस पक्ष नावाला उरला आहे. त्यांचे वैचारिक केंद्र नागपूरहून त्यांना जसे कळवते तसे ते करत असतात. राष्ट्रवादीतील मराठा समाजाने जर या सर्व पार्श्वभूमीला समजून घेतले आणि बहुजनांचा त्यांनी विश्वासघात केला नाही तर यात त्यांचेच राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे, हे त्यांना कळायला हवं. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना आपल्या भाषणात म्हटले की आज त्यांच्या डोक्यावरचे ओझे उतरले आहे. त्यांना हलके वाटत आहे. हे ओझे शरद पवारांच्या डोक्यावर पडले आहे. पवार ही बदलती परिस्थिती कशी हालाळतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. खडसे रा. स्व. सांचे कार्यकर्ते होते की आहेत माहीत नाही पण त्यांनी एक विधान केले होते की “संघात अशा प्रकारचे संस्कार केले जातात की गाढव जरी संघात दाखल झाले तरी ते माणूस म्हणून बाहेर पडते.” पण भाजपमधून जे बाहेर पडतात त्यांच्याविषयी काय? हे त्यांनी सांगितले नाही.


Madina

“उजाड, वैराण, वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद

जगातल्या दीन दु:खीतांचा अखेरचा आसरा मुहम्मद”

कवीवर्य – सुरेश भट.

वरील ओळींवरून प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांची महती लक्षात येते. जगातील कुठल्याही जाती – धर्माच्या विचारी माणसांना प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) भुरळ पाडली होती. ज्यानी इस्लाम स्विकारला केवळ त्यांच्याच मनात मुहम्मदांविषयी (स.अ.व.स) आदर भाव होता असे नव्हे – तर आपल्या स्वत:च्या धर्माशी थोडीही प्रतारणा न करता जगातील बहुतेक साऱ्याच सुशिक्षित आणि विचारी माणसांनी त्यांचे मोठेपण मान्य केलेले आहे. मायकल हार्ट या ख्रिश्चन लेखकाने जगाच्या जडणघडणीवर ज्यांचा विषेश प्रभाव पडला अशा आजपर्यंतच्या 100 महान व्यक्तींवर एक पुसतक लिहले आहे. – ‘द हंड्रेड’ (The Hundred). त्यात त्यांनी या व्यक्तींच्या प्रभावानुसार त्यांची क्रमावारी लावलेली आहे. या क्रमवारीत प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांना प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे. आपल्या पुस्तकात पैगंबरांना सर्वप्रथम क्रमांक देण्यामागचे कारण सांगतांना मायकल हार्ट म्हणतात की, मुहम्मद (स.अ.व.स) हे धार्मिक व संसारिक या दोन्ही क्षेत्रांमध्ये समान रुपाने यशस्वी आहेत. त्यांनी आध्यात्मिक व नैतिक दृष्ट्या अतिशय मागासलेल्या व दरिद्री समाजामध्ये इस्लामच्या शिकवणीला प्रारंभ करून त्याला एका जागतिक पातळीवरील महान धर्मामध्ये रुपांतरीत केले. त्यांचं व्यक्तीत्व डबक्यासारखं मर्यादित न राहता एखा़द्या खळाळणाऱ्या झऱ्यासारखं होतं. म्हणूनच कवीवर्य सुरेश भट त्यांचा उल्लेख “खळाळणारा झरा मुहम्मद” असा करतात.

प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) तत्कालीन वर्तमानाशी तर झुंजलेच पण त्यांनी दिलेल्या तात्विक व नैतिक बळावर इस्लाम आजही अज्ञान व अत्याचाराच्या अंधाराशी झुंजतो आहे. ज्या मरुक्षेत्रातील सृष्टी पुर्णत: पराभूत होती आणि अंतरआत्मे हारलेले होते. तेथेसुध्दा प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) जिंकले. जन्मत: ज्यांच्या नशीबी मरण केवळ नोंदलेले होते अशा मुलींसाठी ते मुक्तीदाता जाहले. ह्या जगात चांगल्यांना तर सारेच मान देतात पण मुहम्मद (स.अ.व.स) उद्धटांशीसुध्दा नम्रतेने वागले. म्हणूनच ते साऱ्या जगाला भावले. परंतु अंधश्रध्दांवर आधारीत ज्यांची धर्मविक्रीची दुकाने बंद झाली होती, अशांना ते झोंबले सुध्दा !

प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) इस्लामचा प्रसार तात्विक आणि नैतिक बळावर केला. एक गैरसमज नेहमीच इस्लामबद्दल पसरवला जातो की हा धर्म तलवारीच्या बळावर पसरवल्या गेला. कुराण अध्याय २: वचन २५६ मध्ये स्पष्ट बजावतो, “धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही.” याच गोष्टीला अधिक स्पष्ट करतांना कुराण अध्याय १० : वचन ९९ मध्ये सांगतो, “धर्म स्विकारण्याकरीता कोणालाही भाग पाडल्या जाऊ शकत नाही.” त्याच अध्यायात सांगितले आहे, “आमचे हे कर्तव्य आहे की आम्ही इमानधारकांना वाचवावे.” त्यासाठी म्हणून प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) हाती खडग धरले होते. त्यांनी तर इतर धर्मीय व इतर उपास्यांना मानणाऱ्यांबद्दल सुद्धा सन्मान ठेवण्यासाठी आपल्या अनुयायांना आज्ञा केली होती. अध्याय ६: वचन १०८ मध्ये स्पष्ट केलेले आहे, “(हे मुस्लीमांनो), हे लोक अल्लाह शिवाय ज्यांचा धावा करतात त्यांचा उपहास करू नका.” परंतु दुर्देवाने सध्याच्या काळात सहिष्णुतेची परंपरा असणाऱ्या भारतासारख्या राष्ट्रात सुद्धा इस्लाम बद्दल गैरसमज निर्माण करून हेतुपुरस्सररित्या द्वेष पासवल्या जात आहे.

प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) यांनी आयुष्यभर जगाला शांतीचा संदेश दिला. अरबी भाषेत ‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘शांती’ असा आहे. त्यामुळे आतंकवाद, नक्षलवाद सारख्या द्वेषाधारित गोष्टींना प्रेषित मुहम्मदांच्या (स.अ.व.स) ठायी मुळीच थारा नाही. कुराण आपल्या अध्याय २: वचन ८४ मध्ये म्हणतो “आपसांत एकमेकांचे रक्त सांडू नका. एकमेकांना आपल्या घरापासून बेघर करू नका. तुमच्यापैकी जे लोक असे करतील त्यांना ऐहिक जीवनामध्येही कठोर यातनांकडे नेले जाईल आणि निवाड्याच्या दिवशी त्यांना यापेक्षाही कठोर शिक्षेच्या दिशेने नेण्यात येईल.” कुराण अध्याय ५: वचन ३२ मध्ये असे म्हणतो, “ज्याने एखाद्या माणसाला विनाकारण ठार केले तर त्याने जणु काही सर्व मानवांना ठार केले.” 

भारतीय संविधानाने भारतातील सर्व नागरीकांना, मग ते कुठल्याही जाती-धर्माचे असोत आपल्या कर्तव्याचे पालन करत असतांनाच आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आजकाल असं करणं म्हणजे जणुकाही देशद्रोहच आहे, असं जाणीव पूर्वक सर्वसामन्य जनतेच्या मनावर बिंबवण्याचा य्रयत्न केल्या जात आहे. विशेषत: हक्कांसाठी संघर्ष करणारी व्यक्ती जर मुस्लीम असेल तर तिच्याकडे ती व्यक्ती देशद्रोहीच आहे की काय अशा नजरेने पाहिल्या जाते. वस्तुस्थिती तर ही आहे की प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) देशद्रोहापासून मुस्लीमांना दूर राहण्याबद्दल सक्त ताकीद दिलेली आहे. ज्या देशात ते राहतात तो देश व तेथील प्रशासन यांच्याशी निष्ठा बाळगण्याचे आदेश त्यांनी दिलेत, मग तो देश इस्लामीक असो की नसो. कुराण अध्याय ४: वचन ५९ मध्ये म्हणतो, “हे मुस्लीमांनो, आज्ञापालन करा त्या लोकांचे जे तुमच्यापैकी आज्ञाधिकारी असतील.” याचा अर्थ असा नव्हे की नागरीकांनी गुलामांप्रमाणे रहावे. याच वचनात पुढे म्हटल्या गेले आहे, “लोकांना शासक व शासन यांच्याशी मतभेद करण्याचा अधिकार सुद्धा आहे आणि आम्ही संवैधानिक पद्धतीने आपल्या हक्कांसाठी लढू शकतो.”

प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) आवश्यकता पडल्यास लढण्याचा जरी आदेश केला असला तरी दोन देशांमधील तहाला फार महत्व दिले आहे. दोन देशांमध्ये जर तह झालेला असेल तर इस्लामिक देशाला कुराण म्हणतो, “संधीचा करार असतांना तुम्ही गैरइस्लामिक देशात राहणाऱ्या मुसलमानांना त्यांनी मागीतल्यावर सुद्धा त्यांची सहाय्यता करू शकत नाही.” (८ : ७२). इस्लाम पुढं कुराणच्या माध्यमातून असं म्हणतो, “जे तुमच्याशी लढतात आणि तुमच्या शत्रूंची मदत करतात त्यांच्या सेाबत मित्रता होऊच शकत नाही.” (६० : ९). ह्या कुराण वचनांवर एक दृष्टीक्षेप टाकल्यावर आपल्या लक्षात येईल की कोणताही खरा मुसलमान अशा कुठल्याही मुस्लीम देशाशी (मग तो पाकिस्तान असो की दुसरा कोणताही) केवळ तो देश मुस्लीम आहे म्हणून आपल्या देशाशी गद्दारी करून मैत्री करूच शकत नाही. भारतीय मुस्लीमांवर कोणीही त्यांच्याबद्दल भय निर्माण करून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करूच शकत नाही. देशद्रोह प्रेषित मुहम्मदाच्या (स.अ.व.स) शिकवणीत बसतच नाही.

प्रेषित मुहम्मद (स.अ.व.स) हे खरे स्त्रिवादी होते. इस्लाम हा जगातील पहिला धर्म आहे, ज्याने स्त्रियांना शिक्षण आणि वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार दिला. प्रेषित मुहम्मदांच्या (स.अ.व.स) आधी अरबस्तानात मुलीने जन्म घेताच तिला जमिनीत जीवंत पुरण्याची क्रूर प्रथा होती. या अमानवीय प्रथेच्या विरोधात प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) बंड पुकारून ही प्रथा बंद पाडली आणि तेथील लोकांना भृणहत्या करण्यापासून परावृत केले, कुराण म्हणतो, “गरीबीच्या कारणास्तव आपल्या संततीला मारून टाकू नका.” प्रेषित मुहम्मदांच्याच (स.अ.व.स) प्रेरणेने संपूर्ण इस्लामी जगतात स्त्रिशिक्षणाचा प्रसार झाला. एकच उदाहरण पुरेसे होईल: जगातील पहिले महिला विद्यालय इ. स. ८५९ मध्ये मोरोक्को येथे फातिमा अल फीहरी या मुस्लीम महिलेने स्थापन केले. विधवा-विवाहाची परवानगी देणारा इस्लाम हा जगातील बहुतेक पहिला धर्म असावा. प्रेषित मुहम्मदांनी वयाच्या २५ व्या वर्षी एका ४० वर्षाच्या विधवेशी लग्न करून आपल्या अनुयायांच्या समोर एक उदाहरण ठेवले. समाजातील गरीब, विधवा, परित्यक्ता, गुलाम, स्त्रियांच्या भरणपोषणाची जबाबदारी प्रेषित मुहम्मदांनी (स.अ.व.स) तत्काली शासन कर्त्यांवर टाकली होती.

साडे चौदाशे वर्षे लोटलेली असली तरीही मुहम्मद (स.अ.व.स) नावाचा ‘खळाळणारा झरा’ अजूनही कोट्यावधी लोकांच्या हृदयात खळाळतो आहे. म्हणूनच कवीवर्य कलीम खान सर्वशक्तीमानाला एक मागणी मागतात.

“बुद्धीस दे विज्ञान पण हृदयामध्ये कुरआन दे

माझा मुहम्मद वेगळा, त्याची फकीरी शान दे.”


- समीना खालीक शेख (यवतमाळ)

७३५०२४८२३८


Arab Traders

अलाउद्दीन खिलजीच्या काळात जियाउद्दीन बरनी हा बाजार आणि अर्थकारणाचा अभ्यासक होता. त्याने बाजार व्यवस्थापनाचे अनेक नियम सांगितले आहेत. त्याने मांडलेल्या ‘दारुल अदल’ या महागाई, साठेबाजारी रोखणाऱ्या बाजारपेठेच्या संकल्पनेला त्याकाळी खूप यश आले. बरनीने बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयीची आपली मते इस्लामी अर्थशास्त्रावर आधारीत असल्याचे म्हटले आहे. इस्लामी तत्त्वज्ञानामुळेच या नव्या संकल्पनेने जन्म घेतल्याची पुष्टीही त्याने आपल्या लिखाणाला जोडली आहे. प्रेषित मुहम्मद (स.) मदीनेत असताना त्यांनी ‘दारुल अदल’ सारख्या आर्थिक शोषण नाकारणाऱ्या बाजाराची स्थापना केली होती. हे बाजार मस्जिद ए नबवीच्या शेजारी होते. या बाजाराविषयी प्रेषितांनी त्या वेळी भूमिका मांडताना म्हटले होते, ‘हा तुमच्या स्वतःचा बाजार आहे. इथे कुणीच तुमच्याशी जबरदस्ती अथवा फसवणूक करणार नाही. कुणीच तुमच्याकडून जुलमी करदेखील घेणार नाही.’ या बाजाराच्या आधारे प्रेषितांनी व्यापाऱ्यांच्या मनमानीला लगाम लावला होता.

मदीनेतील बाजारस्थापनेमागची कारणमिमांसा

प्रेषितांनी मदीना शहरात स्थापन केलेल्या बाजारामागची पार्श्वभूमी कथन करताना डॉ. मेहमूद अहमद गाजी लिहितात, ‘या बाजाराची स्थापना करुन प्रेषितांनी इस्लामच्या अर्थव्यस्थेची मूलभूत तत्त्वेच सांगितली. प्रेषितांनी म्हटले होते की, बाजारात जे लोक व्यापार करतील त्यांना पुर्णतः स्वातंत्र्य असावे. त्यांना कोणत्याही बाह्य प्रभावाने आपल्या इशाऱ्यावर चालण्यासाठी बाध्य करु नये. अनैसर्गिक पध्दतीने वस्तूंच्या दरांमध्ये चढ-उतार होऊ नये. साठेबाजी होऊ नये. आणि कोणत्याच व्यक्तीला बाजारात आपला माल आणण्यापासून रोखले जाऊ नये.’ ही घोषणा करण्यामागे एक मुलभूत कारण होते. 

 ‘मक्का शहरात कातडीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असे. कातडे विकण्यासाठी मदीना शहरातील बाजारात मक्केतील व्यापारी येत असत. ज्यू सावकारांना याची माहिती मिळाल्यानंतर ते मदीना शहराच्या बाहेर जाऊन त्या व्यापाऱ्याला रोखत. त्याला बाजारातील दराची माहिती मिळू देत नसत. त्याच्याकडून संपूर्ण माल खरेदी करत. त्यामुळे या सावकारांना बाजारातील दरांवर नियंत्रणही ठेवता येई. या प्रकाराने माल विकणाऱ्या संबधित व्यापाऱ्याला बाजारातील दरामुळे मिळणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागे. प्रेषितांनी या प्रकाराला निषिध्द ठरवले. आणि बाजारातील स्वातंत्र्याची घोषणा केली.’ त्याशिवाय प्रेषितांनी ग्रामीण उत्पादनव्यवस्थेला शहरी प्रभावापासून रोखण्याचे प्रयत्नही केले. त्यांनी ग्रामीण भागातील उत्पादक घटकांकडून शहरी व्यक्तींवर माल खरेदी करण्यासाठी निर्बंध लादले. शहरी व्यापारी ग्रामीण भागातील उत्पादक घटकाकडून वस्तू खरेदी करुन शहरातल्या बाजारपेठेत मनमानी दरावर विकत होते. या नव्या नियमामुळे ग्रामीण उत्पादक घटकाला थेट बाजारपेठेत प्रवेश मिळाला. आणि शहरी व्यापाऱ्यांच्या दलालीलाही लगाम लागले.’

इब्ने खल्दून हे इस्लामप्रणित प्रगत अर्थशास्त्राचे व्याख्याता मानले जातात. त्यांच्या मते, ‘बाजारातील शोषण संपवून इस्लामने सामान्यांच्या जगण्याला आधार दिला. बाजारात श्रमाचे मुल्य, वस्तूंचे मुल्य आणि नफ्याविषयी इस्लामने मांडलेला सिध्दांत शोषणव्यवस्थेला संपवणारा ठरला. इस्लाम हा नव्या जगातील माणसांसाठी माणूसकीचा संदेश घेऊन आला होता. कारण त्याने जीवनासाठी गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देणारी बाजारपेठ त्याच्यासाठी सुकर केली होती.’ इस्लामने मांडलेला श्रममूल्याचा सिध्दांत हा बाजारातील मुजोर व्यापारी आणि उत्पादन करणाऱ्या धनदांडग्यांना उघड आव्हान होते. श्रमिकांना सन्मान देण्यासाठी इस्लामने सक्तीची धर्मकर्तव्ये म्हणून काही नियम केले. नफा ठरवणारी अनियंत्रित व्यवस्था मोडीत काढण्यासाठी इस्लामने नफ्याचे प्रमाण ठरवून दिले. 

हल्फुल फुदूल करार आणि शोषणाला आव्हान

प्रेषितांनी मक्का शहराच्या समाजजीवनात इस्लामच्या स्थापनेआधी केलेला पहिला हस्तक्षेप हा बाजारातील शोषणाविरोधात होता. प्रेषितत्वापूर्वी मुहम्मद (स.) यांनी ‘हल्फुल फुदूल’ हा करार मक्का शहराच्या बाजारात न्यायाच्या प्रस्थापनेसाठी घडवून आणला होता. मक्का हे शहर व्यापारीकेंद्र होते. आंतरराष्ट्रीय मसाला मार्गावर वसलेले हे शहर अरबांची सांस्कृतिक राजधानी म्हणून इतिहासात ओळखले जायचे. व्यापाऱासाठी भटकणाऱ्या इथल्या नागरीकांना भटकंतीमुळे आणि शहरात येणाऱ्या बाहेरच्या व्यापाऱ्यांमुळे उर्वरीत जगातल्या सांस्कृतिक घडामोडी ज्ञात व्हायच्या. 

मक्केतील काही व्यापाऱ्यांकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले होते. ते त्यांच्या हिताची व्यवस्था लहान व्यापाऱ्यांना वेठीस धरुन जन्माला घालत. त्यामूळे कित्येक व्यापारी भिकेला लागत. शहरात श्रीमंत आणि गरीब अशी दरी निर्माण झाली होती. व्यापारी मार्गावरील शहर म्हणून बाहेरील अनेक उद्योजक मक्का शहरात यायचे. नव्या उद्योगांची सुरुवात करायचे. तेथील कनिष्ठ वर्गीय मजूरांमुळे आणि भिकेला लागलेल्या लहान व्यापार्यांमुळे मजुरांची संख्या मोठी होती. व्यापारी तांड्यासोबत हे मजूर शेकडो मैल चालून जात. सातत्याने होणाऱ्या आर्थिक शोषणातून या मजुरांची स्थिती दयनीय झाली होती. त्यातच व्यापाऱ्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या सावकरांनी आर्थिक शोषणाची सीमा ओलांडली. शोषणाचे हे चक्र मक्का शहराच्या अर्थकारणाला वेठीस धरत होते. 

आर्थिक शोषण सामाजिक अराजकतेला आमंत्रण देते. अरबांना प्रिय असणाऱ्या मक्का शहरात माजलेली ही अराजकता अरबी मनाला अस्वस्थ करणारी होती. म्हणून कालांतराने ‘हल्फुल फुदूल’ सारखे करार करुन अरबी युवकांनी आर्थिक शोषणाच्याविरोधात एल्गार केला. तारुण्यात प्रेषित मुहम्मद (स.) हे त्या करारातील एक महत्त्वाचा दुवा होते. प्रेषिततत्वाची घोषणा केल्यानंतर देखील प्रेषितांनी पुढे आयुष्यात कधीही ‘हल्फुल फुदूल’ सारख्या सामंजस्य करारात सहभागी होण्याची संधी मिळाली, तर आपण त्यासाठी सिध्द असल्याचा पुनरुच्चार अनेकदा केला. 

यामुळेच प्रेषितांना मक्का शहरातील धनिकांचा सर्वाधिक विरोध सहन करावा लागला. कारण या विरोधाच्या मुळाशी प्रेषितांद्वारे होऊ घातलेल्या आर्थिक बदलांची भिती होती. आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या भांडवली घटकांना त्याच्या अर्थकारणाला आव्हान नको होते.  एच. आर. गिब या मताची पुष्टी करताना म्हणतात, ‘मक्कावाल्यांचा विरोध त्यांच्या रुढींना (इस्लामने) आव्हान दिले म्हणून नव्हता. किंबहूना त्यांच्या धार्मिक अंधश्रध्देमुळे देखील तो विरोध नव्हता. मात्र त्या विरोधाच्या मुळाशी आर्थिक आणि राजकीय कारणे होती. मुहम्मद (स.) प्रणित समाजक्रांती त्यांच्या आर्थिक समृध्दीला प्रभावीत करण्याची शक्यता आधिक होती. नवस्थापित इस्लाम त्यांच्या मूर्तीप्रणित अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करु पाहत होता.  प्रेषितांनी अर्थव्यवस्थेत सांगितलेले बदल अरबांच्या नफेखोरीला, शोषणाला रोखत होते.’  ते गरीबांचे अधिकार आणि सामान्य व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांना जपण्याचे तत्त्व सांगत होते. 

ज्या गटाचे शोषण उच्चवर्गीयांच्या हितांशी बांधील असणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे झाले होते. त्यांना इस्लामी अर्थव्यवस्थेची ही नवी तत्त्वे आकर्षित वाटत होती. धर्मप्रेरीत भांडवली सत्तेला इस्लाममुळे मिळालेले आव्हान मक्का शहरातील कनिष्ठ व मध्यमवर्गीयांना आकर्षित करत होते. त्यातही शोषित युवकांना इस्लामी परिवर्तनाने आपल्या बाजूला वळवले. असगर अली इंजिनीयर युवकांच्या सहभागाविषयी माहिती देताना लिहीतात, ‘ सुरुवातीच्या काळात इस्लामी आंदोलन समाजातील दुर्बल व पीडित व्यक्तींच्या विचारांना अभिव्यक्त करत होते. त्यामुळेच हे संशोधन रुचीपूर्ण ठरेल  की, (इस्लामचे) आरंभीचे समर्थक कोण होते? अब्दुल मुतअल अस्सईदी नावाच्या एका इजिप्शीयन लेखकाने याविषयी संशोधन केले आहे. ते म्हणतात, नवस्थापित इस्लाम मुळात युवकांचे आंदोलन होते. ज्या लोकांच्या वयांची नोंद आढळते त्यामध्ये हिजरतच्या वेळी (मक्काहून मदीनेत स्थलांतर करताना) मोठी संख्या ४० हून कमी वयाच्या व्यक्तींची होती. त्यांनी आठ ते दहा वर्षापूर्वी इस्लामचा स्वीकार केला होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्केतील भांडवलदारांना इशारा दिला होता की, त्यांनी साठेबाजी करु नये, श्रीमंतीचा अहंकारी अभिमान बाळगू नये. हेच पीडित, गुलाम आणि अनाथांना अधिक आकर्षक वाटायचे.’ 

बाजाराचे नियमन

सामान्य माणसांच्या शोषणाचे केंद्र बाजार होते. बाजारातून मक्केतील अर्थकारण चालायचे. त्यामुळेच बाजारातील अर्थकारण, व्यवस्था, व्यवहार हा प्रेषितांच्या जिव्हाळ्याचा विषय होता.  प्रेषितांनी केलेल्या बाजाराच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. यासीन मजहर सिद्दीकी लिहीतात, ‘बाजाराचे व्यवस्थापन हे शासनव्यवस्थेचा प्रमुख म्हणून इस्लामी राज्याच्या प्रमुखाचे कर्तव्य होते. प्रेषित वचनसंग्रहातून हे सिध्द होते की, प्रेषित स्वतः बाजारांचा दौरा करायचे. व्यापऱ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करीत. वस्तूंच्या दरातील चढ-उतार, श्रमिकांची स्थिती वगैरेंची माहिती घेत. ‘तिरमिजी’ या प्रेषित वचनसंग्रहात एक प्रसंग नोंदवला आहे. प्रेषित एकदा बाजारातून जात होते. त्यांनी एकेठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाचे ढिग पाहिले. प्रेषितांनी त्या ढिगाऱ्यात हात घातला. गव्हू ओलसर असल्याची त्यांना जाणीव झाली. प्रेषितांनी त्या व्यापाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. आणि ग्राहकांशी धोकेबाजी करण्यास मनाई केली.’

प्रेषितांनी बाजारात दलाली आणि दरांमधील कृत्रिम चढउतार रोखण्यासाठी प्रयत्न केले. बाजारात एकाच ठिकाणी उत्पादक व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करण्यास मनाई केली होती. खरेदीची ठिकाणे व विक्रीची ठिकाणे अलग करण्यात आली होती. व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या धोकेबाजी, मनमानीला लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे काही इस्लामी विद्वानांचे मत आहे. याकरीता प्रेषितांनी बाजाराचा प्रमुख म्हणून आधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.  मक्केवरील विजयानंतर तत्काळ प्रेषितांनी बनु उमैय्या वंशाच्या सईदी घराण्यातील सआबद बिन सईद यांना मक्का शहराच्या बाजारात आधिकारी म्हणून नियुक्त केले. मक्का शहराचे अर्थकारण, बाजारपेठेवरील नियंत्रणासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्वाची होती. यापध्दतीनेच हजरत उमर यांना मदीनेच्या बाजाराचा प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्याकाळात व्यापारी मदिनेच्या बाजाराला अतिशय महत्त्व देत.

मदीनेची बाजारपेठ त्याकाळात अनियंत्रीत होत चालली होती. देश-विदेशातील व्यापारी तेथे व्यापारास येत होते. त्यामूळे मदीनेच्या बाजारावरील उमर यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते. ज्या शहरातल्या बाजारात प्रमुखाची नियुक्ती केलेली नव्हती, त्याचे व्यवस्थापन त्या प्रदेशाच्या प्रमुखाकडे दिले होते.

साठेबाजारी आणि तोलन मापन

बाजारात सट्टेबाजारीवर प्रतिबंध घालण्यात आले होते. मदीनेच्या बाजाराची सुरुवात करताना प्रेषितांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी म्हटले होते, ‘आमच्या या बाजारात कुणी साठेबाजारी करु नये. असे करणाऱ्याला तीच शिक्षा दिली जाईल जी अल्लाहच्या संदेशात प्रक्षेप करणाराला दिली जाते.’ बाजारातल्या तोलन-मापनातली अनियमितताही प्रेषितांनी दूर केली होती. कुरआननेच याविषयी स्पष्ट आदेश दिला आहे. सूरह अल्मुतअफीन मध्ये काटा मारणाऱ्या आणि वस्तूंचे वजन कमी तोलणाऱ्यांची निंदा करण्यात आली आहे. याविषयी कुरआनमध्ये अनेक नियम सांगितले आहेत.

प्रेषितांनी बाजारात तोलन-मापनाची व्यवस्था एकसारखी असावी यासाठी काही नियम केले होते. डॉ. मेहमूद अहमद गाजी लिहितात, ‘बाजाराला चांगल्या पध्दतीने चालवण्यासाठी बाजारातील तोलन मापनाची पध्दत एकसारखी असणे गरजेचे असते. जर प्रत्येक व्यक्ती तोलन-मापनासाठी वेगवेगळे परिमाण वापरायला लागला की, बाजारातील वजन तोलनाची प्रक्रिया न्यायी राहणार नाही. प्रेषितांनी या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतला. वजन मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या परिमाणांचे परीक्षण करुन त्याला बाजारात लागू केले. आणि सर्वांना हेच परिमाण वापरणे बंधनकारक केले होते.’  दुसऱ्या शहरांमध्ये तोलन मापनाच्या या प्रक्रियेत काहीसे बदलही केलेले होते. 

समारोप

इस्लाम हे जीवनवादी तत्त्वज्ञान आहे. जीवनाला आधिकाधीक निकोप करण्यासाठी इस्लामने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. आणि काही नियम सांगितले आहेत. इस्लामने जीवनातल्या सर्वप्रकारच्या शोषणाला नाकरून नव्या व्यवस्थेची संकल्पना समोर ठेवली आहे. बाजार हे जीवनाची गरज पूर्ण करणारे माध्यम आहे. त्यामुळे बाजाराचे नियमन ही त्याकाळातील अपरिहार्य गरज होती. इस्लामने अर्थकारण आणि बाजाराचे नियमन सांगून आर्थिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली.

-सरफराज अहमद

(लेखक गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत.)



लातूर जिल्ह्यातील अहमदपूरसारख्या छोट्या तालुक्यातून प्रा.डॉ. सय्यद अकबर लाला यांनी शुन्यातून आपले जीवन घडविलेले आहे. एमएस्सी. डी.फार्म, एमएड, पीएचडी पर्यंत शिक्षण झालेले सय्यद अकबरलाला हे व्यावसायाने प्राध्यापक आहेत. मुक्तरंग प्रकाशन लातूर यांच्या मार्फतीने त्यांचे हे कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आलेले असून, कविता का लिहिली? या प्रश्‍नाच्या उत्तरादाखल पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकाने म्हटलेले आहे की, ”पोट भरण्यासाठी पैसा कमाविणे आवश्यक आहे मात्र ते ही योग्य मार्गाने. पैसा हे बहुतांश आहे सर्वस्व नाही. पैशाने भौतिक सुख मिळते मात्र आत्मिक सुख नाही. अति पैसा कमाविण्याच्या चिंतेने रात्रीची झोप उडते. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. माझा देश मला काय देईल, यापेक्षा माझ्या देशाला मी काय देऊ शकतो, हा विचार घेऊन मी जीवन जगत आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले असतांनासुद्धा मी जिद्दीने मराठी भाषा विकसित केली म्हणूनच माझ्या या कविता संग्रहाला जिद्दीचे पंख म्हणून नाव दिले आहे. 

डॉक्टर तुमचे :ख पाहूने, मन सुन्न झाले

बालरोग तज्ज्ञ राहूनही तुम्ही हजारो बालकांचे प्राण वाचविले. 

झाले जीवनाचे वाळवंट या पहिल्याच कवितेतील या चार ओळी व त्यानंतरची संपूर्ण कविता एका वृद्धाश्रमामध्ये राहणार्‍या बालरोग तज्ज्ञ डॉक्टरच्या जीवनाचा वेध घेते. ज्याची दोन्ही मुलं विदेशात राहतात व त्याच्या अंत्यसंस्काराला सुद्धा येत नाहीत व परस्पर अंत्यसंस्कार करून आस्थी कुरिअरने पाठवून द्या, असा निरोप देतात. हृदय पिळवून टाकणारी ही कविता वाचणार्‍याला सुन्न करून टाकते. 

आयुष्यभर सोबत राहूनही जवळ कधी बसत नाही

एकाच राष्ट्रात राहूनही एकमेकांना प्रेमाने वागवत नाही

नंतर स्वातंत्र्य मिळणार नाही, या शिर्षकाखाली या कवितेच्या ओळी हिंदू मुस्लिम संबंधातील महत्त्व अधोरेखित करणारे आहेत. संपूर्ण कविता वाचल्यानंतर देशाहितासाठी या दोन्ही समाजांनी एकत्र येण्याची किती गरज आहे, हा संदेश या कवितेतून देतो. 

शाहण्या माणसानं आत्महत्या करावं 

मग वेड्या, भिकार्‍यांनी कसं जगावं

नाही आत्महत्या करणार या शिर्षकातील ह्या ओळी असून, शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचं विदारक सत्य या कवितेतून मांडण्यात कवि यशस्वी ठरलेला आहे. आयुष्याच्या संध्याकाळी काठीचा आधार या 24 व्या क्रमांकावर असलेल्या कवितेमध्ये कवी म्हणतो, 

मुलांसाठी आई-वडिल देह झिजवितात

मुलं आई-वडिलांना सोडून जातात

या कवितेतून वृद्ध आई वडिलांच्या आयुष्याच्या संध्याकाळाचे चित्रण कविने अतिशय प्रभावीपणे केलेले आहे. 25 व्या क्रमांकाची कविता भ्रमणध्वनीच्या दुष्परिणामांबाबत तरूणांना सावधान करणारी असून, 

कामापुरता मोबाईलचा वापर करूनही

काही युवक पोहोचलेत उच्च पदावर

या सुरूवातीच्या ओळीतून दहा कडव्यांची ही कविता आकार घेत जाते. या कवितेत भ्रमणध्वनीपासून होणार्‍या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या आजारांपासून होणार्‍या नुकसानीसंंबंधीचे चित्र आपल्या शब्दातून रेखाटलेले आहे. 

भूलथापांना बळी पडत आहोत, या 48 व्या कवितेतून भारतीय राजकारणारचे चित्रण केलेले असून, असे चित्रण 50 व्या कवितेतूनही करण्यात आलेले आहे. 51 वी कविता स्वच्छतेला समर्पित असून, स्वच्छ भारत या केंद्र शासनाच्या योजनेचे महत्व अधोरेखित करणारी आहे. एकंदरित हा कविता संग्रह वाचनीय झालेला आहे. 


पुस्तकाचे नाव : जिद्दीचे पंख (कविता संग्रह). 

एकूण कविता : 51,      

लेखक : प्रा.डॉ.अकबर सय्यद लाला

मुल्य : 100


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget